Skip to main content

करुण

सांज प्रहरी

लेखक तिमा यांनी बुधवार, 11/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
राम प्रहरी, या सुंदर गाण्याचे एक करुण विडंबन. सर्व पीडित स्त्रियांना अर्पण मूळ गाणे: http://www.aathavanitli-gani.com/Song/Ram_Prahari_Ram_Gatha सांज प्रहरी मार गाथा, वेदना ओठांवरी या वळांनी आसूडाचे चित्र हे पाठीवरी आवडीने चोळितो तो मीठ हे जखमांवरी मार खाता क्षीण काया कोसळे या भूवरी एककल्ली, संशयी तो, नशाधुंदी ज्या सदा भोगदासी मी तयाची दु:ख साही सर्वदा तोचि तारण, तोचि मारण, तोचि माझा सोयरी
काव्यरस

तिथली दिवाळी.....

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 09/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तिथली दिवाळी..... तीरकामठा रंगीत कागद चिखलमाती अर्धा किल्ला.... शिवाजीच्या मावळ्यांहाती, परत फराळ ठेवशील का? पहाट झोपेत हळूच उठवून घमघमणारी आंघोळ घालून, फुलबाजांची हजार फुले परत हातात ठेवशील का? रांगोळीतील हुकले ठिपके रेषांमधील नाजूक वळणे, तुळशीमाईचे लगीन लटके परत दणक्यात लावशील का? किणकिण बांगड्या काचेच्या घिरघीर झालरी पोरींच्या! सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या परत उडवण्या येशील का? तिथली दिवाळी धमाल मजा इथली दिवाळी शांत सजा!! आठवणींचे व्याकुळ दिवे परत घरी पोचतील का?

एक माणूस मिशी काढून..............

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 29/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला. वर्ग भरला मुलामुलींनी सुरेख हसणे पानांमधूनी हळूच पाही शाई सांडूनि, बघते का ती मान वळवूनी! हातचा राखून गणित चुकले नजर चकवून भाषा हुकली कितीक राजे आले गेले इतिहासाच्या पानोपानी.... छंद जीवाला एकच लागे रिबिनीमागचे भोळे कोडे! इकडे तिकडे बघून झाले मास्तर सगळे येऊन गेले मधली सुट्टी चिंचा बोरे मैदानावर सुटली पोरे..... वर्गासहित उठून गेले साधेभोळे हळवे कोडे! भान आले, बाहेर आला.... एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .

भुकेल वासरू

लेखक माहीराज यांनी बुधवार, 14/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
माळरानी चालुन पुरतं थकुन गेलं होतं.. चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं, लहानपणीच नशिबानं ज्याला औताला जुंपल होतं घाम फुटण्याआधीच  मात्र त्याच काळीज तुटलं होतं.. मुक्या बिचार्या जिवाला कधी रडताही आलं नाही दमलोय,थकलोय असं काही बोलताही आलं नाही.. नांगराचा फाळ त्याला कधी ओढताच आला नाही, गळ्यावरचा फास देखिल कधी सोडताच आला नाही.. थकलं होतं, दमलं होतं, जन्माला ञासुनं गेलं होतं, पायातलं ञान हरपुन भुकेनं व्याकुळ झालं होतं.. डोळ्यामधलं पाणी सारं सारं सुकुन गेलं होतं चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं, ..
काव्यरस

क्रूड ऑईल...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 13/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव आता जाई चरावयासी mess वरं हा जीव रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड चपात्यांचे रुमाल येती मूळचे पापड भाऊ मेसवाले फेसं आणिती?तरी किती ते खाऊ!!!? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ( दुत्त दुत्त!

दयेच्या छावण्या

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 09/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी पितो ती नदी आमची नाही अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत! युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या यातलं काहीच आमचं नाही! नाही हो, आमची माणसं इतकी दयावान नाहीत! ती रासवट आहेत, मारतात, मरतात तलवारीने गळे चिरतात, रक्ताच्या कुर्बान्या देतात महाहिंसक माणसं! त्यांच्या कर्तृत्वामुळेच तर आम्ही आज तुमच्यामध्ये आलो....... पण तुमच्यात आलो म्हणजे तुमचे नाही झालो, होऊ शकत नाही! एक काम कर

आठवण...

लेखक सतिश गावडे यांनी शुक्रवार, 02/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारपासून धो धो पाऊस पडतोय अगदी कोकणातल्या पावसासारखा तसा मी इथे आहेच कुठे मी आता कोकणातच पोहचलो आहे, त्या हिरव्यागार डोंगर टेकडयांवर, दुथडी भरुन वाहणार्‍या ओढयांकाठी सर सर तीरासारखे पाणी कापत जाणारे तुम्ही अन तुमच्या पाठोपाठ मी किती छान होतं ना आपलं आयुष्य फक्त आपणच होतो आपल्या आयुष्यात फक्त तुम्ही आणि मी गाव सोडलं आणि त्याबरोबर मी तुम्हालाही सोडलं आज तुमच्या आठवणींनी मन व्याकुळ झालंय डोळे भरून आलेत तुमच्या आठवणींनी आजुबाजूला कुणी नाही म्हणून बरं आहे नाही तर मला थेट पावसातच जाऊन उभं राहावं लागलं असतं कुठे असाल तुम्ही सारे आता, खरं तर तुम्ही नसालच आता, गाई म्हशींना कुठे वीसेक वर्षांपेक्
काव्यरस

ll गंगास्मरण ll

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 26/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो. (जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे! तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती तू कल्याणी, नीरदायिनी तुलाच नमितो सांबसदाशिव, हरहर गंगे तुलाच स्मरती भगिरथाचे पुत्र चिरंजीव प्रकटयोगिनी बिकटगामिनी तुझ्या तटाचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या किनारी शांत निमाले प्रयागसंगम अलख निरंजन तुझ्यात फिरते चक्र चिरंतन विशालसुंदर तरल निरंतर तुझ्यात विरते माझे अ

हे काय कमी काय?

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 16/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं! वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून घरी परततात माणसं, हे काय कमी काय? सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय? सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय? भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव! मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय? उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!

बाय

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 16/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी लगबगं भाकऱ्या चुलीवरं धुराड्यात खोकते ही कैदाशिनं. सडा सारवनं धारोष्ण दुध न्हावुन झाली ही अवदसा. धनी शेतावरं हंबरते वासरु भारा ऊचलाया ही सटवायी. पाखरु आभाळी झळुनिया ऊनं फिरे रानोमाळी ही जोगतीनं. आवसं पुनवं संसार सुखाचा माहेरची ओढ रूते काळजातं.