कै च्या कै कविता ...
कविता..कवि...आणि कै च्या कै कविता...
कधी मुक्यानेच बोलणारी कविता,
तर कधी बिअरसवे डोलणारी..
येता जाता माफी मागणारी कविता....!
झुरळावर स्वार होवून जोमाने
ढेकणावर चढाई करणारी कविता..
आरसे फोडत, वादळात सापडत..
सिगरेटी फुकायला लावणारी कविता...!
अतिव दु:खाने झडणारे (?) ढग अन्
गोमुत्राची चव शिकवणारी कविता..
आमच्यासारखे समिक्षक असताना..
सफाईसाठी डेटॉल शोधणारी कविता..!
गुपचुप चुंबनाच्या व्याख्या शोधताना
तुम्ही-आम्ही मध्ये अडकलेली कविता..
विझलेल्या स्वप्नांची सारीभरणं करत,
आ वासलेल्या सत्यात रुतलेली कविता...!
डोळ्यासमोरून अलगद फिरताना..
डोक्यावरून जाणारी कविता..
आमच्या मंद डोक्यात मंदपणे..
कै च्या कै भरवणारी कविता...!
(वरील कवितेतील आशय कुणाला समजला आहे का? असल्यास त्याला भर चौकात ढोलताशाच्या गजरात, हार तुरे घालुन सुळावर देण्यात येइल. )
कै च्या कै नवकवि ईरसाल म्हमईकर
वाचने
2953
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
!!!
मला अर्थ लागलाय- कविता आवडली
In reply to मला अर्थ लागलाय- कविता आवडली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिलते तो फिर एक बार, चर्चा
सही आहे विशाल दा
अगायाया!
मिपावरचे काही वर्षांपूर्वीचे
In reply to मिपावरचे काही वर्षांपूर्वीचे by विशाल कुलकर्णी
=))