मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळ्या

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

इस्पिक राजा ·
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

चारोळी: माणुसकीची भटकंती!

निमिष सोनार ·
आजकाल माणुसकी भटकल्याने दुर्जनांच्या तावडीत सापडली आहे! माणसांनी तिला सोडून दिल्याने ती अनाथ आणि असहाय्य झाली आहे!

आजची ज्वलंत चर्चा - सुरेल कोण?

विवेकपटाईत ·
दूरदर्शन वाहिन्यांवर, ज्वलंत आणि गंभीर मुद्यांवर चर्चा कश्या रंगतात.... हात हलवीत हातवारे आले, हा! हा! हा!. आज रंगणार सुरांची चर्चा, माऊ, कुत्रा, कोकीळ, कावळा, कोण सुरेल तुम्हीच ठरवा. (मनातल्या मनात इथे माझाच निर्णय अंतिम असतो) हा ! हा! हा!.उडी मारुनी मनी आली बारीक आवाजात हलकेच म्हणाली, हातवारे भाऊ, आवाज आहे माझा गोड, सदा गाते म्याऊ म्याऊ म्याऊ.तेवढ्यात ओरडला दादा कुत्रा, हळवा-बुजरा गळा तुझा, खर्जातला बघा सूर माझा, भों भों भों भों भों. ना सुरांचे ज्ञान तुम्हास्नी, ना तालाचे भान, रडत असतील पूर्वज सारे, ऐकून तुमचे गान.

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

थांबली मुंबई सारी

यल्लप्पा सट्वजी कोकणे ·
गेला पाऊस बरसुनी रस्त्यांचे झाले नाले थांबली मुंबई सारी पाण्याखाली रेल्वे जाळे यल्लप्पा सटवाजी कोकणे २० जून २०१५ ९८९२५६७२६४

नव्याने बरसणार्‍या पावसात

यल्लप्पा सट्वजी कोकणे ·
नव्याने बरसणार्‍या पावसात जुन्या आठवणी आठवतात सहवासातले प्रत्येक क्षण मन पून्हा साठवून ठेवतात यल्लप्पा सटवाजी कोकणे १६ जून २०१५

थांबव लपंडाव तुझा रे पावसा

यल्लप्पा सट्वजी कोकणे ·
थांबव लपंडाव तुझा रे पावसा! घे आता तु मनसोक्त बरसुनी. आतुर झाली धरती सजण्यास, जा हीरवा शालू तिला पांघरूनी. यल्लप्पा सटवाजी कोकणे ११ जून २०१५

जाणवतो तुझा सहवास

यल्लप्पा सट्वजी कोकणे ·
छबी नजरेसमोर तुझी येते पावसाच्या सरी कोसळताना जाणवतो तुझा सहवास पावसाच्या सरी झेलताना यल्लप्पा सटवाजी कोकणे ११ जुन २०१५

प्रेम करुन करुन दमावं

चिन्ट् ·
प्रेम करुन करुन दमावं असं आमच्या आयुष्यात कधी घडलंच नाही, आणि तसं काही घडण्यासाठी कधी कोणी आमच्या प्रेमात पडलंच नाही. प्रेमात होकार मिळवणार्‍याची गावात मोठी वट आहे, समोरुन जर नकाराचा 'रेड' सिग्नल आला तर लगेचच गावच्या 'मजनु' चा डाग आहे सैफ च्या म्हातारपणात तरी असं काय रहस्य दडलंय, त्याला जर करीना पटतेय तर आमचच घोड कुठ अडलंय. आता तर म्हणे पोरगी कशी पटवावी याचेसुध्दा क्लासेस आहेत, तरी सुध्दा नकार मिळणार्‍याच्या ओठी तर मद्याचेच चिकटलेले ग्लास आहेत. आता तर मीही म्हणतो नाही मिळाली प्रेयसी तर नसू दे, लग्नानंतर येईलच की बायको, फिर यारो डरना कायको? ------------------- लेखन संपादित केले आहे

भावनेचा वेग

यल्लप्पा सट्वजी कोकणे ·
जीवनातल्या या चढ उतारात शोधतो फक्त जगण्याचा बहाणा नाते संबंध जपत असताना भावनेचा वेग किती जीव घेणा - यल्लप्पा सटवाजी कोकणे ०७ जून २०१५ ----------------------- धागा संपादित केला आहे