भिकारी
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about भिकारी
- 24 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
असे एक वेडा तिथे तो भिकारी
भुकेच्या आकांती जगाला पुकारी
तमा न तयाला उन्हा-पावसाची
दिसे भुक डोळी किती त्या दिसाची
नसे आप्त कोणी तया पामराला
जीवा साथ द्याया कुणी न घराला
थकुनी कधीचा फिरे तो अभागी
कुठे श्वान वेडे तयापाठी लागी
अधु पाय त्याचा अधु लोचनेही
नसे त्राण त्याच्या जराजीर्ण देही
करुणा जगाची कुठे आज गेली
दशा मानवाची खुलेआम झाली
दिले हाकलोनी जया अन्न मागी
अखेरी उपाशी बसे एक जागी
आगीने भुकेच्या जणु अर्धमेला
म्हणे तुच देवा पाहा लेकराला
किती लोक आले किती लोक गेले
तया पाहताही किती थेट गेले
कुणी एक आला दिली त्यास नाणी
दुवा देई त्याला अधु त्या हातानी
असे वंचिताचे कि ते संचिताचे
जिणे हे नश