डोकं दुखून भणभण पायो
http://kadamsagar.blogspot.in/2015/11/blog-post.html
एक तासाभराचे कथानक १७४ मिनटे आणि १२ गाणे धाकला आणि सगळीकडे बडजात्यचि राजे शाही मिठाई लावली तर ?
http://kadamsagar.blogspot.in/2015/11/blog-post.html
एक तासाभराचे कथानक १७४ मिनटे आणि १२ गाणे धाकला आणि सगळीकडे बडजात्यचि राजे शाही मिठाई लावली तर ?
कविता..कवि...आणि कै च्या कै कविता...
कधी मुक्यानेच बोलणारी कविता,
तर कधी बिअरसवे डोलणारी..
येता जाता माफी मागणारी कविता....!
झुरळावर स्वार होवून जोमाने
ढेकणावर चढाई करणारी कविता..
आरसे फोडत, वादळात सापडत..
सिगरेटी फुकायला लावणारी कविता...!
अतिव दु:खाने झडणारे (?) ढग अन्
गोमुत्राची चव शिकवणारी कविता..
आमच्यासारखे समिक्षक असताना..
सफाईसाठी डेटॉल शोधणारी कविता..!
पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली
तेव्हां
काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर
गजला करत उभा होता
बाजी बोलला
जमवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली
आता मायबोली सर्चमधून
तेच तेच जुने मतले काढून
राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो.
बापानं खोली करुण दिली, मेस लाउन दिली, "आता थेट दिवाळीलाच गावांत याचं! कई कुटाने केले अनआदि मदी गांवात दिसला त् तंगडच् तोडील" म्हणत एका किकमधे बुलेट चालु केली आणि निघुन गेला.
खोली ऐस-पैस पण मी एकटाच. मागच्या वर्षी रूम पार्टनर लोकांनी लफडा केला आणि पळून गेले. मार मी खाल्ला, घरमालकचा आणि नंतर बापाचा. आमचं शिक्षणच ठप्प होण्यासारखं मॅट्टर होतं पण बापाला शिक्षणाची भारी हौस म्हणून त्यांनीच साऱ्यावर पांघरुण घालून दुसऱ्या कॉलेजमधे एडमिशन करुण दिली.
मी पण ठरवले यावर्षी खुप अभ्यास करायचा, फालतू उद्योग एकदम बंद.
अण्णांचं नुकतंच लग्न झालं होतं.नेहमीच्या रिवाजाप्रमाणे त्यांना त्यांच्या सासरवाडील एका लग्नाच्या निमीत्तानं जेवायला बोलावलं होतं.ताट, पाट मांडून पंगत तयार झाली होती. सर्वांना आपआपल्या पाटावर बसायला आमंत्रण दिलं होतं.जांवयाचा मान म्हणून त्यांच्या ताट्पाटा सभोवती रांगोळी घालून त्याची जागा सुशोभीत केली होती.
सगळी मागल्या वर्सातुन फुढं आलेली, म्या एकटाच् नवा. त्याहीच्यात मिसळा मनलं त् म्या खेड्यातला, सुतच् जमाना. वर्गात कई उल्हासच् राइला नवता, पर एकदा तिला हसताना पाइलं अन् सगळा अंगच् नाचू लागला. ति साऱ्या नसाहितातून व्हावू लागली. मागल्या बाकावर बसून, हाताचा कोपाकरुण बोटाच्या सांदीतून तिला टापू लागलो. ति गदगदून हसायची न् म्या खुश व्हायचो. मजाच मजा यायाची. एकदा ति खेटुण गेली अन् म्या अंगाला माराइचा फवाराच् ईकत आणला. दिसभर एकटाच तिच्या मागणं फिरायचु. कदीच्याला बी तिच्यावरच् नजर लावून बसायचो.
तुझ्या सहवासात मी
देहभान सारे हरपतो
तरीही माझ्या पत्नीचा
अचूक वेध मी घेतो
_______________________________________________________
तुझ्या गहि-या डोळ्यांत
माझी नजर गुंतावी
तुझ्या ओठांची लाली
माझ्या ओठानी पुसटावी
नवीनच लग्न मधुच॑द्राची रात
फुटे कवीस कवीतेचा उमाळा
अहो आश्चर्य काय त्यात?
करे कल्पना॑ची बरसात
उडवे उपमा अल॑कारा॑ची खैरात
फुट्ती लाह्या॑सारख्या कविता
काही ख॑ड न त्या॑त
एकएकूनी कविता तयाच्या
पत्नी जाई क॑टाळून
ला॑बलचक देई जा॑भया
मुखच॑द्रमा अन ताणून
रात्र तशी फार न झाली
डोळे मात्र जडावले
कविता तयची निद्रानशावर
रामबाण उपाय दिसे
पत्नीचा चेहरा पाहून अखेर तो था॑बला
जाणवूनि निरुत्साह तिचा
तो थोडसा चिडला
''एव्हढी कशी तु अरसीक?''
तो बोलला रागाऊनी
एकून बोलणे ते रागावली मग तीही
एकदाची सोम्याजवळ चिट्ठी दिली, घरी येऊन जेवण केलं अन गच्चीवर जाऊन चंद्र-तारे पाहत निवांत पडून राहीलो. पर मनात धाकधुक चालूच. जर तिला आवडलं नई अन ति बापाला घेऊन घरला आली त? आपल्या बापाचं जाउद्या, तिचा बापच फोडून काढिन. त्याची मिशि पाहुनच पार गळपटायला हुतं. तेवअख्ख्या गावांत इज्जत घालल. च्याला भलतीच् भानगड़ करुण बसलोय. सोम्याला फ़ोन करुण नकु दिउ म्हणाव त् वरुण तेवच् फाटली का म्हनल. जाउद्या होउ दया काय होइचं ते. खाली गेलू. दप्तर घेतलं. आये ला दिन्याच्या घरी अभ्यासाला चाललू सांगितलं अन घरामागं आलू. दत्तूअण्णा शेतात रहायला गेलेला. त्याच्या पत्र्यावरून फिरसे गच्चीवर येऊन निजलो.
गेले आठ दिवस ऑफिसात शीतयुद्ध सुरु आहे. एच्चारने बारीकसारीक खुसपटे काढून फतवे काढून मला पिडायचे आणि मी शक्य तितक्या विणम्रतेने फतव्यांची अंमलबजावणी करायची किंवा ऑफिशियल भाषेत आदबशीर उत्तरे द्यायची. आज तर हायला, कहरच झाला ! उन्हातून धावतपळत बस पकडून खुर्चीवर येऊन बसते न बसते तोवर टेबलावर प्रेमपत्र हजर !
‘गेल्या आठवड्यात सहापैकी तीन दिवस तुम्ही किमान वीस मिनिटे लेट आलात अशा नोंदी थंब मशीनने दर्शित केल्या आहेत. याबाबत आपणास सूचना देणेत येते की इत;पर आपण कार्यालयात निर्धारित वेळेत हजर राहावे अन्यथा....’ इ.इ.