Skip to main content

ज्योतिष

नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती - तमिल जाणकार मिळत नाही हो

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 03/09/2009 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वाचक, अंनिसवाले पळपुटे आहेत असे आपणास वाटत असेल तर आपण वर्तमानपत्रातून वाचा फोडा. एक सल्ला. अहो, मी कशाला वर्तमानपत्रांकडे धाव घेऊ, जे लाखो रुपयांचे वर्तमानपत्रातून जाहीर आव्हान देतात त्यांची कशी केविलवाणी अवस्था होते ते आपण नुसते एक पत्रातून वाचलेत. अदितीबाईंना तर हे लिखाण अत्यंत जहरी वाटले. अंनिसवाले याहीपेक्षा अत्यंत हीन शब्दात नाडीग्रंथांवर व अनुषंगाने माझ्यावर व अन्य नाडी ग्रंथप्रेमींवर टीका टिप्पणी करतात. याची अदितींना कल्पना नाही. त्यांची एकएक पत्रे व लेख आपण वाचावेत. आपण माझ्या चिकाटीचे कौतुक केलेत, ठीक आहे.

एबर्टीन ज्योतिष आणि स्वाईन फ्लु

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 14/08/2009 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
एका याहूग्रुपवर एका ज्योतिषनिंद्काने प्रश्न विचारला की ज्योतिषांनी स्वाईन फ्लुचे भविष्य का वर्तवले नाही. हा प्रश्न मला उद्देशून असावा कारण मी त्या ग्रुपवरील ज्योतिषाचा खंदा समर्थक आहे. वास्तविक ऑक्टोबर २००८ मध्ये लिहिलेल्या एका टिपणात मी जे ग्रहयोगांचे वर्णन केले आहे, ते जिज्ञासूनी येथे http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/10/blog-post.html अवश्य वाचावे. आधुनिक ज्योतिष (विशेषत: एबर्टीनचे तंत्र) एखाद्या घटनेतील core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास कसे उपयोगी पडते हे यावरून समजून घेता येईल.

तुम्ही कोण आणि कसे आहात पडताळा!

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 10/03/2009 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
काल नागपूर सकाळचा सहावा वर्धापनदिन साजरा झाला. त्या निमित्त विवेक मेहेत्रे यांनी राशीवर्ष हा डिजिटल शो सादर केला. त्यात त्यानी चिनी पद्धतीनुसार राशीवर्ष कसे गणले जाते, त्याची विस्तृत माहिती दिली. मिपावरील सदस्यांना ती द्यावी म्हणून हा लेखनप्रपंच! १२ वर्षांच्या कालांतराने मूषक, वृषभ, व्याघ्र, मांजर, गरुड, सर्प, अश्व, मेन्ढा, मर्कट, कुक्कुट, श्वान, वराह या प्राण्यांच्या नावाने राशीवर्ष गणले जाते. त्या राशीवर्षात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव त्या प्राण्यासारखा असतो, हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले.

मिपा ओळख २

लेखक चेतन यांनी सोमवार, 03/11/2008 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत. भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!

नाडी ग्रंथ पुरावा आणि ताडपत्रलेखनावरील अभ्यास कार्य

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 06/10/2008 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
नाडी भविष्य आणि ताडपत्रलेखनावरील अभ्यास कार्य 'नाडी भविष्यावर आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे.' पुन्हा पुन्हा: नुस्तं "जाऊन पहा" असं म्हणण्यापेक्षा काही पटेलसं लिहिलंत तर "जाऊन पहा आणि मग बोला" असं म्हणण्याची वेळच येणार नाही. लोकं जातील, बघतील आणि स्वतःच प्रतिसाद देतील की "हो, या गोष्टींवर माझा अमुक-तमुक कारणांमुळे विश्वास बसला." पण मुळात ओळख करुन देणारं लिखाणच एवढं त्रोटक किंवा अविश्वसनीय वाटलं तर त्या लिखाणाचं, कदाचित विषयाचंही वर्णन तसंच होणार, आणि लोकांचं मतही!

नाडी ग्रंथ भविष्य आणि इंडॉलॉजिकल स्टडी

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 22/09/2008 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
नाडी ग्रंथ भविष्य आणि इंडॉलॉजिकल स्टडी नाडी भविष्य ताडपत्रावर कोरून लिहिलेले असते. त्याची भाषा तमिळ असते. ताडपत्रवर कोरून लिहिण्याची प्रथा आता अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ताडपत्रे फारच जीर्ण झाल्याने त्यांची डिजिटल पद्धतीने राखण करून त्यातील मजकुराचा अर्थ तज्ञांकडून माहित करून घेण्याचे कार्य अनेक इंडॉलॉजीकल संस्थांतून केले जाते. त्यासाठी भारत सरकार तर्फे नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स. डिपार्टमेंट ऑफ कल्चर - मिनिस्ट्री ऑफ टुरिझम अँड कल्चरतर्फे बरेच धन उपलब्ध करु दिले जाते.

अत्री जीव नाडी

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 14/09/2008 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी अंक २००८ साठी अत्री जीव नाडी विंग कमांडर (नि)शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१0४९. नाडी ग्रंथ भविष्य ही संज्ञा आता मराठी लोकांना गेल्या १०-१५ वर्षांच्या काळात थोडीफार परिचित झालेली आहे. दक्षिण भारतात तमिळ भाषेत ताडपत्रावर कूट लिपितून कोरलेले भविष्य आता महाराष्ट्रातील अनेक शहरात पहायला उपलब्ध आहे. रामायण, महाभारत, भागवत या धार्मिक ग्रंथांतून सामान्यपणे उल्लेखलेल्या अनेक महर्षींच्या नावाने या नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्या उपलब्ध आहेत. त्यापैकी अगस्त्य, महाशिव, कौशिक म्हणजेच विश्वामित्र, वसिष्ठ, शुक, भृगु, काक भुजंदर (भुशुंडी) आदि महर्षींची नावे असलेल्या नाड्या सध्या जास्त प्रचलित आहेत.