(नोटा)

पेरणा सांगायलाच पाहिजे का दर वेळी? चालः- गे मायभू तुझे मी नोटा नोटा कितीक असती हजार पाचशेच्या नाही कुणास मुल्य कागद वाटती साऱ्या दूरस्थ आयकर विभाग ठाऊक पाहतो मजला डोळ्यांत् कॅशियरच्या अनुकंप दाटलेला झालो विवश परंतु बोलणार काही नाही निःशब्द भावनांना होळीच साक्षी राही अत्यंत भित्रे 08112016 पैजारबुवा,

(तिखले)

बंद जाहला वाजून वाजून, गजराचे चुकले कठीण दिलीसे नेमून कसरत, ट्रेनरचे चुकले मध्ये उपटला कुठून जन्मदिन, पेस्ट्रीचे चुकले वामकुक्षीला विसावला त्या, खाटेचे चुकले बुडून गेला दुलईमध्ये, झोपेचे चुकले शर्ट दाटला पोटाला अन टेलरचे चुकले तडफडला पण गेला नाही, ट्रेकिंगचे चुकले रांजणापरी उदरी ढकले, माशाचे तिखले... (गजब)

Foolपाखरा

पेरणा अर्थात Foolपाखरा का जागतेस तू शोना? काय विचार करत असतेस तू? का झोप येत नाही? कोण? मी? तू जागी आहेस ना म्हणून, मी पण जागतोय . गिरणीच्या पट्ट्यासारखी अखंड बोलतेस कधी कधी वाटतं दिवसभर थोड थोड शॉपिंग करत रहातेस माझ्या कार्डावर आणि मग उद्या काय खरेदी करायचे?

!! बालदीन !!

!!बालदीन !! असूया वाटते​ बघुनीया माथी केशसंभार कसा आनंद घेऊ या तरूण मुलांसवे लोपलेल्या केशकुंतलांच्या परागंदा मुळापासून मिळते तुम्हा सुख नित काका अंकल संबोधून किंचित केशकर्तनाचा कृष्ण दिवस आज मस्तक वाळवंटी म्हणती त्यास खालदिन छप्पर असता भाळी,मान वळे तारूण्याची नजर देतसे दाद, नित देव कोंबड्यांची शिलकीच्या तबल्यासम बालतळावर स्कॉलरपणाची सुरेख नक्षी काढू अनुभवांचे मीपण करूनी दिवसाही तारे तोडू उद्याचे आदर्श नागरिक आजच (हि) घडवू -झुल्पांकित (संतप्त खात्री कैवार पसार ) २२ जून २०१७

॥ कार्तिक कृष्ण पंचमी॥

आज कार्तिक पंचमी आज पंचमी कार्तिक उठा उठा चला आता चला सारेच आर्तिकं आज वार बुधवार आज वार वार बुध गॅस करा आता मंद जाई ऊतू बघा दूध आज मिथूनही रास आज रास ही मिथून तळ्यातल्या गणेशाला फेर्‍या इथून तिथून उद्या वार गुरुवार उद्या वार वार गुरु झाली आजची कविता करा उद्याचीही सुरु

मला भेटलेले रूग्ण - ११

http://www.misalpav.com/node/41281 ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.." ह्या आजींना Vitiligo (मराठीत कोड असं वाईट नाव आहे) असल्यानी बाहेर पडणं लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तोंड देणं नको वाटत होतं , हे त्यांनी जरी नाही सांगितलं तरी कळणं अवघड नव्हतं... मी त्यांच्या कोडामुळे पांढरे डाग असलेल्या आणि सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत ऐवढच बोललो...

मला भेटलेले रुग्ण - १०

http://www.misalpav.com/node/41158 हा दहावा भाग लिहीण्याआधी वाटत होतं की थांबावं.... किती लिहायचं आणि तेच तेच तर नाही होणार ना , स्पेशॅलिस्ट असल्याने येणारे रुग्ण पण एकाच पठडीतले शिवाय वाचकांना कंटाळा तर दनाही आला असणार ना ? माणसांची ईतकी व्हरायटी असते की लिहावं तितकं कमीच आहे .... _________________________________ कालच म्हणजे रविवारी फोन केला म्हणून फोनवरच रागावलेलं होतं , पर्सनल नंबर वर काॅल करू नये ही गोष्ट सांगायची गरज नसते पण तरिही केलाच (बरं कारण काय तर सर्दीचा त्रास कमी नाही झाला !!) ..... आता हाच पेशंट समोर बसलेला...

मला भेटलेले रुग्ण - ९

लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/40777 पेशंटसोबत मुलगी आणि जावई आलेले होते ...... तपासणी झाल्यावर रिपोर्ट्स सांगितले.... औषध कशी घ्यायची, पेशंट प्रशिक्षण कार्यक्रमला येण्याची तारीख दिली .... आणि अजून काही विचारायचं आहे का असं म्हटल्याबरोबर पेशंट नी तक्रार केली कि मुलं लक्ष देत नाहीत तब्येतीकडे , बराच त्रास सहन करावा लागतो ह्या वयात ..... त्यांना कळायला पाहिजे ..... मी विचारलं कि सोबत कोण आहेत आलेले , तेव्हा पेशंट बोलला जावई आणि मुलगी आहेत ... मी म्हटलं कि मुलगी घेते आहे ना काळजी मग का त्रागा करून घेत आहेत , त्यावर पेशंट बोलला कि ३ मुलं आणि हि एक मुलगी आहे ...

(महाग्रु)

(महाग्रु) पेरणा क्र १ आणि पेरणा क्र २ सूर्य मी अन काजवे ते, जाणूनी होतो जरी राहतो धूंदीत माझ्या, पाठ माझी खाजरी आत्ममग्न उष्टपक्षी, म्हणती मला पाठीवरी मीच घडवले, मीच केले, ग्रेट माझी शायरी भेट जर झालीच आपुली, सोडेन ना तूजला घरी माझिया माझेच कौतुक, ऐकूनी तू दमला जरी समूळ पिळून्-बोरकर अज्ञ पामरांच्या माहिती साठी - उष्टपक्षी = शहामृग्

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - १)

प्रास्तविक : माझे वडील गेल्या ३७ वर्षांपासून श्वसनविकार व ॲलर्जीतज्ञ म्हणुन प्रॅक्टीस करत आहेत, सुरवातीच्या ८-९ वर्षांनतर त्यांना रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची कल्पना सुचली तेव्हापासून आमच्या दवाखान्यात दमा ,COPD आणि टिबी या आजारांसाठी रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो .... ह्या कार्यक्रमाची २००९ साली लिमका बुक आॅफ रेकाॅर्डस् मध्ये नोंद घेतली गेली (१०,००० पेक्षा जास्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना प्रशिक्षीत केलं गेलं) आणि इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये देखिल दखल घेतली गेली आहे.
Subscribe to औषधोपचार