मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

भिकारी

शार्दुल_हातोळकर ·
असे एक वेडा तिथे तो भिकारी भुकेच्या आकांती जगाला पुकारी तमा न तयाला उन्हा-पावसाची दिसे भुक डोळी किती त्या दिसाची नसे आप्त कोणी तया पामराला जीवा साथ द्याया कुणी न घराला थकुनी कधीचा फिरे तो अभागी कुठे श्वान वेडे तयापाठी लागी अधु पाय त्याचा अधु लोचनेही नसे त्राण त्याच्या जराजीर्ण देही करुणा जगाची कुठे आज गेली दशा मानवाची खुलेआम झाली दिले हाकलोनी जया अन्न मागी अखेरी उपाशी बसे एक जागी आगीने भुकेच्या जणु अर्धमेला म्हणे तुच देवा पाहा लेकराला किती लोक आले किती लोक गेले तया पाहताही किती थेट गेले कुणी एक आला दिली त्यास नाणी दुवा देई त्याला अधु त्या हातानी असे वंचिताचे कि ते संचिताचे जिणे हे नश

वास्तव

विशाल कुलकर्णी ·
पोचले कोणी तिथे स्पर्शून ते चंद्रास आले उंबऱ्याने बांधलेले शेकडोंनी 'चंद्र' येथे ... झुंजले काळासवे ते मृत्यूसही जिंकून गेले 'मी'पणाने जिंकलेले शेकडोंनी 'इंद्र' येथे ... जोखडाचे हार आम्ही माळलेले मस्तकावर कस्पटासम देह तरीही वाटते भीती जराशी आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' माणसा रे माणसा, जाणून घे नियती स्वतःची जात-धर्म, प्रांत-भाषा हीच परिमाणे जगाची माणसाची जात कोणा ओळखू ना ये कधीही मान टेकावी जिथे ती असे पोळी सुळाची विशाल...

कसा फुलताना दिसू?

चांदणे संदीप ·
नाही ओठावर हसू डोळा नुसतेच आसू उभा आत जळताना कसा फुलताना दिसू? रूपाची तुझ्या चांदी झळाळे उष्ण बेभान माझ्या उघड्या मनाने सांग कसे आता सोसू? तुझी साद खोलवर चिरत मला गेलेली आता नव्या पाखरांच्या गाण्यांना मी कसा फसू? तुला मिळालाय कोरा चकाकता तो आईना माझी जागा सांग कुठे सांग कुठे आता बसू? - संदीप चांदणे

जरा जपून

Bhagyashri satish vasane ·
बोलतांना जरा जपून बोलावं शब्द ही अर्थ बदलतात चालतांना जरा जपून चालावं कधी रस्ते ही घात करतात झुकतंना जरा जपून झुकावं कधी आपलेच खंजिर खुपसतात ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी मानसे आपला रंग बदलतात पाऊल टाकतांना जरा जपून टाकावं कधी फुले ही काटे बनतात मागतांना जरा जपून मागाव कधी आपलेच भाव खातात नात जोडतांना जरा जपून जोडावं कधी नकळत धागे तुटून जातात...!

(शीर्षक सुचले नाही )

कवि मानव ·
माझ्या फाटक्या दारिद्र्याला ठिगळ लावीत होतो, ज्यांनी मज बहिष्क्रीत केले, त्यांची थोरवी गाजवत होतो !! त्यांनी माझ्या प्रेमाची बहुत लावली बोली, मी निस्सीम जगाचा प्रियकर, फुकटच वाटत होतो !! इथे प्रत्येकेचा हेतू, प्रत्येकाला अहंकाराने डसले आहे, पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये, तो रंग सोडवत सोडवीत होतो !! किती देऊ परीक्षा खरा असण्याची, दर वेळी पराभूत होतो, मी या अजब दुनियेचा विद्यार्थी, कधी ना मोठा होतो !!

आयुष्य

Bhagyashri satish vasane ·
पायाला लागली ठोकर तिथे बांधायचे घर जिथे काहिच नाही तिथे आभाळ आहेच वर जिवनाचे पुस्तक लिहिले मी स्वत:च्या चेहर्यावर वाचता आले तर विश्वास ठेव वेदनांच्या त्या शब्दांवर तूला कधीच ह्या मनाचा मजकूर समजला नाही मी बंद लिफाफा आहे जो कुणी उघडलाच नाही मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो कुणाला समजलाच नाही मन माझे कुणाला कळलेच नाही, तळ हातावर पोट घेऊन कष्टकरी बनवत फिरत होते, इवल्याशा पोटाची भुक भागावी म्हणूनच तर रक्त जाळत होते...!

"स्व"....

माम्लेदारचा पन्खा ·
कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ .... कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ.... व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच..... जगात काय तो एकटा शहाणा मीच ! एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान..... आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !? आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ? का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ? जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार..... स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..! सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे जेव्हा वेळ पडेल तेव्हा "स्व"नाही ..स्वभाव कामी येतो "स्व" मध्येच अडकलात तर....प

मी स्त्रीशक्ती

माहीराज ·
बरोबरीने तुझीया आले, तुझ्याहून ही नाव जाहले, काय कमी रे माझ्या ठायी जे मी लढण्या आधीच हरले ... नऊ मास मी त्रास सोसुनी जन्म जरी हा तुजला देते, तरी पुन्हा हे भ्रुणहत्येचे पाप माझ्याच माथी येते. ... तुच अपुरा माझ्यावाचुन साथ तुला शतजन्मी देते, मान्य तुला ना सत्य हे सारे म्हणून भोग हे निमित्त ठरते ...   जाणुन घे रे किंमत माझी तुला न ठावे हिम्मत माझी  शांत ज्योतीसम ही जळणारी आग अंतरी शतजन्माची ...

श्रद्धांजली

निनाव ·
श्रद्धांजली लागावी कशी झोप आम्हा आत्ता कळले जेंव्हा - सरहद्दी वर वाहिले रक्त ते , आमुच्या शांत झोपे साठी होते! हसावे आम्ही कसे आत्ता, झालात तुम्ही हसत हसत हुतात्मा दोषी वाटते आम्हा आज गाफ़ील चारित्र्य आमुचे होते ! उठू आम्ही सर्व आत्ता लढू आम्ही वैरास बांधू आम्ही हा देश ऐसा पाहिले स्वप्न जैसे तुम्ही होते !

मी एकटी ....

राजेंद्र देवी ·
मी एकटी .... एल तीरावर मी एकटी पैलतीर त्याला नाही समोर पसरला अथांग दर्या साजणाचा पत्ता नाही परतुनी आले सारे अजून तो आला नाही रात्रीचा चंद्र देतसे तो येईल याची ग्वाही रंग हळदीचा अन मेंदीचा अजून उतरला नाही स्वप्नांचे जहाज बुडाले साजणाचे तारू वाचले का नाही ? बघत बसते खुणा वाळूतल्या निरखीत असते लाटांनाही नकोत रत्ने मज सागरा का साजण माझा परत देत नाही ? राजेंद्र देवी