Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेल्लाभट on Mon, 11/30/2015 - 12:11
ब्लॉग दुवा हा कविता - अमृतप्याला प्रेरणा : https://www.youtube.com/watch?v=f4qqdbRMYG0 www.azlyrics.com/lyrics/lukebryan/drinkabeer.html ---------------------------------------------------------------- अमृतप्याला आज ऐकुनि रुचले नाही काय म्हणावे सुचले नाही दिला ठेवुनि फोन तसाचि जे झाले ते पचले नाही दिशाहीन मी चालत सुटलो विचार मागे रेटत सुटलो दगडा दगडा मधे तरीही तुलाच वेडा भेटत सुटलो जावे वाटे घरी नकोसे हवे हवे ते जरी नकोसे विचार होती लाखो गोळा माझे असले तरी नकोसे इथेच बसुनि राहिन आता जलाशयाच्या या काठाला बुडत्या सूर्या पाहिन आता हाती घेऊन अमृतप्याला लोक चांगले सोडून जाती लाटांपरि ही विरती नाती बघेच असतो आपण सारे बसून बघतो काठावरती उद्या कसे हे असेल सारे कुणास ठाऊक काय कसे आजच्या परि दु:खावरती उपाय आता करू कसे इथेच बसुनि राहिन आता जलाशयाच्या या काठाला बुडत्या सूर्या पाहिन आता हाती घेऊन अमृतप्याला मला वाटते बरेच काही तुझे आता पण ठाऊक नाही आहे प्याला रोजचाच पण पूर्वीची त्या गोडी नाही तुझी आठवण येते फिरुनि मावळतीला इथेच बसुनि असायचो या काठावरती अमृतप्याला हाती धरुनि तसाच मी प्रत्येक दिसाला येईन तुजला भेटायाला अढळ स्थान देऊन टाकतो तुला आणि या सूर्यास्ताला जावे वाटे घरी नकोसे हवे हवे ते जरी नकोसे विचार होती लाखो गोळा माझे असले तरी नकोसे इथेच बसुनि राहिन आता जलाशयाच्या या काठाला बुडत्या सूर्या पाहिन आता हाती घेऊन अमृतप्याला 1 (छायाचित्र जालावरून साभार) - अपूर्व ओक

Submitted by मांत्रिक on Mon, 11/30/2015 - 12:42

Permalink

मस्तच!!! सुंदर!!!

मस्तच!!! सुंदर!!!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Mon, 11/30/2015 - 12:47

Permalink

सुंदर आहे कविता. आवडली!

सुंदर आहे कविता. आवडली!
  • Log in or register to post comments

Submitted by शार्दुल_हातोळकर on Mon, 11/30/2015 - 22:55

Permalink

छान!!

छान!!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 12/01/2015 - 12:55

Permalink

ज्जे ब्बात

ज्जे ब्बात
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Tue, 12/01/2015 - 13:22

Permalink

धन्यवाद

धन्यवाद विशाल, एस, शार्दुल, मांत्रिक
  • Log in or register to post comments

Submitted by शार्दुल_हातोळकर on Sat, 01/02/2016 - 14:24

Permalink

पुन्हा वाचली कविता, अतिशय अर्थपुर्ण !!

आज पुन्हा एकदा ही कविता वाचली, खरोखर अतिशय अर्थपुर्ण आणि उत्कृष्ट आहे !! म्हणुन परत एकदा प्रतिसाद...।.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 01/07/2016 - 15:55

In reply to पुन्हा वाचली कविता, अतिशय अर्थपुर्ण !! by शार्दुल_हातोळकर

Permalink

धन्यवाद शार्दुल :)

धन्यवाद शार्दुल :)
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on गुरुवार, 01/07/2016 - 17:52

Permalink

उत्तम कविता!

वाचनलिस्टात ॲडवली आहे इतकी आवडली आहे! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Tue, 01/12/2016 - 14:38

In reply to उत्तम कविता! by चांदणे संदीप

Permalink

थँक्स अ लॉट संदीप

थँक्स अ लॉट संदीप
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Tue, 01/12/2016 - 14:52

Permalink

छान कविता

छान कविता
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3219 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com