आम आदमी पक्षातील दुही......

Primary tabs

निनाद जोशी's picture
निनाद जोशी in काथ्याकूट
3 Mar 2015 - 2:00 pm
गाभा: 

आम आदमी पक्ष एक फार मोठा विजय मिळवून दिल्लीच्या गादीवर बसला. श्रीयुत केजरीवाल हे गाजावाजा करत मुख्यमंत्री झाले. परंतु लगेचच ह्या पक्षाला ग्रहण लागेल असे वाटू लागले आहे. पक्षाचे मुख्य रणनीतीकार समजले जाणारे योगेंद्र यादव आणि उच्चशिक्षित, यादव ह्यांच्या इतकेच महत्वाचे असलेले प्रशांत भूषण ह्यांना पक्षातून काढले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास आप मध्ये मोठी फुट पडण्याचा संभव आहे. असे घडल्यास आप दिल्ली नीट सांभाळू शकेल असे वाटते का??? का पुन्हा मागील प्रसंगाप्रमाणे केजारीवालांना मुख्यमंत्री पद सोडावे लागेल. आणि असे घडलेच तर दिल्लीमधील जनतेचा लोकशाही वरील विश्वास उडेल एवढे नक्की......

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

3 Mar 2015 - 2:25 pm | मराठी_माणूस

अतिशय दुर्दैवी

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Mar 2015 - 2:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

असे झाले तर दुर्दैवी म्हणावे लागेल.
"बघा ,आम्ही सांगतच होतो" म्हणणार्यांची न.मो. फौज आता पुन्हा जोमाने आंतरजालावर कामाला लागणार असे ह्यांचे म्हणणे.

प्रसाद१९७१'s picture

3 Mar 2015 - 2:37 pm | प्रसाद१९७१

यादव आणि भुषण पिता पुत्र ह्यांना आप मधुन काढले कींवा ते स्वता बाहेर गेले तर काही फरक पडत नाही.
लोकांनी मते फक्त केजरीवाल ला दिली आहेत. ह्या दोघांना जर समज असेल तर ते आपले हसे करुन घेणार नाहीत.

राजकारण दिसतं तितकं सोपं नसतं.

केजरीवाल पुन्हा तोंडावर पडला ना; तर अख्खा देश दिल्लीवर हसेल.

पिंपातला उंदीर's picture

3 Mar 2015 - 3:07 pm | पिंपातला उंदीर

हे दुर्दैवी आहे . भाजप आणि कॉंग्रेस या दोन चोरांपेक्षा वेगळे दिसतात म्हणून लोकांनी आप ला मतदान केल होत . त्यांनी पुन्हा भाजप आणि कॉंग्रेस चा कित्ता गिरवला तर अपेक्षा कुणाकडून ठेवायच्या हा प्रश्न उभा राहील

प्रसाद१९७१'s picture

3 Mar 2015 - 4:45 pm | प्रसाद१९७१

लोकांना पक्षात काय चालू आहे ह्याच्याशी काहीही घेणे देणे नाही. लोकांना काम करणारे सरकार पाहीजे. आप चे आमदार चांगले काम करत असतील तर दिल्लीच्या लोकांना त्यांच्या आपापसातल्या भांड्णांबद्दल काहीही वाटणार नाही.

भाजप आणि कॉंग्रेस या दोन चोरांपेक्षा वेगळे दिसतात म्हणून लोकांनी आप ला मतदान केल होत

केजरीवाल आणि आप सरकार जो पर्यंत चोर आहे असे लोकांना वाटत नाही तो पर्यंत काही फरक पडत नाही. लोक काँग्रेस ला त्या पक्षात भांडणे चालू आहेत म्हणुन वैतागले नव्हते.

यादव ह्यांच्या इतकेच महत्वाचे असलेले प्रशांत भूषण ह्यांना पक्षातून काढले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पक्षातून नाही हो, पॉलिटिकल अफेअर्स कमिटीमधून.
पण तसे झाले तर तेसुद्धा दुर्दैवी असेल एव्हढे मात्र नक्की.

या सगळ्या घटनेवर केजरीवाल यांनी केलेले ट्विट फार आवडले मला.

I am deeply hurt and pained by what is going on in the party.
This is betrayal of trust that Delhi posed in us
I refuse to be drawn in this ugly battle.
Will concentrate only on Delhi's governance.
जनता के भरोसे को किसी भी हालत में टूटने नहीं दूंगा

आम्ही केजरीवाल, योगेंद्र यादव, कुमार विश्वास यांची ‘भक्ती’ करत नाही.
आम्ही आम आदमी पार्टीच्या विचारधारेचे आणि कामांचे समर्थन करतो.

योगेंद्र यादव यांनी रविश कुमारला दिलेली मुलाखत पाहिली का ?
तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील तुम्हाला.
https://www.youtube.com/watch?v=0tNRPZFJ9o8

निनाद जोशी's picture

3 Mar 2015 - 3:14 pm | निनाद जोशी

हि मुलखत मि नक्किच बघिन. आणि पॉलिटिकल अफेअर्स कमिटीच नाही तर अश्यांना पक्षातून काढण्याची मागणी केजरीवाल समर्थक करत आहेत.

आनन्दा's picture

3 Mar 2015 - 3:12 pm | आनन्दा

सांगणे कठीण आहे.

पिंपातला उंदीर's picture

3 Mar 2015 - 3:14 pm | पिंपातला उंदीर

बाकी आप मध्ये पक्षांतर्गत लोकपाल आहे. हि स्वागतार्तः गोष्ट आहे . बाकी घराणेशाही आणि एकाधिर शाहीने ग्रासलेल्या आपल्या दोन मोठ्या राष्ट्रीय पक्षांनी पण याच अनुकरण केल पाहिजे

निनाद जोशी's picture

3 Mar 2015 - 3:17 pm | निनाद जोशी

आप मधील अंतर्गत लोकापालांनी केजरीवाल ह्यांच्याकडील अधिकारांवर बोट ठेवले होते आणि सांगितले होते हि एकाधिकार शाही होऊ लागली आहे.

नांदेडीअन's picture

3 Mar 2015 - 3:36 pm | नांदेडीअन

आप मधील अंतर्गत लोकापालांनी केजरीवाल ह्यांच्याकडील अधिकारांवर बोट ठेवले होते आणि सांगितले होते हि एकाधिकार शाही होऊ लागली आहे.

नाही हो.
उलट ऍडमिरल रामदास यांनी वेळोवेळी केजरीवाल यांची प्रशंसाच केली आहे.

कालसुद्धा ते काय म्हणाले बघा.

To discuss and arrive at creative and visionary decisions on redefining the role of the National Convenor of AAP; to examine whether the same person might efficiently combine both the highly demanding jobs of Chief Minister and National Convenor; and also to explore the possibility of coconvenors.

Read more at:
http://economictimes.indiatimes.com/articleshow/46438173.cms

निनाद जोशी's picture

3 Mar 2015 - 3:46 pm | निनाद जोशी

आप'चे पक्षांतर्गत लोकपाल अॅडमिरल रामदास यांनी केजरीवाल यांच्या कार्यकक्षेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याबाबत त्यांनी पीएसी व खुद्द केजरीवाल यांना पत्र लिहिले असून 'आप' अन्य पक्षांहून वेगळा नसल्याचा आरोप केला आहे.

हे महाराष्ट्र टाईम्स मधलं आहे

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Arvind-Kejriwal-AAP-Lokpal...

प्रशांत भूषण यांची मुलाखत पण बघण्या/ऐकण्यासारखी आहे.

अर्धवटराव's picture

5 Mar 2015 - 8:42 am | अर्धवटराव

धीस इज सिरीयस.

आनन्दा's picture

3 Mar 2015 - 6:39 pm | आनन्दा

वा वा..
हे म्हणजे सासू सुनेने भर बाजारात एकमेकांच्या उखळ्यापाखळ्या काढायच्या, आणि कोणी विचारले तर हे आमचे मतस्वातंत्र्य आहे म्हणायचे अशातला प्रकार झाला

असो. शेवटी आपला तो बाब्या. तुम्ही काय नि आम्ही काय.

पिंपातला उंदीर's picture

3 Mar 2015 - 3:23 pm | पिंपातला उंदीर

तेच तर . त्यामुळे पक्ष व्यक्तिकेंद्रित (पक्षी भाजप ) किंवा घराणे केंद्रित (पक्षी काँग्रेस ) बनणार नाही . सत्तेचे पाशवी केंद्रीकरण होणार नाही . पण हे दोन्ही पक्षांना परवडणारे नाही

आकाश कंदील's picture

3 Mar 2015 - 5:02 pm | आकाश कंदील

योगेंद्र यादव अतिशय शांत, सभ्य गृहस्त वाटतात, ते पक्षाचे रणनीतीकार आहेत, असे असले तरी दिल्लीच्या लोकांनी केजुकडे पाहून मत दिलेली आहेत. म्हणून जो पर्यंत केजु-सरकार आश्वासनांची पूर्तता करत आहे तो पर्यत केजु-सरकार व्यवस्थित चालणार.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2015 - 10:54 pm | श्रीगुरुजी

हे चहाच्या पेल्यातील वादळ आहे. १-२ दिवसातच शमेल व परिस्थिती शांत होईल. तोपर्यंत माध्यमांना ब्रेकिंग न्यूज मिळत राहील.

विकास's picture

4 Mar 2015 - 11:42 pm | विकास

हे चहाच्या पेल्यातील वादळ आहे.

मला वाटते हे कफ सिरप मधले वादळ आहे. :)

संदीप डांगे's picture

3 Mar 2015 - 11:57 pm | संदीप डांगे

लेख वर आणन्याची गरज आहे.

रमेश आठवले's picture

4 Mar 2015 - 7:56 am | रमेश आठवले

आप मधील काही पदाधिकारी गेले काय किंवा राहिले काय! आप पक्ष आपली दिल्लीच्या जनतेला दिलेली अवास्तविक आश्वासने येत्या पाच वर्षात पूर्ण करू शकणार नाही हे सत्य आहे . हे खापर फुटेल त्या वेळेला भूषण बापलेक आणि योगेंद्र महत्वाच्या पदावर कदाचित नसतील इतकेच.

नांदेडीअन's picture

4 Mar 2015 - 12:15 pm | नांदेडीअन

Friends, I beg apology from all my Aap colleagues. I respect Prashantji & was angry with him for talking to media.I was doing the same on SM .
I have deleted all my tweets.. I feel I too have made a BIG MISTAKE of going public. I stand corrected. I thank the vol who corrected me.
- Anjali Damania

I shd not have commented about Bhushans in public. We've fought for many public causes together & will hopefully continue to work as a team .
Have deleted my tweets. Am accountable to every last volunteer & will forever work to strengthen the party.
- Ashish Khetan

निनाद जोशी's picture

4 Mar 2015 - 1:50 pm | निनाद जोशी

नुसते ट्वीट डिलीट करून बोललेल्या गोष्टी मागे घेता येतात का ????

नांदेडीअन's picture

4 Mar 2015 - 3:54 pm | नांदेडीअन

झालेली गोष्ट चुकीची होती आणि ती व्हायला नको होती हे कबूल करण्याची भावना आहे त्यामागे.

अर्धवटराव's picture

6 Mar 2015 - 2:56 am | अर्धवटराव

भावना आवडली.
प्रशांत भूषण साहेबांनापण ति आवडो अशी आशा( शिमगोत्सवानिमीत्त ) करतो.

सव्यसाची's picture

4 Mar 2015 - 8:55 pm | सव्यसाची

प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव हे PAC मध्ये असणार नाहीत.

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2015 - 11:07 pm | श्रीगुरुजी

संपला 'आआप'मधील वाद. हे चहाच्या पेल्यातील वादळ नसून साधी फुंकर होती.

खटासि खट's picture

5 Mar 2015 - 12:00 am | खटासि खट

१४ फेब्रुवारीला झाडू खरेदी केला आहे. अजून काय वाय फाय पकडत नाही..

विकास's picture

5 Mar 2015 - 3:03 am | विकास

इथे साहेबांनी सपष्ट सांगितल्या हाय!

Free Wi-Fi not before a year: Arvind Kejriwal

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2015 - 1:01 pm | श्रीगुरुजी

दिल्लीकरांनी फुकट वायफाय मिळण्याच्या आश्वासनामुळे आआपला मते दिली होती असे वाटत नाही. वीजबिलात ५०% टक्के घट, मोफत पाणी, कंत्राटी कामगारांना कामावरून न काढण्याची हमी आणि बेकायदेशीर झोपडपट्ट्यांना मान्यता या प्रमुख आश्वासनांवर आआपला मते मिळाली असावीत. ही आश्वासने पहिल्या १५ दिवसांतच पूर्ण झाल्यामुळे फुकट वायफाय, १५ लाख सीसीटीव्ही इ. आश्वासने पूर्ण झाली नाहीत तरी दिल्लीकरांना फार फरक पडणार नाही. पंचपक्वानांचे चविष्ट जेवण पोटभर मिळाल्यानंतर बडीशेप मिळाली नाही किंवा दात कोरायची काडी दिली नाही म्हणून कोणी असमाधानी होत नाही.

मतदारांकडून फॉर्म भरून घेतले होते का ?
आम्हाला बी दावा ना गडे ..

रमेश आठवले's picture

6 Mar 2015 - 2:43 am | रमेश आठवले

दिल्लीतील मतदारावर दौलतजादा करण्याची आश्वासने पुरी करायला लागणारी अधिक धनाची तरतूद आप पार्टी कसे करणार हे उमगत नाही . २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली तरी केंद्रसरकार त्यासाठी बजेट वाढवून देईल असे वाटत नाही. आपच्या आत्तापर्यन्त्च्या धोरणा प्रमाणे ते त्यांच्या अख्तार्यात असलेलेल्या बाबींवर कराचा दर वाढवू शकणार नाही . अशा परीस्थितीत फ्री बी वर पैसे वापरल्यानंतर राज्याच्या येत्या पाच वर्षातील विकासासाठी आर्थिक तोंड मिळवणी कशी करणार ? की विकास होणारच नाही ?
अब आयेगा उंट पहाडके नीचे - असे होण्याची शक्यता आहे .

आप च्या विजयामुळे तसा मला फार आनंद झाला नाही. पण पुढील ५ वर्ष त्याचं कामकाज बघून नंतरच आपलं मतं द्यावं असं ठरवलं आहे.
सध्याच्या घडामोडी दुर्दैवी आहेत पण प्रत्येक पक्षाला यातून जावेच लागते. त्यामुळे आप वर टीका करणे योग्य नाही असं वाटतं.
प्रदेशाध्याक्षाच्या निवडीवरून सध्या काँग्रेस मध्ये सुद्धा वादंग माजले आहे. पण हे आपण गृहीतच धरले असल्यामुळे त्यावर चर्चा होत नाही

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Mar 2015 - 10:41 am | डॉ सुहास म्हात्रे

आप च्या विजयामुळे तसा मला फार आनंद झाला नाही. पण पुढील ५ वर्ष त्याचं कामकाज बघून नंतरच आपलं मतं द्यावं असं ठरवलं आहे.
१००% सहमत.

सध्याच्या घडामोडी दुर्दैवी आहेत पण प्रत्येक पक्षाला यातून जावेच लागते. त्यामुळे आप वर टीका करणे योग्य नाही असं वाटतं.
असहमत.
केवळ आपवरच नव्हे तर आपमध्ये सध्या जे चालले आहे ते इतर कोणत्याही पक्षात चालले असले तर त्यावर टीका करायलाच पाहिजे. "नागरीक सजग आहेत, आपल्यावर नजर ठेवून आहेत आणि आपल्या कर्माची फळे ते आपल्याला (पुढच्या निवडणूकीत तरी नक्की) देतील" अशी खात्री सर्व राजकीय पक्षांना वाटल्याशिवाय खरी लोकशाही येत नाही.

प्रदेशाध्याक्षाच्या निवडीवरून सध्या काँग्रेस मध्ये सुद्धा वादंग माजले आहे. पण हे आपण गृहीतच धरले असल्यामुळे त्यावर चर्चा होत नाही.
+१.
एखाद्या पक्षाकडून सर्व आशा खुंटल्यावर आणि बोलून तरी काय फायदा अशी खात्री झाल्यावरच असे दुर्लक्ष होऊ शकते.

राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये काय घडले?
http://www.firstpost.com/politics/last-minute-drama-behind-yadav-bhushans-ouster-kejriwal-played-hardball-threatened-to-quit-2136449.html

मयंक गांधी यांनी आज एका ब्लॉग वर राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये काय घडले यावर आपले मत मांडले आहे.
http://indiatoday.intoday.in/story/aaps-mayank-gandhi-blog-defies-kejriwal-gag-yogendra-yadav/1/422379.html

या सगळ्यांमधून मला एक प्रश्न पडला आहे तो असा कि नेमके कोणत्या कारणासाठी या दोघांना PAC मधून बाहेर ठेवण्यात आले? त्याची कारणे पक्षाकडून अजूनपर्यंत आली नाहीत. असे का व्हावे?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Mar 2015 - 8:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हा एक कुठलीही एक विशिष्ट विचारधारा नसणारा पक्ष फुटावा आणि तो मफलरवाला संधीसाधु तोंडावर आपटावा ही श्री चरणी प्रार्थना...एकदा मुर्ख बनवलय. हा अश्या स्वस्तातल्या गोष्टी देउन दिल्लीच्या अर्थकारणाची वाट लावेल.

कुठलीही एक विशिष्ट विचारधारा नसणारा पक्ष >>> हे तर बलस्थान की ।

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Mar 2015 - 8:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

विचारधारा किंवा एक धोरण नसलेली व्यक्ती किंवा पक्ष निर्णयक्षम असु शकत नाही. अर्थात हा माझा विचार आहे. तुम्हाला तसचं वाटावं अशी अपेक्षा नाही. आप हा संधीसाधुंचा पक्ष आहे असं त्याच्या स्थापनेपासुनचं मत आहे. राजकारण्याकडे अपेक्षित असणारा धुर्तपणा मफलरवाल्याकडे नाही. त्याचा उद्देश साफ असेलही पण फक्त चांगला उद्देश ह्या पायावर दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करता येऊ शकत नाही. कमी दरात वीजबील, फुकट पाणी, वायफाय वगैरे सेवांचा ताण शेवटी सरकारी तिजोरीवरचं येणार आहे, त्याची तरतुद काय? त्यातुन दिल्लीमधले नागरिक आणि कराचा भरणा ह्या गोष्टी एका वाक्यात वापरल्या तर "ग्रॅमॅटिकल मिस्टेक" मानतात. केजरीवालची आश्वासनं म्हणजे मला तरी वादळात पत्त्यांचा बंगला बांधायच्या गोष्टी करण्याएवढ्याचं मुर्खपणाच्या वाटतात.

खटासि खट's picture

6 Mar 2015 - 8:45 am | खटासि खट

With the end of the cold war, all the 'isms' of the 20th century - Fascism, Nazism, Communism and the evil of apartheid-ism - have failed. Except one. Only democracy has shown itself true the help of all mankind.

खटासि खट's picture

6 Mar 2015 - 8:48 am | खटासि खट

जगात मोजकेच इझम्स शिल्लक राहणार आहेत
स्ट्रेट, बाय, सम आणि तत्सम..

होबासराव's picture

11 Mar 2015 - 9:04 pm | होबासराव

तुमचि प्रार्थना मान्य झाली. मफलरवाला संधीसाधु तोंडावर आपटला.. ये भि उन्हि मे से एक है. ह्म जानते थे. हया सगळ्या पोरखेळात दिल्लि चे आणि देशाचे नुकसान झाले असे वाटते कारण आता जनता कुठ्ल्याहि नविन पक्षा ला डावलेल.

विशाल कुलकर्णी's picture

13 Mar 2015 - 1:34 pm | विशाल कुलकर्णी

हा अश्या स्वस्तातल्या गोष्टी देउन दिल्लीच्या अर्थकारणाची वाट लावेल.

अगदी अगदी , सगळ्यात महत्वाची आणि मोठी भीती तीच आहे.

आज सकाळी बातमी आली कि योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना पक्षामधून काढून टाकावे अशी मागणी आमदारांनी केली आहे.
त्यानंतर दुपारी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी कार्यकर्त्यांसाठी एक पत्र जारी केले.
http://www.firstpost.com/politics/yadav-bhushans-letter-blows-up-in-kejriwals-face-duo-talks-of-undemocratic-ways-in-aap-2148073.html
नंतर राजेश गर्ग या माजी आमदाराने केजरीवाल आणि त्यांच्यातील एक संभाषण जाहीर केले. ( याची सत्यासत्यता पडताळून पाहणारी बातमी माझ्या वाचनात आली नाही. )
त्यानुसार ६ काँग्रेस आमदारांनी आपल्याला सपोर्ट केले पाहिजे असे केजरीवाल या तथाकथित स्टिंग मध्ये म्हणत आहेत.
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/arvind-kejriwal-tried-to-poach-6-cong-mlas-last-year-claims-ex-aap-mla/articleshow/46529379.cms
ही बातमी ऐकून अंजली दमानिया यांनी पार्टीचा राजीनामा दिला.
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/anjali-damania-quits-aap-says-backed-kejriwal-for-values-not-horse-trading/articleshow/46528087.cms
संध्याकाळी आशिष खेतान यांची मुलाखत मी पहिली. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश थोडक्यात असा: (चू. भू. द्या. घ्या)
सध्यापुरते असे समजून चालू की हि टेप खरी आहे. परंतु यात horse trading हा शब्द वापरता येणार नाही कारण कुणालाही मंत्री, चेअरमन वगैरे पदाचा लोभ दाखवला नाही. हे फक्त political realignment आहे, जे भारतामध्ये कायमच होत आलाय.

मला खरेच माहिती नाही कि हि टेप खरी आहे कि नाही आणि जर खरी असेल तर आप कडून वरचा प्रतिसाद येणार असेल तर मात्र कठीण आहे.
कुणाचा विश्वास बसेल कि या पक्षाने महिनाभरापूर्वी राजधानीत ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या.

श्रीगुरुजी's picture

16 Mar 2015 - 2:02 pm | श्रीगुरुजी

उपचारासाठी बंगळुरास गेलेले केजरीवाल आज दिल्लीत परतत आहेत. त्यांच्या उपस्थितीत 'आआप'मध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. राजेश गर्ग आणि शाहीद आझाद यांनी केजरीवालांचे स्टिंग ऑपरेशन केलेले ध्वनिमुद्रीत संभाषण प्रसिद्ध केले आहे. 'आआपचे' दिल्लीतील कायदा मंत्री जिंतेंद्रसिंह तोमर यांची बनावट पदवी प्रमाणपत्रे उघडकीस आली आहेत. भूषण पितापुत्र व योगेंद्र यादव यांची राजकीय व्यवहार समितीतून हकालपट्टी झाली आहे. त्यांनी केजरीवालांना लिहिलेली ई-मेल्स प्रसिद्ध झाली आहेत. राजेश गर्ग यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. अंजली दमानियांनी पक्ष सोडलेला आहे.

इतक्या सगळ्या गदारोळात केजरीवाल मौन बाळगून आहेत. या सर्व प्रकारांना त्यांची मूक संमती असणार. परंतु आपल्यावर दोषारोप होऊ नयेत म्हणूनच मुद्दाम त्यांच्या अनुपस्थितीतच हे सर्व घडल्यासारखे वाटते.

१९६० च्या दशकात चीनमधील कम्युनिस्ट पक्षात यादवी माजली होती. त्याचवेळी माओ जवळपास २ वर्षे पेकिंग सोडून गेला व दुसर्‍या शहरातून कारभार चालवत होता. दरम्यानच्या काळात माओ समर्थक व विरोधक यांच्यात प्रचंड भांडणे होउन अनेक माओविरोधकांविरूद्ध पक्षातील कार्यकर्त्यांनीच रणकंदन माजवून त्यांना बदडून काढणे, त्यांची जाहीर निर्भत्सना करणे, पक्षातून काढून टाकणे इ. प्रकार करून त्यांना हतबल करून सोडले. हे सर्व प्रकार सुरू असताना माओ पेकिंगमध्ये फिरकलाही नाही आणि तो गप्प बसून राहिला. शेवटी २ वर्षांनंतर बरेचसे विरोधक नेस्तनाबूत झाले आहेत याची खात्री झाल्यावर माओ पेकिंगमध्ये परतला. हे सर्व प्रकार माओच्याच संमतीने सुरू होते व माओ त्यापासून मुद्दाम दूर राहिला होता.

केजरीवालांच्या अनुपस्थितीत दिल्लीत जे चालले आहे त्यावरून चीनमधील हा इतिहास आठवला.

केजरीवाल बरे होऊन दिल्लीत परतत आहेत, परंतु 'आआप' आजारी पडला आहे असे वाटते.

केजरीवालांच्या अनुपस्थितीत दिल्लीत जे चालले आहे त्यावरून चीनमधील हा इतिहास आठवला.

रेफरन्स आवडला.. तसेही माओची कम्युनिस्ट राजवट असो वा लोकशाहीतले राजकारण शेवटी "पटावरचे सगळेच घोडे अडीच चालींचे" असं म्हणावसं वाटतंय.
फक्त एकच की पाच एक वर्षांनंतर या घटनांचे मूल्यमापन नीट करता येईल. आत्ता या क्षणी कुठलेही कंक्लूजन घाईचेच ठरेल.

वेताळ's picture

11 Mar 2015 - 8:35 pm | वेताळ

कारण दिल्लीतल्या लोकाना कळाले पाहिजे फुकट गोष्टी किती महाग पडतात.

विकास's picture

11 Mar 2015 - 8:56 pm | विकास

सहमत

Private-Arvind-Alone-Party उर्फ PAAP समर्थक. ;)

यश राज's picture

12 Mar 2015 - 9:17 am | यश राज

आज लोकसत्ता मध्ये आलेला अग्रलेख वाचला.

http://www.loksatta.com/sampadkiya-news/chaos-in-aap-1080091/

अगदी उचीत असा लेख आहे.
हा पक्ष संधीसाधूंचा पक्ष आहे हे परत एकदा सिद्ध झाले.
या बाबतीत बाकीचे 'आप्'टार्ड्स काय प्रतिक्रीया देतात त्याची उत्सुकता आहे...

आत्ताच झी टिव्ही जालीय बातम्यांवर (भारतातील Friday, March 13, 2015 - 00:47) वाचनात आल्या प्रमाणे केजरीवालांनी दिल्लीत मुस्लीमांना विधानसभेचे तिकीट देण्याचे नाकारले. मुस्लीमांना आप शिवाय पर्याय नाही, त्यामुळे ते मते देणारच आहेत, असे काहीसे त्यांचे विश्लेषण/राजकारण होते.

९० मिनिटाच्या दुसर्‍या स्टींग ऑपरेशनमधे ते आता उघडकीस आले आहे. गंमत म्हणजे इतरांचे स्टींग ऑपरेशन करण्यास उत्तेजीत करणार्‍या आप पार्टीचे नेते आषुतोष तावातावाने म्हणत होते की स्टींग टेप या शास्त्रिय पद्धतीने सिद्ध केल्या पाहीजेत. असो. चालायचेच. :(

होबासराव's picture

13 Mar 2015 - 1:28 pm | होबासराव

.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2015 - 3:36 pm | श्रीगुरुजी

आआपमध्ये ही काय सुंदोपसुंदी सुरू आहे ते समजत नाही. विधानसभेत तिकीट न मिळाल्याने किंवा नंतर मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेल्यांनी आता ही जुनी स्टिंग बाहेर काढलेली दिसताहेत. इतकं प्रचंड बहुमत मिळूनसुद्धा आआपच्या नेत्यांना ही काय अवदसा सुचली आहे?

आआपमध्ये सध्या जी भांडणे सुरू आहेत त्यावरून जुन्या गोष्टी आठविल्या. १९७७ मध्ये जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा जनता पक्षात विलीन झालेल्या तत्कालीन जनसंघाच्या नेत्यांवर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने मधू लिमये, राजनारायण, जॉर्ज फर्नांडीस इ. नी दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून पक्षात यादवी सुरू केली आणि परिणामी १९७९ मध्ये जनता पक्ष फुटुन सत्ता घालविली.

नंतर १९८९ मध्ये जनता दलाचे वि.प्र.सिंग पंतप्रधान झाले असताना आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्याच्या उद्देशाने सुरवातीला त्यांनी देवीलाल यांना हाताशी धरून गुपचूप योजना आखून चंद्रशेखर यांना पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून बाहेर जायला लावले आणि नंतर काही महिन्यातच देवीलालांचे खच्चीकरण करायला सुरूवात केली. शेवटी ११ महिन्यानंतर सरकार तर गेलेच पण पक्षाचेही तुकडे झाले.

१९९६ मध्ये पुन्हा एकदा जनता दलाला सत्तेची संधी मिळून देवेगौडा पंतप्रधान झाल्यावर नशीबाने मिळालेले पंतप्रधानपद उपभोगायचे सोडून सर्वात प्रथम त्यांनी आपला राजकीय शत्रू असलेल्या रामकृष्ण हेगडेंना पक्षाबाहेर काढले व नंतर पवारांशी जवळीक साधून काँग्रेस फोडायचा प्रयत्न केल्यावर त्यांना आपली खुर्ची गमवावी लागली.

आता आआप त्याच मार्गावर जातोय का अशी शंका येतेय. सत्ता मिळाल्यावर ती टिकविण्याऐवजी आपल्या पक्षातील हितशत्रूंना बाहेर काढणे व पक्षातल्या नेत्यांची आपापसातली भांडणे यामुळे आआपसुद्धा जनता पक्ष, जनता दल यांच्याच मार्गावर जाणार का अशी शंका येऊ लागली आहे.

विकास's picture

13 Mar 2015 - 8:11 pm | विकास

आत्ताच एक मार्क व्टेनचे वाक्य वाचनात आले... असो.

Mark Twain

नांदेडीअन's picture

13 Mar 2015 - 11:01 pm | नांदेडीअन

सध्या गाजत असलेल्या स्टिंग ऑपरेशन्सबद्दल कुमार विश्वास यांचे मत.
https://www.youtube.com/watch?v=05rsIalrPNU

विकास's picture

14 Mar 2015 - 2:27 am | विकास

मला वाटते कुमार विश्वास यांना मार्क व्टेनचे वरचे वाक्य, " 'It's easier to fool people than to convince them that they have been fooled," चांगले माहीत आहे. त्यामुळे ते त्यात सांगितलेली सोपी गोष्ट करत आहेत.

काय योगायोग आहे बाकी, योगेन्द्र यादव, प्रशांत भूषण यांच्या विरोधात कारवाई होत असताना, ते एकेंच्या विरोध्त बोलत असताना, ही सगळी एकेंच्या पद्धतीने केलेली स्टींग ऑपरेशन्स जाहीर होत असताना आणि त्याला त्यांचे समर्थक तोंड देत असताना, कथानायक, अर्थात केजरीवाल मात्र बंगलोरला नॅचरोपथी मधे व्यस्त आहेत. किमान अंतर्गत भांडणे उकीरड्यावर आणण्याआधी नेत्याशी तरी बोलणी करणे महत्वाचे नाही का? त्यांना बरे वाटल्यावर हे सगळे करता आले नसते का? का एकीकडे नेता म्हणायचे आणि दुसरीकडे आम्ही काही करायला स्वतंत्र आहोत याचा अतिरेक करायचा का (कदाचीत हेच जास्त) नेत्याला गोत्यात यावे लागू नये म्हणून तो नसतानाच सगळा धुराळा उडवून खाली बसवण्याची व्यवस्था करायची?

अजून एक विनोदी बातमी...

'स्टिंग'विरोधात 'आप' कोर्टात जाणार?

अर्धवटराव's picture

14 Mar 2015 - 2:46 am | अर्धवटराव

अर्थात 'जुल्म कि हुकुमत' बघितला का तुम्ही?
-- एक तरफ प्रताप कोली शादी कर रहा था और उसी वक्त उसका भाई शहरमे अपने दुश्मनोको मौत के घाट उतार रहा था... ढेण्ट ढेण्ण्ण...इति इन्पेक्टर

नांदेडीअन's picture

14 Mar 2015 - 9:00 am | नांदेडीअन

काय योगायोग आहे बाकी, योगेन्द्र यादव, प्रशांत भूषण यांच्या विरोधात कारवाई होत असताना, ते एकेंच्या विरोध्त बोलत असताना....

yy
प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव अरविंद केजरीवाल यांच्या‘विरूद्ध’ कधी आणि काय बोलले ?

मला वाटते कुमार विश्वास यांना मार्क व्टेनचे वरचे वाक्य, " 'It's easier to fool people than to convince them that they have been fooled," चांगले माहीत आहे. त्यामुळे ते त्यात सांगितलेली सोपी गोष्ट करत आहेत.

त्याचं काय झालंय ना, काही लोक फक्त वाट बघत असतात की केजरीवाल कधी शिंकतोय, कुमार विश्वास कधी एकदा कविता म्हणतोय, किंवा आपचा इतर एखादा नेता कधी एकदा हॉटेलमध्ये जेवायला जातोय वगैरे..
एकदा त्यांनी असे केली की आपल्याला त्यांच्या या देशद्रोही आणि समाजविघातक कृत्याचा विरोध करता येतो ना !

पक्षांतर्गत कलहाचा दिल्लीतील लोकांवर काहीही फरक पडत नाहीये.
त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्या गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तितक्याच तत्परतेने सोडवल्या जात आहेत.
त्यांचे आमदार त्यांच्यासाठी आजही सहज उपलब्ध असतात.
त्यांचे आमदार आजही त्यांनाच विचारून पैसे खर्च करत आहेत.

अहो तुम्ही बघितलात तरी का वरचा व्हिडिओ ?
त्यात कुमार विश्वास यांनी मांडलेले मुद्दे तुम्हाला पटले का ?
पटले नसतील तर का पटले नाहीत यावर बोला ना.

तुम्ही लोक ठरवून आल्यासारखे आपवर टिका करत असता.
इतरांची बाजू ऎकून घ्यायची नाही, पुढे दिसत असलेले सत्य साफ नाकारायचे, आपवाल्यांना नौटंकीबाजच म्हणायचे (भलेही जनतेची सगळी कामं करत असतील तरी.) हे असे सगळे तुम्ही ठरवूनच येणार असाल तर पुढच्या व्यक्तीने काहीही लिहिले तरी ते वायाच जाणार.
त्यामुळे मी सध्या आपबद्दलच्या चर्चांमध्ये भाग घेत नाहीये.
फक्त तुम्हा सगळ्यांसोबत माहिती ‘शेअर’ करतोय.

तुम्ही लोक आयुष्यभर भक्त बनून राहा किंवा आपचे अंध विरोधक बनून राहा, मी मात्र आप करत असलेल्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत पोहचवतच राहीन.

थोडेसेच अवांतर :
’तुम्ही लोक’ हे कृपया वैयक्तिक घेऊ नये.
मिपावर बहुतांश लोक आपचा अंधविरोध करतात करताना दिसून आले, त्यांच्यासाठी आहे हे.
फक्त तुमच्या प्रतिसादाला Quote करावे लागले म्हणून इथे वापरले ’तुम्ही लोक’.
हे वैयक्तिक घेऊन यावरून वाद घालणार असाल तर त्याला मी रिप्लाय करणार नाही, पण त्यासाठी अगोदरच तुमची माफी मागून घेतो.
हा तुम्हाला ‘पर्सनल अटॅक’ वाटला असेल तर कृपया मला माफ करा, माझा हेतू तसा नव्हता.

तुम्ही लोक आयुष्यभर भक्त बनून राहा किंवा आपचे अंध विरोधक बनून राहा, मी मात्र आप करत असलेल्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत पोहचवतच राहीन.

हे आवडलं.

सव्यसाची's picture

15 Mar 2015 - 3:20 pm | सव्यसाची

तुमचा हा प्रतिसाद मॉडेल प्रतिसाद म्हणून प्रत्येक पक्षाच्या समर्थकाला वापरता येण्याजोगा आहे. आपच्या जागी भाजप किंवा कॉंग्रेस किंवा दुसरी कोणतीही पार्टी तसेच त्या त्या पक्षातील नेत्यांची नावे टाकली हा प्रतिसाद सगळ्याच पक्षांना लागू होईल. असो.

अहो तुम्ही बघितलात तरी का वरचा व्हिडिओ ?
त्यात कुमार विश्वास यांनी मांडलेले मुद्दे तुम्हाला पटले का ?
पटले नसतील तर का पटले नाहीत यावर बोला ना.

मी तो व्हीडीओ पूर्ण पाहिला. कुमार विश्वास चांगले बोलतात हे म्हटलेच पाहिजे.

या मुलाखतीतील काही मुद्दे पटले नाहीत. उदाहरण म्हणून काही देतो आहे.
१) स्टिंग केलेल्या माणसाचा मोटीव ध्यानात घेऊन स्टिंग बरोबर कि चूक असे ठरवायचे आहे का? समजा मोटीव चांगला नसेल म्हणून जे स्टिंग मध्ये बोलले गेले आहे ते तर खरे आहे ना?
२) त्यांच्यामते जिंकून आल्यावर कथा नाही करायची आहे सरकार बनवायचे आहे तर सगळ्या गोष्टींची शोधाशोध केली पाहिजे. मला एवढेच कळले कि ते स्टिंग खोटे आहे असे मानत नाहीत पण त्यात काही चुकीचे आहे असे मानत नाहीत (चू. भू. द्या. घ्या). म्हणजे सरकार बनवण्यासाठी दुसरा पक्ष तोडला तर त्यात चूक काही नाही? म्हणजे जो काही घोडेबाजार आजपर्यंत चालायचा तो बरोबर? कि फक्त त्यात पैसा, पदाचे आमिष आला कि भ्रष्टाचार पण इतर वेळी मात्र political realignment?
जर तुम्ही असे मानत असाल तर मी थांबतो. पुढे बोलण्यात तसा अर्थ नाही.

सध्या तरी, चित्रफीत पाहिल्यावर, हे प्रकर्षाने समोर आलेले मुद्दे मला वाटले. बाकी अजून मुद्द्यावर बोलता येईलच.

नांदेडीअन's picture

16 Mar 2015 - 10:44 am | नांदेडीअन

तुमचा हा प्रतिसाद मॉडेल प्रतिसाद म्हणून प्रत्येक पक्षाच्या समर्थकाला वापरता येण्याजोगा आहे. आपच्या जागी भाजप किंवा कॉंग्रेस किंवा दुसरी कोणतीही पार्टी तसेच त्या त्या पक्षातील नेत्यांची नावे टाकली हा प्रतिसाद सगळ्याच पक्षांना लागू होईल. असो.

कॉंग्रेस-भाजपचा मी आजवर एकही असा समर्थक पाहिला नाही, जो कॉंग्रेस-भाजपने ‘केलेल्या कामांची’ माहिती शेअर करतो.
कॉंग्रेस समर्थक भाजपला शिव्या घालतात.
भाजप समर्थक आपवर बिनबुडाचे आरोप लावत असतात, किंवा आपवरचे पांचट जोक्स फॉर्वर्ड करत असतात.

माझ्यासारखे आपचे समर्थक आप करत असलेल्या कामाची माहिती दिल्लीबाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचावी याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात.
भाजपने आत्तापर्यंत १७६० U-Turns घेतलेत, तरीही त्यांचे भक्त त्या U-Turns चे केविलवाणे समर्थन करत असतात.
आपकडून एखादी चूक झाली, किंवा आपसुद्धा एखाद्या विषयावर इतर पक्षांसारखे वागत असेल, तर माझ्यासारखे आप समर्थक जमेल तसा, जमेल तिथे त्याचा विरोध करतात.
याचे साधे उदाहरण पाहायचे असेल, तर हा ग्रूप जॉईन करा.
https://www.facebook.com/groups/AamAadmiParty/

यश राज's picture

16 Mar 2015 - 11:33 am | यश राज

तुमचा हा प्रतिसाद पुर्णतः हास्यास्पद आहे. हे म्हणजे आम्ही म्हणतो तीच पुर्व दिशा.

कॉंग्रेस-भाजपचा मी आजवर एकही असा समर्थक पाहिला नाही, जो कॉंग्रेस-भाजपने ‘केलेल्या कामांची’ माहिती शेअर करतो..

अहो तुम्ही जे 'सो कॉलड्' रीपोर्ट कार्ड शेअर केले आहे त्याची वैधता काय आहे.? ते पुर्णपणे आप ने तयार केलेले रीपोर्ट कार्ड आहे हेवेसांनल. त्याच रीपोर्ट कार्ड वर तुम्ही भाजपा बरोबरच कंपेअर केलेले आहे ज्याची काही गरज नव्हती.

कॉंग्रेस समर्थक भाजपला शिव्या घालतात.
भाजप समर्थक आपवर बिनबुडाचे आरोप लावत असतात, किंवा आपवरचे पांचट जोक्स फॉर्वर्ड करत असतात.

अगदि हेच माझ्या माहीतेतले आप वाले करत असतात. त्यामूळे 'आप'ण कोणी वेगळे आहोत हा गैरसमज नसावा.

भाजपने आत्तापर्यंत १७६० U-Turns घेतलेत, तरीही त्यांचे भक्त त्या U-Turns चे केविलवाणे समर्थन करत असतात.

U-Turns बद्द्ल आप वाले न बोलले तेवढे उत्तम कारण सगळा ईतिहास सर्वश्रुत आहे.

तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तुम्हाला द्यायचे नसेल तर माझे काहीच म्हणणे नाही.

श्रीगुरुजी's picture

16 Mar 2015 - 1:06 pm | श्रीगुरुजी

>>> माझ्यासारखे आपचे समर्थक आप करत असलेल्या कामाची माहिती दिल्लीबाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचावी याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात.

>>> आपकडून एखादी चूक झाली, किंवा आपसुद्धा एखाद्या विषयावर इतर पक्षांसारखे वागत असेल, तर माझ्यासारखे आप समर्थक जमेल तसा, जमेल तिथे त्याचा विरोध करतात.

मी भाजपचा पेड समर्थक असून सोशल मिडीयात भाजपच्या बाजूने आणि इतरांच्या विरूद्ध लिहिण्यासाठी मला प्रत्येक लेखामागे, लेखातील प्रत्येक वाक्यामागे, प्रत्येक वाक्यातील प्रत्येक शब्दामागे मला भाजपकडून पैसे मिळतात असा जावईशोध मिपावर एका महाभागाने लावला होता.

तुमची वरील वाक्ये आणि तुम्ही सातत्याने करत असलेले 'आआप'चे समर्थन आणि इतर पक्षांवरील टीका पाहून इथले एक महाभाग तुमच्याबाबतीतही असाच जावईशोध लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या गाजत असलेल्या स्टिंग ऑपरेशन्सबद्दल कुमार विश्वास "यांच्याबद्दलचे" मत...

AAP's Kumar Vishwas Gets Defamation Notice on Leaked Tapes

नांदेडीअन's picture

16 Mar 2015 - 10:56 am | नांदेडीअन

माझ्यासारख्या आप समर्थकांचा अर्ध्याहून जास्त वेळ भक्तांच्या बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देण्यातच निघून जातो.

मी : आपचे हे रिपोर्ट कार्ड बघा. इतर पक्षांना ५ वर्षं कमी पडतात, ते यांनी ३० दिवसात करून दाखवले. काम करण्यासाठी इच्छाशक्ती लागते.

भक्त : ‘आप’ला फोर्ड फाऊंडेशन पैसा मिळतो. ही संस्था आतंकवाद्यांना पैसा पुरवते.
मी : ‘आप’ने यांच्याकडून एकही पैसा घेतलेला नाहीये. उलट गुजरात सरकारच्याच काही संस्थांना फोर्ड फाऊंडेशनकडून मदत मिळते.

भक्त : आपच्या संस्थापकांपैकी एक आणि सिनिअर लिडर असलेले आश्विनी उपाध्याय यांचा इंटरव्ह्यू बघितला नाही का ?
त्यात त्यांनी सांगितले आहे की आपच्या दिल्ली ऑफिसमध्ये आतंकवादी केजरीवालला भेटायला यायचे आणि काहीतरी प्लॅनिंग करायचे.
मी : एक तर अश्विनी उपाध्याय सिनिअर लिडर वगैरे काहीही नव्हते, आपच्या लिगल सेलमध्ये एक साधे स्वयंसेवक होते. आणि केजरीवाल जेव्हा आतंकवाद्यांसोबत प्लॅनिंग करायचा तेव्हा हे महाशय झोपले होते का ? यांनी पोलीसांना का कळवले नाही ?
बरं, आत्ता हे महाशय भाजपमध्ये गेले आहेत. केंद्रामध्ये यांचे सरकार आले आहे. यांनी सरकारला सगळे पुरावे देऊन केजरीवालला फासावर लटकवल्या जाईल अशी व्यवस्था करावी. कारण त्यांनी लावलेला आरोप साधासुधा नाहीये, देशाचा प्रश्न आहे आपल्या.

भक्त : अरे पण केजरीवाल तर भगोडा आहे ना.
मी: अरे, आप आणि केजरीवालने आत्तापर्यंत हजारवेळा माफी मागितली आहे याबद्दल.
तो भगोडा असता तर दिल्लीच्या जनतेने दुसर्‍यांदा कशाला निवडून दिले असते त्याला ? तेसुद्धा ७० पैकी ६७ सिट्स देऊन ?

भक्त : दिल्लीची जनता फुकटी आहे, सगळे फुकटचे पाहिजे त्यांना.
मी : फुकट फक्त पाणीच देत आहे आप सरकार.
कर्नाटकमध्ये भाजपवाले फ्री लॅपटॉप आणि १ रूपयाला २५ किलो तांदळाचे आश्वासन देत होते तेव्हा कर्नाटकी लोक फुकटे होते का ?

भक्त : चल, नंतर बोलू. काम आहे थोडे.
मी : अरे, सगळे प्रश्न तर तूच विचारले. आता मला चान्स दे ना.
मी विचारतो भाजपबद्दल थोडेसे. उत्तर देशील अशी अपेक्षा आहे.
काळजी करू नको. राम मंदिर, अडवाणी, PDP बद्दल काही विचारणार नाही.

भक्त : ऑफिसमध्ये खूप कामं पेंडिंग पडली आहेत, माझ्याकडे वेळ नाहीये आत्ता.
मी : निरूत्तर !

थोड्या वेळानंतर......

भक्त : अरे, नवीन स्टिंग ऑपरेशन पाहिले का केजरीवालचे ? मुस्लिमांबद्दल काय काय बोलतोय, कसले घाणेरडे राजकारण करतोय.
मी : नाही रे, पाहिले नाही. काय झाले ? नेमके काय बोलला तो ?
भक्त : नेमके माहित नाही रे. मी फक्त हेडलाईन तेव्हढी पाहिली. पण बघ, हेसुद्धा निघाले की नाही इतरांसारखेच !
मी : मी अजून पाहिले नाही हे स्टिंग. माहिती घ्यावी लागेल.

मी (स्टिंग ऑपरेशन आणि संबंधित इतर बातम्या पाहिल्यानंतर) : "लोकसंखेच्या आधारावर मुस्लिमांना जास्त सिट्स देण्याची गरज नाही. आपण कोणत्याही सिटकडे मुस्लिम सिट वगैरे म्हणून का बघतोय ? कॉंग्रेस दिल्लीतून संपली आहे आणि मुस्लिम भाजपला मत देणार नाहीत. त्यांच्यासाठी आम आदमी पार्टी एक आशेचा किरण आहे."
केजरीवाल हे बोलला आहे ^^ त्या टेपमध्ये.
यात काय चुकीचे आहे ? किंवा हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज आहे का ?
आणि केजरीवाल हे ३०० लोकांच्या सभेमध्ये बोलला होता, याला स्टिंग ऑपरेशन कसे म्हणता येईल ?
तूसुद्धा सांग मिडियाला, ’केजरीवाल मला हॉटेलमध्ये जेवतांना दिसला होता आणि त्याने शेवटी वेटरला ५० रूपयांची टिप दिली.’
’केजरीवाल का नया स्टिंग ऑपरेशन’ सारख्या हेडलाईन्स येतील सगळ्या न्यूज चॅनल्सवर आणि तू फेमस होशील.

भक्त : पण केजरीवाल भगोडा आहे.
मी : परत तेच ?

मी : अच्छा, आता तुला वेळ असेल तर मी भाजपबद्दल काही विचारू का ?
भक्त : खूप काम आहे यार मला. नंतर बोलूया का आपण ?
मी : परत एकदा निरूत्तर !

------------------------------------

नेहमीचेच आहे हे.
मी भक्तांसोबत आप करत असलेल्या कामांची माहिती शेअर करत असतो, आणि ते विषयाची अशी वाट लावत असतात.

यांना याचा आनंद नाहीये की पहिल्यांदाच आपल्या भारताच्या एका राज्यामध्ये असे सरकार आले आहे जे जनतेसाठी काम करत आहे.
यांना याचे दुःख आहे की आमचा भाजप एक वर्ष होत आले तरी जनतेची अशी कामं का करत नाहीये, किंवा आमच्या कॉंग्रेसने कधी जनतेप्रती उत्तरदायित्व का दाखवले नाही.

चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणे खरेच इतके अवघड असते का हो ?

हाडक्या's picture

30 Mar 2015 - 3:38 pm | हाडक्या

आप अथवा मोदी यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती परंतु खूप सार्‍या मित्रांच्या यांच्याकडून असलेल्या आशा आणि विश्वास पाहून उत्सुकता होती.
सध्या जे काही चालले आहे ते पाहून एवढेच म्हणावेसे वाटते की माझ्या पिढीच्या लोकांचा भ्रमनिरास आणि विश्वासघात करायचे सुरु आहे (जे माझ्या वडिलांच्या पिढीत कदाचित व्हिपी सिंग आणि तत्समांनी केले असावे).
आता पुढची पिढी आम्हाला विचारत येईल की तुम्ही एवढे उदासीन का तेव्हा कमीत कमी हे घटनाक्रम दाखवता तरी येतील..
असो.

विकास's picture

30 Mar 2015 - 9:13 pm | विकास

आधी जनता पार्टी
मग जनता दल (व्हि पि सिंग)
आता आप

समान धागा - प्रमुख नेते समाजवादी, स-माज (जहाजातला "ज") आणि वाद घालत बसणारे.

त्यामुळे त्यातील चांगल्या लोकांचे देखील नुकसान झाले आणि ज्यांना आशा वाटली अशा सामान्य मतदारांचा भ्रमनिरास. अर्थात आप मधे आत्ता नक्की कोण चांगले आहे हा एक संशोधनाचा मुद्दा ठरू शकेल.

ही एक फुकटच्या पैश्यावर जगणारी जमात आहे. ह्याचा खरा चेहरा लक्षात आलेले एक एक जण आप मधुन बाहेर पडत आहेत.
लोकपाल सारख्या क्रांतीकारी मुद्द्यावर जनतेत वाढलेल्या आप ने आपले स्वःताचे लोकपाल अ‍ॅड.रामदास ह्याची केलेली हकालपट्टी सर्व काही सांगुन जाते. खेतान,आशुतोष,कुमार विश्वास किंवा सिसोदिया हे सर्व एन्जिओ चालवुन घर भरणारी माणसे,ह्याच्यावर किती विश्वास टाकायचा हे लोकांनी ठरवायला पाहिजे होते.
ह्या आपच्या नादात भारावल्यामुळे मात्र चांगले असणारे मित्र दुरावले ह्याचे दु:ख वाटते.त्यांना हे आपचे नेमके स्वरुप लौकर लक्षात यावे.

रमेश आठवले's picture

31 Mar 2015 - 9:48 pm | रमेश आठवले

अब्राहम लिंकन यांनी म्हटले आहे--
You can fool some of the people all of the time, and all of the people some of the time, but you can not fool all of the people all of the time.