नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग २

योगविवेक's picture
योगविवेक in जनातलं, मनातलं
9 Jun 2015 - 4:42 pm

नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग २
प्रा अद्वयानंद गळतगे

अशा रितीने ग्रहांचा मानवावर प्रभाव पडत नसेल तर नाडी ग्रंथात त्यांची शांती-पुजा करण्यास का सांगितले जाते? (वरील प्रश्नातील दुसरा मुद्दा )
त्या पूजेचा काय उपयोग? ( तिसरा मुद्दा)
असे साहजिकच प्रश्न निर्माण होतात. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की ब्रम्हविज्ञानानुसार ग्रहांची शांती-पुजा ही खरे तर त्या व्यक्तीची आपल्याच कर्मांची शांती पुजा असते. ग्रह हे त्या व्यक्तीच्या कर्मांची केवळ प्रतिके (symbols) आहेत. त्या प्रतिकांची शांती-पुजा म्हणजे त्या व्यक्तीची आपल्या कर्माची शांती-पुजा असते. त्या शांती-पुजेचा त्या व्यक्तीला आपले कर्म सुसह्य करण्यासाठीच उपयोग होतो. कर्म तीव्र वा बलवत्तर असेल तर ते त्याच्या शांती-पुजेमुळे सुसह्य होते;आणि सौम्य असेल तर शांती-पुजेच्या रूपाने ( नाडीग्रंथात सांगितलेला खर्च करून) भोगले जाते. पण कर्म भोग भोगलाच पाहिजे, त्या पासून सुटका नाही.
आकाश लेखनतील नोंदीवरून नाडी महर्षींना प्रत्येक व्यक्तीचे कर्म माहित झालेले असते. आपल्या कर्माची म्हणजे कर्म देवतेची ग्रह देवतेच्या रूपाने कोण पूजा करणार आहे व कोण करणार नाही, हे ही आकाश लेखनतील नोंदी वरून महर्षींना माहित झालेले असते. हेच आहे. (विश्वातील सर्वच घटनांची नोंद आकाशलेखनात असते हे लक्षात ठेवावे) ज्यांना शांती-पुजा करूनही काही परिणाम दिसून येत नाही, त्यांचे कर्म बलवत्तर असल्यामुळेच दिसून येत नाही; व ते सुसह्य होण्यासाठीच ती शांती-पुजा सांगितलेली असते. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसारच शांती-पुजेचा अनुभव येतो हे यावरून समजून घ्यावयाचे आहे.
ही गोष्ट एका उदाहरणाने स्पष्ट करता येईल. समजा आपल्याला विद्या प्राप्त व्हावी म्हणून आपण विद्या देवतेच्या किंवा गुरूच्या प्रतिमेची पूजा केली, तर त्या पुजेमुळे आपल्याला विद्या मिळेल काय? पण एकलव्याला द्रोणाचार्य या गुरूच्या प्रतिमेची पुजा केल्यामुळे धनुर्विद्या प्राप्त झाल्याची महाभारतात कथा आहे. पण प्रत्यक्षात एकलव्याला केवळ द्रोणाचार्यांच्या प्रतिमेच्या पुजेमुळे ती विद्या प्राप्त झालेली नसून स्वत:च्या धनुर्विद्येच्या अभ्यासामुळे - म्हणजे स्वत :च्या कर्मामुळे - ती त्याला प्राप्त झाली, ही वस्तुस्थिती आहे. द्रोणाचार्यांची प्रतिमा हे एक निमित्त आहे. धनुर्विद्येचे ते एक प्रतीक आहे. एकलव्याचे कर्म - धनुर्विद्येचा अभ्यास- हेच त्याला ती विद्या प्राप्त होण्यासाठी प्रत्यक्षात कारणीभूत ठरले. एकलव्याला याच जन्मातील कर्मामुळे फळ मिळाले, नाडी भविष्य पाहणाऱ्या व्यक्तीला पुर्व जन्मातील कर्मामुळे शांती-पुजेचे फळ मिळत असते, हा कर्म सिद्धांत शांती पूजेच्या रुपाने सांगितला आहे. किंबहुना नाडीग्रंथ लिहिण्याचा मह्रषिंचा उद्देशच कर्म सिद्धांत सांगणे हा आहे.
अंतिम भाग 3 मधे वाचा ....
गॉकलाँ कोण? जन्मकुंडल्या – संख्याशास्त्रीय प्रयोग - सिझेरियन

मांडणीआस्वाद

प्रतिक्रिया

स्पा's picture

9 Jun 2015 - 4:43 pm | स्पा

ओह

अच्च जाल्ल्ल तल

वाह काय लिहीलंय!! पण काय लिहीलंय?

खटपट्या's picture

9 Jun 2015 - 6:27 pm | खटपट्या

नवग्रह शांती...जर केली आणि फरक नाही पडला तर केलेला खर्च परत मिळतो का ? कारण बराच खर्च येतो असे ऐकून आहे.

फार खटपट्या स्वभाव बाॅ तुमचा

मी तर म्हणेन सर्व कर्मकांडे करणर्‍यांना ग्राहक रक्षण कायदा (असा कायतरी कायदा आहे म्हणे) लागू करावा.

आदूबाळ's picture

9 Jun 2015 - 8:18 pm | आदूबाळ

भारी ऐड्या!

द-बाहुबली's picture

10 Jun 2015 - 8:36 am | द-बाहुबली

जर अशा पुजेची रितसर पावती घेतलीत तर कदाचीत कायद्याचा वापर करता येणे शक्य आहे असे वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2015 - 11:38 am | डॉ सुहास म्हात्रे

त्या पावतीत बाsssरीक अक्षरात "मागील अनुभव म्हणजे भविष्यातल्या यशाची हमी असे नाही" असा वैधानीक इशारा लिहून कायदा विक्रेत्याच्या बाजूला ओढून आणता येतो ! ;) :)

सर्व्हिस टॅक्सही लावता येईल.

संदीप डांगे's picture

9 Jun 2015 - 7:38 pm | संदीप डांगे

सगळ्या पूजा ग्रहशांती निव्वळ थो तां ड आहे. पैसे लाटायचे मार्ग आहेत. वर जी काय कारणे दिली आहे ग्रहशांतीची ती पार भंपक आहेत. कुठल्याच वादविवादात टीकणार नाहीत. तेही ज्यांना ज्योतीष खरंच कळतं त्यांच्या समोर. खरे ज्योतिषी कधीच कुठलीच ग्रहपुजा सांगणार नाहीत. कारण कर्माचे भोग कुणालाच चुकत नाहीत. तुम्ही काहीही करा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 7:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अधिक माहितीकरता व्यनि करा.

याबाबतीत अत्रुप्त यांचे मत जाणून घ्यायला आवडेल..

सतिश गावडे's picture

9 Jun 2015 - 8:18 pm | सतिश गावडे

a

अजया's picture

10 Jun 2015 - 10:50 am | अजया

किती हसताय =))=))

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 11:36 am | अत्रुप्त आत्मा

आपल्याला हसून हसून पोटात दुखतं, त्यांना 'पोटात दुखलं'..की (मगच्च! :P ) हसू येतं. :-D

सतिश गावडे's picture

10 Jun 2015 - 12:46 pm | सतिश गावडे

या विषयावर तुम्हाला काही विचारणं म्हणजे एखाद्या अजस्त्र यंत्रणेने आपली संगणक व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी एखाद्या ह्याकरची मदत घेण्यासारखे आहे.

तुम्हाला व्यक्तीची जन्मतारीख, वेळ विचारून, मनातल्या मनात काही गणितं करून "तोडगा" सांगताना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे हो. म्हणून हसायला आलं. :)

प्रसाद गोडबोले's picture

10 Jun 2015 - 2:36 pm | प्रसाद गोडबोले

तुम्हाला व्यक्तीची जन्मतारीख, वेळ विचारून, मनातल्या मनात काही गणितं करून "तोडगा" सांगताना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे हो. म्हणून हसायला आलं. :)

>>> =))

हे म्हणजे हा सुर्य आणि हा जयद्रथ केलेत आपण गावडे सर !

=))

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 5:02 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्हाला व्यक्तीची जन्मतारीख, वेळ विचारून, मनातल्या मनात काही गणितं करून "तोडगा" सांगताना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे हो. म्हणून हसायला आलं. :)…>> तो एका फ़ुकट्या याजमनाला दिलेला फुकटचा सल्ला होता. म्हणुन तो तसा,आणि त्याच दर्जाचा! पण हे तुम्ही समजावून-घेणं ,म्हणजे मला दिलेल्या उदाहरणाला तुम्ही स्वत:च लायक झाल्यासारखं होइल.
म्हणुन याला स्पष्टि करण न मानता केवळ माहिती माना. कसे?

"आपणास मुद्दा कळलेला नाही" =))

सतिश गावडे's picture

10 Jun 2015 - 5:24 pm | सतिश गावडे

होय. त्यांना मुद्दा कळलेलाच नाही. =))

संदीप डांगे's picture

10 Jun 2015 - 5:27 pm | संदीप डांगे

सहमत...

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 6:30 pm | अत्रुप्त आत्मा

@ मुद्दा कळलेलाच नाही. =))>> :-D चालु द्या,अता तुमचे निरर्थक आत्मरंजन! :P ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊउ :P

हे स्वमतांध दांभिकतेचे देवलसीकर्मकांडिपण झाले.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 7:10 pm | अत्रुप्त आत्मा

व्हेरी गुड!

चालु द्या....

आमचे येथे चालू वैगरे काही मिळत नाही, धन्यवाद!!

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 7:58 pm | अत्रुप्त आत्मा

:)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 1:01 am | अत्रुप्त आत्मा

@ अत्रुप्त यांचे मत जाणून घ्यायला आवडेल>> देव ... ही माणसाच्या अंतर्मनात "तयार होणारी" मूलभूत श्रद्धा सोडली , तर बाकीचे सारे कर्मकांड थोतांड आहे..हे मला मान्य आहे.
कर्मकांड हा मूलभूत श्रद्धांवर रचलेला एक नाटका सारखा शंभर टक्के धंदेवाइक खेळ आहे. तो बुद्धि आणि विवेकानी सोडुन दिला,तरच मी त्याला थोतांड म्हणायला तयार असतो. नाहितर एकीकडे धर्म निर्मित कर्मकांड सोडायची,आणि दुसरीकडे धर्मा शिवाय येणारी दूसरी कर्मकांड स्विकारायाची,अशी विसंगति आयुष्यात येऊ शकते.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 1:45 am | अत्रुप्त आत्मा

आता धर्मा शिवाय असलेली कर्मकांड म्हणजे काय? तर धार्मिक कर्मकांडां मधे जे हेतु दर्शाविलेले असतात,तश्याच हेतुनी केलेल्या ऐहिक क्रिया,ही ती कर्मकांडे होतात. लबाडिने कमावालेले पैसे पचायाला इकडे एखादी पूजा असेल,तर तिकडे त्या ऐवजी असे पैसे जवळ न ठेवता पार्टीत उधळले की पचातात.. असं समजुन नित्य दारुकाम करणारे काही वरकमाईवाले मी पाहिले आहेत. आणि त्यांच्या टोळिचि खरोखर या पैसे उडवण्याच्या मूल्यावर नितांत श्रद्धा आहे. (अजुनही!)

पारंपारिक श्राध्दपक्ष पूजापाठ करणे सोडले आणि स्वत:ला आधुनिक म्हणवुन घेत असतानाच , भिकाय्रा ला अन्न वाढतो तेच श्राद्ध, मित्रांबरोबर आनंद साजरा केला की तीच झालि पूजा ... असा त्या राहिलेल्या श्रद्धेचा 'सल' मिटविण्याचे प्रकार करणारे ही असतात.

ह्या खेरीज असाही एखादा असतो,जो ह्यातलं आणि त्यातलं काहीच करणार नाही. स्वत:ला आधुनिक ही म्हणवुन घेइल. धार्मिक आणि ऐहिकातलि कर्मकांड ही बुद्धि पूर्वक नाकारेल,परंतु त्यानंतरचे उत्तरदायित्व अजिबात न मानता सारे जीवन खुशाल चेंडु ऐषारामात व्यतीत करेल. म्हणजे त्याचं एकेकाळी नकळत लागलेलं हे कर्मकांडाचं व्यसन सुटेल ,पण त्याच्या स्वत:मधला व्यसनी पणा सुटणार नाही. म्हणजे देवाला कर्मकांडांना शिव्या घालून झाल्या,त्या अत्यावश्यकंहि होत्या..हे ही मान्य! पण स्वत: मधल्या देवलसि पणाला कधी शिव्या घालणार... तो स्वत:मधला देवलसीकर्मकांडिपणा कधी मान्य करणार? स्वीकारणार???
हा महत्वाचा प्रश्न उरातोच.

तुमच्या स्पष्टीकरणाने माझे समाधान झाले आहे.

संदीप डांगे's picture

10 Jun 2015 - 10:16 am | संदीप डांगे

देवलसीकर्मकांडिपणा

गुरूजी, थोडं इस्कटून सांगा.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 11:06 am | अत्रुप्त आत्मा

ती मी जाणिवपूर्वक निर्माण केलेली शब्दसंहति आहे.
@ देवलसीकर्मकांडिपणा >> म्हणजे जगातील कुठल्याही प्रकारच्या अज्ञाताला शरण जाण्याची निसर्गदत्त मूलभूत प्रवृत्ति. धर्मात ती देवाप्रधान कर्मकांडात्मक असते,आणि अधर्मात निधर्मात कुठल्याही गोष्टी अथवा गृहितकांवरचि संपूर्ण शरणागत अंधनिष्ठा असते. दोन्हीकडे कर्मकांडां सारखं काहीतरी करून समाधान/फ़ायदा/फलप्राप्ति मिळवण्याचि प्रवृत्ति असते. तिलाच मी या शब्दसंहतित कोंडलं आहे.

अजया's picture

10 Jun 2015 - 10:49 am | अजया

_/\_बुवा.

प्रसाद गोडबोले's picture

10 Jun 2015 - 1:47 pm | प्रसाद गोडबोले

,जो ह्यातलं आणि त्यातलं काहीच करणार नाही. स्वत:ला आधुनिक ही म्हणवुन घेइल. धार्मिक आणि ऐहिकातलि कर्मकांड ही बुद्धि पूर्वक नाकारेल,परंतु त्यानंतरचे उत्तरदायित्व अजिबात न मानता सारे जीवन खुशाल चेंडु ऐषारामात व्यतीत करेल. म्हणजे त्याचं एकेकाळी नकळत लागलेलं हे कर्मकांडाचं व्यसन सुटेल ,पण त्याच्या स्वत:मधला व्यसनी पणा सुटणार नाही.

>>> ह्याला आमचे एक मित्र एक पोथी सोडुन दुसर्या पोथीत अडकणे असे म्हणतात । आमचे दुसरे एक मित्र आहेत असे एक पोथी सोडून दुसर्यात अडकलेले।

असो।

बाकी प्रतिसाद आवडला "मुटेजी" !!

#स्वमतांधदांभिकता

प्रसाद गोडबोले's picture

10 Jun 2015 - 2:38 pm | प्रसाद गोडबोले

हे एक लिहायचे राहिलेच ...

“नाडी/ अध्यात्म/पौरोहित्य तज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2015 - 11:55 am | डॉ सुहास म्हात्रे

देव ... ही माणसाच्या अंतर्मनात "तयार होणारी" मूलभूत श्रद्धा सोडली, तर बाकीचे सारे कर्मकांड थोतांड आहे.

हे एक नंबर !

लोकांचे माना पिळून मग पूजा घालून अथवा देवळांच्या देणगीपेटीत रग्गड रक्कम टाकून पापमुक्तीचे समाधान करून घ्यायचे आणि त्यानंतर परत मोठ्या हुरुपाने नविन माना पिरगळायला तयार ! याला श्रद्धा तरी कसे म्हणायचे ???... याला फरफार तर भ्रामक व्यक्तीगत मनोचिकित्सा (डिल्युजनल सेल्फ-सायकोथेरपी) किंवा स्वतःची हेतुपुर्रसर केलेली दिशाभूल असे म्हणू शकू.

कारण कर्माचे भोग कुणालाच चुकत नाहीत. तुम्ही काहीही करा.

हम्म.. कर्म प्रमाण जरी तरी का भजावा हरी ? असा प्रश्न म्हणूनच केला जात असावा.

संदीप डांगे's picture

10 Jun 2015 - 4:08 pm | संदीप डांगे

हरी भजणे मोक्षाकडे जाणार्‍या हजारो मार्गांपैकी एक आहेच. गंमत इतकीच की 'मुखी हरीनाम पण मनी दुसरेच काम' चालू असते. तिथेच सगळे फसते.

हरी भजण्यासारखी अगदी सोपी, आचरणास साधी क्रिया सामान्य मनुष्यास सांगितली जाते कारण की इतर कठोर तपश्चर्येची त्याची अजून तयारी झालेली नसते. त्या हत्तीएवढ्या कठोर तपश्चर्येची 'नामजप' अगदी मुंगीएवढी पायरी आहे. तरी ती नीट न केल्याने उपयोग होत नाही. कारण साधना कुठलीही असो ती सोपी कधीच नसते जेव्हा तुमचे लक्ष भलतीकडेच असते.

दमामि's picture

10 Jun 2015 - 11:27 am | दमामि

योगविवेकभौ, तुम्ही नाडी स्पेशालिस्ट दिसता?
एक शंका होती, आजकाल चायनिज नाड्या मिळतात, त्या टिकतात काय हो? की नको त्या वेळेला तुटतात?

सिरुसेरि's picture

10 Jun 2015 - 12:02 pm | सिरुसेरि

यावरुन मला 'नारुकाका , चड्डीची नाडी बांध ना ' हा संवाद आठवला . तसेच ' जानती हो इतना तो बदन मे लाखो नाडी , बोल दो मुझको इतना , कहां है प्यार की नाडी ' ही ओळ आठवली . धन्यवाद.
नाडी शास्त्र व कर्णपिशाच्च एकच का ? त्याचे ही जाणकार असतात का ?

साग्रृ's picture

14 Jun 2015 - 1:56 am | साग्रृ

लेख १ व २ है फारच सुंदर पद्धतीने समजवन्यात आले आहेत व त्यामुळे सामान्य माणसालापण त्याचा उपोयोग होइलच यात कही दुमत नाहि. परंतु क।ही समाजविघातक लोकांची प्रतिक्रिया फारच बिनड़ोक पनाचि दिस्ते. तरी समजदार लोकांनी त्या टालाव्यात. ओम नमः शिवाय