अवचित ते घडले, जणू आभाळ फाटले, धरणी कंपली
एक सुनामी आली की जगबुडी झाली,
अन बाई सोडून गेली
किती केली विनवणी, तिज आमिषेही दिली
पाषाणहृदयी त्या बालेला परि दया जराही न आली
अन बाई सोडून गेली
म्हणे तुम्हास बाई मिळेल दुसरी, जर शोधाशोध केली
जीव माझा जरी गेला, काळजी का कोणा इथे वाटली
अन बाई सोडून गेली
तरी बयेस कधी न कामास जुंपले, कायम लाडीगोडी केली
तऱ्हा तिच्या सांभाळत, आंजारत गोंजारत कामे करून घेतली
तरीही बाई सोडून गेली
म्हटले चला तर आता, कामाला लागायची वेळ झाली
बाई मंगळावर जरी पोचली, घरची कामे का तिला चुकली
कशी बाई सोडून गेली
झाडून काढता काढता, जळमटे डोक्यातली निघाली
फरशी पुसता पुसता, लख्ख सफाई
हाहा मस्तच हे पण !
=))
In reply to =)) by प्रचेतस
गुरुबिन कौन बताये बाट!
प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट!
In reply to प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट! by मिसळलेला काव्यप्रेमी
आपका ह्रुदय बहुत बोले तो
अ र्र् र र....
In reply to अ र्र् र र.... by नीलमोहर
सोप आहे...
हे व्हर्जनही आवडले...
मस्त मजबुरी
वा