मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

मनाचा एकांत - ब्लड

शिव कन्या ·
'ब्लड आहे..... फास्ट सोडून नाही चालत!' मऊ शीर, तीक्ष्ण सुई लक्क काळीज, डोळ्यात पाणी थंड एसी, मंद दिवे पांढऱ्या भिंती, एकट रात्री! तासाला थेंबभर या गतीने ठि ब क ते रक्त रात्रभर.... जखडलेल्या शरीराने श्रमलेल्या डोळ्यांनी हुं कि चू न करता बघत राहतो आपण रक्ताची journey........ . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -- शिवकन्या

पाऊस

निलम बुचडे ·
लेखनविषय:
काव्यरस
     कोपर्डी - आणखी एक 'निर्भया'... टीव्हीवरील बातमी बघून सगळं सुन्न झालं.. त्या ह्रदयद्रावक घटनेने माझ्यातल्या 'स्त्रीत्वावर' जो आघात झाला त्याचे पडसाद मनात उमटले.. त्यातूनच "ती" माझ्या मनातून लेखणीत झिरपत गेली..पण हे झालं गद्य...  हे लिहिताना माझ्यातली कवयित्री मला स्वस्थ बसू देईना...  अशा रितीने अवतरलेली ही तिची कविता...........   ----  पाऊस ---- असा वेडा हा पाऊस, करी उगाच वर्षाव.. मन गेलं हे सुकून, होतो खळखळाट फार... त्याच्या ढगांची ती शर्थ, येती दाटूनीया फार.. त्याला नव्हते माहित, येथे वारा नाही फार.. मन कुजूनी जाईल, तुझ्या अतिवृष्टीने...

सुखासन

शिव कन्या ·
आले कोण गेले कोण कवतुक आता वाटत नाही , कुणी थांबले हसून बोलले मनात किणकिण वाजत नाही , पानाफुलापक्ष्यांसाठीही दार सुखाचे उघडत नाही . . . इतके माणूस छिलून निघते एकांताच्या सुखासनावर! -शिवकन्या

गेम = डुआयडी

महासंग्राम ·
प्रेरणा : गेम आयडी कसा बदलता आला पाहिजे डुआयडी बनून मोकळेपणान फिरता आल पाहिजे... थोडं थांबून .. दुसऱ्याला खिंडीत पकडता आलं पाहिजे वेड बनून ... मी त्या गावचा नव्हेच असं सांगता आलं पाहिजे सगळ्यांना हे जमतंच असं नाही... धाग्याचा काश्मीर होतोच असं नाही तरी आजही छुप्या आयडी वर जग चालत.. सगळं काही असूनही आपलं एखाद डुआयडी लागतं .. 'डुआयडी में पागल दीवाने को' आजही जग हासत.. आणि मग डुआयडी बनून प्रत्येकजण 'मेसेज' करत...

पुन्हा पाऊस

विश्वेश ·
लेखनविषय:
काव्यरस
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... चांगली उन्हाची सवय झाली होती ... तो डबडबणारा घाम ते काळवंडलेले शरीर तो कोरडेपणा ... ती रखरख यांना चांगली लय आली होती ... कुठून हे काळे ढग आले ... आता सगळ बेताल होणार ... आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... आता पुन्हा तो ओलावा पुन्हा तो हिरवेपणा पुन्हा त्या कोरड्या डोंगरावर उमटणार झर्यांच्या रेघा ... बुजणार पुन्हा ... पडलेल्या त्या सगळ्या भेगा ... पुन्हा नव्या आशेनी ... आता मन चल बिचल होणार ... आता पुन्हा पाऊस येणार अन ...

त्याची आठवण,

ज्ञानोबाचे पैजार ·
त्याची केव्हाही आठवण आली तरी, सर्वांगावर सरकन् काटा येतो, डोक्यावरचा केस न केस उभा रहातो, आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो, अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर, जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर, कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले, याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले, तो आहेच असा भितीदायक, आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक, मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची, नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची, वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा, पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा, किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले, पण याच्या समोर

तुझे नाव

माहितगार ·
लेखनविषय:
तुझे नाव नी केवळ भितीने गारठून जायला होते पानांवरून ओघळून गेलेला प्रत्येक थेंब डागांची लांबच रांग दुखण्याचीही थांबलेली अन तुझी आठवण म्हणजे स्मरण शब्दातील रण, सरण आणि मरण जसा सडलेल्या समुद्राने त्याच्या उदरातून ओकलेल्या सड्याचा किनार्‍यावर पसरलेला ऊग्र वास ज्या मोत्यांच्या आशेने तुम्ही एक एक शिंपले उघडत जाता त्यातून ओघळणारे रक्ताचे थेंब आणि जखमींचे आणि मृतांचे आर्त स्वर तुझ्या नावाने एक एक उचलत माळ कवट्यांची पुढच्या बळीच्या गळ्यात घालण्यासाठी आणि तुझ्या नावाच्या दहशती खाली दातखीळ बसल्यावर उच्चारून दाखवायचे 'बेहद खुबसूरत', एकच जल्लोश तुझ्या नावाचा घ्यायचा शेवटचा श्वास आणि हुतात्म्या

समाधान !

खेडूत ·
कविता हा आधीच औघड प्रकार, त्यात मीटर वगैरे सांभाळायचं म्हणजे कठीणच ! पण म्हणून कुणी प्रयत्न करूच नये की काय? तरी जिलबी गोड मानून घ्यावी ही विनंती …! *** होती अमुची प्रिया एक ती आमची मंजे कंपनीची सदैव वाटे तिजला कांही नविन करावे प्रतिमासी कधी कनेक्टे हार्ट आमुचे कधी पॉलीस्यां अपडेटवी तसा एकदा सर्व्हे केला 'समाधान सर्वेक्षण' म्हणुनि ! मनात नसता भाग घेउनि सारे प्रतीसादून आले सर्व्हे झाला पटपट आणिक सार निघाले हो झटपट स्वमनिचे निष्कर्ष घेऊनि छान छान पी पी टी सजवून आली हो ऐटीत पुण्याला प्रिया विमानी त्वरित बसून सगळ्यांना गोळा करूनि पोपटपंची झाली करून सगळे आपण कित्ती ह्याप्पी

वेदनेचा गाव

रातराणी ·
लेखनविषय:
किती दिवसांनी आज वेदनेच्या गावात भरून आलंय आभाळ ठसठसत्या जखमांची खपली काढायला मग त्या ओल्या जखमा वाहतील डोळ्यातून फुंकर मारायला असेलच तुझी आठवण भर दिवसा कसा फक्त अंधारच उरलाय घरभर? होत्यानव्हत्या सगळ्याच पणत्या नेल्यास ना सोबत? त्या पणत्यांच्या उजेडात उजळशीलच तू मला दिसशीलच आणि चमचमणार्या एका वीजेत तुझं आपलं बरय तुझ्यात पाऊस भिनायचा मला मात्र टोचतात रखरखलेल्या धरणीवरचे ओरखडे तू भिनलेला पाऊस खोल खोल जातो मनात तिथं तळाशी गेल्यावर शिल्लक काय दिसते? मी उगाच केलेली तुला नकोनकोशी धडपड? कधीतरी माझ्या वेदनेच्या गावात माझ्यासाठी येउन जा तू पाठवलेल्या पावसानी माझी झालेली वाताहत एकदा बघून जा फक्त इथच

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप ·
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!