नाडी ग्रंथ भविष्य आणि कर्म महात्म्य भाग ३ (अंतिम)
वरील लेखातील उल्लेखित गॉकलाँ बाबत तळटीप...
टीप :- हजारो व्यक्तींच्या जन्मकुंडल्या मिळवून संख्याशास्त्राच्या आधारे ग्रह ज्योतिषाचा 'शास्त्रीय' पाया घालणाऱ्या मायकेल गोकलाँ या फ्रेंच संशोधकाची कर्म सिद्धांताच्या ज्ञानाच्या अभावी कशी दिशाभूल झाली आहे हे 'ग्रहांचा मानवावर प्रभाव पडतो ' ह्या त्यांच्या निष्कर्षावरून दिसून येते. विशिष्ट ग्रहाखाली जन्मणाऱ्या व्यक्ती मधे विशिष्ट गुण प्रवृत्ती आढळून येते म्हणून ग्रहच ती गुण प्रवृत्ती निर्माण करतात किंवा ग्रहाच्या प्रभावाचा तो परिणाम आहे.