विश्वास आजूबाजूंच्यावरचा

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जे न देखे रवी...
6 May 2015 - 1:38 pm

पोट गहीवरुन आले
वात गेला निसटून
दोष कुणाचा लपवण्यास
गवाक्ष खुले हे झाले

गुन्हा केला कोणी
आरोपी कुणा ठरवावे
बालंट ते नाकारण्यास
सगळेच भोळे झाले

चर्चा केली त्यांनी
संशयित शोधण्याचे ठरले
ढोंग सारे रचण्यात
मग लोकही कडवे झाले

चौकश्याचें सत्र होते
आरोपी सर्वत्र होते
कोठुनी गंध तो आला
रोख मात्र इतरत्र होते

हायसे झाले 'निरागसाला'
नाव कल्लोळी वाचले
संशयात हरले सगळे
पण त्याचेही सोहळे झाले

काहीच्या काही कवितावावरमुक्तकसमाजजीवनमानराहणी