मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

लाघवी

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
तूझ्या कपाळावर रेंगाळणार्‍या अल्लड, अवखळ... किंचीत खोडसाळ बटा, थेट आतवर वेध घेणारे उत्कट डोळे, आणि... ओठावरचे मिश्किल हसू...!! अलिकडे मात्र उन्मुक्त बटांनाही, वारंवार सावरायला लागली आहेस तू... डोळ्यातली उत्कटता आर्त होतेय आजकाल तू काही बोलत नाहीस... ओठावर मात्र अजूनही तेच मिश्किल हास्य... त्या बंद ओठाआड मात्र, कधी पोहोचताच येत नाही बघ... सगळं आर्त ... त्या मिश्किल हास्यात बेमालूम लपवतेस तू ! आणि ते म्हणतात... व्वा, केवढी लाघवी पोर आहे ! विशाल...

बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा सांगायलाच पाहिजे का? चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, ....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही ....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई .......

मोकळा आहे तरी ना मुक्त मी...

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
श्वास आहे घास नाही कोरडे नि:श्वास केवळ भाकरीचा चंद्र नाही, चांदण्याचा भास केवळ साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ मिरग गेला हस्त गेला पांढरीला ओल नाही धान नाही पेरणीला, पावसाची आस केवळ प्राक्तनी सगळ्या जिवांच्या शेवटी मातीच आहे मोह संपे ना तरीही, खेळ 'त्याचा' ख़ास केवळ खोल नांदे जखम ओली वेदनेला अंत नाही मोकळा आहे तरी ना मुक्त मी... आभास केवळ अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ विशाल ५/०९/२०१५

आयलान कुर्दी !

निनाव ·
लेखनविषय:
काव्यरस
त्या वीर मुलास प्रेम.पूर्वक श्रद्धांजली , ज्याचे मृत.देह इस्तांबुल च्या समुद्र काठी मिळाले. इस्लामिक स्टेट (कवितेत त्यांसाठी कावळा अशी उपमा वापरली आहे) च्या आतंका पासून स्वतःच्या परिवाराची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात अत्यान्त् सध्या होडीतून आपल्या परिवारास घेऊन अथांग सागराचा प्रवास करणाऱ्या ११ लोकांना घेऊन जाणारी होडी सागरात विलीन झाली. ह्या लहान ३ वर्षाचे मृत देह मात्र सागराने परतावले , जगास त्यांचे कर्म त्यांना दाखवून देण्या साठी. एवढीच आशा कि हे हृदय विदारक चित्र पाहून तरी आतंकी मन बदलतील.

चारोळी: माणुसकीची भटकंती!

निमिष सोनार ·
लेखनविषय:
काव्यरस
आजकाल माणुसकी भटकल्याने दुर्जनांच्या तावडीत सापडली आहे! माणसांनी तिला सोडून दिल्याने ती अनाथ आणि असहाय्य झाली आहे!

सुखी जग

शिव कन्या ·
लेखनविषय:
काव्यरस
याहूनी सुखी जग ते कोणते? भेटल्याचा आनंद नाही निरोपाचा खेद नाही.... आभासी जगातला फिल कसा गुड गुड व्हेरी गुड! आठवणींचे सेल्फी कुठले? हसल्याचा आवाज नाही मुसमुसल्याचा गंध नाही...... आभासी जगातला टच कसा साॕफ्ट साॕफ्ट मायक्रोसाॕफ्ट! कोण जागतो कोणासाठी? फिकट डोळे दिसत नाहीत उरली रात्र सरत नाही.... आभासी जगातला गुंता कसा क्रेझी क्रेझी काचणारा!

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

शुष्क

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
आयुष्य ना सुखांचे अंधार दाट होता बुद्धयाच वेदनांशी श्रृंगार थाटलेला झाली उजाड़ स्वप्ने, सत्यास दंभ होता चातुर्य प्राक्तनाचे कळलेच ना कदापी रक्तास चटक ओल्या लागून आज गेली जखमाच त्या, तयांशी, संसार थाटलेला अस्तित्व जाणिवांचे उधळून रात्र गेली त्यां टाळणे मलाही जमलेच ना कदापी होता तसाच आहे ओसाड माळ तिथला पान्हा वसुंधरेचा वक्षात गोठलेला मी रान शुष्क होतो पाऊस स्तब्ध तिथला गोंजारणे फुलांना रुचलेच ना कदापी झाडांस कोरडेपण जेव्हा असह्य झाले तो कोंब पालवीचा बुंध्यात आटलेला तो बहर जून होता फसवेच गंध झाले ते श्वास पाळणेही पटलेच ना कदापी विशाल कुलकर्णी

अणुयुद्ध (शतशब्दकथा)

सटक ·
पूर्वेकडुनीचा सूर्य, चन्द्र हतवीर्य, बुडाले बेट.. रक्तील दिलासे अर्घ्य, काहीना वर्ज्य, यमाची भेट !! त्या कितीक पडल्या रती, मदन संगती, जीव तो स्वस्त.. युद्धाची वाढे गती, नवे संगती, दुखवले दोस्त !! केलेच पाहिजे अता, शांत राहता, शेण तोंडात... जमवून खुळे ठरवता, गिधाडी जथा, घडे आक्रित !! अणुरेणू फुटाया आले, भरून घेतले, निघाले गगनी... बोटात वीष साठले, बटन दाबले, थरारे अवनी !! आकाशी फुलले झाड, मिळेना पाड, सुटेना गुंता... त्या जहरफुलाचे वेड, जीवाची राड, हलेना चिंता !! कित्येक चिरडले देह, धनाचा मोह, गळेना आता.. पसरला धरेवर डोह, तयाचा टोह, न लागे पुरता !! क्षणभरात सरले युद्ध, वारला बुद्ध, लपविती त

कळी

सनईचौघडा ·
लेखनविषय:
काव्यरस
अबला की सबला , वयस्क की बाला , नारी की कुमारी, ऑफिस, शाळा की पाळणाघरी, फुलायच्या आधीच कोमजली कळी , त्यांची नजरच विखारी , काळी की गोरी, शिकलेली की भोळी, मोलकरीण की अधिकारी , फुलायच्या आधीच कोमजली कळी, सावज हेरणारे हे अट्टल शिकारी, साडी असो की जीन्स तोकडे कपडे की पदडाशीन, गर्दीच्या बाजारी,की सुनसान आळी, फुलायच्या आधीच कोमजली कळी , कायमची जखम ती जिव्हारी . बोचर्‍या नजरा समाजाच्या येवु कशी माघारी? विसर म्हणता विसरु कशी, कशी घेवु नवी भरारी? अन् भय इथलं संपत नाही "निर्भया " म्हंटलत तरी * आणि ह्या ओळी पालकांना सांगुन सुध्दा ते मुलीकडे लक्ष देत नाहीत त्यांच्यासाठी.... आभाळाचा केला कागद , आ