कोरोना लसींची चाचणी
सध्या भारतात कोविड-१९ लसीकरण मोहीम चालू आहे. मी स्वतः सध्या त्याकरता पात्र नाही. मित्रांशी बोलत असताना असे जाणवले की ते ही सध्या उपलब्ध असलेल्या लसींबद्दल थोडे साशंक आहेत. त्यामुळे मी या लसींच्या चाचण्यांबद्दल जर्नल्स मध्ये उपलब्ध असलेले संशोधन-लेख वाचले आणि लसींच्या चाचणी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. ती माहिती आपल्या समोर ठेवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. ICMR Covid Vaccine येथे चाचणी अवस्थेत किंवा वापरात असलेल्या सर्व लसींबद्दल माहिती उपलब्ध आहे. मला वैद्यक किंवा औषध निर्माण या शाखांचे कोणतेही शिक्षण नाही.
kool.amol यांनी या आधीच कोरोना लसीबद्दल (misalpav) लिखाण केलेले आहे आणि त्याखालील चर्चेत विविध मुद्दे उपस्थित झालेले आहेत.