ट्रेकिंग बिकिंग

लेखनविषय:
विकेंड बिकेंड ट्रेकिंग बिकिंग ... धबधबे.. डोंगर बिंगर ... पोरी बिरी जाकेटातल्या... फोटो बिटो uploading..... Tag like कमेंटेड ...इंजोयेड अलोट....

असा मी तसा मी--भाग-४

लेखनविषय:
चार आण्याचा प्रसाद देवाजीच्या दारात अन् डोंगराएव्हढ्या कामना भक्ताच्या मनात. ****************************** सगळ्यांच्याच जीवनाच एक सामाईक धोरण आयुष्याची दोन टोकं जिवण आणि मरण. ****************************** साव कुनाला म्हणावं, सगळेच हात बरबटलेले साधु-संताचे मठही एथं गुन्हेगारीत गुरफटलेले. ****************************** अशीच तु मला एकदा उदास्-उदास दिसलीस तेव्हा पासुन मला तु माझ्यासारखीच भासलीस. ******************************* आजकालचे प्रेमविवाह चार दिवसात विटतात त्याच्या तिच्या मनामध्ये तिचे त्याचे दोष साठतात. ******************************* भीती नावाची हडळ एक आपल्याच

वात्रटिका: भाजी आणि पुस्तक

लेखनविषय:
पुस्तकात विवाद्ग्रस्त विधाने का केली जातात?
मसाल्याच्या तड़क्या शिवाय भाजीला स्वाद येतच नाही. विवादाच्या तड़क्या शिवाय पुस्तक खपतच नाही.
तड़का = फोडणी

पाप आणि पुण्य

लेखनविषय:
पाप-पुण्याचा अर्थ, काही लोक मजेशीर लावतात पाप धुऊन टाकायला, पुण्याला ओलीस ठेवतात पापाच्या पैशाचे दान करून, मन "प्युरीफाय" कसं होईल अरे, पाप आणि पुण्य कधी "नलिफाय" कसं होईल

सस्नेह निमंत्रण : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा (अंतिम फेरी २०१४)

लेखनप्रकार
कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे) नमस्कार, या स्पर्धेबद्दल या आधीही एक निवेदन मी येथे दिले होते. त्यानुसार काही कवींनी आपापल्या कविताही पाठविल्या. त्याचबरोबर स्थानिक वर्तमानपत्रातूनही मी निवेदने दिली होती. या सर्व प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळाला असेच म्हणावे लागेल. दरवर्षी, साधारणपणे ६० कवींचा सहभाग यात असायचा. मात्र, यावर्षी एकूण १०४ कवींनी त्यांच्या 'प्रेम' या विषयावरच्या काव्यरचना पाठविल्या.

ओळख पाहू -होळीमय चारोळ्या

लेखनविषय:
(१) गुरूलाच दाखविला धोबीपछाड तयाने घालूनी टोपी गुरुची युद्धात उतरला सत्यवीर(?) (२) जनसमुद्र दिसत होता डोळ्यांसमोर तयाचा की नजर अधू जाहली की कबूतरे उडुनी गेली? (३) भीष्मासम वृद्ध हा सेनानी महान एक पदाती सम आज का उतरला रणांगणात? (४) आधी लगीन गादीशी मग राजकन्येशी विच्छा त्याची आज पूर्ण होणार का? (५) द्वारकेचा राजा होणार का दिलीश्वर. कि कुणा अर्जुनाचा सारथीच ठरणार?

द्विभाषिक क्षणिका/ चश्मा /उम्मीद

लेखनविषय:
(१) चश्मा डोळे झाले माझे अधू दिखती नहीं है दिल्ली. मिळेल कुठे तो जादूचा चश्मा दिखाए मुझे जो लालकिला. (२) उम्मीद झाले शरीर जरी म्हातारे दिल अभी जवान है. वरेल का मला ती षोडसी उम्मीद अभी कायम है.

चारोळी: तीळ अन् गुळाची नाती !!

लेखनविषय:
काव्यरस
विचारांची जुळणी गुळाची असावी.. शब्दांत पेरणी साखरेची असावी.. विचार अन् वाणी यांची मैत्री अतूट राहावी.. तीळ अन् गुळाची नाती प्रेरणा देत राहावी.. संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा....॥

एक चारोळी ... !

लेखनविषय:
शम्पेनच्या बाटल्या फोडण्यात आनंद नसतो, आपण गोड सण करून संस्कृती जपतो, 'इंग्रजी डे' चं हास्य क्षणभंगुर ठरून जातं अन 'जानेवारी' नव्हे 'पाडव्याला' आपलं नवीन वर्ष सुरु होतं ! - साजीद पठाण
Subscribe to चारोळ्या