डबल पोस्ट
डबल पोस्ट
डबल पोस्ट
जरा जास्तच दिस झाले आपल काही बोलण झाल नाही. पण आता का करता जी उनच अस तापल होत का काही लिहूशाच वाटत नव्हत. वरुन लगनसराईचा टाइम तवा टायमच नव्हता. म्या इचार केला पाउस पडून जाउ दे मंगच बोलू. पाउस बी असा दडी मारुन बसला का बोलाच काम नाही. अख्या मिरग गेला पण येक थेंब पावसाचा पता नाही. आता कोठ दोन पाणी झाले. पऱ्हाटी टोबली आन म्हटल आता तुम्हाले सांगतो मायी गोष्ट. मायी लय मोठी पंचाइत झालती राजेहो. आजकाल आमच्यासारख्या गाववाल्यायले शिनेमे पायन कठीण होउन गेल. लय बेक्कार दिस आले पाहा. पिक्चर पायला तर डोक्याले झिणझिण्या आल्या. नाही म्हणाले साहा महिने तरी झाले असन.
चिन्मय बेडवरुन उठला बेसिन जवळ जाऊन वोश घेतला...
दाढी आणि अंघोळ करायचा कंटाळा आल्याने तोंड पुसून केस विंचरून
वरचे कपडे उतरवून तसाच घराबाहेर पडला....
वरचे कपडे उतरवून म्हणजे रात्री झोपताना थंडी वाजत होती म्हणून
हाफ टी शर्टवर फुल टीशर्ट आणि थ्रीफोर्थ वर जीन्स चढवली होती ते वरचे कपडे उतरवून...
तीन संतूर साबणासोबत एक पेन फ्री अशी जाहिरात बघितली आणि मला वाटले, पेन आणि साबण यांचा काहीएक संबंध नसतांना एकावर दुसरे फ्री नेमके कोणत्या कारणास्तव देत असतील?
बहुतेक तीन साबण वापरून संपले रे संपले की ती साबण वापरणारी महिला वयाने इतकी लहान होऊन जाते की मग तिला नोकरी सोडून शाळेत जावे लागते आणि मग शाळेत जायला पेन नाही का लागणार? तेही स्वत:च्या मुलीच्या वर्गात जाऊन!
त्वचा से उम्र का पता नही चलता! काय कमी समजला की काय तुम्ही साबणाला? मम्मी!! मम्मी??
ऑफिसात गेलो,
गप्पा मारून आलो
कॅन्टीनला जाऊन मी
भजे खाऊन आलो
जरी थेंब पावसाचे आले
ओला .. भिजून आलो
भांबावल्या दुपारी
झोपा काढून आलो
होते कुणी न कोणी
नव्हतोच एकटे ना?
लोकां कसे पटावे
पाट्या टाकून आलो.. ?
पाकीट जरी रिकामे
अकाऊंट भरून आले..
चुकू मुळी न देता
लॉगिन करून आलो.
मूळ पेरणा
इथे आहे
(याच प्रेरणास्थानाला उद्देशून लिवलेली आधीची कविता "बिज्जी लेखिकेची आळवणी" )
हरपता ती लेखनस्फूर्ती
हाटेले घालुनी पालथी
ओरपी लेखिका मिसळ
वर घेई मिठाई सुरती
भिववितो तिला तनुभार
स्वप्नि ते आकडे दिसती
निर्धार प्रतिदिनी करिते
'करु उद्याच सुरु भटकंती'
लेखिका म्हणे सुप्रहरी
'मैलाची मारू फेरी..'
पण कुठुनी ते होण्याला
कुणि दिसे तिज सखी प्यारी
गप्पांना येता बहर
गुपिते ती चावट कहर
व्यायाम राही बाजूला
वर वाया प्रातःप्रहर
कुरबुर झाली
(काल रात्री साडे तीन वाजता पाणी बचतीवर एक पथनाट्य लिहीले. एका व्हाट्सअॅप गृपमध्ये येथील सदस्य दुर्गविहारी अन दीपक११७७ यांनी झोप घेत चला अन काही कुरबुर झाली असेल असे विनोदाने लिहीले. सकाळी मी ते वाचले अन मग त्यांना देण्याचे उत्तर या गीतलेखनातून लिहीले.)
तुझ्यासंग माझ्यावाली
कुरबुर झाली ग कुरबुर झाली
त्यानेच माझी झोपायाची
ग झोपायाची पंचाईत झाली ||धृ||
दे दे दे दे दे दे दे
अगं दे दे दे दे दे दे
जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे
जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे
किती वेळ झाला सारखा हातात घेते
तु जशी मालकीण मी पण मालक आहे
माझ्याच घरात मला चोरी झाली
मालकपणाची शान थोडी तरी दाखवू दे
दे दे दे दे दे दे दे
सारखं सारखं नवर्याला घालून पाडून बोलते
(चाल सोडून:-
भाजी आणा, दळण आणा, इस्त्री करा, डबा भरा)
महत्वाचे ते काम सोडून इतर कामे करवते
वैतागलो मी आता मला विरंगुळा हवा थोडा
सारखा रिमोट हातात ठेवते थोडा मला पण दे
सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे
ती म्हणाली " चिमणी "
मी म्हणालो भुर्रर्रर्र
ती म्हणाली " कावळा "
पुन्हा उत्तरलो भुर्रर्रर्र
आलतूफालतू उत्तरं देऊन
आमचं प्रेम झालं सूर्रर्रर्रर्र
लक्षात ठेवून होतो चांगलंच
गुढघ्यात असते अक्कल
डोकं बाजूला ठेऊन काम होतंय
थोडीच पाहिजे शक्कल
कशाला करावा अभ्यास ?
कशाला हवी ती नोकरी ?
कुणी सांगितलंय घासायला
पटवावी श्रीमंत बापाची छोकरी
सासरा बिचारा राबेल
कन्या भोळीच असेल
होऊन जायचं घरजावई
आपोआप झोळी भरेल
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
हे देवी वटसावित्री
मी पण पूजेन तुला
लपून छपून फेरे घेईन
उद्या पौर्णिमेच्या रात्री
माझे सर्व काळे धंदे
अव्याहतपणे चालू देत सदैव
कधी नजरेत येऊ नको देउ तिच्या
नाहीतर होतील माझे वांदे
मी साधाभोळाच राहू देत तिच्यासाठी
फार कठीण गं , झेलणं तिला
ती आहे एक सुशील गृहकृत्यदक्ष
पण दुर्दैवाने वटवटसावित्री
वटवट करूनच मारते
माझ्या नावाने फेरे
नेहेमी मागते देवाकडे
मिळू देत याचे सर्व धागेदोरे
इतकी वर्षे लोटली
कळला नाही तुझा महिमा
आज तुला मी शरण जातो बघ