वलय (कादंबरी) - प्रकरण ८
प्रकरण ७ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41877
---
प्रकरण ८:
सोनीला तिसऱ्या दिवशी तिच्या रूमवरच्या इंटरकॉमवर हॉस्टेलच्या ऑफिसमधून फोन आला.
"आपकी मदर आई है. ऑफिस में बैठी है!"
"आई? आत्ता? अशी अचानक कशी आली?" असा विचार करत ती म्हणाली, "ठ ठीक है, भेज दो उनको अंदर!"
"नही, वे अंदर नही आयेंगी. आपही को बाहर बुलाया है!"
सोनी थोडी साशंक विचारांनी बाहेर जायला निघाली.