✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

<<<< चालचलाऊ मिपा>>>

ज — जेपी, गुरुवार, 02/12/2015 - 10:35
प्रेरणा जेपी म्हणे' गा मिपादेशी | या लिखाणाची ऐशीतेशी, बेहतर आहे एका लेखाशी| पण लिहीणार नाही. खड्यात जावो ही लिखाई| आपल्याच्याने होणार नाही. समोर सारे हुशार बेणे|विजींनीयर डागटर ऐणे, काखे वही,हाती पेन| डायरी माझ्या लिहीण. पण हा कुठला कंपुपणा| आपसात चर्चा कुदवती. या लोकांना नाही उद्योग |गायब झाले सगळे लोग. लेंकानो लिहाना रोज |वाचुन तेच तेच बोर झालो. लिखाई का असते सोपी| रोज कळफळक बडवती , कित्येक लेकाचे आयटी | मेगाबायटी प्रतिसाद देती, मिपा म्हणे 'जेपुना | हा कुठला बे पळपुटेपणा ? पहिल्याने तर टणाटणा | उडत होता लिहाया, मारे धाग्यावर बैसला | प्रतिसाद काय दिला, परि तुझ्या लेखाला सोडणार नाही कच्चमजी, वाजवतो संघटनेची टिमकी| आहे म्हणतो ती खमकी, आहारे भित्रा भाई | म्हणे मी लिहीणार नाही, किबोर्ड सोडा रडुबाई | आणी बसा खफ खेळत, कशाला जमविले कंपुबाज ? नसता बिचारे दिला ताप , धाग्यावर प्रतिसाद देत | निपचीत सारे पडले असे, नव्हते पाहिले मेनबोर्डा | उगाच करी टणाटणा, म्हणे यंव लिहीन त्यँव लिहीन| आहे का विकली नेट पॅक ?, लेका वाचनमात्र रहावयाचे वेड| डोक्यात कुठुन शिरले ?, जेपी म्हणे 'गा मिपाकरा| तुमची कटकट पुरे करा, दहादा लिवले तरी| हट्ट तुमचाच खरा, आपण काही लिहीत नाही| नेटबिल शिरी कोण घेई, वाचनमात्र म्हणा की प्रतिसादक| आपुन आता लिहीणार नाही, ऐसे बोलुन जेपुन | दुर कळफलक फेकुन, नेट पॅक बंद करुन| मटकन खाली बैसला . (इति चालचलाऊ मिपा प्रथमोध्याय समाप्त) *क्रमश....

प्रतिक्रिया द्या
10071 वाचन

💬 प्रतिसाद (30)

भारी आहे

सविता००१
गुरुवार, 02/12/2015 - 10:49 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

जेप्या...

नाखु
गुरुवार, 02/12/2015 - 10:49 नवीन
मस्तच रे! *good* *ROFL* हा टक्या कुठेय दिसेना तो, जरा बघ हा एकलव्य (अंगठा न दाखवणारा आणि न मागणारा सुद्धा!) *wink* पुभाप्र
  • Log in or register to post comments

मी हाय हितंच

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/12/2015 - 12:12 नवीन
मी हाय हितंच बाकी जेपीची प्रतिभा माझ्यापेक्षा लय म्हणजे लयच भारी आहे हे मला कधीपासून माहीती आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

दिसामाजी काही लिहावे

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 02/12/2015 - 11:15 नवीन
दिसामाजी काही लिहावे, खफ, बोर्डावरी टाकावे आणि मग तटस्थ पणे वाचावे, येकयेक प्रतिसाद प्रतिसाद मिळाले नाही जरी, मनी जराही अढी न धरी, उगाच "धन्यवाद" न देत राही , वाढवण्या प्रतिसाद लेखाचे, जेव्हा कृष्ण गीता सांगता झाला , ठाउक होते का त्याचे त्याला, इतुके वेड लावेल जगाला, एक एक श्लोक गीतेचा, गाथा तुकोबाने गाईली, लोके ईंद्रायणीत बुडवीली, त्याने का मग खुन्नस धरली, जगा वरती सगळ्या? कोणास आवडे हिवाळा, कोणी म्हणे पावसाळा, तर कोणा प्रिय उन्हाच्या झळा, तसेच असते विचारांचे कोणी असतो आध्यात्मिक, तर कोणी संसारी सात्विक, कोणी टवाळकीचे पुजक, समविचारी नसे प्रत्येक, म्हणौनी आपण लिहीतच रहावे, सत्य जगापुढे मांडावे, मग समविचारी शोधावे, प्रतिक्रीयांच्या मधौनी, अशांना मग व्यनि करावा, फेसबुकावर अ‍ॅड करावा, मग त्यांच्या कडुन जाणावा, दर्जा अपुल्या लेखनाचा, फार झाले उपदेशांचे डोसु, मनी पडला असेल प्रकाशु, घेउ नये लेखन संन्यासु, एवढेची सांगतो आता, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

@जेपी म्हणे 'गा मिपाकरा|

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/12/2015 - 12:24 नवीन
@जेपी म्हणे 'गा मिपाकरा| तुमची कटकट पुरे करा, दहादा लिवले तरी| हट्ट तुमचाच खरा,>>> =))))) लै जबरी हो जेपि =))
  • Log in or register to post comments

=))

पैसा
गुरुवार, 02/12/2015 - 12:26 नवीन
=)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL:
  • Log in or register to post comments

सन्यासाचीही इतकी आसक्ती ???!!

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 02/12/2015 - 12:33 नवीन
सन्यासाचीही इतकी आसक्ती ???!!! +D
  • Log in or register to post comments

(No subject)

आदूबाळ
गुरुवार, 02/12/2015 - 12:42 नवीन
:D
  • Log in or register to post comments

ताटी उघडा जेपीजी ।

पगला गजोधर
गुरुवार, 02/12/2015 - 13:21 नवीन
मिपाकर जेणें व्हावें । खलांचे बोलणे सहावें । तरीच अंगी थोरपण यावे । जया नाही कंपूबाज । रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वधाग्याशी । ऐशी समदृष्टी कराजी । ताटी उघडा जेपीजी ॥ काकु काश्मीरी झाले कोणी । तेव्हा आपणा व्हावें पाणी । जाणोन सर्वांची ऐक जननी । धन्य ती मिपा माउली । शब्द शस्त्रें झालें क्लेश । अंतरी मानावा तो उपदेश । इतकें जाणोन शांती धराजी | ताटी उघडा जेपीजी । मिपागृह जो प्रवेश केला | उंच नीच काय त्याला । खटासखट व ज्याचेत्याला | संमं इच्छे धरून बोला । नटनाटयचा हा मोठा मेळा | स्थिर नाही तो एकवेळा । निवृत्तीच्या कल्पना टाकाजी । ताटी उघडा जेपीजी ।
  • Log in or register to post comments

+१ फक्त एक दुरूस्ती

नाखु
गुरुवार, 02/12/2015 - 13:56 नवीन
"ताटी" ऐवजी "तोटी" टाकून बघा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

@"तोटी" टाकून बघा !!! >>

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/13/2015 - 00:09 नवीन
@"तोटी" टाकून बघा !!! >> =))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

सर्व प्रतिभावंतांना दंडवत.

कंजूस
गुरुवार, 02/12/2015 - 15:08 नवीन
सर्व प्रतिभावंतांना दंडवत. थोडीशी पाठवून द्या इकडं नरेंद्र, देवेंद्र, अरविंद.
  • Log in or register to post comments

=))

मूकवाचक
Fri, 02/13/2015 - 11:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हेच म्हणतो

श्रीरंग_जोशी
Sat, 02/14/2015 - 08:49 नवीन
ब्रह्मदेव काव्यप्रतिभा वाटत असताना मी नक्कीच फुले वेचायला गेलो असणार. जेपी - __/\__.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

_/\_

अजया
गुरुवार, 02/12/2015 - 15:49 नवीन
सर्वांना दंडवत!
  • Log in or register to post comments

उगाच "धन्यवाद" न देत राही , वाढवण्या प्रतिसाद लेखाचे, ...

बबन ताम्बे
गुरुवार, 02/12/2015 - 16:17 नवीन
ज्ञानोबाचे पैजार , उगाच "धन्यवाद" न देत राही , वाढवण्या प्रतिसाद लेखाचे हे बाकी खरे. मी पण तेच करतो :-)
  • Log in or register to post comments

+१

सविता००१
गुरुवार, 02/12/2015 - 16:36 नवीन
________/\________ सर्वांना दंडवत
  • Log in or register to post comments

कोण कृष्ण? कोण अर्जुन? कोण

आतिवास
गुरुवार, 02/12/2015 - 17:52 नवीन
कोण कृष्ण? कोण अर्जुन? कोण संजय? ;-)
  • Log in or register to post comments

कोण संजय?

आदूबाळ
गुरुवार, 02/12/2015 - 18:48 नवीन
कोण संजय?
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

@कोण संजय? >>> वारलो रे

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/13/2015 - 00:10 नवीन
@कोण संजय? >>> =))))) वारलो रे वारलो! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

जबराट रे जेप्या.

प्रचेतस
गुरुवार, 02/12/2015 - 18:31 नवीन
जबराट रे जेप्या.
  • Log in or register to post comments

आज पासून जेपीपण गुरुस्थानी !!

खटपट्या
Fri, 02/13/2015 - 02:28 नवीन
आज पासून जेपीपण गुरुस्थानी !!
  • Log in or register to post comments

अगदी अगदी!

बॅटमॅन
Fri, 02/13/2015 - 11:16 नवीन
अगदी अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

लय भारी!

चुकलामाकला
Fri, 02/13/2015 - 17:12 नवीन
लय भारी!सर्वांचेच आवडले!
  • Log in or register to post comments

मस्त..

मुक्त विहारि
Sat, 02/14/2015 - 06:30 नवीन
छान जमलंय,,, क्रमशः वाचुन बरे वाटले.
  • Log in or register to post comments

मस्त !

मदनबाण
Sat, 02/14/2015 - 07:55 नवीन
मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुझसे मुहब्बत का इजहार... ;) { Hum Hain Rahi Pyar Ke }
  • Log in or register to post comments

मारे धाग्यावर बैसला |

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 02/14/2015 - 09:51 नवीन
मारे धाग्यावर बैसला | प्रतिसाद काय दिला, परि तुझ्या लेखाला सोडणार नाही कच्चमजी,
खपलो.....!!! कच्चमजी हा नवा शब्द म्हराठी भाषेस बहाल केल्याबद्दल अखिल मिपा मापंकाढे मंडळ ह्यांजकडुन जे.पी. ह्यांचा एक प्रतिसाद, दोन नारळ आणि शालजोडी(तले) देउन सत्कार करण्यात येत आहे.... =))
  • Log in or register to post comments

थेट वर्ष

नाखु
Wed, 03/30/2016 - 15:27 नवीन
झालं पुढचा भाग कुठे आहे ?
  • Log in or register to post comments

अरे वा !!

नीलमोहर
Wed, 03/30/2016 - 15:46 नवीन
हे तर पाहिलंच नव्हतं.. भारी लिहीता की जेपी, येऊ द्या पुढचे भाग लौकर..
  • Log in or register to post comments

आवडल!

मन्याटण्या
गुरुवार, 03/31/2016 - 17:10 नवीन
आवडल!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा