बुकीश - पुस्तकांवरचा एक टीव्ही शो
नमस्कार ,
बर्याच दिवसांनी बोलतोय तुमच्याशी ... आजकाल मिसळपाव वर वाचन मात्रच असतो ..पण , असतो एवढं नक्की ...
नवं काही केलं की ते मिसळपाव वर अधी सांगायचं ही माझी जुनी सवय ...
(बघता बघता मिसळपाव शी कनेक्ट होऊन ५ वर्षे होत आली मला !!! )
त्यासाठीच आजही लिहितोय येथे
गेल्या म्हणजे जुनच्या सुट्टीत एक वेगळा प्रयोग केला ...
कोल्हापुरात एक लोकल टीव्ही चॅनेल आहे ..चॅनेल "बी" म्हणुन ...
त्यासाठी एक टीव्ही शो केला ..बुकीश नावाचा .. पुर्णपणे पुस्तकांवर आधारीत ...
त्याची मांडणी , सूत्रसंचालन आणि दिग्दर्शन करायची संधी मिळाली होती