एक हात कठड्यावर ठेऊन,
अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन,
मी उभा आहे गॅलरीत!
तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर
मन रमून गेले फार!
इथेच बसून नाही का लावत
तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला!
नाही.....वेडा नव्हतोच कधी
समंजस होतो खूप म्हणून
गॅलरी नाही ओलांडत
आजही!
मला नाही जमत लिहायला,
तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला!
इतकं जग पाहूनही
प्रेमबीम पण नाही कळत मला!
पण....तू तिथे कुस बदललीस कि
इथे माझी झोपमोड होते,
एवढेच बारीक जाणवते!
अन, अवेळी उठून मी
एक हात कठड्यावर ठेऊन
उभा राहतो गॅलरीत
कुणी हाक मारेपर्यंत.....!
अमुचा नमस्कार घ्यावा
आमचे एक मित्रसुद्धा शीघ्रकवी
In reply to आमचे एक मित्रसुद्धा शीघ्रकवी by प्रचेतस
पण ते फक्त हगोष्ण काव्य रचतात
शान्त गदाधारी भीम !
अरे
व्वाह! बहुत अच्छे..मजा आया।
रोफ्ल
प्रश्न पहिला माझा,
In reply to प्रश्न पहिला माझा, by मितभाषी
हा हा, हलकेच घेतल्याबद्दल
In reply to हा हा, हलकेच घेतल्याबद्दल by संदीप डांगे
मी पण
In reply to हा हा, हलकेच घेतल्याबद्दल by संदीप डांगे
धन्यवाद डांगेसाहेब