मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

सिनेमे पाहायचेत.

इनिगोय ·
सिनेमे पाहायचेत. कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो ८ ते १० वर्षे वयाच्या मुलासोबत काय पाहावं हा. लहान मुलांची कार्टुन्स आणि तसे चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे. या वयाच्या मुलांना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मुलाचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे मोठ्यांनी पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही..

साहित्य संपादकीय आवाहन

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर मित्रमैत्रिणींनो,
साहित्य संपादक मंडळाची स्थापना काही विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. त्यामधले महत्त्वाचे उद्देश म्हणजे नव्या मंडळींना मिसळपाव वर स्वतःचं लेखन करायला प्रोत्साहन देणे आणि त्यासंदर्भात लागेल ती मदत करणे हे होत. इथल्या नव्या आयडींनी मोडकं-तोडकं का होईना पण लेखन करायला सुरुवात करावी अशी अपेक्षा आहे. तुमच्या चुका सुधारून घ्यायला आणि तुम्हाला मदत करायला दोन्ही संपादक मंडळं तयार आहेतच.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २

खेडूत ·
भाग १ २००० मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी तंत्रशिक्षणाचा हळूहळू दर्जा खालावत गेला. पण सगळं वाईटच आहे का? तर नाही. म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या संस्थांची गरज होती. पण चांगल्या चार- पाच आणि वाईट पन्नास असं झाल्यानं हे सगळे क्षेत्रच वाईट असा समज झाला. काय निवडावं लोकांना कळेनासं झालं. गावातलं कॉलेज - राहायचा खर्च नको व्हायला म्हणून जवळ प्रवेश घेतला तर स्पर्धेत मागे पडतो आणि पुण्यात जाउन घ्यावं तर अतिसुमार ठिकाणी मिळते आणि हे नंतर कळते! अशा पेचात ग्रामीण भागातली मुलं फ़सतात.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …१

खेडूत ·
आपल्या परिचयाचे कित्येक जण इंजिनियर असतात. शहरांत तर घरटी एक इंजिनियर असणे आता फार दूर राहिले नाही. तंत्रशिक्षणाची अधोगती झाली असं आपण ऐकतो त्याच वेळी दोन्ही टोकाची उदाहरणं दिसतात! कुणी भारतीय इंजिनियर देशात अथवा परदेशांत काहीतरी मोठी कामगिरी करताना दिसतो तर त्याच वेळी कुणी इंजिनियर कॉल सेंटरमध्ये जाताना, विमा एजंट किंवा एखाद्या सहकारी ब्यांकेत वीजबिलं स्वीकारताना दिसतो. तुमचा किराणा दुकानदारसुद्धा इंजिनियर असू शकतो , अतिशयोक्ती नाही. पूर्वी बेकारीत रहाणारे इंजिनियर आता मिळेल ते काम करताना दिसतात हे एका अर्थी बरंच झालं. पण प्रश्न असा पडतो की असे का व्हावे?

आयुष्य आणि करीअर...

संदीप डांगे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
career
चिनार यांच्या माझं करीयर मार्गदर्शन (!) या लेख व प्रतिसादांवरून सुचलेले व कायम साचलेले विचार आणि निरिक्षण (काही चुकत असेल तर अवश्य सांगा): एखाद्या विद्याशाखेचं पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर 'आता काय करू?' हा प्रश्न जर उभा राहत असेल तर आडातच समस्या आहे असं माझं मत आहे. दहावीचा निकाल लागेपर्यंत लोक्स निर्धास्त असतात. "पुढे काय करणार?" असं विचारल्यावर "किती मार्क्स मिळतात त्यावर ठरवू" असं उत्तर देतात.

चीनी कम

आशु जोग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजवर भारतीय उपखंडामधे(सार्क) केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या रस्सीखेचीलाच फार महत्त्व मिळे पण भारताने आपल्या पश्चिमेकडून आता थोडे पूर्वेकडे पाहणेही आवश्यक आहे असे प्रतिपादन केले जाऊ लागले. पूर्वीच्या सरकारने त्याचे वर्णन लूक-ईस्ट पॉलिसी असे केले होते. सध्या त्यापुढे एक पाऊल जावून अ‍ॅक्ट-ईस्ट पोलिसीचा बोलबाला आहे. पंतप्रधानांच्या मंगोलिया, बांगलादेश भेटीनंतर याला पुन्हा दुजोरा मिळाला आहे.

आंगणवाडी ते ....

प्रमोद देर्देकर ·
लेखनविषय:
नमोच्या जपाने काँगी हरले, खेळ तोच हो, फक्त खेळाडू बदलले , पल्ला माझा हजार कोटींचा, घेवु द्या ना मोठी उडी, आताशी हडपलेत फक्त २०० कोटी, ही तर नव्हे जगबुडी, वही, पुस्तक,पाटी , पेन्सिल, बाळ गोपाळांच्यात मी रमले, कधी, कुठे, कशी, खायची चिक्की, आंगणवाडीनेच शिकवले, तुझा मोठा घोटाळा की माझा , हे ठरवेल जनता किंवा समिती, तु आधी मी आधी करत, भरुन टाकुया स्वीसची खाती , पापा होते तो कहते , बडा नाम करेगी बेटी मेरी, पण बाबा गेला दुर देशी न ये तो माघारी, जर खाते राहता रिकामे, होऊ कशी मी उतराई, पद उतार होण्याची , मला हो कसली घाई.

डोमिसाईल हवंय.... ? ?

खेडूत ·
आता म्हणाल हे डोमिसाईलचं काय नवीनच फ्याड? तुम्हाला एक वेळ ''पी.एस.पी.ओ. '' माहीत नसेल तरी क्षम्य आहे . पण डोमिसाईल - महाराष्ट्रातल्या रहिवासाचं प्रमाणपत्र माहीत हवंच. मागची दहा वर्षे तुम्ही महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा. तुम्ही म्हणाल इथंच तर असतो तीस वर्षं झाली - दुसरीकडे कुठं जाणारे? तुम्ही राहिवासी असालही महाराष्ट्राचे - पण तुमच्या पाल्याला प्रमाणपत्र मिळालंय का तसं? अतिप्राचीन काळापासून जन्मभूमी आणि कर्मभूमी वेगळी असण्याचा इथला इतिहास आहे. अनेक महारथी जन्मदात्याच्या घरात न रहाता अन्यत्र जाउनच मोठे झाले. तुम्हीही तसेच महान असाल हे सरकारने गृहीत धरलंय.

उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत)

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिसळपाव या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार मिसळपाव संकेतस्थळ हे एक येथे नमुद धोरणांच्या परिघात सामुदायिक लेखन वाचन सहभागास अनुमती देणारे खाजगी मालकीचे संकेतस्थळ आहे. सदर संकेतस्थळाने दिलेल्या नियमांच्या चौकटीच्या मर्यादा सांभाळून संगणक वापरणार्‍या व आंतरजाल जोडणी उपलब्ध असलेल्या कुणालाही लेख धागे काढता येतील प्रतिसाद देता येतील अशी या संकेतस्थळाची रचना आहे. माझे या संकेतस्थळावरील लेखन मुख्यत्वे हौशी लेखन असून ज्या धागालेखांवर प्रताधिकार मुक्ततेची सुस्पष्ट सूचना दिलेली नाही ते लेखन प्रताधिकारीत समजावे.

मिएनमार प्रकरणाच्या निमित्ताने... आंतरराष्ट्रीय सैनिकी कारवाया आणि त्यातून दिले जाणारे संदेश

डॉ सुहास म्हात्रे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय सैन्याने मिएनमारच्या हद्दीतल्या अतिरेकी ठाण्यांवरच्या हल्ल्यांच्या बद्दल अनेक तज्ज्ञ आणि तथाकथित तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हे अपेक्षित आहे. जेवढी निरपेक्ष विश्लेषणे येत आहेत, त्यापेक्षा जास्त (या घटनेच्या दोन्ही बाजूने असलेल्या तज्ञांच्या व्यक्तिगत हितसंबंधांमुळे प्रत्येकाच्या आवडी-उद्येशा-प्रमाणे) तिखटमीठ मिसळलेली विश्लेषणे येत आहेत. हे पण अपेक्षितच आहे. कारण, अश्या प्रकारच्या, अंतिम परिणाम मिळविण्यासाठी नाही तर मुख्यतः संदेश देण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर, तिचे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी, कारवाईच्या बाजूला असणार्‍या लोकांनी तसे करणे आवश्यक असते.