मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळ

कृतांतकटकामलध्वज जरा जरी पातली...(#)

अनन्त्_यात्री ·
केस पांढरे तरी हा डाय लावतो हिरवा पाखरांनो सावधान घुमे टेचात पारवा केस पांढरे तरी हा डाय गुलाबी लावतो पाखरांनो उडलात तरी पिसे हा मोजतो केस पांढरे तरी हा काळा कलप लावतो पाखरांनो सावध हा दाणे दुरून टाकतो केस पांढरे तरी हा अंतर्यामी अतरंगी पाखरांनो नका भिऊ निर्विष याची हो नांगी (#)माझ्यासारख्या विविधरंगी केश-भूषित साठी-पार युवकांनी कृपया हलक्यात घ्यावे :)

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

चित्रगुप्त ·
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

मिसळ पाव मिसळ पाव

पाषाणभेद ·
मिसळ पाव मिसळ पाव खा रे खा मिसळ पाव मिसळ पाव मटकीची उसळ तिची करा मिसळ उसळीत घातला शेव कांदा त्यात पिळला लिंबू अर्धा रस्सा टाका त्यात चांगला पावाबरोबर खाऊन टाका मिसळ पाव मिसळ पाव झणझणीत तर्री अर्धी वाटी ओता त्यात होईल खाशी नाकातोंडातून येईल धुर मग दह्याने बदला नूर असली मिसळ अन दहा पाव खाऊन तर पहा राव मिसळ पाव मिसळ पाव एकदाच खा अन ढेकर द्या उगाच नंतर जेवायचे काम नाय नको ते इडली सांबर पुन्हा घ्याल का पराठे नंतर? मिसळीत आहे सारे गुण एकदा खाल तर व्हाल टुन्न हातावरचे अन पोटावरचे एकच झाले मिसळीवरचे केवळ नाव तुम्ही घ्याल मिसळ खाल मिसळ खाल मिसळ पाव मिसळ पाव - पाषाणभेद ०१/११/२०२०

डीडीएलजे : स्वप्न दाखवण्याची २५ वर्षे

महासंग्राम ·
विसाव्या शतकाच्या अखेरीस भारताने आपली आर्थिक धोरणं बदलली आणि दोन-चार वर्षांत त्याचा परिणाम इथल्या मध्यमवर्गावर दिसू लागला.लोकांच्या खिशात खुळखुळणारा पैसा वाढला होता,उच्छभ्रु समजल्या जाणाऱ्या दुचाकीला लोकाश्रय मिळु लागला होता, केवळ सिनेमात दिसणारे ब्रँड्स भारतात आपली दालनं उघडू लागले होते. या साऱ्याचा बदल इथल्या तरूणाईवर होणं स्वाभाविक होतं. त्यांच्या इच्छा,स्वप्न यात कमालीचा बदल झाला तो ही फार झपाट्याने. याच बदलाच्या टप्प्यावर 'राज मल्होत्रा' भारतीय तरुणांना भेटला (आणि तरुणींना भावला.) उनाड,मित्रांसोबत गाड्या उडवत फिरणारा, मेंडोलीन वाजवणारा बेजबाबदार.

डोक्याला शॉट [चतुर्थी]

गड्डा झब्बू ·
मला लिहिते करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जेष्ठ मिपाकर अविनाश कुलकर्णी (अकु काका) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना. ***** ब्रह्मांड लोकातून चिन्मय परत आल्यावर बोललेला नवस फेडायला जानकी बाई लगेच पुढल्या दोन दिवसांनी काशी यात्रेला गेल्या होत्या. काशी यात्रेहून परत आल्यावर चिन्मयही आता पूर्वीपेक्षा जरा बरा वागू लागल्याचे पाहून त्यांनी अप्पा राशीनकरांकडे त्याला कुठेतरी नोकरीला लावण्यासाठी शब्द टाकला. अप्पांनीही त्वरित त्यांच्या परिचयाच्या सरकारी कामांचे कंत्राट घेणाऱ्या एका कंत्राटदाराकडे त्याला नोकरीला लावले होते.

मिसळ- एक ड्रीम प्रोजेक्ट

विखि ·
मिसळ-एक ड्रीम प्रोजेक्ट आता तुम्ही म्हन्साल ह्ये असलं कुठं प्रोजेक्ट असतंय व्हय.प्रोजेक्ट म्हणजे कसं कायतरी भव्य दिव्य,ग्रँड. भन्साळीच्या पिक्चर सारखं पायजे. पण आपली कामंच असली. आधीचे प्रोजेक्ट घोटाळा, चिंबोरी, मॅजिक,झमेला आणि आता ही मिसळ म्हणजे अंडा मिसळ. एक जुना सुप्त प्रोजेक्ट्. तो रईस मधला शारुख म्हणतो ना, "कोई भी धंदा छोटा बडा नहीं होता" सेम तसंय "कोई भी प्रोजेक्ट छोटा बडा नहीं होता" तर तुम्हाला या ड्रीम प्रोजेक्टची एक छोटीशी ष्टोरी सांगतो... साल 2011, हिंजवडी फेज 2, एका कंपनीत गटात न बसणारा शब्द म्हणजेच Odd Man Out म्हणून जॉब करत होतो.

ना देवेंद्र देव इथे , ना उद्धव आहे साव

खिलजि ·
ना देवेंद्र देव इथे ना उद्धव आहे साव आजही बळीराजा भीक मागतो पण , त्याला काडीचा नाही भाव संगीत खुर्ची चालू झाली पवार वाजवतायत बिगुल हरेक पठ्ठ्या मग्रूर इथे पण आपलीच बत्ती गुल किती बघावं , काय बघावं कळत नाही काहीच जो तो आम्हाला नाग वाटतो आपला वाली कुणी नाहीच का लावला डाग नखाला ? डोक्याची झालीय भेळ कोण बसणार खुर्चीवरती यातच चाललाय वेळ लाज बाळगा जरा मनाची पुरे हि शोभायात्रा लोकप्रतिनिधी निवडून दिलेयत कि वेड्यांची भरलीय जत्रा कुणीही बसावे , काही करावे आता मेलेय माझे मन डाग पुन्हा कधी लावणार नाही हा करतोय आज मी पण सिद्धेश्वर विलास पाटणकर

डोक्याला शॉट [प्रतिपदा]

गड्डा झब्बू ·
चिन्मय बेडवरुन उठला बेसिन जवळ जाऊन वोश घेतला... दाढी आणि अंघोळ करायचा कंटाळा आल्याने तोंड पुसून केस विंचरून वरचे कपडे उतरवून तसाच घराबाहेर पडला.... वरचे कपडे उतरवून म्हणजे रात्री झोपताना थंडी वाजत होती म्हणून हाफ टी शर्टवर फुल टीशर्ट आणि थ्रीफोर्थ वर जीन्स चढवली होती ते वरचे कपडे उतरवून... तर सांगायचा मुद्दा काय कि चिन्मय कपडे उतरवून घराबाहेर पडला आई काशी यात्रेला गेली होती ल्लोळत पडायचा कंटाळा आला म्हणून पडली स्वारी घराबाहेर ...

शिरवळ

चांदणे संदीप ·
इंडिया-इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती. इंग्लंडचे फलंदाज टिच्चून फलंदाजी करत होते. आतापर्यंत चौथ्या दिवशीच्या पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडच्या दुसऱ्या डावांत ३ बाद २९८ धावा झालेल्या. इंग्लंड १२७ धावांनी पिछाडीवर होता आणि कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात इंग्लंडला यश येईल असेच एकंदरीत चित्र होते. मी लॉंगऑफला उभा होतो. विकेटमागे धोनी, ही जोडी कशी फोडावी या विचारात होता. ॲलिस्टर कुक जरा चाचपडत होता पण उपुल थरंगा अगदी फॉर्मात बॅटींग करत होता. हरभजनला अगदी निष्प्रभ करून टाकले होते त्याने. तरी हरभजननेही अजून हार मानली नव्हती. अचानक हरभजनने त्याची नेहमीची बॉलींग ॲक्शन सोडून मिडीयम फास्ट टाकायला सुरूवात केली.