टोपण नावे
मराठीतील टोपण नावे आणि मूळ लेखकाचे नाव ह्यांची यादी करूयात का?
१. कलंदर : अशोक जैन
२. ठणठणपाळ : जयवंत दळवी
३. तंबी दुराई : ??
४. ब्रिटीश नंदी : प्रविण टोकेकर
मराठीतील टोपण नावे आणि मूळ लेखकाचे नाव ह्यांची यादी करूयात का?
१. कलंदर : अशोक जैन
२. ठणठणपाळ : जयवंत दळवी
३. तंबी दुराई : ??
४. ब्रिटीश नंदी : प्रविण टोकेकर
उर्फ पु.ल. वरील शिर्षकातले नाव त्यांनीच "अपूर्वाई" ह्या त्यांच्या प्रवासवर्णनामध्ये फ्रांसच्या भेटीवर असताना घेतले होते. पु.ल. म्हंटल्यावर काही लांबलचक लिहून त्यांची ओळख वगैरे मी करून द्यावी ह्याची गरज नाही. पण मराठीतल्या विनोदाची उंची....सॉरी शुद्ध,निर्मळ,निर्भेळ विनोदाची त्यांनी गाठलेली उंची आजचे काही लेखक (त्याच्या पायथ्यापर्यंतही पोहचू शकत नसताना)गाठण्याचा प्रयत्न करताना पहिले की मला रावसाहेब आठवतात ते म्हणतात "बदला की वो चाऽऽऽल, ते दिनानाथ नाही का बदलले पण त्यांचा अधिकार होता म्हणतोय मी...." थोडक्यात आजचे लेखक "कोटीच्या" नावाखाली जे करतात त्याने खूप त्रास होतो.
जीएंना महाभारताचे खुप आकर्षण होते हे आता सर्वश्रुत आहे. प्रतिभावंताचा विषय निघाला की जीए हटकुन व्यासांचे नाव घेत. जीएंच्या कथांमध्ये काही ठिकाणी महाभारताचे संदर्भ आलेले आढळतात. त्या उपमांनी, संदर्भांनी जीएंच्या कथांना एक वेगळीच श्रीमंती बहाल केलेली दिसते. त्यादृष्टीने जीएंची पत्रे महत्वाची आहेत. विशेषतः सुनिताबाईंना लिहिलेल्या जीएंच्या पत्रांत त्यांनी महाभारतावर, त्यातील व्यक्तीरेखांवर चर्चा केली आहे. ज्या तर्हेने जीए या विषयावर लिहितात त्यावरुन हे जाणवते की महाभारत हा त्यांच्या सततच्या चिंतनाचा विषय असावा.
मरीन ड्राईव्हला गेलो होतो(अर्थातच एकटा गेलो नव्हतो, पण ते महत्त्वाचं नाहीये). मरीन लाईन्स स्टेशनवर उतरून रस्ता ओलांडून कठड्यावर चढलो. वेळ गर्दीची नव्हती. त्यामुळे बसायला जागा भरपूर होती. पण बसावं, असं त्या अखंड कठड्यावरच्या एकाही ठिकाणी वाटलं नाही. आम्ही नुसतेच बसण्याजोगी जागा शोधत त्या कठड्यावरून फिरत होतो बराच वेळ. कोणी म्हणेल, की अरे मरीन ड्राईव्हचा एवढा लांबलचक कठडा, समोर एवढा अथांग समुद्र आणि बसण्याजोगी जागा नाही म्हणतोस?? बसण्याजोगी म्हणजे कठड्यावरची अशी जागा ज्यावर पिंक टाकल्याच्या खुणा नसतील आणि ज्याच्या पुढ्यात, खाली कचरा पडलेला नसेल अशी.
नुकताच शाळेचा ब्लॉग वाचला... आणि एकदम शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. मित्र-मैत्रीण आठवले, मैदान आठवलं, आपण केलेली मस्तीही आठवली. पण प्रकर्षाने आठवण आली, ती शिक्षकांची... आपल्या आवडत्या, चांगल्या शिक्षकांची आणि काही विनोदी शिक्षकांची सुद्धा.
अस्मादिकांना एलर्जी, हृदय आणि मणक्याचे दुखण्याचा त्रास असल्या मुळे मेट्रोत तास भर उभे राहून प्रवास करणे त्रासदायकच. म्हणतात न ‘जहाँ चाह, वहाँ राह’ बसायला सीट कशी मिळवावी या वर बरेच विचार मंथन केले. वय मोठ दिसाव म्हणून पांढऱ्या झालेल्या केसांना रंगविणे सोडून दिले.
आयुष्य हे......
संध्यासमयी सुमारे ४ वाजता आम्ही फेसबुक फेसबुक खेळण्यात मग्न असताना मोबाइल खणखणला , स्क्रीनवर घरचा नंबर. अरेच्या ! ह्यावेळी कोणी फोन केला असेल ? म्हणुन फोन पट्कन उचलला पलिकडुन
आई " ह्यालो सोनुडया तुला एक तास अगोदर रजा मिळेल का ग ऑफिसातुन ?
मी : का ग आई ? काय झाले ? काही गड्बड आहे का ?
आई : हो जरा काम आहे मह्त्वाचे घरी आल्यावर सांगते पण तु ये पटकन .
मी जरा चाचरतच विचारले आइ सगळे व्यवस्थित तर आहे ना ग ? काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला ?
हि मी अश्विनी या नौदलाच्या कुलाबा रुग्णालयात काम करीत असतानाची गोष्ट आहे. तो मंगळवार होता. एके दिवशी रात्री दहा वाजता मला नौदलाच्या पोलिस स्टेशन वरून फोन आला कि लवकर रुग्णवाहिका पाठवा. मी चौकशी केली तेंव्हा आमच्या दोन रुग्णवाहिका बाहेर गेल्या होत्या.एक रुग्णाला पोहोचवायला आणि दुसरी आणायला गेली होती. इतर दोन रुग्णवाहिका उभ्या होत्या पण त्यात चालक नव्हता(रात्रपाळीला दोन चालक असत). मी तिथे सूचना देऊन ठेवली होती कि रुग्णवाहिका जशी येईल तशीच पोलिस स्टेशन ला पाठवा. पुढच्या दहा मिनिटात परत दोन वेळा फोन आला कि ताबडतोब रुग्णवाहिका पाठवा.
कॉपीराईट संबंधी एक दिशा देणारी चर्चा येथे करता येईल का ? मिपा हे एका अर्थाने प्रकाशक आहेत. वेगवेगळ्या नावाने इथें वावरणारे लेखक /कवी आणि त्यांचे लेखन याचा कॉपीराईटशी कितपत संबंध आहे??