बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें
लेखनविषय:
काव्यरस
माननिय गुर्जी यास,
प्रेर्ना
बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें,
तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें !
काय म्हणता ?
'बायको' हे प्रकरण नक्की कांय असतें ?
अहो दशरथ असो वा राघोबा, असो परवाचा आमिर,
युगानुयुगे हे कोणालाही न कळले दिसतें,
पन तरिही तुमचं वा त्यांचे अगदी 'सेमचं' असतें !
रुसली तर रुसू दे, भडकली तर भडकू दे !
तरीसुद्धा तरीसुद्धा, तुम्हाला म्हणुन सान्गतो
बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें,
तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें !
एखाद्याची वेळ भरता, मनी लग्नाचे धुमारे उमलू लगतात
संसाराच्या हळदीची पुटं त्याच्या मेंदूवर साचू लागतात ।
आठवतं ना ?
तुमची लग्न घटिका जेव्हा, भरली होती,
"सावधान" म्हणून भटाने
खरंच लाश्ट वॉर्निंग दिली होती !
पण तरीही आंतरपाटामधून बेभान होऊन
तुम्ही काहीतरी शोधत होता,
चौड्यावर उभे राहील्याने
पडता पडता वाचला होता !
कोणालाच तेव्हा कळत नसतं,
आम्हालासुद्धा कळलं नव्हतं !
बेसावध क्षणी हळुवारपणे 'ती' आयुष्यात उतरू लागते,
'व्यापारी म्हणून आले अन राज्यकर्ते झाले'
पुस्तकाबाहेरचा धडा लाइफ शिकवू लागते,
पण, 'तोफ बरसली कि खंदकात लपून वाचण्याची' प्राक्टीस आपण करायची असते,
आणी ती करता करता कधीही तोंड उघडायचे नसते,
त्यावेळी तसंही आपल्या हाती आणखी काय उरलेलं असते ?
कारण
बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें,
तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें !
वाचने
6715
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
:)
भारी जमलंय.
बायको डे
हहहहाहहा
अरे देवा, बायको पुराण!!
नवरारडे आपलं नवरा डे कधी?
In reply to नवरारडे आपलं नवरा डे कधी? by कंजूस
सोप्पंय
:)
:)
In reply to :) by स्रुजा
खिक्क!
म्हणूनच सांगतो, लग्न करू नका.
कविता खुप आवडली. प्र को.
मजेदार आहे हं
@आठवतं ना ?
In reply to @आठवतं ना ? by अत्रुप्त आत्मा
तुमच्या घटी़का भरल्यावर