वेळूच्या बनात
एक पाखरू एकटे
शीळ देई वारियाला
सांगे जा तू घरट्याला
वारा उनाड बावरा
घुमे वेळूच्या भवती
म्हणे वेळूचे गे गाणे
गळा भर, पाखराला
पारा उन्हाचा महान
लखलख मृगजळ करी
कंठी पाखराच्या परि
पाऊस घरचा ओला
जीव बनी अडकला
जीव एक घरट्यात
देई हळवा संधिकाल
बळ नाजूक पंखाला
- संदीप चांदणे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4969
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम कविता संदिप.
अप्रतिम कविता संदिप.
मस्त
मस्त
वा वा वा वा वा! अप्रतिम
वा वा वा वा वा! अप्रतिम काव्य.
धन्यवाद!
___/\___
प्रतिसादासाठी धन्यवाद!
प्रचेतस आणि गुर्जींचे प्रतिसाद नेहमीच सुखावून जातात तर ३ए सरांचा प्रतिसाद म्हणजे एका कवीची अनमोल दाद!
धन्यवाद,
Sandy
धन्यवाद संदीप
In reply to धन्यवाद! by चांदणे संदीप
धन्यवाद संदीप
पण चांगल्या कलाकृतीला दाद ही मिळाल्याशिवाय कधीच रहात नाही.
असेच लिहित रहा....
आणि हो......
In reply to धन्यवाद! by चांदणे संदीप
सर नका म्हणु.....
एकेरी उल्लेख all ways welcome.
तेव्हढीच सहजता रहाते.
वोक्के....
In reply to आणि हो...... by एक एकटा एकटाच
वोक्के....नोटेड!
सुंदर शब्दरचना....
सुंदर शब्दरचना....
कविता आवडली.
कविता आवडली.
पण ...
शेवटच्या कडव्यात काहीतरी गडबड वाटली.
पुन्हा जरा निवांतपणे वाचते.
देई हळवा संधिकाल
In reply to कविता आवडली. by आतिवास
देई हळवा संधिकाल
बळ नाजूक पंखाला
ह्याएवजी
लागे हळव्या संध्याकाळी
पिसे नाजूक पंखांना
चालले असते असे वाटते का?
शब्दरचना उत्तम आहे...
In reply to देई हळवा संधिकाल by अभ्या..
शब्दरचना उत्तम आहे... पण अपेक्षित अर्थापासून दूर चालल्यासारखी वाटते! :)
अर्थात सॅन्डी.
In reply to शब्दरचना उत्तम आहे... by चांदणे संदीप
अर्थात सॅन्डी.
मला जर कविता करायला येत असती तर.... :(
.
असो. नाही येत तेच बरेय ;)
मी काय म्हणतो अभ्या साहेब
In reply to अर्थात सॅन्डी. by अभ्या..
तुम्हाला एक ट्राय करायला काय हरकत आहे.
मस्तचं की!
मस्तचं की!
!
In reply to मस्तचं की! by रातराणी
अलगद
कवीता..
मस्त
सर्वांचे आभार!
___/\___
आतिवासताईञ्च्या निवांत वाचनानंतरच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असलेला...
Sandy
अरे सॅण्डीबाबा त्या बुलेट
अरे सॅण्डीबाबा त्या बुलेट ट्रेन अन नास्तिक आस्तिकाच्या घोळात हे राह्यलेच की वाचायचे.
सॉल्लीड जमलीय.
पंखांना असलेली ओढ भिडली रे एकदम.
धन्यवाद अभ्यादादा!
In reply to अरे सॅण्डीबाबा त्या बुलेट by अभ्या..
___/\___
असंच होतंय आजकाल मिपावर माझपण! :(
सुरेख लय आहे कवितेला. आवडलीच
सुरेख लय आहे कवितेला. आवडलीच ..
उत्कृष्ट कविता
सुंदर काव्यरचना.!!
निखळ भावना अलगदपणे मांडलेल्या आहेत..