पिंपळ
सर्वांना नमस्कार!
मी एवढ्यातच मिपा वर अलोय. काही दिवसांपासून वाचतोय. भन्नाट आहे मिपा!
एक कविता (भीत भीत) प्रकाशित करतो आहे. माझी भाषा, व्याकरण, साहित्याची जाण हे सगळं जेमतेमच आहे. तेव्हा चुका होतील त्यांच्यासाठी आधीच माफी मागतो.
पिंपळ
पिवळ्या उन्हात
मनाचा पिंपळ
सळसळत राहतो
पिवळ्या उन्हासोबत
येतात काही पाखरं
नाव-गाव नसलेली
आणि फांदी फांदीत खेळतात
गातात
एखादं घरट बांधतात
उन्हं पानापानात भिनून जातात
स्वप्न बनून आनंद बनून हुरहूर बनून