मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

औषधोपचार

त्याची आठवण,

ज्ञानोबाचे पैजार ·
त्याची केव्हाही आठवण आली तरी, सर्वांगावर सरकन् काटा येतो, डोक्यावरचा केस न केस उभा रहातो, आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो, अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर, जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर, कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले, याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले, तो आहेच असा भितीदायक, आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक, मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची, नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची, वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा, पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा, किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले, पण याच्या समोर

<मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका>

नाखु ·
मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका एकोणवीस शोधण्यात खूप वेळ जातो काथ्याकुटात एक धागा हुकला आहे त्याच्या जरासं खाली एक किडा वळवळतोय दुर्लक्षण्यात खूप वेळ जातो टंकाळा आल्यावर मी एखादा प्रतिसाद लिहायला घेतो अर्थ? समजण्यात खूप वेळ जातो तोल सुटलाय मिपावरचाही रोज उठून कोण साव्ररणार त्याला? सल्ला, मागण्यातही तूचभेळ खातो मिपा ! ही तर एक रिक्षाच आहे वाट पाहण्यात (चांगल्या धाग्याची) खरंच खूप वेळ जातो -नजरबंद

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप ·
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

< < मजबुरी है > >

ज्ञानोबाचे पैजार ·
हमारे दोस्तने हिंदीमे एक कविता क्या लिखी सब लोग उसका लैच कौतुक करने लगे. मेरी तो बहोत म्हणजे बहोत जलने लगी. एकदम चुलके वल्ले लकडीकी माफिक मै धुमसने लगा. बहोत धुवा निकालनेके बाद मैने सोच्या अगर वो लिख सकता है तो मै क्यो नही? फिर क्या..... निकाली अपनी पाचवी की पुस्तक और लिख डालीच ये कविता. क्या करु मजबुरी है ना…..

तेव्हा मला तू फार म्हणजे फार आवडतोस

ज्ञानोबाचे पैजार ·
मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून , अर्धातास, निमुट उभा रहात, आमच्या गप्पा ऐकणार्या तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते “आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले दमुन झोपले आहेत बिचारे.

बाई सोडून गेली

नीलमोहर ·
अवचित ते घडले, जणू आभाळ फाटले, धरणी कंपली एक सुनामी आली की जगबुडी झाली, अन बाई सोडून गेली किती केली विनवणी, तिज आमिषेही दिली पाषाणहृदयी त्या बालेला परि दया जराही न आली अन बाई सोडून गेली म्हणे तुम्हास बाई मिळेल दुसरी, जर शोधाशोध केली जीव माझा जरी गेला, काळजी का कोणा इथे वाटली अन बाई सोडून गेली तरी बयेस कधी न कामास जुंपले, कायम लाडीगोडी केली तऱ्हा तिच्या सांभाळत, आंजारत गोंजारत कामे करून घेतली तरीही बाई सोडून गेली म्हटले चला तर आता, कामाला लागायची वेळ झाली बाई मंगळावर जरी पोचली, घरची कामे का तिला चुकली कशी बाई सोडून गेली झाडून काढता काढता, जळमटे डोक्यातली निघाली फरशी पुसता पुसता, लख्ख सफाई

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL ·
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

(छटाक) नंतर

नाखु ·
पुर्वार्ध आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.
काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!
या भागत तोच मिवा नेमका मिपा सामार्ज्याची रंगपचमी निमित्त सफर करायचा मनसुबा जाहीर करतो आणि मग तो मिसा बरोबर साम्राज्यात दाखल होतो.

<जिलबी का टाकावी>

नाखु ·
"मिपावर का लिहायचे ? न लिहिल्यास अज्ञानातून (आप्लयालाच काय) इतरांनाही आपले अज्ञान कळत नाही." "इतरांच्या धाग्यातून आणि प्रतिसादातून शिकण्यासाठी तरी आपण धागे का वाचावेत! त्या जिलब्या आपण करून पाहू नये यासाठी!" "पण मला स्वत:च्या जिलबीतून दाखवायचे आहे. हे जग मोठी कढई आहे. जिलब्या टाकत टाक्त राहणे मला आवडते! माझे स्वत:चे पाकज्ञान मी निर्माण करणार! चकलीच्या जिलबीतून!" "मान्य आहे.

संमोहन आणि मानसोपचार

शि बि आय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
संमोहन किंवा मानासोपाचाराविषयी मी ह्या माझ्या " http://www.misalpav.com/node/32031 " मागील धाग्यात विचारणा केली होती. मानसोपचारतज्ञ संमोहनाद्वारे माणसाच्या मागील आयुष्यातील काही गोष्टी ठराविक उपचार पद्धतीचा अवलंब करून जाणून घेतात आणि त्यावर उपचार ही करतात. माझ्या जवळील व्यक्ती जेव्हा अशा प्रकारचे उपचार घेणार आहे असे समजले आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी काही साईट्स देखील पहिल्या परंतू त्या साईट्स वरील माहिती परिपूर्ण असूनही तशी समाधानकारक नाही वाटली म्हणून मग धाग्याचा प्रपंच करावा लागला.