जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे.
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे
जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे
कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला
अवघडावे असे लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.
सुट्टी
चालत्या घड्ञाळासारखी असावी
बाकीच्या जगाला चालू दिसताना
आत ते नियमीत निवांत
अनवाईण्ड होत असते.
ते इतरांच्या वेळेवर नाही
पळत, इतरांना
स्वतःच्या वेळेवर पळवते.
जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते
तेव्हा त्याचा आराम चालू होतो
पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत
भू-कवचा विंधून धरेच्या
गाभ्याशी जाईन
शून्य गुरुत्वाकर्षण तिथले
अधांतरी मोजेन
निंबोणीचे रोप कोवळे
चन्द्रावर रुजवीन
अंगाईचे शब्द बदलूनी
पुन्हा लिहून काढीन
जर्द तांबडी मंगळमाती
शनीवरी शिंपीन
शनि-मंगळ मग युती अनोखी
एकवार पाहीन
राहू-केतुची जोडगोळी मग
समक्ष बघण्यासाठी
चंद्रसूर्य कक्षांच्या अलगद
सोडवीन निरगाठी
सात अश्व सूर्याचे - त्यांना
थोपटीन प्रेमाने
त्यांचा दाणा , पाणी , खरारा
करीन मी निगुतीने
कृष्णविवर सैराट , भटकते
हुडकून मग काढीन
गळाभेट घेईन तयाची -
त्यात विरुन जाईन
मनोरथाच्या वाटेवर जरी
वास्तव पसरी काटे
त्या काट्यातून फूल फुलवी जो
त्याचे संचित मोठे
रोबोट्सनी जग जिंकले होते
माणूस इतिहास जमा झाला होता.
पण रोबोट्सना
पोट नव्हते, त्वचा
झाकण्याची गरज नव्हती
आकांक्षा नव्हत्या
त्यांचे अर्थशास्त्र ठप्प झाले
आता पुढे काय असा प्रश्न पडला
जेव्हा त्यांना मिसळपावच्या
अर्काईव्हमध्ये माहितगारची
एक जुनी कविता आढळली
मग त्यांनी पोट असणारे
त्वचा झाकाविशी वाटणारे
आकांक्षा असणारे
जन्म मृत्यू असणारे
रोबोट बनवले
असा लावला रोबोटमय जगाने
माणसाचा पुर्नशोध
आज लै दिसांनी मिपावर आलो अन समोरच प्राचीताईची कविता दिसली मग काय हात शिवशिवायला लागले
प्राचीताई नेहमी प्रमाणे या बालकाला उदार अंतःकरणाने क्षमा करतीलच...
चाल "ए दिल मुझे बता दे" लैच फिट बसते, नाहीतर "मेरे ढोलना सुन" थोडीफार ओढाताण करुन, किंवा "दाटून कंठ येतो" किंवा "तु सप्तसुर माझे" च्या चालीवर म्हणावी,
दिवसातुन सहा वेळा असे १०८ दिवस उच्चरवात रोज गायल्यास सातजन्माची पापे समूळ धुतली जातील.
कोकिळा गप्प झाली का
माहीत नाही का रुसून गेली
कोण गाईल आता अंगाई
का संपली पुण्याई
कोण रिझवेल आता
कोण निजवेल आता
ऐकता भजन, भूपाळी
दिस उगवेल का नाही
गानसम्राज्ञी दिदीनां सजल नयन भावपूर्ण श्रद्धांजली.
सगळे कंस पूर्ण केलेले आहेत उगाच मोजत बसू नका...
पेरणा, प्राची ताईची ही कविता
http://www.misalpav.com/node/49553
प्राचीताईने केलेला भावानुवाद करायचा प्रयत्न चांगला होता, पण तिला बिचारीला त्या गाण्याचा खरा अर्थ समजलाच नाही ( हा उगाच खोटे कशाला बोलायचे?)
स्पष्ट बोललो म्हणून रागावू नको बरका प्राचीताई, पण माझ्या फार अपेक्षा होत्या तुझ्या या भावानुवादा कडून.
माझ्या आता पर्यंतच्या अनुभवावरुन सांगतो हे गाणे असे भारी आहे की दुसऱ्या कोणाlला खरा अर्थ लक्षात येण्याची शक्यताच नाही.