✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चाफा

श — शिव कन्या, गुरुवार, 02/04/2016 - 10:58
वाटेवरी कुणाच्या आहे अजून चाफा! मंद परी जीवघेणा, आहे तसा पसारा! ऊन उठून येते रात्री, घर गोळा होते नेत्री! कुणी दिसते, कुणी विरते! परी चाफ्यापाशी सारे, हताश होऊन बसते! मंद परी जीवघेणा आहे तसा पसारा वाटेवरी कुणाच्याही असू नये गं चाफा! -शिवकन्या

प्रतिक्रिया द्या
8415 वाचन

💬 प्रतिसाद (18)

व्वा! कोकणातील तांबड्या

विजय पुरोहित
गुरुवार, 02/04/2016 - 11:00 नवीन
व्वा! कोकणातील तांबड्या मातीची वाट! त्या वाटेवर चालता चालता श्वेत चाफ्याच्या फुलांनी बहरुन आलेलं झाड अगदी नजरेसमोर उभं राहिलं!
  • Log in or register to post comments

चला…

पगला गजोधर
गुरुवार, 02/04/2016 - 11:56 नवीन
गॅलरीतला पालापाचोळ्यातून बाहेर पडून, तै, कंपाऊंड ओलांडून, परिसराच्या वाटेवरील चाफ्याच्या झाडापाशी तरी आल्या एकदाच्या …. (क. आ. हे. वे. सां. न. ल. )
  • Log in or register to post comments

येतील

नाखु
गुरुवार, 02/04/2016 - 17:05 नवीन
हमरस्त्यावरील वड-पिंपळाच्या झाडाकडे पण येतील. अवांतर : कवीता चांगला आशय राखून आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

;-) पालापाचोळ्याचे मूळ

शिव कन्या
Sat, 02/06/2016 - 09:59 नवीन
;-) पालापाचोळ्याचे मूळ शोधायचं म्हणजे हे आलंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

सुंदर कविता. चाफ्याचा सिझन

शान्तिप्रिय
गुरुवार, 02/04/2016 - 12:45 नवीन
सुंदर कविता. चाफ्याचा सिझन सुरु झालाय!
  • Log in or register to post comments

छान. सुंदर कविता.

डॉ. एस. पी. दोरुगडे
गुरुवार, 02/04/2016 - 13:09 नवीन
छान. सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

कविता वाचली, समजून घेण्याच्या

माहितगार
गुरुवार, 02/04/2016 - 13:14 नवीन
कविता वाचली, समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे.
  • Log in or register to post comments

अजून एक

माहितगार
गुरुवार, 02/04/2016 - 13:19 नवीन
@ शिव कन्या तुम्ही आपल्या कवितांसोबत सोबत काही कवितेच्या दृष्टीने सहज जमल्यास चपखल छायाचित्रे जोडण्याचा विचार करावा असे आपल्या कविता वाचून वाटते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. फार बारकाईने वाचत

शिव कन्या
Sat, 02/06/2016 - 10:05 नवीन
धन्यवाद. फार बारकाईने वाचत असल्याबद्दल. फोटो चिक्कार आहेत,मी स्वतः काढलेले. पण मिपावर डकवणे फार अवघड आहे. सगळ्या प्रयत्नांती गप्प राहिले. रच्याकने, केवळ याच एका अडचणी पायी भटकंतीतील अनेक लेख तसेच आहेत. संमं ला सारखा त्रास द्यावासा वाटत नाही. सूचना उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

छान कविता

मयुरMK
गुरुवार, 02/04/2016 - 14:40 नवीन
Image removed. छान कविता
  • Log in or register to post comments

मस्त

एक एकटा एकटाच
गुरुवार, 02/04/2016 - 16:29 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

छान .

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/04/2016 - 20:38 नवीन
छान .
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

यशोधरा
गुरुवार, 02/04/2016 - 22:56 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

छानच!

प्राची अश्विनी
Fri, 02/05/2016 - 10:24 नवीन
छानच! "चाफ्याच्या झाडा... " ही पद्मा गोळे यांची कविता आठवली.
  • Log in or register to post comments

हॕलो प्राची!थँक्यू;:-)))

शिव कन्या
Sat, 02/06/2016 - 10:08 नवीन
हॕलो प्राची!थँक्यू;:-))) ती कविता मिळाली तर इथे टाक ना! मला माहीत नाही. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

चाफ्याच्या झाडा ….

प्राची अश्विनी
Sat, 02/06/2016 - 12:19 नवीन
चाफ्याच्या झाडा …. का बरे आलास आज स्वप्नात? तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले? दु: ख नाही उरलं आता मनात फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा …. नको ना रे पाणी डोळ्यात आणू ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा …. पानात, मनात खुपतंय ना काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय …. कळतंय ना …. चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलय ना कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं फुलांनी ओंजळ भरलीये ना – पद्मा गोळे. या तरल कवितेचं अरुणा ढेरेंनी केलेलं रसग्रहणही तितकच सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

वा! सुंदर आहे कविता..... धन्स

शिव कन्या
Mon, 02/15/2016 - 20:29 नवीन
वा! सुंदर आहे कविता..... धन्स प्राची ! :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

सु्ंदर कविता

मित्रहो
Mon, 02/15/2016 - 22:45 नवीन
छान
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा