रणरणत्या दुपारी एक पक्षी सिमेंटच्या गॅलरीत आला.
तहानेने हा हा करीत होता.
‘ तहान तर संपत नाही.
सहन काहीच होत नाही.
उडू कसा, जगू कसा?
एक झाड सापडत नाही!’
मी म्हणाले, ‘रहा माझ्या घरात!’
काचेच्या तावदानावर चोच मारीत म्हणाला,
‘आमच्या बापजाद्यांनी ते ही केलं.
आरशांच्या मागे, दाराखिडक्यांच्या वर,
अगदी तुमचे संडासबाथरूम ही सहन केले.
आता, घरांनाही तेवढे उबदार कोपरे राहिले नाहीत.’
कोरडे डोळे पाणावत जराशाने म्हणाला,
‘भर दुपारी, निष्पर्ण वृक्षावर
अंडी घालायची हिम्मत आता होत नाही.
इतकं उडून दूरदुरून अन्न पाणी आणण्याची
शक्ती आमच्यात आता राहिली नाही.
आम्हाला सुखाने मिटू द्या.
अखेरच्या श्वासासाठी एखादे पान