मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नेमक काय चुकतंय?

शब्दबम्बाळ ·
लेखनविषय:
काव्यरस
काल मला ती म्हणाली तुमचं माझ्याकडे दुर्लक्ष होतंय, संसाराच्या गाड्यात माझं एकटीच तिरकिट होतंय, तिचं देखील बरोबर आहे मला हे पटतंय, पण काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… कधीतरी मी तिचा हात प्रेमाने हातात घेतो, अलगदपणे मग तिला माझ्या मिठीत घेतो, जेव्हा ती पाघळत असते मिठीत माझ्या, नेमक तेव्हाच गॅसवरच दुधसुद्धा उकळतंय, काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… रात्रीच्या वेळी मी थोडा निवांत बसतो, तिच्याकडे पाहून मग छानसा हसतो, जेव्हा ती हि हसते गालात हळूच, नेमक तेव्हाच कार्ट आमचं भोकाड पसरतंय, काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… कधीतरी मी हिच्यासाठी मुद्दाम सुट्टी काढतो, कुठेतरी फिरवावं हिल

स्त्रीजन्म हीच आहे हर स्त्रीची चूक आता

वेल्लाभट ·

"स्त्रीची घुसमट छान शब्दात मांडली आहे" हे बरोबरच आहे ग भावना. पण तरिही मला ही थोडी आउटडेटेड कविता वाटतेय. आजची स्त्रि आता ईतकी लाचार नाहिये तर, बर्‍यापैकी स्वयंसिद्धा झालीय. 'अरे' ला 'का रे' करण्याची धमक पण येतेय. आपले हक्क, अधिकार समजतायेत तिला बरोबर. समाजही धिम्यागतीनी का होईना पण निश्चितच बदलतोय, खरं म्हणजे स्त्रि हा बदल घडवून आणतेय. या कवितेत फारच लाचार, दुबळी, गरिब, हेल्पलेस आणि होपलेस स्त्रि रंगवलीय यार... आणि पुरुषांचे जग म्हणजे अगदी 'no woman's land' टाईप भितीदायक दाखवलय. दोन्हीही कडे टोकच गाठलय.

In reply to by स्वप्नांची राणी

लोकल मध्ये कधी चुकून किवा सहकुटुंबहि पुरुष डब्ब्यात चढल्यावर तिथे आपल्यावरच रेंगाळणाऱ्या नजरा, स्थानकावर लोकलची वाट पाहत उभे असताना , बस मध्ये गर्दीच्या ठिकाणी आणि बरीच उदाहरणे देईन मी.आज हि इथली स्त्री एकटीने पुरुष डब्ब्यात चढण्याचे धाडस करणार नाही. मुंबई महानगरात रोज संध्याकाळी अश्या घटना रोज आंखो देखी आहेत. अपवाद असतील पण १०%. पण रोजच्या दिनचर्यात अश्या किती तरी नजरांचा सामना इथल्या स्त्रियांना करावा लागतो. छेडले जाणे हे क्वचित असले तरी अश्या नजरां रोज किती तरी स्त्रियांना सहन कराव्या लागतात. काहीजणी दुर्लक्ष करतात, काहीना फरक पडत नाही, काहींना असे काही असते हे कळतच नसते मुळात आणि काही ज्यात मी मोडते संताप होतो, शक्य तिथे नजरेने प्रतिकार करते, जमेल तिथे दोन लगावून हि देते पण माझा प्रश्न मुळात हाच कि का? तुमच्यासारखीच एक माणुस म्हणुन नाही पाहू शकत का? स्त्री आहे म्हणुन का या नजरा सहन करायच्या. स्त्री स्वयंसिद्धा झाली आहे, निर्भर आहे पण म्हणुन का हि मानसिकता बदलणार आहे का? परत मी सगळेच असे आहेत असे म्हणत नाही आहे पण किती हि पुढारले असले तरी त्यांच्यातला हा "पुरुष" ज्या दिवशी बदलेल तो सुदिन.

In reply to by भावना कल्लोळ

+१.. हेच म्हण्ते ग. पण पुरुषी मानसिकतेवर हि कविता काहिच भाष्य करत नाहीये. आणि किती सरसकटिकरण केलय. आणि वर परत 'स्त्रि जन्म हीच आहे चूक...' वगैरे आणखीन मानसीक खच्चीकरण. म्हणजे कवीचा हा उद्देश्य नाहिये ग, पण ध्वनित होतोय तसाच. या छापाच्या कवितांमुळे संतापानी पेटून उठणं वगैरे तर राहू द्यात बाजुलाच पण निरर्थक संशयाच वातावरणच निर्माण व्हायच.

In reply to by स्वप्नांची राणी

बॅटमॅन 29/01/2015 - 18:43
कोण हा भल्या? तदुपरि शेवटचे वाक्य वाचून "वयं युष्माकं के?" नामक चित्रपटातील "हे राम, युवतीनां एतद्युगम्" नामक गाण्याची आठवण झाली. ("वयं युष्माकं के" प्रेमी) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

'भल्या'च सोडा हो. पण हे असं 'हल्या'सारख एक-एकटं किती दिवस हवाबाण किंवा हवागोळे म्हणा सोडत राहणार... कल्जि वटते...

In reply to by स्वप्नांची राणी

बॅटमॅन 29/01/2015 - 18:59
कल्जि स्वतःपुरती ठेवा हो. अम्चि कल्जि कर्न्रे समर्त अहेत. शेवटी हवाबाण वा हवागोळे सोडणं हे कॉमनच आहे. एकटं काय अन दुकटं काय. तस्मात कल्जि वतयचि असेल त्र हव्बन सोदन्यचि वतवि. एकत्य-दुकत्यचि नहि.

In reply to by बॅटमॅन

पटल... पण सतत असे एकाक्शरी प्रतिसाद कॉपी-पेस्ट करण्यापेक्शा काहितरी ठोस अभिप्रेत आहे तुमच्याकडून. ठ्ठो म्हणजे अति झालं न हसू आलं .. आय मीन, हसू पण येत नाही ईतकं फुसकं झालय. अवांतर : चला, आमचा विकेंड सुरु!!!

सूड 29/01/2015 - 17:55
फारच जनरलायझेशन केलंय!! 'जळ्ळा मेला पुर्षाचा जल्म' टाईप प्रतिक्रिया टायपायला लागाव्या अशी उदाहरणे अजिबात आलेली दिसत नाहीत किंवा चान चान लिहायचं म्हणून लिहीलंय.

वेल्लाभट 29/01/2015 - 18:05
असे प्रतिसाद अपेक्षित होतेच. 'स्वप्नांची राणी' कतारात राहता तुम्ही. तुमच्याइथे शिरच्छेदाच्या वगैरे शिक्षा असतात असं 'ऐकून' आहे. इथे तसं काही फारसं नसतं. काही अंशी मान्य करतो तुमचं की अगदी इतकी अवस्था मुळीच नाही. जनरलायझेशन झालंय इत्यादी. मान्य. एवढच सांगतो की गर्दीच्या ठिकाणी मुलींकडे/बायकांकडे आसपासची उपस्थित मंडळी कशी बघतात हे मी जेंव्हा बघतो तेंव्हा मी जे म्हटलंय तेच मला वाटतं. बाकी चालूदे पानिपत.

पैसा 29/01/2015 - 19:50
असे अनुभव येतात. बलात्कार, स्त्रीभ्रूणहत्या थांबल्याचं ऐकू येत नाही, बातम्या येतच असतात. तरी एकीकडे लग्नाला मुली मिळत नाहीत अशीही तक्रार ऐकू येते आहे. विरोधाभास सगळीकडे. सुवर्णमध्य कधी साधला जाईल?

कतारात असले तरि सुरुवातीची वर्ष हे सगळे अनुभव घेत भारतातच काढलेली आहेत. पण या नजरांचा, नको तिथे स्पर्शान्चा मी सामना करत असताना त्या गर्दीतून कधीही कोणतीही मदत मिळालेली नाहिये मला. बर...मदतीची अपेक्षाही नाही पण त्या गर्दीतून एकहि ओळ 'पुरुषा तुझ्या जन्माची बाळग लाज आता'अशी येऊ नये....? म्हणजे त्या गर्दीचा तुम्ही एक हिस्सा आहात आणि तरीही त्या स्त्रिनेच स्वत:चा जन्म हीच चूक इतकी अगतिकता सहावि?? बाकी, हल्ली असल्या विषयांवरुन पानीपत होत नाही मिपावर. आणि पर्सनली घेऊ नका प्लीज.

In reply to by स्वप्नांची राणी

वेल्लाभट 29/01/2015 - 20:03
मी पर्सनली घेत नाहीच. पण तुम्ही 'लिटरली' घेतलंत ! 'स्त्रीजन्म हीच चूक' हा उद्वेगजन्य उपहास आहे; शेरा किंवा मत वगैरे नाही. त्यामुळे त्याचा शब्दार्थ नका ना घेऊ. मग कळेल काय म्हणायचं आहे ते.

सुचेता 29/01/2015 - 20:03
समजतोय ग तुला काय म्हणायचेय ते, आणि सुवर्णमध्य साधला जाईल तो सुदिन

कवी ची प्रतिभा आणि कोणाच्या मनात कधी काय विचार यावेत आणि ते कसे व्यक्त व्हावेत याबद्दलचा तुमचा पूर्ण अधिकार मला मान्य आहे इतकेच सांगून मी माझ्यातर्फे काही वाद सुरु होत असेल तर त्यावर पडदा टाकते. आणि हवाईझादा पहायला जाते. ओपन फोरम वर व्यक्त व्हायचा माझाहि अधिकार आहेच मुळी!!!

In reply to by स्वप्नांची राणी

बॅटमॅन 30/01/2015 - 14:47
नै म्हणजे तुमचे सगळे अधिकार मान्य आहेत. पणः आगंतुक भोचक सल्ला मोड ऑन> हवाईज़ादा हा पिच्चर बघू नका. वायझेड थीम आहे पिच्चरची. आगंतुक भोचक सल्ला मोड ऑफ>

In reply to by स्वप्नांची राणी

बॅटमॅन 30/01/2015 - 17:16
हम्म....पहा आणि परीक्षण लिहा म्हणजे 'व्हाय शुड आय सफर अलोन' चे उत्तरही स्वतःच देऊ शकाल. तदुपरि काही माहिती देत आहे. तुम्हांला वा अजून कुणाला अगोदर माहिती असेलही पण जनहितार्थ इ. जारी. तळपद्यांनी जे कै उडवले ते बलूनछाप होते. राईट बंधूंचे क्रेडिट हे की त्यांनी 'हेवियर दॅन एअर' विमान उडवले. एरवी जडपणामुळे जे हवेत उडू शकणार नाही असे विमान त्यांनी इंजिनाच्या जोरावर हवेत उडवले. 'लाईटर दॅन एअर' असलेले बलूनसारखे प्रकार अगोदरपासूनच अस्तित्वात होते. आणि भारतातही बलून उडवणारे तळपदे हे पहिले नव्हेत. त्यांची बातमी १८९५ ची आहे, तर १८८०-८५ च्या आसपास गुजरातेत एकाने तसे बलून उडवल्याचेही वाचले आहे. त्यामुळे कशालाच कसलाही आधार नाही.

एस 30/01/2015 - 15:11
कवितेच्या भाव्यार्थाशी सहमत आहे. बर्‍याचदा अशा प्रवृत्तींचा विषाद वाटतो. मानवजातीचा एक हिस्सा म्हणून मला व्यक्तिशः कधीकधी शरम वाटते समाजाच्या या बिनचेहर्‍याच्या गर्दीच्या वागणुकीची.

प्रत्येक नजर वाटे धरतेच डूख आता स्त्रीजन्म हीच आहे हर स्त्रीची चूक आता ||धृ|| हक्क कितीक आले आरक्षणेही आली आणि वेगळेपणाची मग लक्षणेही आली गर्दीत पुरुषांच्या कोंडतो श्वास येथे एकटेपणात होतो भलताच भास येथे शोधता स्नेह नयनी दिसतेच भूक आता कळपात श्वापदांच्या गत होई जी हरणाची होते तशी अवस्था अन भीती ही मरणाची एकही भला चेहरा ना वाटतो आधार सर्वांसमक्ष येथे घडतोही अत्याचार सगळा समाज वाटे झालाय मूक आता प्रत्येक नजर वाटे धरतेच डूख आता स्त्रीजन्म हीच आहे हर स्त्रीची चूक आता - अपूर्व ओक

दे दणादण

निनाद ·

पैसा 22/01/2015 - 11:12
व्यष्टीपासून समष्टीपर्यंतच्या प्रवासातला एक परिस्थितीशरण थांबा! याचे निरुपण शब्दात करणं लै कठीण बावा!!

नाखु 22/01/2015 - 12:36
आता याचे खंडकाव्य लिहायला घे ! जालीय शिक्षेत वाचायला लावू हा.का.ना.का. मूळ अवांतर : अचंभीत्/संभ्रमीत (आकाशपाळणा) अवस्थानुभव.

बंधन पद स्वीकृति त्वरे त्वरण परित्याग कर्तव्यार्थ असे शोषण प्लावन हे सहाधिकारी ते प्रवण समयसारणी हे निकट हे स्तरण पोतनिहाय नव्हे संवृत वर्गीकरण आकाशग मग कुंडल तंतु भारण पेशीभारण अभ्यंतर सयंत्र रोपण बंधन हे मूक कुंडलित अनुकूलन प्रतिपिंड ऋणाग्र भाव का अकरण ग्राभित विदरण का विरुप निःशोण रक्त विलयक नि प्रवाह प्रतिरुपण संमीलनीत स्फुल्लिंग निग रोपण विद्रधि युद्ध-संरूपणात हो संपादन वेदन प्रतितलीत बिंदुचे साक्षांकन कंकोळ असे कंप्रता नियंत्री धारण अभिनति दे अर्धपद्धति दे दणादण

माझेच (म्हणणे) खरे

नाखु ·

सतिश गावडे 05/01/2015 - 11:34
पण त्याचं काये काका, स्वस्तुतीमग्न पुरुषांच्या लक्षणांनुसार "जन काय म्हणतात" याच्याशी त्यांना काही कर्तव्य नसते. अशांना कधीतरी मग अपचन होते आणि त्यांची जालिय प्रतिमा "हेवनवासी" होते.

प्रचेतस 05/01/2015 - 16:12
भारी. बाकी फूटनोट्स पाहून आमचे एक कवी मित्र पूर्वी कविता अशाच प्रकारे समजावून द्यायचे त्याची आठवण झाली.

वि.कुं ची क्षमा मागून्.आणि खरे काकांना दंडवत घालून (शीर्षकात खरे शब्द वापरू दिल्याबद्दल) वाचनापूर्वी (गर्भीत) सूचना :काव्यरस व लेखन विषय नजरेखालून घालावा नंतर पश्चाताप नको. नेहमी प्रमाणे यावरील खुलाश्यास वा स्पष्टीकरणास आम्ही बिलकुल बांधील नाहीत तेव्हा अपेक्षा करून मुखभंग करून घेऊ नये. :-| :| =| :-| वि.सू.

..का आज सारे गप्प

मंदार दिलीप जोशी ·

एस 26/12/2014 - 16:41
कविता आवडली. ह्या प्रश्नावर भारतीय समाजात तितकी चलबिचल झाली नाही याचे एक कारण म्हणजे बोडोंचा प्रश्नही त्यांच्या बाजूने समजण्यासारखा आहे. बोडो जमाती आज त्यांच्याच प्रदेशात अल्पसंख्यांक ठरण्याच्या मार्गावर आहे. आसामच्या उत्तरेकडील या भागात खालील आदिवासी आणि बांगलादेशातून घुसलेले बेकायदेशीर लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. अर्थात हा एक मुद्दा झाला. ह्या प्रश्नाचे इतरही असंख्य पदर आहेत. आणि अशा अमानवीय दहशतवादाची जितकी निर्भत्सना करावी तितकी कमीच आहे.

In reply to by एस

बहुगुणी 29/12/2014 - 19:51
सहा वर्षांपूर्वी मी इथे लिहिलेल्या 'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या एका स्फुटाची आठवण झाली. स्वॅप्स म्हणताहेत तशी ही बहुपदरी समस्या आहे, त्यातील सीमेपलिकडून होणारं स्थलांतर (आणि दहशतवाद्यांची आवक) ही समस्या कित्येक वर्षे unresolved आहे, त्याविषयी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये २००८ मध्ये एका हताश ऑफिसरने हे म्हंटलं होतं: "While all attention was on Mumbai and the western frontier, no additional resources were deployed in the east. We did our best to nab as many as we could but many more could have got away through the extremely porous border," a senior officer said. Only about 550 km of the border with Bangaldesh in Bengal has been fenced. Of the remaining, nearly 267 km is a natural riverine boundary. मला वाटतं भारतीय समाज, आर्मी आणि राजकीय नेतृत्वाने आपली मानसिकता बदलण्याबरोबरच आपल्या आर्मी व सरकारने प्राधान्याने सच्छिद्र पूर्व सीमेचा बंदोबस्त करणं अतीव गरजेचं आहे.

श्रीगुरुजी 26/12/2014 - 20:37
बाहेरच्या लोकांनी असे कृत्य केले तर संताप दाखविता येतो आणि सहानुभूतीही दाखविता येते. पण आपल्याच लोकांनी असं केलं तर दोन्ही दाखविता येत नाही. आपलेच दात आणि आपलेच ओठ!

In reply to by काळा पहाड

hitesh 30/12/2014 - 10:01
काँग्रेसच्या काळात सगळ्या बातम्या समजत होत्या. मोदी आल्यापासुन दंगल , युद्धे याच्या बातम्या फारशा येत नाहीत. आसाम घडत असताना सगळे मेडियावाले भारतर्त्न भाज्पेयीना आरती ओवाळत होते

In reply to by hitesh

काळा पहाड 30/12/2014 - 12:25
काँग्रेसला विसरा आता. राहूल आणि सोनिया "आत" जाणार आहेत. राहिलेल्या काँग्रेस नेत्यांना भाजप घरवापसी करून प्रवेश देणार आहे. बाकी आसामचा प्रश्न काँग्रेसमुळेच निर्माण झालाय. त्याचा, काश्मीरचा अशा गोष्टींचा हिशेब चुकता करणं बाकी आहेच.

In reply to by काळा पहाड

hitesh 30/12/2014 - 13:46
नानाचा डायलॊग आठवला."बच्चा समझके कंधे पे लिया तो कानमे...." नमोभक्तांच्या कानाची काळजी वाटते आहे.

In reply to by hitesh

काळा पहाड 30/12/2014 - 14:26
मी नमोभक्त नाहिये हो. (सध्याचे) गांधी (आणि वड्रा) विरोधी आहे. त्यासाठी मला नमो चालतील, केजरीवाल चालतील. मुलायम चालतील. अपवादः ममता बॅनर्जी (हिच्या ऐवजी राहुल गांधी सुद्धा चालतील).

पैसा 30/12/2014 - 13:53
आपल्या तात्कालिक सोयीसाठी दीर्घ मुदतीच्या परिणामांचा विचार न करणारे राजकारणी जोपर्यंत आहेत तोपर्यंत असए प्रश्न विचारणे आणि हताश होणे याशिवाय आपल्या हातात काही नाही. तुम्ही एकगट्ठा मतदान करून सरकारे बदला, पण दुसरा येतो त्याच्याकडे पाहिले तर आधीचा परवडला म्हणायची पाळी येते कारण कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो सोडवण्यापेक्षा तसाच चिघळत ठेवणे याना व्होट बँकेसाठी आवश्यक वाटते. धन्य तो आमचा महान भारत अन धन्य ते आमचे पुढारी.

In reply to by पैसा

मदनबाण 30/12/2014 - 14:31
आपल्या तात्कालिक सोयीसाठी दीर्घ मुदतीच्या परिणामांचा विचार न करणारे राजकारणी जोपर्यंत आहेत तोपर्यंत असए प्रश्न विचारणे आणि हताश होणे याशिवाय आपल्या हातात काही नाही. +१००

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09 The U.S. Debt Continues To Climb

गंमतच आहे. शेजारी बळी पडलेल्या लेकरांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे लोक इथे आपल्या घरात बळी गेलेल्या लोकांबद्दल चकार शब्द का काढत नाहीत असे विचारणारे तथाकथीत देशभक्त लोक 'तिथे पाकिस्तानने जे पेरले त्याची फळे ते भोगताहेत, त्यांच्याबद्दल काय सहानुभूती बाळगायची' असे विचारताना, होत असलेल्या दहशतवादाबद्दल सरसकट सर्व पाकिस्तानींना जबाबदार ठरवताना, स्वतःमात्र इथल्या दहशतवाद्यांबद्दल मात्र चकार शब्द काढत नाहीयेत. अगदी या कवितेचा सुरसुद्धा दहशतवाद्यांपेक्षा पाकिस्तानातल्या त्या हत्याकांडात बळेी गेलेल्यांबद्दल सहानुभूती बाळगणार्‍यांनाच दोष देणारा दिसतोय

In reply to by विशाल कुलकर्णी

hitesh 30/12/2014 - 18:29
तीच तर हिंदुत्ववाद्यांची गंमत आहे... पाकिस्तानी माता जेंव्हा आक्रोशकरताना बोलल्या की ही मुले भारताची किंवा अमेरिकेची होती का ? तेंव्हा त्यात हिंदुत्ववाद्यांना भारतद्वेष दिसला. अतीव दु:खाच्या वेळी आपलंच मूल का बळी गेलं शेजार्‍याचं का नाही , असे विचारले तर तो म्हणे भारतद्वेष झाला. स्वतःच्या मुलाचं हित शाबुत ठेउन दुसर्‍याच्या मुलांचा बळी जा वा ही इच्छा म्हणे अ‍ॅब्नॉर्मल ! स्वताच्या पोराला राजा करण्यासाठी दुसर्‍याच्या पोराला वनवासात घालणार्‍या , स्वतःच्या पोरासाठी नवर्‍याच्या मांडीवरुन सवतीची पोरं उठवणार्‍या बायका कुठल्या धर्मातल्या ? हे बघायला मात्र यान्ना वेळ नाही !

In reply to by विशाल कुलकर्णी

अगदी या कवितेचा सुरसुद्धा दहशतवाद्यांपेक्षा पाकिस्तानातल्या त्या हत्याकांडाबद्दल सहानुभूती बाळगणार्‍यांनाच दोष देणारा दिसतोय.>> अर्थात तसा तो आहेच. आणि तोच आहे. का नसावा? आपल्या लोकांच्या हत्या दिसत नाहीत आणि पाकिस्तानात घडलेल्या घटनेबद्दल पुळका आहे अशा भंपक लोकांच्या वृत्तीवर प्रहार करणे हाच उद्देश आहे मुळात कवितेचा. असे विचारताना, होत असलेल्या दहशतवादाबद्दल सरसकट सर्व पाकिस्तानींना जबाबदार ठरवताना, स्वतः मात्र इथल्या दहशतवाद्यांबद्दल मात्र चकार शब्द काढत नाहीयेत. >> हे कसं काय बुवा ठरवलंत? ते अतिरेकीही वाईटच. दुसरं म्हणजे भारत सरकार पूर्वोत्तर रा़ज्यांच्या परवडीबद्दल जबाबदार असेलही, नव्हे आहेच, पण अतिरेकी निर्माण, प्रोत्साहन आणि ट्रेनिंगचे काम भारताने आजवर कधीही केलेले नाही. तेव्हा भारताच्या बाबतीत सरसकटीकरण करताच येणार नाही. तिसरं, असंख्य ठिकाणी निषेध व्यक्त केलेलाच आहे. पण खरी गंमत म्हणजे पाकिस्तानात घडलेल्या घटनेबद्दल गळे काढणारेच लोक आसामच्या हत्त्याकांडाबाबत मौन बाळगून आहेत..

..का आज सारे गप्प आपल्यांची हाक आली! कुंपणापार ती निरागस अन् आसामी का निराळी? तेव्हा पेटले गहिवर वन्हि झाल्या मेणबत्त्यांच्या मशाली आज आपुलेच वाहता रक्त का वाटे व्यथा निराळी? तुम्हा न गोड लागे तेव्हा अन्न अन् पाणी गात्रे आज ती थिजली अन् बसली दातखीळ साली! ना शब्द करुणा ल्याले ना ओल डोळा आली आज पुन्हा का तुमची विवेकबुद्धी नग्न झाली? ना निषेध दिसला कोठे ना दिसल्या षंढ चर्चा का आज शब्द रुसले अन् मने रिकामी झाली? माणुसकीचा य

मोठ्ठे आरसे

शब्दानुज ·
लेखनविषय:
काव्यरस
मुलींच्या वस्तीग्रुहात मी त्याला पकडले कॉलर पकडुन ओढत बाहेर काढले बहिणिस आपल्या खांद्यावर होते घेतलेले घाबरलेले पोर ते ,बोलण्यास न धजावले दटावताच पोर ते रडु लागले बहिणीस सावरत हातापाया पडु लागले "बहिणीला माज्या चेहरा बघायचा व्हता आयला मारताना बान आरसा फॉड्ला आरश्यातबी हि लय ग्वाड दिस्सल बघुन स्वताकडं 'एकडाव ' तरी हसलं ह्या बारीस जौद्या, परत येत नाय मोठया आरशात बघायची औकात नाही आरसे आपले खरेच मोठे आहेत.. पण आपलाच चेहरा का लपवतायत??

क्षण तो.....

psajid ·
लेखनविषय:
काव्यरस
नाही विसरलो तुझं मला ओलांडूनी जाणं, जाता जाता मनाचं इतकं कठोर होणं !! कालपर्यंत दोघांचं एकच होतं जीणं, एका वळणावर मात्र त्या हाताचं झिडकारणं !! गैरसमज क्षुद्र तरीही जीवाचं करतो मागणं, आयुष्यच शून्य होईल गं तुला करता उणं !! तेही आठवतात क्षण तुझं उचंबळून येणं, आसू हासुच्या आठवांत गंध वर्षावूनी जाणं !! ते तुझं चालता चालता बोलणं बोलता बोलता हसणं, गालामधल्या खळीमध्ये माझ्या मनाचं बसणं !! आता ती खळी नाही टाकलंस ते बोलणं, तुझ्या वाचून नाही जगणं आयुष्याचं तूच तर देणं !! आठव आणाभाका त्या ज्यात आपलं होतं जीणं, प्रवाहाविरुद्ध पोहेन मी तुझ्यासंगती निर्मीन नवं गाणं !! :श्री.

पंचप्राण

चलत मुसाफिर ·

विवेकपटाईत 30/10/2014 - 19:58
कविता आवडली. बाकी - ती कोण, कुठे भेटली, जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण दुसर्या कुणाची वाट पाहण्यासाठी, अनेक प्रश्न येतात मनी. *man_in_love* *IN%%_%%LOVE* *IN LOVE*

In reply to by विवेकपटाईत

चलत मुसाफिर 01/11/2014 - 23:15
बायको नियमितपणे आंतरजालावर संचार करत असते. त्यामुळे आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. माफी असावी. :) :)

ती नसेल तर होईल आर्त एक कल्लोळ झपाटलेल्या पिंपळावर विरहविजेचा लोळ ती नसेल तर होईल विरक्त जीवनगाणे बैराग्याच्या थाळीतले भकास पै-आणे ती नसेल तर होतील प्रश्नच अंतर्धान जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण

कारुण्य टंकन

निराकार गाढव ·

In reply to by एस

कवितानागेश 25/10/2014 - 10:47
माझ्याकडे अनुभव नसल्यानी मला अर्थच कळत नाही. पण मला कळत नाही म्हणून मी अश अलौकिक रचणे ला निरर्थकही म्हणणार नाही. षब्द्वैभव बघूनच मी गार पडलेय.

अजया 25/10/2014 - 10:39
___/\___ जे काय क्रिप्टिक लिहिलंय ते उलगडणारी पुढची कविता येऊ दे!

कंजूस 25/10/2014 - 11:05
१)गाढवाला कसले दु:ख झाले आहे ? २)त्याचे क्षण असे क्षीण का होत आहेत ? ३)गाढवे जिथे राहातात तिथे सिंह नसतात तरी त्याला सिंहांपासून धोका कसा ? ४)गगनाकडे लाथा झाडणाऱ्या रासभास दिशा लुप्त झाल्याने काय फरक पडणार आहे ? गुण २०

बंपर हाय ह्ये.... शब्द अनाकलनीय तर्किकाचे जणू वाशिंड माजलेल्या वृषभाचे फिरूनी पुन्हा ते आले काव्य इथल्याच गर्दभाचे....!

पैसा 25/10/2014 - 11:14
काय देखणी शब्दकळा आहे! शरदिनीतैंसारखी निराकार कविता. अर्थ बिर्थ लावायला नकोच.

अनर्थात अर्थ शोधणे अर्थात अनर्थ असणे... यासाठीच्या तालिम / रियाज / सरावासाठी आदर्श असलेला एक अत्युत्तम काव्याविष्कार !!! आता याची पुढच्या वर्षीच्या नोबेल पारितोषिकासाठी शिफारस करणे आले ;) :)

In reply to by निराकार गाढव

सतिश गावडे 30/10/2014 - 09:24
>> ईश्श्य!... स्वप्नांत रंगले मी.... लोकांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध. तुम्ही निराकार गाढव नसून निराकार गाढवीण आहात.

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 01/11/2014 - 09:01
निराकाराचे गुरु आहेत काय??? किमान एकलव्यासारखे तरी!!! असल्यास गुरुंनी शिष्याला अंगठा दखवला का शिष्याने गुरुला ??? खुलासा झालाच पाहिजे!! कालच मा.देवेन्द्र यांनी सांगितले पारदर्षी कारभार होणार म्हणून,तेव्हा शुभारंभ तुमच्या पासून होउन जावूदे!! मि.पा.प्रतिसाद विबंडल्न गॅलरी प्रेक्षक. आसन क्रमांक २५

In reply to by नाखु

ऑ? माझ्यासारख्या मणावर मणातील मणाबाहेरून मणसोक्त विजय मिळवलेल्या गर्दभश्रेष्ठाचे गुर्जी असे शूद्र मणुष्ययोनीतील असतील आसं वाटलंच कसं तुंम्हाला? .

In reply to by निराकार गाढव

पैसा 01/11/2014 - 13:54
काकाजी, आत्मा अमर आहे! मणुश्ययोनीतले म्हणून अत्रुप्त आत्म्याचा अपमान करण्याचे धारिष्ट्य करू नका. शेवटी गुर्जी आहेत. ओम फट स्वाहा म्हणून एखादा शाप देतील तेव्हा कळेल!

In reply to by पैसा

मणुष्यजातीचे गुरूजी माणसांसाठी ठीक आहेत. पण माझ्यासारख्या हुच्च जातीच्या आणि विद्वानाला ते काय शिक्कीवणार? त्यासाठी आमचे स्पेशल गुर्जीच पायजेलेत.

मनीषा 29/10/2014 - 15:50
ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले होते म्हणे .. तुमच्यावर सरस्वती देवीचा वरदहस्तं असावा असे वाटते आहे ... कविता भलतीच ऊंच आहे ....

आनंदी गोपाळ 03/11/2014 - 07:55
मिपावर प्रतिसाद टंकताना टंकणार्‍यांच्या मनात नक्की काय सुरू असतं, त्याचं तरल अन भावदर्शी कथन. मोक्याच्या धाग्यांवर रासभलीला सुरू होण्याआधी मनातल्या खळबळीवर व रक्तातल्या वारुणीवर स्वार होऊन जी काय आवर्तने मेंदूत उठतात, ज्या आठवणींच्या संदर्भांचे आवेग दाटून येतात, अन रणांगणावर लखलखणार्‍या समशेरींसारख्या जिव्हा कारुण्यटंकन करू लागतात! त्याचे हे खरे वर्णन. वावावा! आवडले, हे वेगळे सांगायला नको.

व्रण जीर्ण बंधनांचे भयगच्च कंपनांचे दीर्घ आव्रुत्त घ्रुणांचे क्षण क्षीण रासभाचे समरी प्रदीप्त, दहनी अलिप्त, श्रवणी प्रदीर्घ रणदुंदुभी | जठरी समस्त, नयनी प्रदीग्ध, भुवनी प्रक्षुब्ध शिवअंबिणी || रण अंगणी धुळीचे मतिशून्य गोंधळीचे विषदग्ध चित्त साचे क्षण क्षीण रासभाचे घनघोर युद्ध, क्रुत विद्ध शुंभ, शर वध्य दंभ, जय अंबिके | चामर चिक्षूर, मदमत्त दुर्धर, करि हन्त हन्त श्री अंबिके || लय स्तब्ध बद्ध गुरूचे जय शुष्क रुक्ष तरूचे हत रिक्त आर्ततेचे क्षण क्षीण रासभाचे अक्राळ विक्राळ जिव्हा सर्पिणी त्या, सिंहस्थ म्रुत्यू रणी राक्षसां त्या | चंडी प्रचंडी भूजा रक्त प्याल्या, वसुधैव गगनी दिशा लु

<पतंग>

राजेश घासकडवी ·

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth

प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी