डोकं दुखून भणभण पायो

Primary tabs

सागरकदम's picture
सागरकदम in जनातलं, मनातलं
13 Nov 2015 - 3:48 pm

http://kadamsagar.blogspot.in/2015/11/blog-post.html

एक तासाभराचे कथानक १७४ मिनटे आणि १२ गाणे धाकला आणि सगळीकडे बडजात्यचि राजे शाही मिठाई लावली तर ?

prem ratan


राजश्री प्रत्यक वेळी प्रेक्षकाला विसरून देत नाहे कि हा चित्रपट राजेशाही आहे ,सलमान च्या कुर्त्यापासून

महाल राजेशाही ,शाळा राजेशाही ,कात्री पण राजेशाही

हेच नाही तर बूट ,अभ्यास ,नोकर चाकर आणि जेवण गृह

हेच नाही (२) इथे राजकुमारी आहे ,दिवान आहे ,सुरक्षा प्रमुख ( ह्याला भाजी मंडित फळे घ्याला पाठवा जाते )
घोडागाडी पण राजे शाही ( इधर बचपन खिला था)

तर सगळ्यांना माहित आहे कि राजकुमारची मदत त्याचा जुळा (??भाऊ??) करतो ,जेव्हा मृत्यू शय्यॆवर सलमान सलमानला भेटतो तेव्हा पहिले वाक्य काय ? "महाराज कधी तरुण पणी आपल्या गावी असतील ,हा माझा भाऊ दिसतोय "

तरी पण चित्रपट हिट आहे कारण प्रेम से सबकुच बोलेंगे ,सलमान जो भी करता हीन cute लागता हैन

सलमान काळ्या shirt मध्ये छान दिसतो
सलमान काळ्या पारदर्शक मध्ये छान दिसतो
सलमान येडा आहे राजकुमारीशी प्रेम करतो

गाणे "जो हुम्से टकरायेगा चूर चूर हो जायेगा "

हे प्रेमगीत आहे ? राजश्री ला फरक नाही

जानी दुश्मन आठवतोय ? अरमान कोहलीच्या पंख्यांसाठी खुशखबर ,लोक इच्छा धरी नागाची वाट बघत बसतात ,शेवटी छोट्या राजकुमारवर वाईट बनायचे कारण तर पाहिजेच ( पुली मध्ये श्रीदेवी ला वाईट बनवले जाते खलनायका कडून )
पण गेला चान्स कारण तो राज परिवाराच्या मागे का हात धून आहे त्याचे कारण काळात नाही .
पण पारिवारिक चित्रपट आहे ,मग कोटुंबिक भांडणे असणारच

मग गाणे रॉयल टाईम आयो

सोनम कपूर तिच्या fashion sense साठी प्रसिद्ध होतीच ,पण राणीचा रोल चांगला केला आहे ,पण माधुरीशी तुलना होणारच ,गाणे " 'Flowers are falling, in the bower "

आणि प्रेक्षकांना तलवारी वर गळा आपटावस वाटतो ज्यावर राजेशाही भाऊ खेळत असतात .
मध्ये मध्ये राजेशाही हल्दीराम ,गोवर्धन तूप ,गाडगीळ ज्वेलर्स ,गाड्या ,crockery ,सगळे राजेशाही येत असतात .

अरे हो ,स्वरा भास्कर चा राग शांत हॊइल पर्यंत अजून दोन गाणे आणि शिश महाल चा भूत काळ असतो

शिश महाल मध्ये नील नितीन चुकेश जेवडा दारू पियुन बेवडा होत नाही तेवडा प्रेक्षक येडा होतो

नशीब कोणी राजेशाही सुतार बोलावून महाल रेपेर करत नाही

राजश्री अजूनही हम साथ साथ मोड मध्ये आहे

spoilers
अरे हो आज भाऊ बीज आहे
सावत्र बहिणी सलमान ला आपला भाऊ म्हणून स्वरास्कर ( स्वीकार ) करतात " हमे अपनी बहाण मान लो "
आणि चुकेश पण येतो ( और मीन भी ) नशीब तो लगेच चूक सुधारतो "भाई समझ लो "

बाकी निरीक्षण नंतर कधी

विनोदसमीक्षा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

13 Nov 2015 - 3:53 pm | टवाळ कार्टा

=))
तु हेच्च कर...मिपावर परिक्षणे लिही...हे मस्त जमते :)

सागरकदम's picture

13 Nov 2015 - 4:03 pm | सागरकदम

धनयवाद

कपिलमुनी's picture

13 Nov 2015 - 3:57 pm | कपिलमुनी

ब्लोग लिहून बिलीनीयर होण्याची आयडीया तुमचीच का ?

सागरकदम's picture

13 Nov 2015 - 3:59 pm | सागरकदम

नाही
ते बिल गेट्स असतील

अद्द्या's picture

13 Nov 2015 - 4:17 pm | अद्द्या

हे ब्येष्ट आहे .

अशीच परीक्षणे लिहित जा .

सागरकदम's picture

15 Nov 2015 - 3:27 pm | सागरकदम

नक्की नक्की

मुक्त विहारि's picture

13 Nov 2015 - 4:34 pm | मुक्त विहारि

पण नंतर डायरेक्ट प्रतिसाद वाचायला घेतले.

सागरकदम's picture

13 Nov 2015 - 5:06 pm | सागरकदम

काय आवडे नाही ते सांगा
सुधारणा नक्की होईल

जव्हेरगंज's picture

13 Nov 2015 - 4:59 pm | जव्हेरगंज

हाणु मोदण !!
परीक्षणेच लिहायला घ्या राजे!!!

कै लिवलंय कै लिवलंय कै लिवलंय!!!!!!
कोणीतरी जाड चष्मा लावलेला पोक्त माणूस सर्वाधिक खपाच्या पेपरात लिवतो ना त्या सगळ्यांना रिटाइअर करा आणि याला घ्या.पिक्चर कसा काढायचा अन गल्ला जमवायचा ते प्रड्युसरांस कळतं का या आरामखुर्चीला एका पायाला टेकू लावून लिनाय्रांना कळतं?
अस्स पाहिजेल परीक्षण.फास्ट फॅारवर्ड.

सागरकदम's picture

13 Nov 2015 - 11:39 pm | सागरकदम

माफ करा पण
समीक्षा लिहिणारे कधीच चांगला चित्रपट काढू शकत नाहीत ,इतिहास आहे असा

शिश महाल मध्ये नील नितीन चुकेश जेवडा
दारू पियुन बेवडा होत नाही तेवडा प्रेक्षक येडा होतो>>>>>>>+ best

सागरकदम's picture

15 Nov 2015 - 9:49 pm | सागरकदम

धन्यवाद

खरंय परीक्षण.अवदसा आठवली की आपण काही कृत्य करतो तसा हा पिक्चर आहे.निव्वळ भयाण.कथा नाही गाणी नाही अभिनय नाही.अत्यंत फालतु बकवास सिनेमा. तीन तास फुकट.

श्रीरंग_जोशी's picture

13 Nov 2015 - 10:05 pm | श्रीरंग_जोशी

परिक्षण आवडलं. भारी लिहिलं आहे.

सागरकदम's picture

19 Nov 2015 - 10:55 am | सागरकदम

धन्यवाद

संदीप डांगे's picture

13 Nov 2015 - 10:20 pm | संदीप डांगे

मनापासून आहे परिक्षण, कमवाल... तुम्ही पण कमवाल. नक्कीच.

सागरकदम's picture

15 Nov 2015 - 10:58 pm | सागरकदम

धनयवाद

नमकिन's picture

13 Nov 2015 - 10:56 pm | नमकिन

आकडे कोटी रुपये. ६०-बनवला, २०- पसरवला, ५७- संगीत व उपग्रह अधिकार, ४३- गल्ला (प्रथम दिन)
सलमान खान वर पैसे लावले तर सिनेमा प्रकाशित झाल्या दिवशीच निर्माता २० कोटी रूपये नफ्यात आहे अन् अजून पूर्ण आठवडा बाकी आहे.
लोकप्रिय कलाकार बघुनंच पैसे फिटतात बहुतेक, बाकी कथा, अभिनय राहिला बाजूला.

सागरकदम's picture

13 Nov 2015 - 11:41 pm | सागरकदम

हैप्पी नु year पेक्षा तरी बारा आहे ,नशीब

रेवती's picture

14 Nov 2015 - 12:53 am | रेवती

हैला! हा शिनेमा आला का? परिक्षण समजले नसल्याने सिनेमाही पाहणार नाही. उगीच वेळ वाया घालवायचा कश्याला!

संदीप डांगे's picture

14 Nov 2015 - 1:14 am | संदीप डांगे

जिस्का प्रीक्षन इतका भारी होयेल वो पिच्चर कित्ता सोल्लीट होयेल...

तमाम मिपाकरांचे घामाचे, श्रमाचे, मेहनतीचे, कष्टाचे पैसे वाचवल्याबद्दल.... आभारी आहोत.

रेवती's picture

14 Nov 2015 - 2:15 am | रेवती

यग्झ्याक्टिकली.

सागरकदम's picture

14 Nov 2015 - 12:20 pm | सागरकदम

परीक्षण vadlyabaddal dhanywad

जुइ's picture

14 Nov 2015 - 11:42 pm | जुइ

हेच म्हणते :-)

रातराणी's picture

14 Nov 2015 - 1:14 pm | रातराणी

ही ही. सलमानचे पिक्चर बघणं सोडून दिलंय. शिसारी येते ह्याला पाहिल्यावर.

सागरकदम's picture

14 Nov 2015 - 1:25 pm | सागरकदम

मग मला पण तुमच्या समोर येत नाही येणार

रातराणी's picture

14 Nov 2015 - 4:04 pm | रातराणी

सल्लूभाय शर्टात रहा. (तुमच्याचं)
=))

टवाळ कार्टा's picture

14 Nov 2015 - 4:24 pm | टवाळ कार्टा

फुटलो =))

सागरकदम's picture

16 Nov 2015 - 8:59 pm | सागरकदम

बरा मग ??

( पुली मध्ये श्रीदेवी ला वाईट बनवले जाते खलनायका कडून )

पुली असा सिनेमा आहे?

सागरकदम's picture

14 Nov 2015 - 5:31 pm | सागरकदम

हा धागा शतकी जाऊ द्या
लिहील समीक्षा पुली ची पण

टवाळ कार्टा's picture

14 Nov 2015 - 5:33 pm | टवाळ कार्टा

२८

पुली नामक तमिळ पिच्चर आहे याच वर्षी बाहुबलीनंतर रिलीज झालाय. त्याचा अर्थ टायगर असा होतो.

आदूबाळ's picture

14 Nov 2015 - 7:22 pm | आदूबाळ

अच्छा ओक्के. मला वाटलं कदमतालभाऊ ताल चुकून कुलीला पुली म्हणतायत की काय.

मग तुम्ही कसा पुलीच म्हणाले ?

बोका-ए-आझम's picture

14 Nov 2015 - 3:19 pm | बोका-ए-आझम

और जलेबीयां बनाये जा!

सागरकदम's picture

16 Nov 2015 - 10:25 am | सागरकदम

dhanywad

याॅर्कर's picture

14 Nov 2015 - 5:57 pm | याॅर्कर

दोन दिवसात सत्तर कोटी झाले कि!
अजून शनिवार,रविवारचं कलेक्शन बाकि आहेच.

सलमानचे भक्त मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांना पटकथा,अभिनय,संगीत या गोष्टींशी काही देणघेणं नसतं,
बाकि सोमवारनंतर चित्रपट नांगी टाकेल यात काही शंका नाही.
पण ओवरआॅल 200+ कोटी होऊन जातील.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Nov 2015 - 6:00 am | निनाद मुक्काम प...

मला राजश्री चा शेवटचा सिनेमा आठतोय अतिशय गोड गोड संस्कारी बाबुजीसह संस्कारी अमृता शहिद
सिनेमा चालला.हाही सिनेमा चालेल.
दोन दिवसात चेपू वर अनेक माझ्या परिचयातील मंडळीनी खास हा सिनेमा पाहतोय असे स्टेटस टाकले
किंबहुना परिवाराचे महत्व सांगणारा हा सिनेमा दिवाळी सारख्या सणासुदीला खास परिवारासह पाहत आहोत हे आपल्या आप्तस्वकीयांना
सागण्यासाठी लोकांनी दोन दोन दिवसात सिनेमाला ७० कोटी मिळवून दिले ,
सिनेमा भारतात ३०० करोड कमवेल असे मला वाटते
.
भारतात विविध धर्माची आणि जातीची नव्हे तर वेगवेगळ्या मानसिकतेची ,आयक्यू असणारी माणसे आहेत
कोणाला काय आवडते ह्याचा निकष लावणे महाकठीण काम
मला रामसे बंधू आवडतात
आता बोला
प्रेम दिलवाले मध्यप्रदेश आणि उत्तर भारतात नक्की धंदा करेल तिथली लोक म्हणजे रोडीज व बिग बॉस आवडीने बघतात व त्यावर तावातावाने चर्चा करतांना पाहण्याचे पातक माझ्या हातून घडले आहे कधीकाळी.
ज्यांना हा सिनेमा पाहायचा नाही त्यांच्यासाठी
खास दिवाळीसाठी साठी महाग्रू ने उर्दू भाषेला उर्जावस्था प्राप्त होणे , देशपांडे साहेबांचे गाणे सामान्य लोकात पोहोचावे ,शंकर साहेबाना थोडी प्रसिद्धी मिळावी जेणेकरून परत त्यांना बॉलीवूड मधील सिनेमांचे संगीत करायला मिअवे व भावे साहेबांच्या हालाखीच्या काळात पुण्यात डाळ दिवाळीत सुद्धा २०० रुपये मिळत असतांना त्यांच्या प्रपंचाला हातभार व सगळ्यात म्हणजे
मोदिजींच्या मेक इन इंडिया ह्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून कट्यार मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.त्यांच्यामुळे हा सिनेमा पूर्ण व परिपूर्ण झाला आहे तेव्हा महारष्ट्र सरकारला महसूल मिळवून देण्यासाठी
तेव्हा कट्यार परत एकदा पहावा.
अवांतर
जालावर स्वच्छ भारत सारखी मोहिमेसारखी प्रेम रतन ची स्वच्छ प्रिंट कोणी उपलब्ध करून दिली किंवा कुठे मिळू शकेल ह्या बाबत मार्ग दर्शन केले तर सदर शिनेमा पाहण्यात येईल
आमच्याकडे फक्त रुक रुक खान चे शिनेमे खास जर्मन मध्ये त्यांच्या जर्मन चाहत्या महिलांच्या सोबत थेटरात पहायची सोय आहे.

विवेकपटाईत's picture

14 Nov 2015 - 7:17 pm | विवेकपटाईत

अस्सल मिवाप परीक्षण, बाकी सलमानचे सिनेमे टाईम पास असतात.

नूतन सावंत's picture

14 Nov 2015 - 10:01 pm | नूतन सावंत

हे राम!

सागरकदम's picture

22 Nov 2015 - 9:43 pm | सागरकदम

का हो
काय झाले ?

ठोक कारण क्र.१-
यामध्ये एक सुंदर गाणं शान ने गायलेलं एक शानदार गाण आहे. या गाण्याचे क्रॅकजॅकी लिरीक्स एकाच वेळेस मीठे और नमकीन दोन्ही आहेत. यात सहसा गाण्यात न येणार्या उदा. मठरी बर्फी इ. येतात. हे अतिशय सुरेख चित्रीत गाणं आहे.
केवळ या गाण्यासाठी हा चित्रपट पैसा वसुल करुन देतो.
त्याचे लिरीक्स बघा
आज उनसे मिलना है हमें
आज उनसे मिलना है हमें
चल उनके लिए कुछ लेते चलें
और उनको दुआएं देते चलें
थोड़ी गुंजिया वुन्जिया देते चलें
थोड़ी बर्फी वर्फी लेते चलें
पुढे मठरी काजु अहो चिवडा पण येतो. फारच मस्त गाणं

ठोक कारण क्रं.-२

यात सोनम सलमान चा जरा वेगळा प्राचीन शैलीतला एक अत्यंत उत्कट असा रोमँटीक सीन आहे. ( हा चित्रपट बघण्याची माझी मुख्य प्रेरणा हाच सीन होता व मी निराश नाही झालो.) म्हणजे वसंतसेना वासकसज्जा अष्टनायिका इ. टाइप चा रोमान्स आहे. आहाहा काय वर्णावा तो मधुर प्रसंग
यात ती शुभ्र काही जीवघेणे कॅनव्हास ऐवजी स्वतःची पाठ यु नो बॅक कॅनव्हास नायकाच्या समोर सादर करुन त्याच्या सर्जनशीलतेला आव्हान देते. मग सलमान एक भल मोठ्ठ पीस ( हे नक्की कुठल्या पक्ष्याचं माहीत नाही मोठ्ठाल मात्र ) घेऊन समोर येतो तेव्हा वो कॅनव्हासको हम उनको देखते है अशी आपली अवस्था होते.
मग क्ष सौदर्यदर्शनाने व झालेला प्रेम काहीतरी आपल चिंखाडतो अस दाखवलय. अक्षरे दिसत नाहीत आपल्याला ते काहीतरी गुढ आहे. हे सर्व एका अत्यंत सुंदर अशा गच्चीवरील महालात महालासारख्या सुंदर सजवलेल्या ठीकाणी दाखवलय. इथली रंगसंगती फार सुंदर , तिच्या केसातली अडकलेली फुले ( किसने भीगे हुए बालो से ये झटका पानी झुमके आयी घटा टुटके बरसा पानी ) वा वा वा ( मध्येच इनसर्ट केल्यासारखा मात्र ती नायिका काहीतरी बार्बेक्यु चा चमत्कारीक कृत्रिम उल्लेख करत असते त्याने रसभंग होतो) मग अजुन एक गाणं आहे सीन आहे छान त्यात आजपर्यंत तुम्ही कलाई को गजरा बांधके मुजरा बघणारे अनेक लाला बघितले असतील पण इथे नायिका एक वेगळीच क्युट क्युट स्वीट गंमत करते. ती अगोदर नायकाच्या हातात फुलांचा हार अडकवते मग तोच स्वतःच्या हातात मग त्याला स्वतः मागे ओढत नेते अस... आहाहा
मधुर मधुर रोमान्स म्हणजे डोळ्याचे पारणे फिटतात इतका शालीन रोमान्स ( आजकालच्या मर्डर हाशमी च्या जमान्यात )
हे इतकं सुंदर तरल रम्य आहे अस वाटतं की ऐ काश के हम होश मे अब आने ना पाये ये लम्हा यु ही चलता रहे
याचा परीणाम तुम्हाला सांगतो अगदी वाळलेल्या खोडालाही हिरवीकंच पालवी फुटेल अस रोमँटीक दृश्य आहे हे.

बाकी चिल्लर कारणे म्हणजे
भावा बहीणीचं प्रेम आहे. यातली मोठी चुलत बहीण दर्जेदार तीक्ष्ण अभिनय करते. छान दाखवलय.
घोडागाडी कोसळण्याचा भव्य सीन आहे छान चित्रीत केलेला.
शीशमहल आहे सुंदर बनवलेला एक एंटर द ड्रॅगन टाइप फाइट सीन आहे.
आर्ट डिरेकश्न कॉश्च्युम्स छान आहेत.
नृत्यांत काही लवचिक ठुमके आहेत
अजुन काय हो पाहीजे इत्ते रुपये मे इत्ताइच मिलेगा
शिवाय हमारी संस्कृती आहेच.
बाकी बडजात्या चा शिनमा दिमाग से नही दिल से देखा जाये तो ही बेहतर है
हे वेगळे सांगणे न लगे

कोणाची आहे माहित नाही

प्रेम रतन धन पायो
बहुत सारा धन पायो

हद से ज्यादा धन पायो
पर आप इतना धन नही पायो

इस लिये देखने मत जायो
सलमान खान डबल रोल मे आयो

सोनम कपूर को राजकुमारी के रूप मे दिखायो
राज घराने मे iPhone/iPad चलायो

खूब सारी लग्जरी कारे दिखायो
फालतू की सजावट करवायो

हर किसी से इंग्लिश बुलवायो
देश के सारे कल्चर एक ही महल मे घुसायो

अनुपम खेर एक्टिंग की माँ-बहन करवायो

फालतू डायलॉग्स बुलवायो
हम तो गलती से देख आयो

कह रहे हैं मत जायो
कह रहे हैं मत जायो ।।

सोनम कपूर विषयीच्या ओळी मीसिंग आहेत.

मारवा's picture

15 Nov 2015 - 4:42 pm | मारवा

हर किसी से इंग्लिश बुलवायो
देश के सारे कल्चर एक ही महल मे घुसायो

अनुपम खेर एक्टिंग की माँ-बहन करवायो

अनुपम खेर च्या मुद्द्यावर १०००% सहमत
अनुपम आता बघवत नाही फार त्रास होतो त्याला सहन करतांना.

पैसा's picture

15 Nov 2015 - 5:30 pm | पैसा

सलमानखानचा सिनेमा आहे म्हणून बघणार नाही.

टवाळ कार्टा's picture

15 Nov 2015 - 7:33 pm | टवाळ कार्टा

+१११११११११११११११

हे तर एका दगडासाठी दागिना सोडण्यासारख झाल.
सलमानखानचा सिनेमा आहे म्हणून बघणार नाही.
पण अस का ? एक बाळबोध कुतुहल आपलं

पैसा's picture

15 Nov 2015 - 5:38 pm | पैसा

त्याच्या केसेस वगैरे लिहून वाद घालत टैमपास करूया का? पण आत्ता वाद घालायचा मूड नै हो!

तसा तर प्रत्येक स्भिनेत्या वर काहीतरी केस आहेच ,पैसा जी

तशी तर लता मंगेशकर यांच्यावर देखील कोल्हापुर हेरीटेज ची केस आहे.
आता १ २ ३
पळा पळा सागर आता थांबु नकोस बाबा इथे.

सागरकदम's picture

15 Nov 2015 - 8:42 pm | सागरकदम

मिपावर केस आहे का एखादी ?

आता एकदम पळ

भंकस बाबा's picture

15 Nov 2015 - 6:37 pm | भंकस बाबा

आत्तापर्यन्त वाचलेल्या समीक्षेवरुन असे वाटते की मस्त तंदूरी चिकन आर्डर करावे व् जुन्या डीवीडीतील टॉम हैंक्स, टॉम क्रूज़, निकोलस केज यांना त्रास द्यावा. गेलाबाजार आर्नाल्ड बाबा पन चालेल. मागे हैपी न्यू इयर बघितला होता. शाहरुखला सांगावेसे वाटते , डोन्ट ट्राय टू अंडरएस्टीमेट कॉमन मैन . हो माझ्यासारख्या एका सामान्य मध्यमवर्गियाला तेव्हा पडदा जाळायची तीव्र भावना झाली होती. त्यापेक्षा बरा आहे का हो? जब तक है जान ने देखील झीट आणली होती.
बिहारमधे लालूना सर्वात जास्त जागा मिळाल्या. काही आश्चर्य नाही. साले हे टीनपाट करोड़ो कमावतात लालू तर मुरलेले राजकारणी आहेत

सागरकदम's picture

23 Nov 2015 - 10:01 am | सागरकदम

नक्की नक्की

वगिश's picture

15 Nov 2015 - 7:37 pm | वगिश

Prem Bought a product online
Prem didn't like the product
Prem Returned the product
Prem Return Dhan Payo

भाऊंचे भाऊ's picture

15 Nov 2015 - 11:28 pm | भाऊंचे भाऊ

सोनम कपूर तिच्या fashion sense साठी प्रसिद्ध होतीच

अरारा. असो. आमचं एवडच म्हनने आहे तीच्या अंगावरती कर्व(ज) नसल्याने तीला ज्यावर झोपवुन चित्रपटाचे पोस्टर तयार केल्या गेलं आहे त्यालाच बडजात्याला कर्व द्यावा लागल्या आहे.

बाकी चित्रपटात आज उनसे मिलना है हमे .. चलो सुट्टा दारु लेके चले, जरा फ्लेवर्ड कंडोम लेके चले अशा बोलाचे गित असते तर जास्त मज्या आली असते असेच राहुन आणी राहुन वाटते. हे बोल मिपाचे कट्टागीत (ऑफ्कोर्स एक्सेप्ट दी कंडोम पार्ट सेंटेन्स) म्हणुनही शोभु शकते याला माझ्यासकट कोणाचीही हरकत नसावी असा प्रस्ताव रचतो.

थोडक्यात चित्रपट अवश्य बघा , मला तरी आवडला. इट्स सिंपल भंपक स्वीट येट रिडीक्युलसली डिफरंट दॅन करंट ट्रेंड. अलोकनाथला जाम मिस केला चित्रपटात. तो असता तर चार चांद लग जाते.

टवाळ कार्टा's picture

16 Nov 2015 - 1:47 pm | टवाळ कार्टा

याला पंख लाग्णार हो...पूर्वीचं मिपा राहिलं नाही ता

सागरकदम's picture

16 Nov 2015 - 3:06 pm | सागरकदम

राहायला पाहिजे हा प्रतिसाद

भाऊंचे भाऊ's picture

15 Nov 2015 - 11:31 pm | भाऊंचे भाऊ

आणी हो सागर भाउ चित्रपट पाहिला आहे तर जरा क्लायमॅ़स सामज्वता काय ? आज दिवाळी आहे पत्त्ते खेळायचे आहेत असे कही बोलुन विलन नागराज (कोहली) त्याला कुठेतरी घेउन जातो तो डयरेक शिशमहलमधेच पोचतो काय अन तिकडे वेगळाच दंगा सुरु होतो काय.. जरा चित्रपटाची वेळ क्जमी करण्याच्या नादात एडीटींग मधे काही गोंधळ उडाला आहे काय हो ?

भाऊंचे भाऊ's picture

15 Nov 2015 - 11:34 pm | भाऊंचे भाऊ

कारण मी तरी पत्ते खेळायचा डॉयलोग ऐकल्यावर आत केसीनो रोयाल टाइप होल्डेम आल पोक, ब्लॅक जॅ़क अथवा गेलाबाजार तिनपत्तीचा डाव असे काही पडद्यावर बघायला मिळेल अशी अपेक्षा करत होतो... नक्कि काय गोंधळ झालाय सिन कट झालाय का ?

सागरकदम's picture

16 Nov 2015 - 12:30 am | सागरकदम

क्लायमॅ़स
ज्यांनी चित्रपट पाहिला नाही त्यांनी जपून वाचा

मूळ राजकुमाराला चुकेश आणि जानी दुश्मन शिशमहाल मध्ये भूल भूल्या असतो बांधून ठेवतात .डमी (रमी नव्हे ) राजकुमार सोडवायला जातो ,दोघा सलमान चे एकदम छोटे भांडण ,राजकुमार मग भावाशी तलवार युद्ध खेळतो,डमी राजकुमार भूल भूल्या सोडवतो ,जानी दुश्मन आणि एक दोन ताल्वार्बाजना मारतो,चुकेश आणि ह्याचे भांडण मिटवतो ,जनी दुश्मन मग खालून गोळ्या झाडतो ,चुकेश ला राजकुमार पडण्यापासून बाचावतो ,जानी दुश्मन छतावर जाऊन गोळ्या मारतो पण तोच खाली पडतो
दीपक दोब्रीयाल मधेच भाव खातो
मजा आहे

भाऊंचे भाऊ's picture

16 Nov 2015 - 1:08 am | भाऊंचे भाऊ

पन यात पोकर कुठे आहे हा माझा सवा होता....

भाऊंचे भाऊ's picture

16 Nov 2015 - 1:08 am | भाऊंचे भाऊ

पन यात पोकर कुठे आहे हा माझा सवाल होता....

सागरकदम's picture

16 Nov 2015 - 1:35 am | सागरकदम

अरे तो फिल्मी dialogue मारायचा म्हणून त्याने मारला
तसे बघ्याची तर

१) डमी ने असली राजकुमारला आधी बघ्तले नाही कसे शक्य आहे ,निदान त्याच्या ओळखीच्याने तरी
२) शिश महाल च्या सज्ज्याला कधीच कठडे का लावले नाहीत
३) सावत्र बहिणी घर कसे चालवतात ,वकिलाची फी कशी भरतात ?
४) फुट बाल match त्यन्च्या घराच्या शेजारीच कशी ?
५) जानी दुश्मन ची काय दुष्मनी असते
६) राजमाता एकदम शेवटीच कशी प्रकट होते
७) एवढ दरीत पडून माणूस जिवंत राहतो आणि चार दिवसात एका injection ने मारा मर्या करतो

तुमचा अभिषेक's picture

15 Nov 2015 - 11:42 pm | तुमचा अभिषेक

सलमान आणि शाहरूख हे खरेच खूप मोठे सुपर्रस्टार आहेत. तीन खानांमध्ये बोलायचे झाल्यास त्या आमीरपेक्षाही सरस. त्या बिचार्‍याला वर्षभर मेहनत करून मिस्टर परफेक्शनिस्ट पणा दाखवत सिनेमा बनवायला लागतो, आणि इथे हा सलमान आपल्या कोर्ट केसेस सांभाळत, तर तो शाहरूख आयपीएल वगैरे धंदे सांभाळत आणि साईड बाय साईड शेकडो जाहीरातीत काम करत सोबत सिनेमे करतात आणि तरीही त्याच्यासारखेच शेकडो करोडोंमध्ये कमावतात. तसेच एवढे करून ते फिल्मफेअर अ‍ॅवार्ड सुद्धा आमीरच्या जागी शाहरूखलाच जास्त मिळतात.

शेवटी अभिनयापेक्षा सरस काही असेल तर तो एक्स फॅक्टर !

सागरकदम's picture

16 Nov 2015 - 12:17 am | सागरकदम

Prem ratan theater aayo.
Prem ratan ticket book karayo.
Prem ratan ghatiya review payo.
Prem ratan ticket cancel karayo.
Prem ratan ghar wapas aayo.
Prem ratan gana hi gana payo.
Prem ratan movie na mujhko bhayo.
Prem ratan diwali me jamke ullu banayo.
Prem ratan faltoo ka paisa waste karayo.
Prem ratan sir dukhayo.
Prem ratan dhan lutayo.
Prem ratan rupiyo dubayo....

अजून एक धाकाल्पत्र

नितीनचंद्र's picture

16 Nov 2015 - 12:29 pm | नितीनचंद्र

अच्छा ! म्हणजे प्रेम रतन हा जुना मराठी सांगते ऐकाचा ( थोडासा ) थोडासा रिमेक आहे म्हणायचा. आधी प्रेम मग ती बहिण असल्याचा साक्षात्कार मग भाऊबीजेचा टचिंग सीन.

सागरकदम's picture

16 Nov 2015 - 1:54 pm | सागरकदम

त्यात पण डबल रोल असतो ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Nov 2015 - 12:43 am | निनाद मुक्काम प...

आता पर्यंत जालावर कुठेही उल्लेख झालेला नाही म्हणून येथे खास नमूद करतो ह्या सिनेमांचे कथानक परिवार एकत्र आणणे हा भाग वगळता दिवाने ह्या अजय व उर्मिला च्या सिनेमावरून ढापले आहे
त्यात अजय चोर व पोलिस अधिकार्याची भूमिका केली आहे
साधन व्यापारी खानदानी अजय हा पोलिस अधिकारी असतो उर्मिला त्यांची प्रेयसी असते
प्रेमात रुक्ष अजय कामात चोख असतो त्याचा काका परेश रावल त्याचा काटा काढण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करतो त्याने अजय कोमात , अजयचा डुप्लिके ट हा चोर असतो त्याला शिवाजी साटम हा बडा पोलिस अधिकारी अजय च्या जागी पोलिस अधिकारी म्हणून आणतो कारण त्यांना खरे अपराधी शोधायचे असतात , ह्या नाटकाचा भाग म्हणून चोर अजय ला उर्मिला सोबत प्रेमाचे नाटक करावे लागते , प्रेमळ व प्रणयचतुर चोर अजय वर उर्मिला प्रेम करू लागते व तोही तिच्या प्रेमात पडतो
तिला अजय मध्ये झालेला बदल लक्षात येतो पण ती त्याबद्दल जाम खुश असते
पुढे पोलिस अधिकारी कोमातून बाहेर मग चोर अजय चे रहस्य उघड मग उर्मिला ची द्विध्धा मनस्थिती मग दुष्टांचा नायनाट
आणि मग शेवटी पोलिस अधिकार्याला उर्मुलाचे मन समजते तो तिला चोराकडे सोपवतो
२००० चा सिनेमा ह्यातील कयामतजोगिया गाणी हिट झाली. सदर सिनेमात उर्मिला च्या व्यक्तिरेखेला बर्यापैकी वाव आहे

अजय देवगण ने तेवा ओळीने दोझेन भर डबल रोल केले होते

तसा जानी दुश्मन वर पण बेतलाय
सावत्र भवन मध्ये भांडण तिकडे पण लावलेय

सूड's picture

16 Nov 2015 - 4:36 pm | सूड

काय लिहिलंय?

सागरकदम's picture

16 Nov 2015 - 5:45 pm | सागरकदम

कोणी?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Nov 2015 - 1:41 am | निनाद मुक्काम प...

थोडक्यात सांगायचे तर प्रेम रतन ... हा सिनेमा २००० साली आलेल्या दिवाने ह्या अजय व उर्मिला ह्याच्या सिनेमावरून ढापला आहे.

उगा काहितरीच's picture

17 Nov 2015 - 1:59 am | उगा काहितरीच

पाहणार नव्हतोच ! शिक्कामोर्तब झालं...
-(आत्तापर्यंत सलमानचा एकही चित्रपट चित्रपटगृहात न पाहिलेला) उका.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Nov 2015 - 2:16 am | निनाद मुक्काम प...

इंग्रजी सिनेमे परदेशात पाहतांना असे अनुभव येत नाहीत.
भारतातही इंग्रजी सिनेमे पाहतांना असे अनुभव मला तरी आलेला नाही
मराठी व हिंदी सिनेमांच्या वेळी असे प्रकार होतात बहुदा
आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.

जगात दोन प्रकारचे लोक्स आहेत. प्रेम रतन धन पायो पाहून त्याला शिव्या घालणारे आणि तो बघण्यात वेळ वाया न घालवता डायरेक्ट शिव्या घालायला सुरु करणारे.