मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जगावेगळे... !

विशाल कुलकर्णी ·

मदनबाण 09/06/2015 - 11:16
नको शाश्वती जीवनाची दयाळा हवे त्याच वेळी..; मरण मागतो मी क्या बात है,वाह...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- भिगी भिगी भिगी जादु भरी लम्हों की ये राते... :- Thakshak

सटक 09/06/2015 - 18:12
अप्रतिम....गझलचा बाज आहे..मक्ता छान! कुणी ना म्हणावे पुरे रे 'विशाला'? जगावेगळ्या मागण्या मागतो मी ! (मनी रात्र काळी, 'सेहेर' मागतो मी !)

In reply to by सटक

मनी रात्र काळी, 'सेहेर' मागतो मी ! वाह, क्या बात आवडेश, आवडेश ! लिहायला बसलो तेव्हा गझलच डोक्यात होती, पण नंतर जाणवलं की भुजंगप्रयात वापरून गझलेपेक्षाही सुंदर कविता होवू शकेल. म्हणून मग गझलेचा मोह टाळला. धन्यवाद :)

In reply to by विशाल कुलकर्णी

सटक 09/06/2015 - 19:54
छानच जमली आहे! व्रुत्तरचना नामशेश होण्याच्या मार्गावर आहे आता! पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!

लेखनविषय:
काव्यरस
जगावेगळे मागणे मागतो मी तुझी याद नाही विसर मागतो मी स्मरावे तुला ना प्रभो मी कधीही तुझ्या दुश्मनांना शरण मागतो मी नको शाश्वती जीवनाची दयाळा हवे त्याच वेळी..; मरण मागतो मी किती आजवर मीच केलीत पापे नको श्वास आता, अभय मागतो मी इथे माजले धुर्त स्वार्थांध सारे जमावे मला वाकणे.., मागतो मी नुरे पात्रता रे तुला प्रार्थण्याची 'हरामीपणा' थोडका मागतो मी जगाला कळेना विनंत्या मनाच्या विषाचाच जहरीपणा मागतो मी कुणी ना म्हणावे पुरे रे 'विशाला'? जगावेगळ्या मागण्या मागतो मी ! विशाल..

आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक सुरकतलेल्या चेहर्‍यावरी तुझाच कयास उसवला श्वास गड्या जणू संपला प्रवास भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं भुकेल्या पोटाला आता मातीची ढेकळं पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!! आस घे भिडायाला ओठी पिरतीचे गाण रानातल्या पिकासाठी काळजाचा ठाव हरवलं आता भान.. अंधारलं जग मिठीत तुझ्या विसावलं वेडं स्वप्नपान ------------- शब्दमेघ

विश्वास वासावरचा

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by शब्दानुज

अजुन विशीपण नाय गाठली हो मी..
मी पण, मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे. पैजारबुवा,

In reply to by शब्दानुज

गणेशा 06/05/2015 - 12:53
पण दाखला देवु नका हो , नाहितर ज्ञानोबाच्या पैजारबुवांना त्यांचा मिसरुड न फुटलेला चेहरा येथे द्यावा लागेल की.. असो ११-६ म्हणजे जवळ आला की वाढदिवस ... आमचा पण १०-०६ आहे. वर्षे मात्र ९५ असते तर कीती बरे झाले असते..

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सूड 06/05/2015 - 18:50
मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे.
असं असेल तर मग मी आत्ता कुठे रांगायला लागलो आहे.

तिमा 06/05/2015 - 11:21
पायोरिया मैंने दाँतोंमें मेरे क्यूँ पायो बदबू अनोखी मसूडोंकी हालत सबजन मुँहफेर करायो

आमची पेरणा अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन.... रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात वासहिन श्वासाची कामना करतात तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो सेंटच्या

विश्वास श्वासावरचा

शब्दानुज ·

गणेशा 06/05/2015 - 11:24
कविता अवघड वाटली, अर्थ वाचायला आवडेल असे म्हंटल्याने म्हणुन आपला साधासा अर्थ घेतलेला सांगतो... ----- येथे तो म्हणजे 'आत्मा' मी म्हणजे 'प्राण' आणि ती म्हणजे 'प्राणहिन प्रेयशी' प्राण .. आत्म्या बद्दल बोलत आहे त्यांचे बोलण्याचे माध्यम 'श्वास'

In reply to by गणेशा

शब्दानुज 06/05/2015 - 12:03
विरहाची ही कथा आहे वाहणारा वारा हा पियकर आहे असे मानले आहे तो वारा तिला शोधण्यासाठी फिरतो आहे अशी कल्पना आहे बाकी माझ्याहुन तुमचीच कल्पना चांगली आहे..

In reply to by शब्दानुज

गणेशा 06/05/2015 - 12:44
तुमच्या अर्थाने कविता वाचल्यावर कविता लगेच कळाली. .मस्त आहे. मी उगाच उलट क्लिष्ट करुन ठेवला होता अर्थ.. असो पण मज्जा आली.. माझ्या अर्थाने एकदा कविता वाचुन बघा बरे..

रोज पुन्हापुन्हा तो बाहेर पडतो संगे फक्त कोरडा उःश्वास घेतो हजारो वर्षापासुन तो तिला शोधतो ती अजुनही असल्यावर विश्चास ठेवतो प्रत्येकाच्या शरीरात जावुन तो पाहतो तिच्या अोळखीच्या खुणा शरीरात शोधतो पवनाच्या रुपातुन तो मला रोज भेटतो पुन्हापुन्हा तिचे कुशल मला विचारतो प्रत्येक श्वासातुन मी समजावु पाहतो श्वासाशिवायच्या शरीरास मी तरी नाकारतो तो मात्र अजुनही विश्वास ठेवतो तिच्या श्वासहिन शरीरास शोधत राहतो श्वासाशिवाय तो तरी भटकत राहतो श्वासावरच्या विश्वासास ठोकरु पाहतो.....

क्षमा नावाच्या भूमातेस

देवदत्त परुळेकर ·

पैसा 23/04/2015 - 20:09
कविता आवडली. वसुंधरेचे हाल करणार्‍या माणसाला निसर्ग वेगवेगळ्या मार्गानी शिक्षा करतोच.

पैसा 23/04/2015 - 20:09
कविता आवडली. वसुंधरेचे हाल करणार्‍या माणसाला निसर्ग वेगवेगळ्या मार्गानी शिक्षा करतोच.
लेखनविषय:
काव्यरस
अगणित अत्याचार सोसलेस तू आ‌ई आ‌ई, तुझ्या अंगावरचे मौल्यवान दागिने लुटले आमच्या चैनीसाठी आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, तुझ्या हृदयावर चालवले आम्ही असंख्य नांगरांचे फाळ तू क्षमा केलीस आ‌ई, तुझे दुधाने भरलेले स्तन बुलडोझरने कापून टाकले आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, तुझ्या दुधात हलाहल जहरिले वीष कालवले आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, आज पर्यंत आमचा प्रत्येक अपराध तू पोटात घातलास कृतघ्न उपजलो आम्ही उन्मत्त झालो आम्ही निव्वळ स्वार्थी, भ्रष्ट, नतद्रष्ट झालो आम्ही आतातर निर्लज्ज, हलकट झालोय आम्ही आ‌ई, तुझे हिरवेगार वस्त्र या पापी हातांनी फेडले आम्ही तुझ्या अंगावर असंख्य वार हसत कृरपणाने केले आम्ही

कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!

निमिष सोनार ·

होबासराव 22/04/2015 - 15:40
निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!! मानवी कर्म आणि देव (मानवी स्पंज आणि स्प्रिंग!) तुम्ही कोण आहात? नियम, मानव की देव? पण लक्षात घ्या की तुम्ही मानव असलात तरी नियम आणि देवा ला त्रास देऊ नका. कारण ते दोघे उलटले तर..... दादानु बेलकम.....

माणसाची देवाला विनंती: असूनही रणरणत्या उन्हाची वेळ का चालवलायस तू पावसाचा खेळ? बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ? देवाचे सडेतोड उत्तर: माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ

धोतर आणी डबा २

शब्दानुज ·
लेखनविषय:
पोटच्या खळगीसाठी मी शहरात उतरलो शहराच्या वैभवात पार हरवुन गेलो मॉल थिएटर हॉटेलमध्ये सकाळ सरली अचानक पोटातुन माझ्या कळ आली भविष्याच्या कियेची जाणीव तिथे झाली 'त्या' जागेची मागणी तत्परतेने केली सुलभ सुविधा फारच असुलभ होती पाय ठेवण्याचिही तिची लायकी नव्हती मनातला आवेग बाहेर पडु लागला उत्कटता जशी प्र्ेयसी शोधे प्र्ीयकराला अंधारमय भविष्य माझे समोर दिसले थकलेले घामेजलेले पाय थरथरु लागले समोरुन एका बसला जाताना पाहिले उरलेले बळ क्षणात गोळा केले पकडताच बस कंडक्टने मला उतरवले भयानक गर्दिचे कारण पुढे केले गेले चालत जावुन शेवटी स्टॅंड गाठले जागेसमोरील गर्दि पाहुन मन हबकले कुलुपाची चावी त्यांच्याक

तुम्ही अनावर व्हा....

शिव कन्या ·
लेखनविषय:
काव्यरस
रणरणत्या दुपारी एक पक्षी सिमेंटच्या गॅलरीत आला. तहानेने हा हा करीत होता. ‘ तहान तर संपत नाही. सहन काहीच होत नाही. उडू कसा, जगू कसा? एक झाड सापडत नाही!’ मी म्हणाले, ‘रहा माझ्या घरात!’ काचेच्या तावदानावर चोच मारीत म्हणाला, ‘आमच्या बापजाद्यांनी ते ही केलं. आरशांच्या मागे, दाराखिडक्यांच्या वर, अगदी तुमचे संडासबाथरूम ही सहन केले. आता, घरांनाही तेवढे उबदार कोपरे राहिले नाहीत.’ कोरडे डोळे पाणावत जराशाने म्हणाला, ‘भर दुपारी, निष्पर्ण वृक्षावर अंडी घालायची हिम्मत आता होत नाही. इतकं उडून दूरदुरून अन्न पाणी आणण्याची शक्ती आमच्यात आता राहिली नाही. आम्हाला सुखाने मिटू द्या. अखेरच्या श्वासासाठी एखादे पान

भग्न अवशेष

कहर ·

निनाद जोशी 06/03/2015 - 11:44
भग्न झाल्या राउळी हि देव जरासा हासला म्हणे येथे जन्मलेला रामही वनी वासला.... यातना नशिबातली सर्वा सहावी लागते त्याविना कोणासही देवत्व नाही लाभते.....

निनाद जोशी 06/03/2015 - 11:44
भग्न झाल्या राउळी हि देव जरासा हासला म्हणे येथे जन्मलेला रामही वनी वासला.... यातना नशिबातली सर्वा सहावी लागते त्याविना कोणासही देवत्व नाही लाभते.....
लेखनविषय:
काव्यरस
जिथे राहिले भग्न अवशेष बाकी वदे कोण त्या राउळाची कथा .. पुजारी म्हणे ओळखीचे पुरावे न ओळखे परी देवतेची व्यथा ... --- कहर .

तुझा प्रवास सुखाचा होवो

निनाद जोशी ·
लेखनविषय:
काव्यरस
माझे घरंगळणारे अश्रू तुझ्या पायापाशी पोहोचले ....... तुझा स्पर्ष होताच थोडेसे गालात हसले...... म्हणाले तुझा सहवास फारच मोजका झालाय..... सावलीत बसूनही माझा जीव उन्हाने त्रासालय.... हवीये तुझी भेट काही क्षण तुझे हवे आहेत .... आठवणीचा प्रकाश उजळवायला थोडे भास तुझे हवे आहेत .... जाताजाता तुझी छोटी भेट दे मला .... तू नाही तर तुझा आभास दे मला .... किमान आठवण ठेव माझी हृदयाच्या एका कोपऱ्यात.... अडगळीत का होईना पण राहण्याचे समाधान असेल त्यात.... चाल आता मी धरतो परतीची दिशा.... तुझा प्रवास सुखाचा होवो हीच माझी आशा.... चल आता मी धरतो परतीची दिशा.... तुझा प्रवास सुखाचा होवो हीच माझी आशा....