लेखकराशीयांनी मंगळवार, 24/02/2015 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
जिवनाच्या व रेल्वेरूलाच्या नियमात थोडे साम्य सापड्ले
दुरुन पाह्त राहील्यास गून्ता दिसतात
परंतु एकदा का गाडी चालायला लागली की
गून्ता आपोआप सुटतात.
ता.क : माझा पहीला प्रयत्न आहे. चुकभूल माफ द्या.
लेखकविवेकपटाईतयांनी सोमवार, 16/02/2015 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाच्या दिवशी अर्थात (आंग्ल भाषेतील वेलेन्टाईन डे) कार्यालायातून सांयकाळी ५च्या सुमारास बाहेर पडलो, राजपथावर अक्षरश: प्रेमी जोडपे हातात हात घालून फिरत होते. या प्रकरणांचा अंत काय होईल, विचार करताना सुचलेल्या दोन क्षणिका
तिच्या साठी सर्व सोडले, पण तिने ....
गुलाबी काटा
ह्रदयी डसला.
जीव भौंऱ्याचा
नाहक गेला.
बहुतेक मुलींच्या नशिबी ....
रस पिउनी
भौंरा उडाला.
कळीच्या नशिबी
विरह वेदना.
लेखकविवेकपटाईतयांनी शनिवार, 07/02/2015 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी दिल्लीत निवडणूक होती. आमच्या भाग उत्तम नगर भागात, जिथे नावाखेरीज काहीच उत्तम नाही., सकाळी वोट टाकून आलो. थोडा-फार फेर-फटका ही मारला. अनधिकृत वस्तीतल्या गल्ली बोळ्यांत आज जे काही खुले आम दिसत होते, त्याला काय म्हणावं.......
(१)
प्रसाद घ्या
तीर्थ प्या
आटोत बसा
वोट आपला
असा विका.
(२)
नेता नोट
मोजतात
नोट मते
मोजते.
(३)
गांधींच्या डोळ्यांत
एकच सवाल?
गुलाबी नोटेवर
फोटू का?
लेखकप्रमोद देर्देकरयांनी बुधवार, 10/12/2014 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला हायकु किंवा चारोळी म्हणा हा प्रकार आवडतो. कमी शब्दात खुप काही व्यक्त करता येतं. यातला तिसरा हायकु हा काही दिवसांपुर्वी मी खफवर लिहला होता.
बाटली रिकामी
ग्लास घरंगळलेला,
टेबलावरचा थेंब
केव्हाचाच सुकलेला.
ढग विखुरलेले
पाऊस थांबलेला,
कुंदाळ हवेत
मी गारठलेला.
काडी काडी करुन
तिनं घरटं बांधलं,
वाराही वहायचा थांबला
त्यानेही ते जाणलं.
लेखकटवाळ कार्टायांनी सोमवार, 01/12/2014 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625
"काण्या तू ? वहिनी कुठाय"
या तुझ्या टोकदार प्रश्नानं
तु माझ्या पोटाचं
मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं
टचकन फुटून गेलं,
आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात
तू पुन्हा एकदा यशस्वी झालास..
अभिनंदन!!!
लेखकविवेकपटाईतयांनी शनिवार, 01/11/2014 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तेचा आनंद
नाक कान डोळे
ठेवा सर्व बंद
गुपचूप चिडीचूप
सत्तेचा आनंद
नागपुरी संत्रा
नागपुरी संत्रा
पहा कसा बहरला
लवकरच कळेल
गोड आहे कि कडू.
टोल प्रश्न
गादीवर बसतात
सत्ताधारी झाला
टोलचा प्रश्न
झाडावर टांगला
लेखकविवेकपटाईतयांनी रविवार, 26/10/2014 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
चाईनीज बॉम्ब
जोरात फुटला
कानाचा परदा
कुणाचा हो फाटला.
फटाक्यांचा धूर
आकाशी दाटला
खोखलत-खोखलत
कुणाचा प्राण गेला.आधी केली साफ -सफाई
मग पसरविला कचरा
दिवाळीचा सण मोठा
असा साजरा केला.
लेखकविवेकपटाईतयांनी गुरुवार, 23/10/2014 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
चंचला कमळा ती
हातातुनी निसटली
दिव्यांच्या उजेडात
कमळावर स्वार झाली.
पीएम इन वेटिंग सारखा
सीएम इन वेटिंग राहिला
कोकणचा राजा
आज ही उपाशी राहिला
धनुष्य बाणाचा नेम
कसा काय चुकला?
शकुनी पास्यानी
दगा का दिला?
अंधार दूर झाला
वनवास आज संपला
आज वोट पाउलांनी
सत्ता घरात आली.
लेखकमुक्त विहारियांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.
डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे.
ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.
डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...
१. ठिकाण ===> नंदी पॅलेस
२. दिनांक ===> १८-१०-२०१४
३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०
४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.
डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.