सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५

Primary tabs

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in काथ्याकूट
8 May 2016 - 11:05 pm
गाभा: 

ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग.

माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे?

शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 May 2016 - 7:29 am | प्रचेतस

ते लेखनसापेक्ष आहे.
लेखन उत्कृष्ट असेल तर कितीही मोठा भाग असेल तरीही वाचकांना कंटाळवाणे वाटणार नाही. मात्र लेखनातच दम नसेल तर लेख लहान काय किंवा मोठा काय..

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 9:24 am | तर्राट जोकर

हो. हे बाकी सौ टका खरंच. मी थोडंसं टेक्निकली थिंकत होतो उगाच. ;)

पिशी अबोली's picture

17 May 2016 - 11:33 pm | पिशी अबोली

सौ टका

:D

sagarpdy's picture

23 May 2016 - 4:06 pm | sagarpdy

सौ. टका :D

टवाळ कार्टा's picture

18 Jun 2016 - 8:51 pm | टवाळ कार्टा

=))

खेडूत's picture

9 May 2016 - 9:43 am | खेडूत

माझा प्रश्नः
जुनी हार्ड डिस्क आहे.चार वर्षे पडून आहे- त्यातले फोटू, आणि अन्य माहिती यू एस बी द्वारे लॅप्टॉप वर घ्यायची आहे.
जालावर १५-२० डॉलर्सचे काही उपकरण दाखवत आहेत, ते वापरून थेट पोर्टेबल हार्ड डिस्क करू शकतो म्हणे.
हे कुणी केले आहे का?

तुषार काळभोर's picture

9 May 2016 - 7:43 pm | तुषार काळभोर

पुण्यात ४००-५०० रुपयांमध्ये युएसबी कन्वर्टर मिळतो. त्यात आयडीई, साटा ५" व लॅपटॉपची साटा ३.५" हार्डडिस्क जोडून युएसबीने संगणकाला जोडता येते.

तुषार काळभोर's picture

9 May 2016 - 7:45 pm | तुषार काळभोर

वरती इंचातली साईज अनुक्रमे ३.५ व २.५ इंच आहे.

स्वच्छंदी_मनोज's picture

9 May 2016 - 7:55 pm | स्वच्छंदी_मनोज

जुन्या हार्डड्राईव्हला एक्स्टर्नल ड्राईव्ह म्हणून कन्वर्ट करा कींवा पाय सारखे उपकरण वापरून नॅस मधे रुपांतर करा.

जर जुनी ड्राईव्ह फार मोठी नसेल तर पहीला पर्याय सोपा आणी मस्त.

सांरा's picture

27 May 2016 - 11:17 pm | सांरा

माझा संगणक बिघडला होता तेव्हा...

अभ्या..'s picture

9 May 2016 - 10:49 am | अभ्या..

Sata to USB or ATPI To USB adapter 350 rs aprox.

आनंदी गोपाळ's picture

24 May 2016 - 9:09 am | आनंदी गोपाळ

हे पुण्यात नक्की कोणत्या दुकानात मिळते, सांगता येईल काय?
व्यनि/खरड केल्यास कृतज्ञ राहीन.
धन्यवाद.

सांरा's picture

27 May 2016 - 11:16 pm | सांरा

मी स्वतः हि वापरून बघितली आहे...
येथे पहा. दुकानात ३००, ४०० देण्यापेक्षा हे स्वस्तात मस्त.

आनंदी गोपाळ's picture

1 Jun 2016 - 2:19 pm | आनंदी गोपाळ

अमेझॉन लिंकबद्दल धन्यवाद!
माझी जुनी डिस्क साटा न निघता पाटा निघाली. तिच्यासाठी लागणारी बॉक्स पॉवरसप्लायसह ६०० रुपयांत मिळाली.

खेडूत's picture

9 May 2016 - 1:34 pm | खेडूत

धन्यवाद अभ्या..
हे करून बघतो आता.

माझ्याकडे एक जुनी vcr कॅशेट आहे..
त्याला dvd अथवा पेनड्राईव्हात बदलता येते का ?

मराठी कथालेखक's picture

9 May 2016 - 6:31 pm | मराठी कथालेखक

तुम्हाला स्वतःला हे करायचे असेल तर तुमच्याकडे VCR असायला हवा
१) VCR मधे ती कॅसेट पळवा, VCR च output (RF असावं असं मला वाटतय) computer ला जोडलेल्या TV Tuner card la द्या . TV tuner card च्या मदतीने computer वर ते विडीओ साठवा नंतर pen drive / dvd मध्ये टाकू शकता
२) बाजारात VCR cassete वरुन dvd बनवणारे व्यावसायिक सापडू शकतील. अर्थात हळूहळू त्यांची संख्या कमी होत जाणार आणि दर वाढत जातील हे गृहीत धरा. जुने मोठे फोटो लॅब्स, विडिओ शूटींग करणारे, टीवी VCR चे ग्रे मार्केट (उदा: पिंपरी) अशा ठिकाणी/या लोकांच्या मदतीने शोधल्यास असे व्यावसायिक सापडतील.

सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद..मकले..
आताच एकाशी बोलण झाल..700 रु.. dvd करुन मिळेल अस एकाने सांगितल..

मराठी कथालेखक's picture

9 May 2016 - 6:51 pm | मराठी कथालेखक

अजुन शोधाशोध करा, थोडी घासाघीस करुन बघा, पण महत्वाचे विडिओ असतील तर फार लांबणीवर नका टाकू.

रेवती's picture

11 May 2016 - 6:07 am | रेवती

धन्यवाद, लक्षात ठेवते.

लालगरूड's picture

9 May 2016 - 6:58 pm | लालगरूड

मिपावर लेखाला like dislike चा पर्याय असावा फक्त आयडीसाठी

भाते's picture

9 May 2016 - 8:37 pm | भाते

स्वारगेट बस स्थानकापासून चितळे बंधू मिठाईवाले दुकानापर्यंत जायला मार्गदर्शन हवे आहे.
कोल्हापुर स्थानकापासुन रंकाळा तलावापर्यंत जायला मार्गदर्शन हवे आहे.
दादर स्थानकापासुन शिवाजी पार्कपर्यंत जायला मार्गदर्शन हवे आहे.
बायको माहेरी गेली आहे. वरणभाताचा कुकर लावायला मदत हवी आहे.
शर्टाचे बटण तुटले आहे. सुईत दोरा ओवायला मदत हवी आहे.
मुलीची गृहपाठाची वही घरातच हरवली आहे. शोधायला, अर्थातच, मदत हवी आहे.

मिपाकर या शंकांचे निरसन करतील याची खात्री आहे.

मिपावर येणारे पुढील धागे :)

मिपाच्या सध्याच्या प्रथेप्रमाणे प्रत्येकासाठी वेगळा एकोळी धागा काढू का?

प्रत्येक प्रश्र्नासाठी वेगळा धागा काढल्यास उत्तम.

स्वारगेटला पोलीस चौकी आहे. तिथे जाऊन चितळेंच्या दुकानात मोठी ऑर्डर द्यायची आहे. आपण मला दुकानात नेउन सोडल्यास कमिशन देऊ असे सांगावे. स्वतःच्या गाडीने सोडतील. नंतर पाव किलो पेढे घ्यावेत आणि त्याचे एक टक्का कमिशन द्यावे. बसचा खर्च अधिक मारदर्शन फी यापेक्षा ते स्वस्तच पडल्याचे लक्षात येईल.

या सल्ल्याचे रूपये दोनशे पाठवून द्यावेत ही नम्र विनंती. तशी आमची फीज करोडो मधे असते, परंतु प्रश्नांचे स्वरूप पाहून आकारली आहे. धन्यवाद.

मराठी कथालेखक's picture

10 May 2016 - 1:24 pm | मराठी कथालेखक

एक नवीन कथा लिहण्याकरिता स्त्रीवंध्यत्वाविषयी काही माहीती हवी आहे. कथेतील तपशील चुकू नयेत म्हणून जाणकाराकडून अप्लसे मार्गदर्शन हवे आहे. कुणी आहे का ?

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 1:29 pm | तर्राट जोकर

काडी...? ;)

मराठी कथालेखक's picture

10 May 2016 - 2:45 pm | मराठी कथालेखक

नाही हो.. खरेच कथा लिहायची आहे. कथानक मनात तयार आहे पण तपशीलात चूक नको म्हणून केवळ थोडं ताडून घ्यायचं आहे.

सुबोध खरे's picture

10 May 2016 - 4:55 pm | सुबोध खरे

Ring me up on 9819170049

मराठी कथालेखक's picture

11 May 2016 - 2:57 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

एकुलता एक डॉन's picture

10 May 2016 - 1:52 pm | एकुलता एक डॉन

मुक्तपीठ वर लेख कसा पाठवावा ?

खेडूत's picture

10 May 2016 - 5:02 pm | खेडूत

बहुधा सकाळ च्या मुक्तपीठाबद्दल विचारताय?
थेट चौकशी करा:
संपादकः
Contact No. – +91 20 24405500
Fax No. - +91 20 24450583
Email – webeditor@esakal.com

एकुलता एक डॉन's picture

11 May 2016 - 4:58 am | एकुलता एक डॉन

प्रतिसाद नाही मिळणार
सदर संपर्क क्रमाक व ईमेल एकाहून जास्त गोष्टींसाठी वापरण्यात येतो

मदत हवी आहे..

गोंडस बाळ's picture

14 May 2016 - 8:23 am | गोंडस बाळ

मासिकासाठी ISSN क्रमांक कसा मिळवायचा? कुणी त्याची प्रक्रिया सांगेल का?

एकुलता एक डॉन's picture

17 May 2016 - 11:09 pm | एकुलता एक डॉन

गुटखा मुक्ती साठी काय करावे?
हर्बल किवा आयुर्वेदिक गुटखा असा काही उपाय आहे का ?

पिवळ्या रंगाच पासपास म्हणून एक प्रॉडक्ट आहे, त्यात सुपारी ऐवजी खजुराचे तुकडे आणि पानमसाला असतो, त्याने सुटते सवय. नंतर तेही बंद होते.
तंबाकू पण सवय असेल तर मुशकील आहे.

बोका-ए-आझम's picture

17 May 2016 - 11:32 pm | बोका-ए-आझम

त्याने तंबाखू सुटायला मदत होते असं ऐकलेलं आहे. कृपया ते वापरण्याआधी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि मुश्किल आहे, पण अशक्य नाही हे लक्षात ठेवावे. एखादी सवय हा आपला problem आहे आणि ती सोडावीशी वाटते आहे - ही ती सवय कायमची सोडण्याच्या प्रक्रियेतली सर्वात महत्वाची पायरी असते हे लक्षात ठेवावे.

एकुलता एक डॉन's picture

17 May 2016 - 11:35 pm | एकुलता एक डॉन

majhe manlele bhau ,20 varshe मोठे आहेत ,त्यांना द्याचे आहे गुटखा सुटावे mhanun

भायखळा राणीच्या बागेत एक झाड आहे.बारापंधरा फुट उंच आहे.याची पाने थेट चुना लावून तंबाखू चघळल्याची चव देतात.परंतू तंबाखू नव्हे. झाडाच्या पानांचे काही अरेबिक देशांत व्यसन वाढल्यावर तिकडे ब्यान केले आहे.

नुकतीच तुनळीवर हि शॉर्ट फिल्म बघितली. ०९:४६ ला भारताच्या तिरंग्यावर इंग्रजीत लिखाण केलेले पाहिले.
हे मनाला न पटल्यामुळे विकीवर इथे शोध घेतला.
स्पष्टीकरण ५ (एफ) मध्ये लिहिल्याप्रमाणे तिरंग्यावर लिखाण करणे हा तिरंग्याचा अपमान आहे.
भारतीय नागरिक म्हणुन मी याच्याविरुद्ध कोणाकडे किंवा कुठे तक्रार करू शकतो?

सस्नेह's picture

23 May 2016 - 10:59 am | सस्नेह

घरी नवीन वॉटर प्युरीफायर घेतला आहे. त्याची TDS लेव्हल कंपनीच्या माणसाने ३०-३५ इतकी ठेवली आहे. इतकी कमी लेव्हल पिण्याच्या पाण्यासाठी योग्य आहे का ? याबाबतीत जालावर अधिकृत माहिती कुठे मिळाली नाही. काही लोकांचे म्हणणे आहे की ती कमीतकमी १५० असावी. कृपया कुणाला अधिकृत माहिती असल्यास किंवा लिंक असल्यास द्या.

मराठी कथालेखक's picture

23 May 2016 - 12:26 pm | मराठी कथालेखक

माझ्यामते TDS कमी असणं चांगलंच आहे. Corporation कडून देण्यात येणार्या पाण्याची TDS कमीच असते. नदीच्या वाहत्या पाण्याची ही कमी असावी बहूधा.

चिनार's picture

23 May 2016 - 12:57 pm | चिनार

याच क्षेत्रात काम करत असल्यामुळे सांगू शकतो.
TDS लेव्हल १५० पर्यन्त असेल तरी शरीराला काहीही अपाय होत नाही. उलट ३५-४० इतक्या कमी TDS लेव्हलचे पाणी पिउन आपण आपल्या पोटाला तशीच सवय लाऊन ठेवतो. मग बाहेरचे पाणी चालत नाही अशी परिस्थिती येते. शक्य असल्यास TDS लेव्हल १०० पर्यन्त ठेवा.
तुमच्या घरी जर महानगर पालिकेचे पाणी येत असेल तर प्युरीफायरची गरज नाही. बोअरचे पाणी असेल तर प्युरीफायर लावावा.
खरं सांगायचं तर पाण्यामुळे होणारे पोटाचे विकार TDS नव्हे तर TSS (Total suspended solid ) या मुळे होतात. पण तस कमी करणारे घरगुती प्युरीफायर माझ्या माहितीप्रमाणे बाजारात उपलब्ध नाही.

सस्नेह's picture

23 May 2016 - 2:12 pm | सस्नेह

पाणी नगरपालिकेचे आहे. या दिवसात तरी स्वच्छ नसतेच.
TDS लेव्हल कमी असल्यामुळे पोटाला सवय लागणे याशिवाय आणखी काही दुष्परिणाम होतात का ? म्हणजे शरीरात सॉल्ट इनटेक कमी होणे वगैरे ?

विअर्ड विक्स's picture

23 May 2016 - 2:04 pm | विअर्ड विक्स

TSS साध्या तलम कपड्याने सुद्धा गाळून वेगळे करता येतात वा तुरटी वापरून !!!!! आजार हे पाण्यातील रोगकारक जीवाणू नि विषाणु मुळे होतात. सर्व पुरिफ़िएर मध्ये ultra filtration असते. ज्याने TSS सुद्धा वेगळे होतात ..

होय. दर एका आठवड्याने त्यातील फिल्टर स्वच्छ करावा लागतो.

विअर्ड विक्स's picture

23 May 2016 - 4:00 pm | विअर्ड विक्स

बरोबर. तो cartridge ( मराठी शब्द ???) फिल्टर . तो मुख्यतः TSS वेगळे करतो.

एकुलता एक डॉन's picture

23 May 2016 - 3:48 pm | एकुलता एक डॉन

आजकाल बरेच वाचण्यात येत आहे कि पालेभाज्या गटाराच्या पाण्यात उगवतात ,कीटक नाशके टाकून फळे पिकवतात ,टरबूज साठी अनैसर्गिक रसायने वापरतात

निदान पुण्यात फळे व भाज्या कुठे मिळतील जे व्यवस्थित पिकवलॆल असेल ?

सेंद्रिय सेतु म्हणून नेत वर सर्च करा.

एकुलता एक डॉन's picture

2 Jun 2016 - 11:01 pm | एकुलता एक डॉन

खूप खूप आभार

विअर्ड विक्स's picture

23 May 2016 - 3:57 pm | विअर्ड विक्स

TDS नि hardness या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मुख्यतः body salt balance हा sodium नि chloride वर अवलंबून असतो. Salt Intake वर filtered पाणी प्यायल्याने काही दुष्परिणाम होत नाही.

सस्नेह's picture

23 May 2016 - 4:06 pm | सस्नेह

कमी TDS चे पाणी पिऊन सवय झाल्याने नंतर कधीतरी बाहेरचे पाणी पिण्याचा प्रसंग आला तर काही त्रास होऊ शकतो का ?

विअर्ड विक्स's picture

23 May 2016 - 6:07 pm | विअर्ड विक्स

होऊ शकतो. कारण असे पाणी पचवण्याची शरीरास सवय नसते.

चिनार ने बरोबर सांगितलंय.ती सोय वापरा पण अतिरेक नको.
टिडिएस ची लेवल ५० करा.पाणी मचूळ वाटत नसेल तर ७५ करा नाहीतर मचूळ लागेपर्यंत वाढवा आणि तो आकडा पाहा.मचूळ लागणार नाही इतकेच खाली सेटिंग करा.त्याने पाण्याचा फ्लो वाढेल आणि कार्टिज फार लवकर बदलावी लागणार नाही.

सस्नेह's picture

23 May 2016 - 8:23 pm | सस्नेह

धन्यवाद कं काका आणि विवि :)

अगम्य's picture

24 May 2016 - 2:09 am | अगम्य

नवी मुंबई (किंवा मुलुंड, ठाणे) येथे आयुर्वेदिक उपचार (पंचकर्म वगैरे ) मिळण्याची सोय कुठे आहे. मला वाटते कि स्वस्त पासून अतिशय महाग अश्या सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे प्रामाणिक ते भोंदू असेही सर्व प्रकारचे पर्याय असतील :-) कदाचित काही वैद्यकीय महाविद्यालयांच्या तर्फे सुद्धा काही उपचार उपलब्ध असतील. तर ज्यांना याबद्दल माहिती आहे त्यांनी कृपया येथे द्यावी अशी विनंती.

संदीप डांगे's picture

27 May 2016 - 10:35 am | संदीप डांगे

नमस्कार मित्रांनो,

पुणे जिल्ह्यातील नारायणगावात दिर्घकाळ वास्तव्यासाठी फ्लॅट भाड्याने हवा आहे. मिपाकरांच्या ओळखीत कोणाचा फ्लॅट असेल तर कृपया मदत करावी. मला वारंवार मिसळपाव संस्थळाला भेट देणे शक्य होणार नाही त्यामुळे माझ्या फोन वर संपर्क केला तर योग्य होईल. माझा क्रमांक ९५५ २६ ९९ ३३३. खूप खूप धन्यवाद!

- संदीप डांगे

पुण्यातील अश्या संस्थांची माहिती हवी आहे जिथे लहान मुलांसाठी खेळणी भेट देता येईल..!
आगावु धन्यवाद

सही रे सई's picture

12 Jul 2016 - 4:55 am | सही रे सई

आपलं घर नावाची संस्था आहे डोणजे, सिंहगड पायथ्याशी. तेथे खेळणी, कपडे, पुस्तके, शैक्षणिक साहित्य व मुलांच्या रोजच्या वापरातील वस्तु देऊ शकाल. त्यांना फोन केलात तर त्यांची गाडी सामान घ्यायला येते.

एकुलता एक डॉन's picture

28 May 2016 - 12:59 am | एकुलता एक डॉन

?पुण्यात स्वस्तात केसांचा विग कोठे मिळेल ?

आनंदी गोपाळ's picture

1 Jun 2016 - 3:59 pm | आनंदी गोपाळ

भाड्याने हवाय, की विकत?

कॅन्सर पेशंटसाठी विग मोफत देणार्‍या चॅरिटीचा पत्ता कोणीतरी दिला होता.

नाटकासाठी हवा असेल तर मॅकड्रपमध्ये मिळेल.

तुळशीबागेत राम मंदिराजवळ काही गंगावनांची दुकानं आहेत. तिथे खास अलका कुबल स्टैल विग मिळतात.

एकुलता एक डॉन's picture

1 Jun 2016 - 8:13 pm | एकुलता एक डॉन

स्वतःसाठी पाहिजे

एकुलता एक डॉन's picture

12 Jun 2016 - 1:23 pm | एकुलता एक डॉन

तुळशीबागेत बघितला
पुरुष विग नाहीये

मराठी कथालेखक's picture

1 Jun 2016 - 11:55 am | मराठी कथालेखक

फोबिया चित्रपट पाहिला का कुणी ? थोडक्यात समीक्षण (चांगला, बरा, वाईट ई) सांगता येईल का ?

अकुकाकांचे लिखाण लेख/चारोळी/कविता/कादंबरी/ललित लेखन/कथा यापैकी किंवा याशिवाय अस्तित्वात असलेल्या कोणत्या साहित्यप्रकारात येतं ?
-- अज्ञानी पामर चिनार

सस्नेह's picture

1 Jun 2016 - 2:55 pm | सस्नेह

भूछत्र.

अविनशी साहित्याला कोणताही प्रकार नसतो.

नाखु's picture

1 Jun 2016 - 4:33 pm | नाखु

देवळे/देव स्वयंभू असतात त्या प्रमाणे ते साहीत्यही स्व्ययंभूपणाने दशांगुळे व्यापुन उरले आहे कसलया प्रकाराच्या कक्षेत बसवून त्याचे अवमुल्यन करू नये...

अखिल याचक वेधकवाचक रेचकपाचक भेदकजाचक महासंघांकडून खुलासा निवेदन......

माहीती संकलक नाखु

चिनार's picture

1 Jun 2016 - 5:41 pm | चिनार

माफी असावी नाखुकाका

आनन्दा's picture

1 Jun 2016 - 10:20 pm | आनन्दा

हायला भारीच. ते वारूळ दशांगुळे उरले असल्याची कल्पना करून हस हस हसलो.

आयुर्वेदिक उपचार:/ अगम्य
केरला आयुर्वेदिक उपचार माटुंगा पोलिस स्टेशनच्या मागे ( किंग्ज सर्कल रे स्टे ला उतरुन जाता येईल.)
२) सायन रे स्टे बाहेर चर्चच्या नंतर आयुर्वेद कॅालेज चे बाह्य उपचार दवाखाना आहे.तुमच्या रोगावर औषध देतात.त्यांना गरज वाटल्यास पंचकर्म सुचवतात.

अगम्य's picture

21 Jun 2016 - 12:12 pm | अगम्य

सायन आणि माटुंगा बरेच लांब पडेल तरी तुमच्या प्रतिसाद आणि माहितीबद्दल धन्यवाद

सतिश पाटील's picture

1 Jun 2016 - 4:07 pm | सतिश पाटील

नवी मुंबईत भांगेची गोळी कुठे मिळेल?
आजकाल केसांचा व्यवस्थित भांग पडत नहीये.

काही चुकीचे , विचित्र शब्द वापरण्याची मिपावर प्रथा आहे. अशा प्रकारे भाषेत नसलेले मराठीला इंग्लिशचा तडका दिलेले वगैरे शब्द वापरले जावू नये असे मला वाटते म्हणून मी हे आवाहन करत आहे. (बाकी ज्याचा त्याचा प्रश्न)
१) लोक्स
२) अ‍ॅडवणे

(अजून आठवतील / सापडतील तसे लिहीन)

धन्यवाद

भाषा प्रवाही असते दादा. आपण कितीही काहीही म्हटलं तरी भाषेचं स्वरूप बदलत जाणारच.

रच्याकने [ ;) ] तुम्ही "फोडणी" ऐवजी दिलेला "तडका" मराठी मानलाच की नाही?

मराठी कथालेखक's picture

1 Jun 2016 - 4:55 pm | मराठी कथालेखक

शब्द निदान कोणत्या तरी एका भाषेतला असावा "तडका" मूळ मराठी नसेल पण निदान हिंदी तरी आहे ना.
अ‍ॅडवले म्हणण्या ऐवजी "अ‍ॅड केले" म्हंटले तरी चालू शकेल.

बाकी कीबोर्डला कळफलक किंवा अ‍ॅक्सिलरेटरला गतीवर्धक असेच म्हंटले पाहिजे असा आग्रह मी धरत नाहीये.

भाषा प्रवाही असते हे मान्य केले तरी मग कुणी काहीही नवीन शब्दांची भर घालत गेलेत तर ती भाषा कळण्यापलीकडे होईल.

झका तयरका ?

मराठी कथालेखक's picture

1 Jun 2016 - 4:58 pm | मराठी कथालेखक

तुम्ही "फोडणी" ऐवजी दिलेला "तडका" मराठी मानलाच की नाही?

बाकी मराठीत (म्हणजे मराठी बोलणार्‍यांच्या संवादात) फोडणी आणि तडका हे दोन्हीही शब्द वापरले जातात आणि माझ्यामते त्या दोन्हीत काहीसा फरक आहे.
स्वयंपाकनिपुणांनी अधिक प्रकाश टाकायला हरकत नाही.

आनन्दा's picture

1 Jun 2016 - 10:21 pm | आनन्दा

हो फोडणी घातली जाते, तडका मारला जातो.

मराठी कथालेखक's picture

2 Jun 2016 - 7:34 pm | मराठी कथालेखक

'वाटा जागलेल्या' हे काही महिन्यांपुर्वी प्रसिद्ध झालेले एक स्वतंत्र (चित्रपटबाह्य) मराठी गाणे.
आधुनिक पद्धतीचा संगीतसाज आणि साधे सोपे, शुद्ध मराठी शब्द (हिंदी , इंग्लिशची भेसळ नाही) असलेले हे गाणे माझ्या मते आवर्जुन दखल घ्यावे असे आहे. मात्र 9x झकासच्या पलीकडे ते फारसे पोहोचले असे वाटत नाही म्हणून इथे मिपाकरांना या गाण्याबद्दल सांगावेसे वाटले.

https://www.youtube.com/watch?v=urUrqusXwR8

'आंब्यापासून तयार होणारे खाद्यपदार्थ' ह्यावर एक लेखमाला सुरु करावी अशी विनंती मी संपादक मंडळाला करतो.
असे केल्यास मिपा खऱ्या अर्थाने 'मोहरून' येईल.

तुम्हाला 'आंबून' असे म्हणायचे आहे काय ?

आंब्याच्या झाडाला मोहर येतो ना..तसा
ऑलरेडी आम्बलोय !!

थांबा थोडे आता बाठ्याचे वेफर्स,भाजी,मिश्र लोणचे,उपवासाचे पदार्थ,कांतीसुधारक उटणे येत आहे.तोपर्यंत धुतलेल्या कोयींची कढी ,रसम प्या.उन्हाळ्यासाठी हितकारक.

अजया's picture

8 Jun 2016 - 6:26 pm | अजया

US undergraduate engineering ला मुलांना पाठवणे कितपत योग्य अयोग्य कोणी सांगू शकाल का मिपाकरांनो.

सुबोध खरे's picture

9 Jun 2016 - 10:38 am | सुबोध खरे

undergraduate engineering ला पाठवून मुलांना फारसा फायदा होत नाही. कारण तुम्ही जेंव्हा MASTERS करता तेंव्हा तुमची पदवी कुठल्या महाविद्यालयातील आहे याचा शष्प फरक पडत नाही. तेथे पाठविणारे SAT चे क्लास वाले "अचाट आणी अफाट" चढवून सांगतात. वार्षिक १०-१२ लाख खर्च दोन वर्षे करा मग शिष्यवृत्ती मिळेल.सगळे पुढचे शिक्षण फुकट होईल ई ई. मी पण त्याक्षणी हुरळून गेलो होतो. मग थंड डोक्याने विचार केला आणी माझ्या अनेक निवासी आणी अनिवासी मित्रांशिया चर्चा करण्यात आली तेंव्हा यातील मिथ्या भाग लक्षात आला.शिष्यवृत्ती १०० मध्ये फारतर एखाद्या मुलाला मिळते. शिक्षणाचा एक कोटी रुपयापर्यंत खर्च येतो आणी त्याचा पुढच्या आयुष्यात फारसा काहीही उपयोग होत नाही असे अनेक मित्रांनी स्वच्छ आणी स्पष्ट शब्दात सांगितले.

हो.मलाही दोन्ही प्रकारचे सल्ले मिळत आहेत.अजून सॅट क्लासला नाही जाऊन आले.ते असेच चढवून सांगतील कल्पना आहे.

अगम्य's picture

21 Jun 2016 - 12:09 pm | अगम्य

खरे साहेबांना अनुमोदन. undergrad भारतात करून masters साठी अमेरिकेला पाठवणे उत्तम. जर भारतात undergrad साठी चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळत नाही म्हणून SAT चा विचार करत असाल तर तसे अजिबात नको. उगाच खर्च करून खड्डयात पडाल. भारतात undergrad शिक्षण चांगले आहे. मुंबई पुणे ह्यासारख्या विद्यापीठांचा syllabus सुद्धा चांगला आहे. म्हणजे, भारतात undergrad केले म्हणून अमेरिकेत masters करताना काही disadvantage होतो असे नाही.

मोबाईल साठी पॉवर बँक घेताना काय निकष लावावा.?

गुगल क्रोम कास्ट काय आहे ?

मराठी कथालेखक's picture

9 Jun 2016 - 12:18 pm | मराठी कथालेखक

Computer ( WIndows, MAC ई) किंवा मोबाईलची screen जशीच्या तशी TV वर पाहता यावी , सोबत आवाजही ऐकता यावा यासाठीचे एक छोटे उपकरण. ते टीव्हीला जोडले जाते, मग घरातील WiFi चा उपयोग करुन (मला वाटतय router नसेल तर मोबाईलच्या hotspot नेहि जोडता येत असावं) याचा साधा सरळ उपयोग असा की समजा तुम्ही मोबाइलवर एक विडीओ बघत आहात पण तुम्हाला तो मोठ्या स्क्रीनवर बघायचा आहे तर त्याकरिता पेन ड्राईव मध्ये वगैरे कॉपी करत बसण्याची गरज नाही. तुम्ही तो मोबाईलवर चालवायचा आणि स्क्रीन कास्ट करुन मोठ्या स्क्रीनवर बघायचा. तुमच्या टीवीला HDMI port असणे गरजेचे ते नसेल तरी योग्य ते adapter लावून तुम्ही हे उपकरण वापरु शकता. तुमचा टिवी पेन ड्राईव्ह सपोर्ट करत नसेल तरी या उपकरणामुळे तुम्हाला टीव्ही लगेच अपग्रेड करायची घाई करण्याची गरज नाही हा नेमका फायदा ...

मराठी कथालेखक's picture

9 Jun 2016 - 12:23 pm | मराठी कथालेखक

टीप : मी स्वतः हे उपकरण वापरेलेले नाही , त्याबद्दल वाचून जी माहिती झाली ती लिहिली आहे.

टीवी नवीन आहे..फोन / टेब जुना झालाय. एच एम एल सपोर्ट नैये म्हणे.

मग क्रोम कास्ट घ्यावा की एच एम एल सपोर्ट वाला फोनच नवीन घ्यावा...आपल्याला काय वाटतं?

मराठी कथालेखक's picture

9 Jun 2016 - 1:41 pm | मराठी कथालेखक

MHL support वाले मोबाइल फारसे नाहीयेत असं मला वाटतं. तुम्हाला फोन तसाही बदलायचाच असेल तर तुम्ही MHL support वाला घेवू शकता.
बाकी तुमची गरज नेमकी काय आहे ?
युट्युब वगैरेवरुन तुम्हाला टीवीवर विडीओ बघायचे आहेत का ? यासाठी MHL support वाला फोन किंवा chrome cast सारखं उपकरण घ्याव लागेल. (Chrome cast सध्या ebay वर १९९९ ल दिसत आहे, हा खर्च तुम्हाला फार जास्त वाटत नसेल तर बिनधास्त घेवून टाका) एकूणातच MHL support वाला फोन पेक्षा मी chrome cast आधी सुचवेन कारण याने तुम्ही pc वरुनही स्क्रीन टीवीवर कास्ट करु शकता.
की save केलेले mp4 वगैरे विडीओ टीवीवर बघायचे आहेत ? हे तुम्ही प्रेन ड्राईव्ह किंवा मोबाईल टीवी ला थेट जोडूनही करु शकता. हो पण टीवी अनेक formats नीट दाखवत नसेल तर मात्र पुन्हा वरचेच पर्याय शिल्लक राहतात.

मी तर सरळ केबल टीवी च्या सेट टॉप बॉक्स ला ऑप्शन म्हणून बघत होतो. यू ट्युब लावलं की काम झालं.

मराठी कथालेखक's picture

10 Jun 2016 - 10:35 pm | मराठी कथालेखक

नेहमीच यूट्युब वरुन फक्त कार्यक्रम बघणार असाल तर हे शक्य आहे.

मोहनराव's picture

9 Jun 2016 - 3:03 pm | मोहनराव

sinus infection चा त्रास मला गेल्या महिन्यापासुन होत आहे. अ‍ॅलोपेथीक उपचार घेत आहे पण लवकर बरा होत नाहिये.
यावर काही घरगुती उपचार आहेत का? आयुर्वेदिक उपचार कोणी घेतले आहेत का?

मराठी कथालेखक's picture

9 Jun 2016 - 3:09 pm | मराठी कथालेखक

नियमित वाफ घेणे, झेपेल तसा व्यायाम करणे, पाठीचे आणि गळ्याचे थंडीपासून रक्षण करणे (थंड गोष्टींना पाठ टेकून बसू नका, एसी मध्ये तसेच थंड हवेतून बाइकवरुन जाताना वगैरे गळ्याबोवती मफलर लपेटा)
बाकी थोडा थोडा ओवा खूप वेळ चावून खाण्याची सवय चांगली.
पण वाफ सगळ्यात महत्वाची असे मला वाटते, अगदी अ‍ॅलोपथीचे डॉक्टर पण वाफ घेण्याचा सल्ला देतातच.

मोहनराव's picture

10 Jun 2016 - 1:04 pm | मोहनराव

धन्यवाद!

palambar's picture

10 Jun 2016 - 12:39 pm | palambar

PGD ERP course SAP coep college one year full
time ,Is it useful forBcom studen?
kindly guide. thank you.

धनुष्याला जी दोरी बांधली जाते त्याला काय म्हणतात ?

आदूबाळ's picture

10 Jun 2016 - 3:34 pm | आदूबाळ

प्रत्यंचा.

इरसाल's picture

12 Jul 2016 - 11:17 am | इरसाल

मोबाईल मधल्या ब्लुटुथ चे नाव प्रत्यंचा ठेवले होते याची आठवण झाली.

सिन्नरकर's picture

12 Jun 2016 - 3:31 pm | सिन्नरकर

२- BHK, काठे गल्ली, द्वारका, नासिक
१२०५, बिल्ट अप , ४ वर्ष
पाचवा मजला, रोड टच,
नाशिक – पुणे हायवे पासून ५ मीन.
पुण्यात शिफ्ट झाल्याने विकत आहे.
संपर्क – ९१६८८७७८०६

राजस्थान ट्रिप ला कोणी गेले आहे का? जयपुर जैसलमेर हा
भाग चांगला की जयपुर उदयपुर हा चांगला?

सौन्दर्य's picture

16 Sep 2016 - 2:23 am | सौन्दर्य

जयपूर-जैसलमेर जास्त चांगला. उंटवाले फार फसवतात त्यामुळे निट स्पष्ट भाव करूनच उंटावर बसा. हॉटेलमध्ये देखील इलेक्ट्रिसिटी वाचविण्यासाठी एसीचे टेम्परेचर वाढवून ठेवतात.बाकी जैसलमेर एकदम सुंदर, खास करून किल्ला आणि वाळवंट.

वाळवंटाचे दर्शन आणि अनुभव तुम्हाला जैसलमेर ला होइल. जयपुर उदयपुर हा बर्‍यापैकी ( तुलनात्मक ) हिरवा भाग आहे.

काळातली गाणी बघत होतो. तेव्हा कोरीओग्राफी मध्ये इतकी प्रगती नव्हती झालेली. म्हणजे टेरेन्स, वैभवी मर्चेन्ट,इ. सारखे दिग्गज बॉलिवुड च्या कोरीओग्राफ्री मध्ये उतरण्याच्या क्रांतीपुर्व कालातील कोरीओग्राफी.
हा फारच विनोदी प्रकार होता असे लक्षात आले. इतक जबरदस्त मनोरंजनाच साधन जे होत म्हणजे कोरीओक्रांतीपुर्व कालातील गाणी पाहणे हा मोठा विरंगुळा या लोकांनी हिरावुन नेला असे वाटते.
दिवाना चित्रपटातला रुषी कपुर च दिव्या भारती बरोबरच गाणं यातला रुषी व मागचे सर्व.
तु शायर है मै तेरी शायरी मध्ये माधुरीला साथ देणारे मागचे सर्व
बहोत मनोरंजन है ही गाणी बघावी एकदा.

तुषार काळभोर's picture

18 Jun 2016 - 5:30 pm | तुषार काळभोर

'सपने साजन के' मधील जॅकी श्रॉफ व डिंपल वर चित्रीत 'कभी भुला कभी याद किया'

विअर्ड विक्स's picture

18 Jun 2016 - 8:32 pm | विअर्ड विक्स

" सारी के फॉल सा " हे गाणे पाहावे. यात महिला extra चेहरा न दाखवता पूर्ण गाण्यासाठी एकच स्टेप करतात , तरीसुद्धा या गाण्यातील नृत्य दिग्दर्शन फारच वेगळे नि अनोखे वाटते , ना कुठे इकडून तिकडे धावाधाव न जोडीने P.T. चे वर्ग

इतक जबरदस्त मनोरंजनाच साधन जे होत म्हणजे कोरीओक्रांतीपुर्व कालातील गाणी पाहणे हा मोठा विरंगुळा या लोकांनी हिरावुन नेला असे वाटते.खरंय =)) थक्क करून टाकणारी choreagraphy असायची आणि हीरो- हीरोइन चे कपडे, हेअर स्टाइल पाहून पब्लिक पूर्णपणे कोमात!!!
शाहरूख आणि काजोल चं ये काली काली आखें..

आरारारा!

शारुख ची दोन्ही पाय वेगळे असलेली पॅण्ट!

या

आणि मध्येच अन्नू मलिकचं किंचाळणं!
मैं मिला, तू मिली!

राजस्थान तसा खूप मोठा आहे पाहाण्यासाठी.नक्की काय पाहायचे आहे आणि टुअर/ स्वत: पाहाणार यावर अवलंबून आहे खर्च.शिवाय काही मधली अंतरे २०० किमी आहेत.महाल एकापाठोपाठ एक पाहून कंटाळा येऊ शकतो.हत्त्यारं,चिलखतं,अंबाय्रा,शिकारचित्रे,फोटो,वस्तुसंग्रह आणि प्रत्येक राजाचा इतिहास.

एकुलता एक डॉन's picture

29 Jun 2016 - 10:51 am | एकुलता एक डॉन

premasathi कमिंग सून हा चित्रपाट सौ ना पाहायचा आहे .कसा बघता येईल

मराठी कथालेखक's picture

1 Jul 2016 - 2:39 pm | मराठी कथालेखक

'फक्त मराठी' या वाहिनीवर बरेच वेगवेगळे , अनेकदा अजिबात माहित नसलेलेही चित्रपट दाखवतात. त्यामुळे यावाहिनीचे वेळापत्रक बघत रहा. हा चित्रपट तिथे मिळू शकेल

एकुलता एक डॉन's picture

2 Jul 2016 - 6:25 pm | एकुलता एक डॉन

ती वाहिनी उपलब्ध नाहीये

लालगरूड's picture

1 Jul 2016 - 12:04 am | लालगरूड

वकील आहे का कोण मदत हवी आहे।

एकुलता एक डॉन's picture

18 Sep 2016 - 6:21 pm | एकुलता एक डॉन

जोगळेकर म्हणून मिपावर आहेत
तसेच lawyersclubindia म्हणून संकेतस्थळ बघा

रघुनाथ.केरकर's picture

1 Jul 2016 - 12:29 pm | रघुनाथ.केरकर

मित्रहो,
मला कोकणात एक पॉलीहाउस उभारायचे आहे.
त्यात मसाले पदार्थ इत्यादीची लागवद करायचीआहे.

फ़ार भांडवल नसल्याने, ग्रीन शेड नेट आणी बांबु वापरुन वापरुन उभे करायचे आहे.

पॉली हाउस बद्दल कुणाला माहीती असल्यास अवश्य सांगावी.

मराठी कथालेखक's picture

1 Jul 2016 - 2:01 pm | मराठी कथालेखक

बजेट : रु १०,००० पर्यंत
प्रकार : शक्यतो २.१ (४.१ ही चालेल) पण मुख्य भागाचा आकार फार मोठा नको नाहितर ठेवण्याची अडचण होईल.
हवेच : FM, USB, AUX, Remote , TV / Set top box शी सजह connection होणे. FM चा दर्जा चांगला असावा, बाकी आवाजाचा दर्जा चांगला असावा, वाद्यांचे आवाज तसेच मानवी स्वर अगदी सुस्पष्ट ऐकू यावे
असल्यास चांगले : Bluetooth , LCD screen , Equalizer , preset equalizer, bass/treble control
कोणतेही ब्रँड चालेल पण दर्जा चांगला हवा, टिकावू हवे.
अतिरिक्त माहिती : दिवाणखान्याची मापे (१८ फुट x ११ फूट )

मी जालावर शोधलेली काही उत्पादने

१) फिलिप्स MMS4040F/94
यास bluetooth नाही. फ्लिपकार्ट तसेच , स्नॅपडिल वरील गुणांकन (ratings) खूप चांगले आहेत.
२) फिलिप्स MMS4545B/94 , हे जवळपास वरच्यासारखेच आहे पण यात Bluetooth आहे. पण फ्लिपकार्ट स्नॅपडिल वरील गुणांकन तितकेसे आकर्षक नाही.

पिंपरी-चिंचवडमध्ये विजय सेल्स वा क्रोमा ई दुकानांत ह्या उत्पादनांची प्रात्यक्षिके बघण्यास ( म्हणजे ऐकण्यास) मिळू शकतील काय ?
अजून इतर उत्पादनांचा शोध चालू आहेच. तरी मिपाकरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळावे ही विनंती.

मराठी कथालेखक's picture

1 Jul 2016 - 5:29 pm | मराठी कथालेखक

F&D F380X
याची पण बर्‍यापैकी चर्चा आढळुन येत आहे. कुणाला माहीत आहे का ?

NiluMP's picture

2 Jul 2016 - 6:13 pm | NiluMP

बाल शिवबा (animated movie by Rane Prakashan) आणि बाजी प्रभु देशपांडे या चित्रपटांची प्रगती काय? Anybody know

एकुलता एक डॉन's picture

3 Jul 2016 - 5:34 pm | एकुलता एक डॉन

पुण्यात कॅन्सर पीडित साठी मदत पाहिजे
सादर व्यक्ती दारिद्य रेषे वर आहे

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चॅरिटी विभागाकडे चौकशी करा. खूप रुग्णांना मदत होताना प्रत्यक्ष पाहिलं आहे.

अ‍ॅनेक्स बिल्डिंगच्या तळमजल्यावर आहे. तिथेच आँकोलॉजी विभागही आहे. (डॉ० केळकरांची ओपीडीसुद्धा.)

एकुलता एक डॉन's picture

7 Jul 2016 - 1:01 pm | एकुलता एक डॉन

पार्किंग मध्ये मुले दुचाकीच्या आरसे फिरवतात
काय करावे

माझी नोकरी बदलल्याने पुणे येथे नवीन जागा शोधत आहे (भाड्याने). नवीन नोकरी पुणे हिंजेवाडी phase १ ला आहे. जाणकार मिपाकरांनी राहण्यायोग्य परिसराबद्दल माहिती द्यावी ही विनंती. मी, बायको आणि १ वर्षाची मुलगी असा परिवार आहे. पुण्याबद्दल काहीही माहीत नसल्यामुळे माहिती साठी विनंती.

/उमेश (८७६७४६८७६८)

मराठी कथालेखक's picture

11 Jul 2016 - 2:30 pm | मराठी कथालेखक

कोलते पाटील यांचं Life Republic इथे बघा (मी स्वतः अजून ही सोसायटी बघितलेली नाही) फेज १ पसून जवळ आणि भाडे कमी आहेत आणि अनेक सुखसोयी आहेत. पिंपरी-चिंचवड शहरापासून थोड दूर वाटेल पण वरचेवर शहरात जायचं नसल्यास याचा विचार करु शकता.
तुमची पत्नी नोकरी करत नाही हे गृहीत धरुन सल्ला दिला, त्या नोकरी करत असतील तर मात्र आधी त्यांची सोय बघणे योग्य होईल.

लालगरूड's picture

12 Jul 2016 - 12:37 am | लालगरूड

flat pahije ka room?

उमेश पाटील's picture

12 Jul 2016 - 12:42 pm | उमेश पाटील

फ्लॅट हवा आहे

नाखु's picture

11 Jul 2016 - 2:35 pm | नाखु

नाही हिंजवडी.....

बाकी चालू द्या.....

उमेश पाटील's picture

11 Jul 2016 - 11:26 pm | उमेश पाटील

बरं, हिंजवडी

उमेश पाटील's picture

11 Jul 2016 - 11:25 pm | उमेश पाटील

माहिती साठी आभारी आहे, पत्नी नॊकरी करत नाही त्यामुळे जास्त अडचण नाही . अजून माहिती काढतो

भक्त प्रल्हाद's picture

11 Jul 2016 - 11:46 pm | भक्त प्रल्हाद

लाईफ रिपब्लीक लांब आहे खूप.
वाकड मध्ये किंवा पिंपरी चिंचवड ला बघा.
तुम्हाला इतर्ही सगळे सोयिचे पडेल.

उमेश पाटील's picture

12 Jul 2016 - 10:34 am | उमेश पाटील

गूगल मॅप ६ किलोमीटर दाखवत आहे

विअर्ड विक्स's picture

13 Jul 2016 - 3:01 pm | विअर्ड विक्स

multipurpose इलेकट्रीक kettle घ्यावयाची आहे. कोणत्या ब्रॅण्डची चांगली असते ? काही अनुभव ? नुसते पाणी उकळवणे नव्हे तर मॅगी ,ओट्स , दूध तापवणे ही कामेसुद्धा त्यात व्हावीत अशी अपेक्षा आहे. क्षमता - ०. ५ ते १. ० ली. बजेट १५०० वा थोडे अधिक

किटलीऐवजी इलेक्ट्रिक कुकर घ्या.

x

यात पोळ्या सोडून सगळा स्वयंपाक करता येतो.

विअर्ड विक्स's picture

18 Jul 2016 - 11:41 pm | विअर्ड विक्स

धन्यवाद. चांगला पर्याय दिसतोय. निर्णय घेतल्यावर कळवतो.

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2016 - 3:12 pm | श्रीगुरुजी

पावसाळ्यात साखर, मीठ इ. पदार्थ डब्यातच ओलसर होतात. ते ओलसर होऊ नयेत यासाठी काय करावे?

घट्ट झाकणाचे डबे वापरावेत.

समी's picture

18 Jul 2016 - 11:22 am | समी

double door refrigerator घ्यायचा आहे साधारण २५००० पर्यंत.... कुठला घ्यावा?

सिरुसेरि's picture

18 Jul 2016 - 11:35 am | सिरुसेरि

एलजी

नितीन पाठक's picture

28 Jul 2016 - 5:01 pm | नितीन पाठक

Samsung चे मॉडेल सुध्दा चांगले आहेत. वीज खर्च कमी येतो.

समी's picture

18 Jul 2016 - 3:41 pm | समी

एलजी चे मॉडेल सांगू शकाल का?

अजुन काय ऑप्शन आहेत?

संदीप डांगे's picture

23 Jul 2016 - 8:02 pm | संदीप डांगे

वडगाव कांदळी, ता, जुन्नर जिल्हा पुणे येथे एक मजेदार घटना रोज घडते. दोन वेळेला याचा साक्षीदार मीच होतो. ह्यावेळेला रेकॉर्ड केले. जेव्हा मशीदीतून अजान सुरु होते तेव्हा गावातली कुत्री भेसूर आवाजात साथ द्यायला सुरुवात करतात... =))

https://soundcloud.com/sandeep-daange/dogs-barking-while-ajaan

मितभाषी's picture

23 Jul 2016 - 8:14 pm | मितभाषी

कुत्रे मागच्या जन्मात मुमा असतील.
२०% डिस्काउंट कशावर आहे? =))))

संदीप डांगे's picture

23 Jul 2016 - 8:35 pm | संदीप डांगे

ते चुकून आले हो. औषधांवर आहे.

तुम्ही कुठल्याही कथा कादंबरीत विशेषतः लेखात वगैरे असा उल्लेख ऐकलेला आहे का ?
१- एका गावात एक गरीब शुद्र/वैश्य/क्षत्रिय राहत होता.
२- एका गावात एक विद्वान शुद्र्/वैश्य्/क्षत्रिय राहत होता.
३- रत्नागिरीत कोल्हापुरात त्याकाळी एक शुद्र्/वैश्य्/क्षत्रिय कुटुंब राहत असे.
४- त्याकाळी तिथे शुद्र/वैश्य्/क्षत्रियांची चारच घरे संपुर्ण गावात होती.

सन्जय गन्धे's picture

28 Jul 2016 - 2:34 pm | सन्जय गन्धे

एक्सटर्नल हार्ड डिस्क क्रॅश झाली आहे. घरच्या घरी डेटा एक्सट्रॅक्ट करायचा आहे. मुख्य म्हणजे फोटो आणि चांगले जमा केलेले हिंदी आणि इंग्लीश पिक्चर! बेसिक पासून माहिती हवी आहे. मला कंप्यूटरविषयी टेक्निकल माहिती अजिबात नाही.

हेमन्त वाघे's picture

28 Jul 2016 - 10:44 pm | हेमन्त वाघे

हार्ड डिस्क ची अनेकदा केस आणि सर्किट जाते आणि आतली हार्ड डिस्क ठीक असते

हार्ड डिस्क चे केसिंग विकत मिळते त्यात ती घालून बघा

कधी काडी जुने केसिंग चाकू ने खोळावे लागते किंवा तोडावे लागते .

कोठल्या प्रकारची हि हार्ड डिस्क आहे

SATA कि PATA ( जुन्या प्रकारची)
2.5 इंच ( छोटी लॅपटॉप ची ) कि 3.5 इंच ( ( डेस्कटॉप ची )