Skip to main content

ज्योतिष

कथा: विश्वरचनेचे "अज्ञात" भविष्य!

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 07/01/2016 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक- 27/02/2050 वार- रविवार! वेळ- सकाळी चार! मुंबईत अंधेरी येथे "के. के." हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता. वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता! "सी.एम. डब्ल्यू" कार ताशी 80 च्या वेगाने भन्नाट धावत होती. त्यात एकच व्यक्ती बसलेली होती. ड्रायव्हर सीटवर. गाडी चालवत! त्या व्यक्तीचा मोबाईल हॅण्डसेट एका केबलद्वारे त्या कारमधल्या एका फ्रंट डिस्प्ले पॅनेल ला जोडलेला होता. त्यातून डॅनियल नावचा व्यक्ती त्या कारमधल्या व्यक्तीशी इंग्लीशमधून बोलत होता, "विक्रम, कुठे आहेस? पोहोचला नाहीस का अजून?" विक्रम म्हणाला, "मला नेमकी माहिती मिळायला मेहेनत करावी लागली रे. पण शेवटी मिळाली.

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 02/01/2016 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

लेखक DEADPOOL यांनी रविवार, 27/12/2015 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 27/11/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
'पेरणी'साठी बियाणे! मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत! प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये! १. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये.

आला आला जिलबीवाला

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 23/11/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला जिलबीवाला आला आला जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला साधी जिलबी मावा जिलबी पण आहे पंजाबी की राजस्थानी देऊ बोला चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू पण भेसळमालाची देऊ खाण्याला आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी नाहीतर करता तुम्ही झिंगालाला जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला - स्वामी संकेतानंद जलेबीवाले
काव्यरस

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 14/11/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 01/11/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले…. त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो.

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 05/10/2015 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

शनी महादशा- दशा की दुर्दशा? महाशंका आणि कुशंका!

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 01/10/2015 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
तमाम ज्योतिष जाणकार आणि प्रवीण मंडळींना मी काही प्रश्न, शंका आणि कुशंका विचारू इच्छितो. ते सगळे प्रश्न शनीच्या महादशेसंदर्भात आहेत. १. शनीची महादशा नेहेमी दुर्दशाच करते का? २. राशीनुसार आणि जन्मलग्नानुसार शनीच्या महादशेचे फळ कमी जास्त तीव्र किंवा कमी जास्त चांगले आणि वाईट असते का? करिअर आणि कुटुंबावर वर काय परिणाम होतो? ३. मित्र ग्रहांच्या राशींना शनी हा त्याच्या महादशेत त्रास देत नाही असे आहे का? ४. शनी महादशेत शनीची साडेसाती आली तर दुप्पट त्रास होतो का? शनी महादशेच्या दरम्यान शनीची अंतर्दशा आली तर काय होते? आणि त्यात शनीची साडेसाती सुरु असेल तर काय होते? ५.