अमेरीका...अमेरीका...अमेरीका...
In reply to ... by आशु जोग
In reply to हा सरसकटीकरण करणारा दावा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आम्हाला प्रश्न पडतो. by नाव आडनाव
In reply to काहीसे विस्कळीत-१ by गॅरी ट्रुमन
In reply to काहीसे विस्कळीत-१ by गॅरी ट्रुमन
In reply to आता कुणी अमेरिकेचे फॅन असेल by संदीप डांगे
In reply to आता कुणी अमेरिकेचे फॅन असेल by संदीप डांगे
अमेरिका कशी इतरांसारखीच नॉर्मल आहे हे रशियाला जास्त काळं करून दाखवण्याचा प्रयत्न करूनच केलंय ना?चला या निमित्ताने रशिया पण काळी होती हे मान्य केलेत हे पण काही कमी नाही. आपल्याकडे अमेरिकेला शिव्या घालणारे लोक अगदी ढिगानी सापडतील.पण डाव्या विचारांनी प्रभावित झालेल्यांनी त्यापेक्षा जास्त वाईट गोष्टी करूनही (गुलाग वगैरे) त्याविरूध्द किती लोक बोलतात?
अमेरिकेला कसलातरी अहंगंड का न्यूनगंड आहे म्हणून जगभर आपली प्रतिमा ओन्ली सेवियर ऑफ ह्युमन रेस ऑफ द व्होल वर्ल्ड अशी बनवत असतात.याला तुम्ही काही हवे ते म्हणा. लोकशाही आहे (जी डाव्यांमध्ये नसते--त्यांच्याविरूध्द काही बोलले तर गोळ्या खाणे नाहीतर गुलागमध्ये जाणे हेच पर्याय असतात). पण हा राजकारणाचा भाग आहे. आणि अमेरिकेची सेव्हिअर ही प्रतिमा सध्याच्या काळाविषयी नसली तरी शीतयुध्दाच्या काळात कम्युनिझम या मानवजमातीला काळीमा असलेल्या व्हायरसचा जगभर प्रसार रोखण्यात अमेरिकेने नक्कीच चांगली भूमिका बजावली त्याबद्दल योग्यही होती असे मी म्हणेन. दुसर्या महायुध्दानंतर कम्युनिझम पसरायला अगदी योग्य परिस्थिती होती. युध्दात नुकसान झाल्यामुळे गरीबी होती.आणि गरीबांना भूलथापा देऊन आपल्याकडे वळवायचे काम याच डाव्यांनी सर्वत्र केले आहे.अशावेळी अमेरिका हाच फ्री वल्ड साठीचा कम्युनिझमविरूध्दचा आधारस्तंभ होता.
त्यामुळे अमेरिकेचा दांभिकपणा जास्त उजळ व सर्वत्र दिसतो, रशिया गपगुमान हातपाय पसरून खातपित असतो.नाही हो रशियाचा दांभिकपणा अगदी उजळपणे कळला तरी तो मान्य केलेला चालेल का त्या महान विचारवंतांना? :) अमेरिकेने शीतयुध्दाच्या काळात अनेक वाईट गोष्टी नक्कीच केल्या.पण त्याचे कारण काय होते? युरोपमधले दुसरे महायुध्द संपतानाच रशियाने पूर्व युरोपात हातपाय रोवले.दुसरे महायुध्द नक्की कशाकरता लढले गेले होते? हिटलर या राक्षसापासून जगाची मुक्तता झाल्यानंतर पूर्व युरोपात मात्र तिथे स्टॅलिन नावाचा दुसरा राक्षस येऊन बसला.आणि हा राक्षस हिटलरपेक्षाही सवाई निघाला.त्याने जगात आणखी हातपाय पसरले असते तर जगातील फ्री सोसायटी, लिबर्टी, लोकशाही या सगळ्या गोष्टींना बासनात गुंडाळून ठेवावे लागले असते.तसे होऊ नये म्हणून अमेरिकेला अनेक गोष्टी कराव्या लागल्या.यात अमेरिकेची बाजू १००% पांढरी नक्कीच नाही पण ती रशियाच्या आपले विचार पूर्व युरोपात हुकुमशाहीने लादायच्या प्रवृत्तीला प्रतिक्रिया होती.
In reply to :) by गॅरी ट्रुमन
अमेरिका हाच फ्री वल्ड साठीचा कम्युनिझमविरूध्दचा आधारस्तंभ होता.अगदी अगदी ! अमेरिकेने शीतयुध्दात रशियाला आवरले नसते तर जगाचे काय झाले असते हा विचार करवत नाही ! धर्म ही अफुची गोळी असेल ही कदाचित पण कम्युनिझम हा हेरॉईन चा ओव्हर डोस आहे ! !
In reply to :) by गॅरी ट्रुमन
In reply to मिसळपावच्या स्थापनेत by द-बाहुबली
In reply to मिसळपावच्या स्थापनेत by द-बाहुबली
In reply to रशिया ला शिव्या खुद रशियन लोक by निनाद मुक्काम …
ओबामा नोबेल ला जागत आहे मलाला उलाला सारखा शोभेची बाहुली म्हणून नुसता मिरवत नाही बसला.मलाला ही एक १३-१४ वर्षाची शाळेतली मुलगी आणि ओबामा हा अमेरिकेचा अध्यक्ष. दोघांनाही नोबेल मिळाले म्हणून या चर्चेत मलालाचा उल्लेख आणायचे प्रयोजन समजले नाही. ओबामाला अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून अनेक पॉवर्स आहेत. तशा मलालाला आहेत का?मग ते मिळालेले नोबेल मिरविण्याशिवाय मलाला आणखी काय करू शकणार आहे? आणि दुसरे म्हणजे नोबेल पारितोषिक काहीतरी केल्यानंतर देतात की नोबेल आधी मिळते आणि मग ते जागायला काहीतरी करावे लागते? ओबामाला नोबेल जाहिर झाले नोव्हेंबर २००९ मध्ये. ओबामा सत्तेत येऊन जेमतेम १० महिने होत होते तोपर्यंत.या काळात ओबामाने नक्की असे काय केले होते की ज्याबद्दल त्याला नोबेल मिळाले? आणि इराणबरोबरचा अणुकरार म्हणजे एक मोठी चूक ठरणार आहे असे मला वाटते. खरेखोटे काय ते काळच सांगेल.
In reply to तोच तर मुद्दा आहे. अमेरिकेने by गॅरी ट्रुमन
इराणबरोबरचा अणुकरार म्हणजे एक मोठी चूक ठरणार आहे असे मला वाटते. खरेखोटे काय ते काळच सांगेल.ह्या चर्चेच्या निमित्ताने सविस्तर प्रतिसाद देवुन अथवा लेख लिहुन इराण अणुकरारावर प्रकाश टाकावा अशी गॅरी ट्रुमन ह्यांना विनंती करीत आहे ! आमच्या विकीपीडीय अभ्यासा नुसार तर ह्या कराराचे जगभर स्वागत होत आहे , फक्त आमच्या आवडत्या इस्त्राईल ने मात्र निषेध् केल्याचे निदर्शनास आले !
In reply to इराणबरोबरचा अणुकरार म्हणजे एक by प्रसाद गोडबोले
ह्या कराराचे जगभर स्वागत होत आहे१९३८ च्या म्युनिक कराराविषयी जगभरात काय प्रतिक्रिया होती? असो. इराण म्हणजे १९३९ चा जर्मनी होईल असे नाही आणि वर्षभरात तर नाहीच नाही. पण तरीही इराण म्हणजे "बातोंसे माननेवाले" भूत आहे का हा प्रश्न आहे.
In reply to इराण बातोंसे माननेवाले भूत आहे का? by गॅरी ट्रुमन
In reply to तोच तर मुद्दा आहे. अमेरिकेने by गॅरी ट्रुमन
In reply to अमेरिकेने मदत केल्यामुळे by निनाद मुक्काम …
हिटलर अमेरिकेने निर्माण केला नाही म्हणून अमेरिकेने लाद्देन निर्माण केला नाही हे असे काहीसे तुमचे गृहीतक दिसतेओसामा हा एक मनुष्य समजले तर माझे म्हणणे नक्की काय आहे हे समजणार नाहीच. ओसामा, पक्षी दहशतवाद ही एक प्रवृत्ती आहे.आणि सौदीमधून दहशतवाद निर्यात होणे हा प्रकार ओसामापूर्वीपासून कित्येक शतके चालू आहे.तेव्हा अमेरिकेने आपल्या रशियाविरूध्दच्या राजकारणासाठी ओसामा, पक्षी दहशतवाद वापरून घेतला पण दहशतवाद त्यापूर्वी कित्येक शतके अस्तित्वात होता आणि त्यामुळे दहशतवादासाठी अमेरिकेला जबाबदार धरणे चुकीचे आहे एवढेच माझे म्हणणे आहे.
लादेन निर्माण केला व त्याचे अवतारकार्य पूर्ण झाल्यावर त्याचे विसर्जन केले नाही परिणामी तो अमेरिकेवर उलटला त्यामुळे अमेरिका परत अफगाण मध्ये आले अफगाण उध्वस्त झाला त्या भागात व पाकिस्तान मध्ये कट्टर वाद रुजला ,काट्याने काटा काढून मग दोन्ही काटे मोडावेत असे अमेरिकेने नक्कीच करायला हवे होते. रशियाविरूध्दचे काम झाल्यानंतर ओसामाला उडवायला हवे होते हा मुद्दा नक्कीच मान्य. पण अमेरिका परत अफगाणिस्तानात आल्यामुळे पाकिस्तानातही कट्टरतावाद रूजला--- नक्की का? प्रेतांनी भरलेल्या रेल्वेगाड्या दिल्लीला १९४७ मध्ये येत होत्या त्यावेळीही अमेरिकाच अफगाणिस्तानात असल्यामुळे रूजलेला कट्टरतावाद का तो? असो.
In reply to हिटलर अमेरिकेने निर्माण केला by गॅरी ट्रुमन
In reply to कट्टरवाद व धार्मिक उन्माद by निनाद मुक्काम …
पण आज बांगला देशात पाकिस्तान एवढा कट्टरवाद नाही आहे .की सध्याचे बांगलादेशचे सरकार कट्टर नाही? बांगलादेशात भारतविरोधी तत्वे नाहीत? बांगलादेशात जमाते-इस्लामी नाही? तिथला विरोधी पक्ष--बेगम खालिदा झिंयांचा बांगलादेश नॅशनल पक्ष भारताच्या बाजूचा आहे? पूर्वोत्तर भारतातील दहशतवादी संघटनांना पूर्वीच्या सरकारच्या काळात बांगलादेश सरकारने पाठिंबा दिला नव्हता? उल्फाचे वगैरे नेते बांगलादेशात आश्रयाला नव्हते? २००१ मध्ये (सध्याच्या शेख हसिनाच पंतप्रधान असताना) मेघालयमध्ये बी.एस.एफ च्या १२ जवानांची हालहाल करून हत्या बांगलादेश रायफलने केली नव्हती का? त्यावेळी असेच वातावरण होते की शेख हसीनांचा हेतू चांगला आहे (शेवटी त्या मुजीबच्या कन्या आणि मुजीबची हत्या पाकिस्तानवाद्यांनीच केली) आणि त्या भारताबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेऊ इच्छितात.पण त्या कट्टर तत्वांपुढे फार काही करू शकत नाहीत. सध्या त्यांना यश मिळत आहे हे चांगलेच आहे.पण म्हणून बांगलादेशात सगळेच आलबेल आहे हे म्हणायला it's too early.
जगभरात एकेकाळच्या पूर्व पाकिस्तानला म्हणजे आताच्या बांगला देशाला अमेरीरेकी परीसस्पर्श न लाभल्याने तेथील नागरिक व तो देश जगभरात दहशतवादी देह म्हणून ओळखला जात नाहीतुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?देशात मुळात कट्टरतावाद असला नसला तरी अमेरिकेचा परिसस्पर्श झाल्यास तो देश दहशतवादी बनतो? तुर्कस्थानही नाटोचा सदस्य आहे म्हणजे त्या देशालाही परिसस्पर्श झालाच आहे की. आणि शिया-सुन्नी दंगली म्हणाल तर आपल्या लखनऊमध्येही होत असत.मग भारतावरही अमेरिकेचा परिसस्पर्श आहे का? असे बाहेरून परिसस्पर्श होऊन पाकिस्तानसारखे देश कट्टर बनतात हे म्हणणे अत्यंत भाबडेपणाचे आहे. मुळात थोडाही कट्टरपणा नसेल तर त्याला बाहेरून फूस लावणार कोण आणि कशी?
In reply to :) by गॅरी ट्रुमन
In reply to पाकिस्तानी माजी राजदुताकडून by निनाद मुक्काम …
In reply to कट्टरवाद व धार्मिक उन्माद by निनाद मुक्काम …
In reply to अमेरिकेने मदत केल्यामुळे by निनाद मुक्काम …
In reply to ... by आशु जोग
In reply to रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजर by गॅरी ट्रुमन
In reply to रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजर by गॅरी ट्रुमन
In reply to रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजर by गॅरी ट्रुमन
त्यातही रशियाने पूर्व युरोपात जे काही केले, नंतर हंगेरीमध्ये केले त्यामुळे रशियाचा जगभर हातपाय पसरायचा प्रयत्न आहे असे वाटून आपल्या बाजूला उभे राहणार्या याह्याखानसारख्या क्रूरकर्म्यांनाही अमेरिकेने समर्थन दिले.मुळात रशियाने तसे काही केलेच नसते तर १९७१ मध्ये अमेरिकेची भूमिका काय असती?(विडंबन मोड ऑन) १९७१ मध्ये भारताने पूर्व पाकिस्तानात जे काही केले त्यानंतर भारताचा पुर्ण आशियामध्ये हातपाय पसरायचा प्रयत्न आहे असे वाटून आपल्या बाजूला उभे राहणार्या दाऊद इब्राहिमसारख्या क्रूरकर्म्यांनाही पाकिस्तानने समर्थन दिले. मुळात बाबरी मस्जिद पाडलीच नसती तर दाऊदला मुंबईत बॉम्बस्फोट करावे लागले असते का? (विडंबन मोड ऑफ) अवांतरः आज पहिल्यांदाच क्लिंटन साहेबांची भुमिका पुर्णपणे बायस्ड वाटतीय.
In reply to त्यातही रशियाने पूर्व युरोपात by गुलाम
In reply to त्यातही रशियाने पूर्व युरोपात by गुलाम
In reply to विडंबन by गॅरी ट्रुमन
In reply to विडंबन by गॅरी ट्रुमन
In reply to असे विडंबन करायचा एकच उद्देश by गुलाम
In reply to एक विचार by श्रीरंग_जोशी
अमुक ठिकाणचा इस्लामी दहशतवाद अमेरिकेच्या पाताळयंत्रीपणामुळे आहे, तमुक ठिकाणचा इस्लामी दहशतवाद अमेरिकेच्या पाताळयंत्रीपणामुळे असे नेहमी बोलले जाते. जगभरच्या मुस्लिम लोकांना लढण्यासाठी काही कारण असेल तर अमेरिका छुप्या पद्धतीने बळ देऊ शकते तर आजवर अमेरिका गैरमुस्लिम अन्यायग्रस्त लोक जसे तिबेटी लोक किंवा काही देशांत अल्पसंख्य असलेले हिंदू धर्मीय यांना दहशतवादी का बनवू शकली नाही?सहमत आहे. म्हणूनच मागील प्रतिसादात गझनीच्या महंमदाचे उदाहरण दिले होते.भारताने बघितलेल्या अनेक राक्षसांपैकी तो एक होता.त्याला कुठल्या अमेरिकेने समर्थन दिले होते? तेव्हा अफगाणिस्तानात अमेरिकेने त्या दहशतवादाचा आपल्या राजकारणासाठी रशियाविरूध्द उपयोग करून घेतला असे फार तर म्हणता येईल पण तो दहशतवाद अमेरिकेमुळे जन्माला आला हे म्हणणे म्हणजे चुकीचे आहे असे मला वाटते.
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
जगभरच्या मुस्लिम लोकांना लढण्यासाठी काही कारण असेल तर अमेरिका छुप्या पद्धतीने बळ देऊ शकते तर आजवर अमेरिका गैरमुस्लिम अन्यायग्रस्त लोक जसे तिबेटी लोक किंवा काही देशांत अल्पसंख्य असलेले हिंदू धर्मीय यांना दहशतवादी का बनवू शकली नाही?हे आर्ग्युमेंट खुपच भयानक आहे. कारण यात रिडींग बिट्वीन द लाईन्स केलं तर तुम्हाला "सगळे मुस्लिम दहशतवादी नसतात पण सगळे दहशतवादी मुस्लिम असतात" असं काहीतरी म्ह्णायचंय असं वाटतं. आय होप आय एम व्राँग. कारण मी आधीच नक्षलवाद्यांच्या रुपाने गैर-मुस्लिम दहशतवादाचे उदाहरण दिलेले आहे. एलटीटीई, कछ (ज्यु दहशतवादी संघटना), DKBA (बुद्धिस्ट दहशतवादी संघटना), अभिनव भारत वगैरे इतर उदाहरणे आहेतच. अमेरिकेनी अल्पसंख्य तिबेटी किंवा हिंदू यांना दहशतवादी बनवण्याचा प्रयत्न केला नाही कारण ते त्यांना पॉलिटिकली सोयिस्कर नव्हतं एवढंच. पण जर उद्या त्यांना गरज वाटली तर ते करु शकतच नाहीत असं नाही. हिंदू लोक दहशतवादी होउच शकत नाहीत असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर चीन त्यांना समर्थन देऊन नक्षलवादी बनवु शकतो तर अमेरिका का बनवु शकणार नाही.
In reply to क्लिंटनजी आणि श्रीरंगजी दोघांना एकत्रित प्रतिसाद देतोय by गुलाम
In reply to क्लिंटनजी आणि श्रीरंगजी दोघांना एकत्रित प्रतिसाद देतोय by गुलाम
In reply to क्लिंटनजी आणि श्रीरंगजी दोघांना एकत्रित प्रतिसाद देतोय by गुलाम
परंतु याचा अर्थ इतिहास-वर्तमानातल्या कुठल्याच दहशतवाद्याला अमेरिकेने समर्थन दिले नाही, हे लॉजिक पुर्णपणे गंडलेले आहे.अहो नक्की काय लिहिले आहे हे वाचत जा हो. माझे म्हणणे इतकेच आहे की ओसामासारख्या दहशतवाद्याचा अमेरिकेने रशियाविरूद्ध्दच्या आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला. पण दहशतवाद अमेरिकेने जन्माला घातलेला नाही. तो कित्येक शतके आधीपासून होता. हे आता चौथ्यांदा आणि शेवटच्यांदा लिहित आहे.
In reply to परंतु याचा अर्थ इतिहास by गॅरी ट्रुमन
In reply to ट्रुमन साहेब, by संदीप डांगे
शीतयुद्धाआधी किंवा त्याच्याही आधी तेलाचा शोध लागेपर्यंत तरी इस्लामी दहशतवाद कुणाला माहिती नव्हता.म्हणजे गझनीच्या महंमदासारख्या तत्कालीन ओसामा बिन लादेनांनी केवळ युध्देच केली आणि सामान्य जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावला नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तसे वाटायला काहीच आडकाठी नाही.पण ते सत्य परिस्थितीला धरून नाही. हिंदूकुश पर्वताचे नाव कसे पडले यामागेही एक अत्यंत लांछनास्पद आणि रक्तरंजित कहाणी आहे.त्या प्रकाराला तुम्ही काय म्हणणार?त्यात सामान्य माणसांच्या कत्तली झाल्या नाहीत का? मग तो दहशतवाद कसा नाही? तेव्हा कट्टरतावाद आणि दहशतवाद यात तुम्ही नक्की कुठे लाईन काढणार? आणि त्यापेक्षाही अधिक जास्त मूलभूत प्रश्न----तुम्ही म्हणता तिथे ती लाईन काढायची झाली तर मुळात धर्माच्या नावावरील कट्टरतावाद नसेल तर धर्माच्या नावावरील दहशतवाद कुठून येणार?
In reply to शीतयुद्धाआधी किंवा त्याच्याही by गॅरी ट्रुमन
तर मुळात धर्माच्या नावावरील कट्टरतावाद नसेल तर धर्माच्या नावावरील दहशतवाद कुठून येणार?तुम्हाला वाटेल त्या पध्दतीने कट्टरतावाद आणि दहशतवाद याच्यात फरक करायचा असेल त्या पध्दतीने केला तरी तो कट्टरतावादही अनेक शतकांपासून आहेच. तेव्हा अमेरिकेमुळे धर्मावर आधारीत दहशतवाद निर्माण झाला हे म्हणणे कितपत योग्य आहे हे तुम्हीच बघा. अनेकांचा दावा तो असतो.
In reply to आणि हो by गॅरी ट्रुमन
In reply to त्यातही रशियाने पूर्व युरोपात by गुलाम
In reply to रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजर by गॅरी ट्रुमन
In reply to १९४७ by फारएन्ड
उलट १९४७/४८ मधे काश्मीरमधल्या वादग्रस्त भागाबद्दल अमिरेकेने भारताला समर्थन दिले होते आधी. याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल का...In reply to ... by आशु जोग
In reply to १९४७ by फारएन्ड
तसेच १९४१ मधे अटलांटिक कराराच्या वेळेस रूझवेल्ट यांनी भारताला फेवरिंग भूमिका घेतली होती. पण चर्चिल ने ते नाकारले.हो बरोबर. अटलांटिक कार्टरच्या वेळेस भारताला स्वातंत्र्य द्यावे असे फ्रॅन्कलीन रूझवेल्ट यांचे मत होते पण चर्चिल यांनी त्याला कडाडून विरोध केला. पण यावरून अमेरिकेचा भारताला पाठिंबा होता असे म्हणता येईल का? कारण अनेकदा असे निर्णय त्या वेळचे त्या राष्ट्रांचे हितसंबंध लक्षात घेऊन घेतले जातात.अटलांटिक कार्टर ऑगस्ट १९४१ मधील. त्यावेळी अमेरिकेचा दुसर्या महायुद्धात अधिकृत प्रवेश झाला नव्हता.आणि महायुद्धात इंग्लंडची अवस्था फार चांगली होती असेही नाही.अशा वेळी भारताला स्वातंत्र्याचे मधाचे बोट दाखवून भारतीय सैनिकांचे आणि जनतेचे युध्दासाठी सहकार्य मिळवावे आणि भारतातील कच्च्या मालाचा उपयोग करून घ्यावा असे कारण असू शकेल का?
उलट १९४७/४८ मधे काश्मीरमधल्या वादग्रस्त भागाबद्दल अमिरेकेने भारताला समर्थन दिले होते आधी. ब्रिटिश नेत्यांनी भारताविरूद्ध केलेले लॉबीइंग व नवीन भारत सरकार ने अमेरिकेकडे केलेले दुर्लक्ष यामुळे त्याचा फायदा भारताला घेता आला नाही.पण यु.एन मध्ये प्रश्न गेल्यानंतर मात्र अमेरिकेची भूमिका भारतविरोधीच होती. त्यापूर्वी अमेरिकेचे भारताला समर्थन असेल तर त्याचा उपयोग आपण करून घ्यायला हवाच होता. यु.एन सुरक्षा परिषदेने ने ऑगस्ट १९४८ मध्ये पास केलेल्या ठरावाप्रमाणे पाकिस्तानला काश्मीरमधून सैन्य मागे घ्यावे आणि मग सार्वमत घ्यावे असे म्हटले होते.म्हणजे भारताने सैन्य काश्मीरातून मागे घ्यायचा त्या प्रस्तावात उल्लेख नव्हता तर सार्वमतात पाकिस्तानच्या बाजूने मत आल्यास अर्थातच भारतीय सैन्य काश्मीरातून मागे घेणे क्रमप्राप्त झाले असते.पण डिसेंबर १९४९ मध्ये कॅनडाच्या ए.जी.एल.मॅकनॉटन (सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष) यांनी सादर केलेल्या प्रस्तावात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सैन्य मागे घ्यावे अशी तरतूद होती.ती पाकिस्तानने मानली पण भारताने स्वाभाविकपणे अमान्य केली. हे मॅकनॉटन कॅनडाचे असले तरी अमेरिका आणि कॅनडामधील सख्य लक्षात घेता त्यांच्यावर अमेरिकेचा प्रभाव नव्हताच असे म्हणता येणार नाही.नंतरच्या काळात दोन बाजूंमध्ये एक मध्यस्थ नेमण्यात आला.तो मध्यस्थ होता अमेरिकेचे माजी सिनेटर फ्रॅन्क ग्रॅहॅम.त्यांनीही मॅकनॉटन यांच्याप्रमाणेच प्रस्ताव सादर केले होते आणि ते प्रस्तावही भारताने नाकारले.कुलदीप नय्यर यांच्या "बियाँड द लाईन्स" या आत्मचरित्रात अमेरिकेने काश्मीर प्रश्नी सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला कसा पाठिंबा दिला आणि त्यामुळे नेहरू कसे फ्रस्ट्रेट झाले होते याचा उल्लेख आहे. काहीही असले तरी सुरवातीला जर अमेरिकेचा भारताला पाठिंबा होता तर त्याचा उपयोग आपण करून घ्यायलाच हवा होता.या नव्या माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to "मुसलमान तसलेच" एवढाच पॉइंट by नितिन थत्ते
In reply to क्लिंटन यांचे सर्व प्रतिसाद by एस
In reply to पूर्णपणे सहमत. by संदीप डांगे
In reply to क्लिंटन यांचे सर्व प्रतिसाद by एस
क्लिंटन यांचे सर्व प्रतिसाद या वेळी जास्तच एकांगी आणि काही तथ्ये उघड न करणारे किंवा टाळणारे वाटले.आपल्या मताचा आदर आहे.
मी काही रशियाचा भोक्ता नाही हे आधीच स्पष्ट करू इच्छितो.चला या निमित्ताने केवळ अमेरिकेलाच नावे ठेवण्याबरोबर रशियाचेही नाव यायला लागले हे पण काही कमी नाही. बाकी मार्शल योजना जगात कम्युनिझम या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी खूपच महत्वाची होती. दुसऱ्या महायुध्दात इतके प्रचंड नुकसान झाले होते की जगातील संपत्तीच्या अर्धी संपत्ती एकट्या अमेरिकेत होती. युरोपचे प्रचंड नुकसान झाले होते.आणि ही परिस्थिती कम्युनिझमच्या प्रसारासाठी एकदम योग्य होती.गरीबांना भूलथापा डाव्यांनी नेहमीच दिलेल्या आहेत आणि आपल्याकडे वळवले आहे.धर्म ही अफूची गोळी असेल तर कम्युनिझम म्हणजे गांजा-चरस-हेरॉईन इत्यादी सगळे एकत्र असलेली गोळी आहे. अशावेळी महायुध्दात नुकसान झालेल्या देशांना मदत दिली नाही तर या देशांमध्ये या व्हायरसचा प्रसार होईल ही भिती नक्कीच अमेरिकेला होती आणि मला तरी त्यात काहीही चुकीचे वाटत नाही.
पूर्व युरोपातल्या एका परिषदेत अमेरिकन परराष्ट्रमंत्र्याने जाहीरपणे 'साम्यवाद हा अमेरिकेचा क्रमांक एकचा शत्रू आहे आणि साम्यवादाचा मुळापासून नायनाट करणे हे अमेरिकेचे ध्येय्य आहे' अशी घोषणा करणे,मला तरी यात काहीही चुकीचे वाटत नाही. आणि रशियातल्या राजवटीचेही अमेरिकेच्या भांडवलशाहीचा समूळ नायनाट करणे हे ध्येय नव्हते का? कम्युनिझम हा मानवजमातीला असलेला कलंक आहे आणि त्याचा मुळापासून नायनाट करणे हे अमेरिकेने ध्येय ठेवले हे चांगलेच झाले. आणि त्याच कारणासाठी मी अमेरिकेला समर्थन देतो कारण कम्युनिझमचा मुळापासून नायनाट व्हावा असे मलाही वाटते.
पूर्व युरोपाजवळ अण्वस्त्रे तैनात करणे आणि क्यूबाच्या रूपाने स्वतःच्या अंगणात हेच होतेय याची कुणकुण लागताच थेट अणुहल्ल्याचा इशारा देणे, अशा अनेक बाबी आहेत.क्युबापासून अमेरिकेचा किनारा १०० मैलांवर. पूर्व युरोपपासून रशिया सुरू किती मैलांवर होता?असो.
In reply to आपल्या मताचा आदर आहे by गॅरी ट्रुमन
In reply to चला या निमित्ताने केवळ by निनाद मुक्काम …
...