Skip to main content

करुण

अस्तित्वाची बोंब

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 08/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
स्फुर्तीदाते: मितभाषी आणि त्यांचे लाघवी मूल. प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या! मूळ बघता सर्व वादांचे असे बस फक्त पिण्याचे अध्यात्म नाहीरे षंढाचे हे तुज नाही कळायाचे. भेद भावा तु बघ जरा अज्ञानास फाडती टरा टरा डोळे फिरवती गरा गरा दंभ नाहीच इथे खरा तुम्हा नसे त्याची प्रचिती म्हणुनि त्या खोटा म्हणती मनापासुनि ते ओरडती अंधारासी मी एकच पणती. हिशोब सरला रे जन्माचा बाकी थोडा असे मिपाचा मिंधा नसे कुणाच्या बा'चा पण मानासाठी घासतो टाचा करु लढाया थुंकायाच्या जोर लावुनि भुंकायाच्या दोन शिव्या

चाफा

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 04/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेवरी कुणाच्या आहे अजून चाफा! मंद परी जीवघेणा, आहे तसा पसारा! ऊन उठून येते रात्री, घर गोळा होते नेत्री! कुणी दिसते, कुणी विरते! परी चाफ्यापाशी सारे, हताश होऊन बसते! मंद परी जीवघेणा आहे तसा पसारा वाटेवरी कुणाच्याही असू नये गं चाफा! -शिवकन्या

राहील कुठे आता ही चिमणी?

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 28/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
वारा वादळ हे जोराचे शाखा तुटल्या झंजावाते उडले घरटे फुटली अंडी सांगेल कुणाला व्यथा मनिची राहील कुठे आता ही चिमणी? उघडून जरी मी कपाट माझे बोलावत आहे तिजला नुसती चिव-चिव करते आहे नकळे मजला आणिक तिजला घरात परि ती कशी रहावी घरी वृक्ष तो आणू कैसा घरटे मग ती कोठे बांधिल आणेल कुठून ती पिले बिचारी सांगेल कुणाला व्यथा आपली राहील कुठे आता ही चिमणी? (महादेवी वर्मा यांच्या मूळ हिंदी कवितेवर आधारित) २८/०१/२०१६

बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 07/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
माननिय गुर्जी यास, प्रेर्ना बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें, तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें ! काय म्हणता ? 'बायको' हे प्रकरण नक्की कांय असतें ? अहो दशरथ असो वा राघोबा, असो परवाचा आमिर, युगानुयुगे हे कोणालाही न कळले दिसतें, पन तरिही तुमचं वा त्यांचे अगदी 'सेमचं' असतें !
काव्यरस

घरट्याची ओढ

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 14/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
वेळूच्या बनात एक पाखरू एकटे शीळ देई वारियाला         सांगे जा तू घरट्याला वारा उनाड बावरा घुमे वेळूच्या भवती म्हणे वेळूचे गे गाणे         गळा भर, पाखराला पारा उन्हाचा महान लखलख मृगजळ करी कंठी पाखराच्या परि         पाऊस घरचा ओला जीव बनी अडकला जीव एक घरट्यात देई हळवा संधिकाल         बळ नाजूक पंखाला - संदीप चांदणे

आटपाट नगरात......

लेखक भानिम यांनी शुक्रवार, 11/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगरात  जिवंत माणसांना गाडीखाली चिरडतात  आणि पायातल्या वहाणांना डोक्यावर घेतात आटपाट नगरात  माणसे किड्यांसारखी मारतात  आणि मारणारे हुतात्मा म्हणून मिरवतात आटपाट नगरात  कष्टकरी अन्नाला महाग होतात  आणि सवंग नाचे दैवताचा मान घेतात आटपाट नगरात  विकाऊ माध्यमे टी आर पी वर जगतात  आणि खुन्यांचे गोडवे गात फिरतात
काव्यरस

अमृतप्याला

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 30/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा कविता - अमृतप्याला प्रेरणा : https://www.youtube.com/watch?v=f4qqdbRMYG0 www.azlyrics.com/lyrics/lukebryan/drinkabeer.html ---------------------------------------------------------------- अमृतप्याला आज ऐकुनि रुचले नाही काय म्हणावे सुचले नाही दिला ठेवुनि फोन तसाचि जे झाले ते पचले नाही दिशाहीन मी चालत सुटलो विचार मागे रेटत सुटलो दगडा दगडा मधे तरीही तुलाच वेडा भेटत सुटलो जा

जगणं

लेखक माहीराज यांनी सोमवार, 23/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आलं सागरा उधाणं पेट घेतला वार्यानं स्वप्न सारीच मोडून खेळ मांडला दैवानं ।। डोळयामंदी दाटलं आभाळ रं      आभाळाच्या मनामंदी काही आगळं पाण्यामंदी पेटलेला जाळ रं       जाळाच्या ह्या ऊभा मागं काळ रं उरलं सुरलं हरलं.. नशिबाचं वारं फिरलं  ।। कुणा मनी जपलेलं सारं चांदणं       चांदण्याच्या छायेखाली मोठं अंगण आन् कुणा मनी काटेरी बाभळं        बाभळीच्या काट्यावानी सारं जीवन कळलं कळलं जगणं.. समदं सारं उसनं ।।
काव्यरस

गॅलरी .....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
एक हात कठड्यावर ठेऊन, अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन, मी उभा आहे गॅलरीत! तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर मन रमून गेले फार! इथेच बसून नाही का लावत तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला! नाही.....वेडा नव्हतोच कधी समंजस होतो खूप म्हणून गॅलरी नाही ओलांडत आजही! मला नाही जमत लिहायला, तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला! इतकं जग पाहूनही प्रेमबीम पण नाही कळत मला! पण....तू तिथे कुस बदललीस कि इथे माझी झोपमोड होते, एवढेच बारीक जाणवते! अन, अवेळी उठून मी एक हात कठड्यावर ठेऊन उभा राहतो गॅलरीत कुणी हाक मारेपर्यंत.....!

कै च्या कै कविता ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कविता..कवि...आणि कै च्या कै कविता... कधी मुक्यानेच बोलणारी कविता, तर कधी बिअरसवे डोलणारी.. येता जाता माफी मागणारी कविता....! झुरळावर स्वार होवून जोमाने ढेकणावर चढाई करणारी कविता.. आरसे फोडत, वादळात सापडत.. सिगरेटी फुकायला लावणारी कविता...! अतिव दु:खाने झडणारे (?) ढग अन् गोमुत्राची चव शिकवणारी कविता.. आमच्यासारखे समिक्षक असताना.. सफाईसाठी डेटॉल शोधणारी कविता..! गुपचुप चुंबनाच्या व्याख्या शोधताना तुम्ही-आम्ही मध्ये अडकलेली कविता.. विझलेल्या स्वप्नांची सारीभरणं करत, आ वासलेल्या सत्यात रुतलेली कविता...! डोळ्यासमोरून अलगद फिरताना.. डोक्यावरून जाणारी कविता.. आमच्या मंद डोक्यात मंदपणे.. कै च्या