बुद्धिभेद
पेपर, टीव्ही, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी घटत्या उपयोगितेच्या
( हेन्री फियोल ) पलीकडे गेल्या आहेत.
( मी पा अपवाद :) ).
जे काही वाचनात येत त्यावर परस्पर विरोधी मत वाचायला मिळतात. नीरक्षीर विवेक बर्यापैकी जागृत असल्याने काय घ्यायचं न काय सोडायचं हे स्वत:ला ठरवता येतं. पण माध्यमांच्या त्सुनामी मध्ये एकाच बातमी इतक्या वेग वेगळ्या प्रकारे वाचायला / पाहायला /ऐकायला मिळते कि यातला खरा कोण हे शोधणं कठीण होतंय.
आपला मुद्दा मांडणे वेगळ नि वाद घालणे वेगळ, हा गोंधळ कुठेतरी आपल्या निर्णय क्षमतेवरच घाला घालतोय.