Skip to main content

घरट्याची ओढ

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 14/12/2015 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
वेळूच्या बनात एक पाखरू एकटे शीळ देई वारियाला         सांगे जा तू घरट्याला वारा उनाड बावरा घुमे वेळूच्या भवती म्हणे वेळूचे गे गाणे         गळा भर, पाखराला पारा उन्हाचा महान लखलख मृगजळ करी कंठी पाखराच्या परि         पाऊस घरचा ओला जीव बनी अडकला जीव एक घरट्यात देई हळवा संधिकाल         बळ नाजूक पंखाला - संदीप चांदणे
लेखनविषय:

वाचने 4941
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

___/\___ प्रतिसादासाठी धन्यवाद! प्रचेतस आणि गुर्जींचे प्रतिसाद नेहमीच सुखावून जातात तर ३ए सरांचा प्रतिसाद म्हणजे एका कवीची अनमोल दाद! धन्यवाद, Sandy

In reply to by चांदणे संदीप

धन्यवाद संदीप पण चांगल्या कलाकृतीला दाद ही मिळाल्याशिवाय कधीच रहात नाही. असेच लिहित रहा....

In reply to by आतिवास

देई हळवा संधिकाल बळ नाजूक पंखाला ह्याएवजी लागे हळव्या संध्याकाळी पिसे नाजूक पंखांना चालले असते असे वाटते का?

In reply to by अभ्या..

लागे हळव्या संध्याकाळी पिसे नाजूक पंखांना
शब्दरचना उत्तम आहे... पण अपेक्षित अर्थापासून दूर चालल्यासारखी वाटते! :)

In reply to by चांदणे संदीप

अर्थात सॅन्डी. मला जर कविता करायला येत असती तर.... :( . असो. नाही येत तेच बरेय ;)

अरे सॅण्डीबाबा त्या बुलेट ट्रेन अन नास्तिक आस्तिकाच्या घोळात हे राह्यलेच की वाचायचे. सॉल्लीड जमलीय. पंखांना असलेली ओढ भिडली रे एकदम.