सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


वाद

सीट नको पण स्त्री आवर

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
14 Apr 2015 - 11:54 am

प्रसंग १:
स्थळ: साधारण गर्दी असलेली एक बस
'स्त्रीयांसाठी राखीव' आसनावर एक आजोबा बसलेले आहेत. एक 'स्त्री' हटो! हटो! करत उभ्या असलेल्या पुरुषांना ढोसत येते आणि 'समझता नही क्या? लेडीज सीट है' असं म्हणत त्या आजोबांच्या अकलेला हात घालते. आजोबा गरीब (स्वभावाने) असल्याने ते सॉरी म्हणून उठतात. कसेबसे उभे रहातात. या बयेचा तोंडाचा पट्टा चालूच असतो. 'पढनेको नही आता लोगोंको. जान बूझके बैठते है लेडीज सीट पे' इत्यादी इत्यादी.

सुभाषबाबू सत्य ..पाळत ...

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
11 Apr 2015 - 9:44 am

हि बातमी

सुभाषबाबूंच्या मृत्यू विषयीचे गूढ अजून किती दिवस गूढ राहणार आहे ?

इतके वर्ष इतक्या चौकश्या झाल्या त्यांनी दिलेला निर्वाळा खरा असेल तर पुन्हा पुन्हा हे का चर्चेत येतंय ?

त्या दिवशी तैपेई विमानतळावर एकही विमान आले गेले नव्हते हे खरे असेल तर मग तो अपघात झाला हे ह्या समित्यांनी कसे ठरवले ?

माय चॉईस

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in काथ्याकूट
7 Apr 2015 - 12:37 am

दिपिका काकुन "माय चॉईस" ही चित्रफित दाखवून सर्व जगात खळबळ माजवली आहे. हे औचित्य साधून मूलभुत हक्कांवर सुदृढ चर्चा घडवून आणण्याचा मानस आहे. मिपाकरांनी मनमोकळेपनाने आपले मत व्यक्त करावे अशी नम्र विनंती.

अनाहितामध्ये जरी ह्या विषयाचा खिस पाडून कोशिंबर झाली असली तरिही स्त्री वर्गाने इथे भाग घेवून सर्वांच्या ज्ञानात भर घालण्याची कृपा करावी.

चर्चेचा पाया मह्णून गेल्या काहि दिवसातील घडामोडी इथे संदर्भासाठी देत आहे. हे सर्व आंतर्जालावरू साभार.

सर्वात आधी दिपिकाचा विडियो
dipika original

अंजिराचा चिक आणि औषधोपचार

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
27 Mar 2015 - 4:41 am

आमच्या आवारात अंजिराचं झाड आहे. ते अगदी फाटकाला लागून आहे. त्याचा वाढायचा वेग आणि पसारा प्रचंड आहे. त्यामुळे आम्हाला ते सारखं छाटत राहावं लागतं. नाहीतर ते फाटकातून यायला जायला अडथळा करू लागतं आणि वर त्या झाडाच्या अगदी डोक्यावर विजेच्या तारा आहेत. त्यामुळे ते सरळही वाढू देऊ शकत नाही आणि आडवंही. त्याला भरपूर पाने येतात आणि कसली तरी पांढरी चिलटं भरमसाठ प्रमाणात पानांच्या खालच्या बाजूला गर्दी करतात. जणू उलट्या बाजूने बर्फवृष्टी झाली असावी सगळ्या झाडावर. ती चिलटं संध्याकाळ झाली की घरात घुसायला बघतात. ती चिलटं खूप बारीक आणि पीठासारखी अंगाला चिकटून बसणारी.

जमीन अधिग्रहण कायदा व इतर.....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in काथ्याकूट
17 Mar 2015 - 5:47 pm

एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा टाकत आहे.

आज श्री. जेटली यांनी बजेटवरील चर्चेला उत्तर देताना म्हटले,....
ज्या राज्यांना हा (जमीन अधिग्रहण) कायदा राबवायचा नाही त्यांनी राबवू नये. ज्यांना राबावायचा आहे, जमिनींचा उपयोग उद्योगासाठी करायचा आहे त्यांनी तसे करावे. ही सुधारणा त्यांनी विरोधकांच्या दबावाखाली केलेली दिसते.
आता मुख्य प्रश्न असा आहे....

भूसंपादन विधेयक

निनाद जोशी's picture
निनाद जोशी in काथ्याकूट
9 Mar 2015 - 1:48 pm

ह्या भूसंपादन विधायकाबद्दल रोज काहीतरी सतत ऐकू येते. काही जण ह्याच्या विरोधात आहेत तर काही ह्याचे समर्थन करत आहेत. ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे पण प्रगतीसाठी हे विधेयक फार महत्वाचे आहे. जमिनी द्यायच्या नसल्या तरी द्याव्या लागतील परंतु ह्यामुळे नवीन प्रकल्प राबवण्यासाठी आवश्यक जमिनी मिळवणे सोपे होईल. फारच गोंधळ आहे. तुमचे काय मत भूसंपादन कायदा हवा का नको????? हवे असल्यास का हवे??? नको असल्यास का नको???

आम आदमी पक्षातील दुही......

निनाद जोशी's picture
निनाद जोशी in काथ्याकूट
3 Mar 2015 - 2:00 pm

आम आदमी पक्ष एक फार मोठा विजय मिळवून दिल्लीच्या गादीवर बसला. श्रीयुत केजरीवाल हे गाजावाजा करत मुख्यमंत्री झाले. परंतु लगेचच ह्या पक्षाला ग्रहण लागेल असे वाटू लागले आहे. पक्षाचे मुख्य रणनीतीकार समजले जाणारे योगेंद्र यादव आणि उच्चशिक्षित, यादव ह्यांच्या इतकेच महत्वाचे असलेले प्रशांत भूषण ह्यांना पक्षातून काढले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास आप मध्ये मोठी फुट पडण्याचा संभव आहे. असे घडल्यास आप दिल्ली नीट सांभाळू शकेल असे वाटते का??? का पुन्हा मागील प्रसंगाप्रमाणे केजारीवालांना मुख्यमंत्री पद सोडावे लागेल.

बाई, आज रातच्याला वाड्यावर या !!! - भाजपा

किरण८८७७'s picture
किरण८८७७ in जनातलं, मनातलं
25 Feb 2015 - 2:24 pm

"बाई, आज रातच्याला वाड्यावर या" निळू फुलेच्या पाटील/सावकारी भूमिकेची आठवण झाली न. बाईंना यावेच लागणार, अन अत्याचार झाल्यावरही कुणाकडे दाद मागायला मार्ग नाही. कारण आगोदरच सांगितलेय कि "आवाज बंद, कुणाकडे काही बोलायचे नाही. हुकुमशाही आहे". काय मार्ग राहायचा त्या बाईंना? वाड्यावर हजेरी लावायची अन मग रडत कडत थोडे दिवस काढायचे अन मग जिवाचे बरेवाईट करून घ्यायचे. मी का सांगतोय हे सगळे? २ दिवसातल्या घडामोडी पाहुन मला हे सर्व आठवले. फरक फक्त इतकाच कि त्या बाई म्हणजे "आपला गरीब शेतकरी" अन सावकार म्हणजे "भाजपा सरकार" .

विचारप्रतिक्रियालेखवादप्रतिभाधोरणमांडणीपाकक्रियासमाजजीवनमानराजकारण

केजरीवाल / राज ठाकरे

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
10 Feb 2015 - 1:18 pm

दिल्लीत केजरीवाळ यांच्या आम आदमी पक्षाला टोलेजंग बहुमत मिळाले आहे.
त्यांची लढाई अक्षरशः दिया और तुफान की लडाई होती. तरीही त्यानी नेत्रदीपक यश मिळवले.
कदाचित त्यांचेकडे नक्की काय करायचे आहे याचे प्लॅनिंग होते.
भाजपचा पूर्ण नि:पात झाला. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सुद्धा निवडणूक हरला.
याची कारणे काय याची चर्चा होईल.
मात्र हा धागा काढलाय तो केजरीवालांच्या या विजयातुन महाराष्ट्रात मनसे या पक्षाला बरेच काही शिकण्यासारखे आहे.

शंका: बेळगाव महाराष्ट्रातच हवे ही मागणी नक्की कशासाठी?

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in काथ्याकूट
25 Jan 2015 - 11:10 am

मित्रहो, बेळगाव प्रश्न या विषयावर इथे पूर्वी चर्चा झालेली असणार यात तिळमात्र संदेह नाही. परंतु मला या भांडणाचा उलगडा अद्याप झालेला नाही, म्हणून पुन्हा एकदा हा मुद्दा मांडतो.

बहुतांश आयुष्य महाराष्ट्राबाहेर (जरी भारतातच) काढलेले असल्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न हा मला एक निरुद्योगी (किंवा मतलबी) लोकानी जाणूनबुजून धुमसत ठेवलेला मुद्दा वाटतो. याची कारणे खालीलप्रमाणे: