Skip to main content

ज्योतिष

सात वारांची भारतीय पद्धती

लेखक निनाद यांनी सोमवार, 15/01/2024 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार, सोमवार इत्यादि सात वारांची व्य्वस्था पुर्णपणे भारतीय कालगणना पद्धतीने जगाला दिलेली देणगी आहे. (या वाक्यावर अनेक मार्क्सवादी इतिहासकार आणि त्यांच्या सपक लेखनावर पोसलेले त्यांचे पंटर माझ्या अंगावर धावून येण्याचा धोका मला दिसतो आहे.) तर वार ही भारतीय देणगी नाही - असा आक्षेप येतो त्याकडे आधी पाहू या. सर्व साधारणपणे भारतात काहीच ज्ञान नव्हते आणि जे काही भारताला माहिती आहे ते सर्व भारतात बाहेरून आणले गेले असे साधारण या आक्षेपाचे स्वरूप असते. त्यासाठी रोमन संस्कृतीने इस १०० च्या आसपास 'वार' म्हणजे दिवसांची नावे भारताला दिली असा एक धादांत खोटा 'कयास स्वरूपाचा सिद्धांत' मांडला जातो.

फलज्योतिष्य कुठे जन्मले?

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 31/07/2023 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
फलज्योतिष्य हे भारतात निर्माण झालेले नसून ते इजिप्त किंवा ग्रीस या देशांमध्ये पहिल्यांदा जन्माला आले. त्यानंतर काही ग्रीक अभ्यासक भारतीय राजांकडे आले त्यांनी आपले ज्योतिषी विषयक ग्रंथ सादर केले त्यानंतर त्या ग्रंथांचे संस्कृतमध्ये रूपांतर करण्यात आले अशा प्रकारे फलज्योतिष हे भारतात आले. पण काही भारतीयांचाच असा समज आहे की फलज्योतिष हे भारतातच निर्माण झाले आहे. तर फलज्योतिष हे नक्की कुठे जन्मले याचा खल करण्यासाठी आणि त्यातून काही ठाम निष्कर्ष काढण्यासाठी हा धागा काढला आहे.खाली काही लिंक आणि एका पुस्तकातील फोटो जोडत आहे जाणकारांनी यावर आपले मत द्यावे.

लोकभ्रम- गूढचिकित्सामंडळ

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 05/04/2023 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
मला माझ्या ज्योतिषछंद जोपासताना एक वाईट सवय आहे. एखाद्या संदर्भ वा माहिती साठी त्याच्या मागे हात धूवुन लागण्याची. तसे ही अनुत्तरीत प्रश्न मला अस्वस्थ करतात त्यामुळॆ मी त्या प्रश्नांच्या मागे लागतो. . तेव्हा मी मुंबईला नोकरीला होतो. मी पॅंटच्या मागच्या खिशात एक छोटी डायरी ठेवत असे. त्यात मी माहिती, संदर्भ असे संकीर्ण टिप्पण ठेवत असे.ग्रंथालयात गेलो वा एखाद्या भाषणाला गेलो व तिथे काही दुर्मिळ माहिती मिळाली की मी ती डायरीत लिहित असे. अगदी आता आता पर्यंत ती सवय होती. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जुने ग्रंथ चाळताना एकदा मला रा.ज.

फलज्योतिषविद्येला जोडलेल्या धार्मिक विधी,उपासनांचा जातकाला उपयोग काय?

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 05/11/2021 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
अस्मादिक फलज्योतिषविद्येचे हौशी अभ्यासक आहेत. फलज्योतिष हे भारतात विकसित झाले असले तरी त्याचे मूळ भारतीय नाही. इजिप्त,बॅबिलोनिया या प्रदेशात जन्मलेली ही विद्या आहे.हिचा संबंध आकाशस्थ ग्रह, उपग्रह, छायाग्रह आणि नक्षत्रे यांच्याशी आहे. म्हणजे निर्जीव ,भटक्या आकाशस्थ वस्तूंशी फलज्योतिषविद्येचा संबंध आहे. हे सर्व ग्रह, उपग्रह, नक्षत्रे, छायाग्रह हे मानव पृथ्वीवर निर्माण होण्याआधीपासून आकाशात आहेत. याचाच अर्थ असा की विशिष्ट ग्रह, तारे यांचा पृथ्वीवरील देवी देवतांशी काहीच संबंध नाहीये.

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 02:48 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

आहुती ????????

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 04/05/2021 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
यज्ञास बैसलों आम्ही आहुतीचा मान घ्यावा भरा झोळी माझीच फक्त भरभराटीचा आशिष द्यावा अवकाळी पाऊस , भूकंपाची जोड त्याला घरे पडली भूकंप येता , पडल्या दगड आणि विटा त्याच चोरुनी यज्ञ मांडला आता आहुतीसाठी आटापिटा तिथे दूरवर चूल पेटली राखण करती दोन मशाली भाकरी रांधण्या तिथेच बैसली सुन्न चेहरा घेऊन माउली महत्प्रयासे पार मशाली आता राहिली फक्त माउली तिला एकदा का आडवी केली आहुतीची मग चिंता मिटली माऊलीचा भोग चढवितो जगणं आलंय जिवा क्षुब्ध व्हाल अशी आस धरितो भरभराटीचा आशिष मज द्यावा ==================================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

रंग रंग तू, रंगिलासी

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 12/05/2020 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
रंग रंग तू, रंगिलासी दंग दंग तू, दंगलासी भंग भंग तू, भंगलासी वेड्यापिश्या रे जिवा जाशी उगा जीवाशी अव्यक्त बोल रे तुझे शब्दांचे झाले तुला ओझे का धावीशी उगा तू रे कुणी नाही वेड्या रे तुझे तो सूर्य देई एकला शक्ती समिंदराची ओहोटीभरती आकाश झेलते तारे मग का हवे रे , तुला सारे ? का जन्म घेतलासी ? हा डाव साधलासी रंगात रंगुनिया साऱ्या संसार मांडलासी गती मंद होत तुझी जाईल मग हार गळ्याशी येईल अग्नीत दग्ध होई सारे आला तसाच रिता जाशील ऐक साद अंतरात्म्याची शमेल खाज त्या बुडाची घे नाम त्या शिवाचे लाभेल गती तुला मोक्षाची ======================== सिद्धेश्वर विलास पा

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

गुप्तधनाचे रहस्य

लेखक jp_pankaj यांनी शनिवार, 26/11/2016 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
"आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ...हॅ हॅ हॅ..आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ हॅ.हॅ..हॅ.. " "गपये.." "आंऊऊऊऊऊऊऊऊ...हँ..हँ..हँ... " आत गप्तो का ?. उगाच ओरडायला जनावरासारखा." पल्लवीने समोरील पटावरील एक प्याद उचलुन हातात पकडल्,पुढली चाल करायच्या आधी पार्थ कडे एक नजर टाकली. "ताई ते तर आहेच जनावर्, डुकरासारखा लोळतय मगापासुन आणी आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊ.....