वाद

मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग २: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी) माहिती साठ्याची कमतरता

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
10 Mar 2014 - 11:30 am

वस्तुतः चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी ह्या विषयाच्या सांगोपांग चर्चेस अजूनही वाव आहे. माझ्या निरीक्षणांनुसार मराठी आणि महाराष्ट्र संबंधी कोणत्याही विषयावर हिट्सचा अभ्यास केला तर मराठी माणसाचा मराठी आणि महाराष्ट्र विषयीचा जिव्हाळा कायम आहे पण अजूनही ९०-९५ टक्के शक्य श्रोता अथवा वाचकवर्ग इंग्रजीतूनच शोध घेतो मराठीत शोधत अथवा वाचतच नाही लेखन दूरची गोष्ट आहे; याच एक कारण मराठी भाषेतील ऑनलाईन मराठीत ज्ञान आणि माहिती साठ्याची कमतरता आहे.

ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
9 Mar 2014 - 1:15 pm

व्यक्ती, कुटूंब, व्यवसाय, ते असंख्य सामाजिक, जातीय, धार्मीक, राजकीय, केवळ माझच (आमचंच खर) म्हणणार्‍या टोकाच्या भूमीका; व्यक्तीगत आणि समुहांच्या हिताची गणित अनेक संघर्षांना टोकाला नेत असतात.

संस्कृतीधर्मसमाजतंत्रराजकारणशिक्षणविचारमाहितीवादप्रतिभा

बौद्धिक कृष्णविवर

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
1 Mar 2014 - 2:39 pm

बौद्धिक कृष्णविवर:

लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते.

बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४]

संस्कृतीसमाजतंत्रविज्ञानविचारसमीक्षावादप्रतिभा

हिन्दुत्ववादी ते हिन्दुत्वविरोधक मतांतराचा प्रवास

वैनतेय's picture
वैनतेय in काथ्याकूट
26 Feb 2014 - 12:30 pm

समस्त मिपाकार मंडळी,

राम राम!

बरेच लेख / प्रतिक्रिया वाचताना मला एक गोष्ट ठळकपणे जाणवली, ती म्हणजे आपल्यापैकी अनेकजण "पुर्वी हिन्दुत्ववादी होते". याचाच अर्थ आपले मतांतर झाले आहे. ते का झाले हे समजावुन घेण्याचा हा प्रयत्न...

१. आपण कशामुळे हिन्दुत्ववादी विचारांकडे झुकलात?
२. असे काय घडले ज्यामुळे आपण हिन्दुत्वविरोधक झालात?

वरील दोन्ही प्रश्नांची ऊत्तरे परिस्थिती, घटना, व्यक्ती, वाचन, संघ शाखा, शिवसेना अथवा भा.ज.पा. किंवा तत्सम संघटना या अनुषंगाने अपेक्षित आहेत.

मिपा सर्वे म्हणुयात का याला?

धिस इज द सिस्टीम !

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
25 Jan 2014 - 11:28 pm

'विथ रेफरन्स टु धिस ऑफिस लेटर डेटेड सिक्स्थ डिसेंबर, वी आर टु इनफॉर्म यू दॅट ...'
'बीप बिपीप ...बीप बिपीप..' लँडलाइनच्या आवाजाने मी सेक्रेटरीला देत असलेले डिक्टेशन मधेच खंडित झाले.
सकाळपासून मी ते महत्वाचे पत्र कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करीत होते. पण भेटायला येणाऱ्या लोकांच्या एकसारख्या फ्लोमुळे ते काही बेटे मूर्त स्वरूपात येईना. अखेर सेक्रेटरीला बोलावून मी ते पूर्ण करण्याचा निकराचा प्रयत्न चालवला असताना पुन्हा या लँडलाइनने घात केला.
'ओह शिट...हॅलो ?' पहिले दोन शब्द अर्थातच मी रिसिव्हर उचलण्यापूर्वी म्हटले होते.

मांडणीसमाजरेखाटनअनुभववाद

वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
18 Jan 2014 - 11:52 am

१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत.

नाईट-ओव्हर!!!

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
11 Jan 2014 - 12:55 am

सुट्टीच्या दिवसात आई-वडील गावाला निघाले की पोरं जाम खुश होतात... लगेच ग्रुपमधल्या सगळ्या मेंबरांना फोनाफोनी होते. प्रत्येकाने किती किती पैसे काढायचे याचा एक अंदाज ठरतो. कोणकोणत्या मुलींना बोलवायचं(किंवा होस्ट मुलगीच असेल तर सोन्याहूनही पिवळं), कोणाला कटवायचं वगैरे बोलणी होते. प्रत्येकाचे आपआपल्या पसंतीनुसार आणि ऐपतीनुसार 'ब्रँड्स' ठरलेले असतात. कोणी नुकतीच भीष्म प्रतिज्ञा करून 'दारू सिगरेटला हात लावणार नाही' असा चारजणांचे ग्लास समोर भरलेले दिसल्यावर आपोआप ढळणारा अढळ निश्चय केलेला असतो.

कथाविचारमतवाद

शरीरसंबंधांना नकार हे क्रौर्य ????

खटासि खट's picture
खटासि खट in काथ्याकूट
16 Dec 2013 - 9:27 am

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=E3NLG
(बातमी जुनीच आहे. कुणी तरी धागा काढेल असं वाटलं होतं म्हणून महत्वाचा असूनही मागे पडला विषय).

चावडीवरच्या गप्पा - 'आप'आपली मते

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
10 Dec 2013 - 3:01 pm

chawadee

“पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत.

“वेबसाइट, ब्लॉग...बरं... बरं... काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

समाजजीवनमानप्रकटनमाध्यमवेधवादविरंगुळा

सिंगापुरातील दंगल

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
9 Dec 2013 - 4:12 pm

आज एक महत्वाची बातमी वाचली. महत्वाची मी म्हणतोय कारण ती मला महत्वाची वाटली. सिंगापूर मधे भारतीय वंशाच्या एका कामगाराचा अपघाती मृत्यू आणि त्यानंतर दंगल. त्या दंगलीत अनेक जखमी, लाखोंची वित्तहानी इत्यादी.

सिंगापूर हा अतिशय शांत देश आहे, तिथे न्यायव्यवस्था अतिशय कडक आहे आणि त्यामुळे तो एक सेफ देश समजला जातो. हे खरं आहे, तिथे रहाणा-या माझ्या परिचयाच्या व्यक्तींच्या अनुभवावरून मी असं म्हणू शकतो. आता तिथे ही अशी घटना झाली. जी गेल्या ३० वर्षात झाली नव्हती.