मिपा ची सवत!
मी आणि माझ्यासारखे अनेक लोकं मिपाचे फार पूर्वीपासूनचे सभासद आहेत. मी मिपावर नाही म्हंटलं तरी बर्यापैकी लेखनही केलेलं आहे. पण पूर्वीपासून इथे लेखन करण्यातली एक अडचण म्हणजे तुमच्या लेखनात जर फोटो टाकायचे असतील तर ते डायरेक्टली इथे टाकता येत नाहीत. त्यासाठी मग प्रथम फ्लिकरवर जा, तिथे फोटो लोड करा, आणि मग इथे त्या फोटोंची लिंक द्या वगैरे सव्यापसव्य करावं लागतं....
पूर्वी हे सगळं केलंही. पण आता स्वतःच्या ब्लॉगवर किंवा फेसबुकावर सरळ डायरेक्टली आपल्या लॅप्टॉपवरून फोटो अपलोड करता येतात. काम खूप सुटसुटीत होतं.....