अस्तित्व

अस्तितत्वता नसते जिथे या जगाची
दूर-दूर....अशा निवांत निश्चल एकांती
रम्य निर्मळशा सरिते काठी
शांत-शांत ... अन हिरवी जेथे वनराई
निर्झराचे वाही चम् -चम् पाणी
गाई खळखळ मंजूळ गाणी
धुंद धावतो पवनही रानोरानी
शीळ मधुर वाजवीत पानोपानी

अस्तितत्वता नसते जिथे या जगाची
दूर-दूर....अशा निवांत निश्चल एकांती
रम्य निर्मळशा सरिते काठी
शांत-शांत ... अन हिरवी जेथे वनराई
निर्झराचे वाही चम् -चम् पाणी
गाई खळखळ मंजूळ गाणी
धुंद धावतो पवनही रानोरानी
शीळ मधुर वाजवीत पानोपानी
ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते,
ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते!
क्षण गुंतुनी जातोय जो पुढच्या क्षणी निःशब्दसा
त्याने युगांनाही लुटायाचे मला भय वाटते!
बंदिस्त माझे जाहले आहेत स्वर काचांतुनी
मी गाउ जाता त्या फुटायाचे मला भय वाटते!!
हा दाटला काळोख माझ्या भोवती चोहीकडे
धमन्यातला पारा सुटायाचे मला भय वाटते!!
आहे वसंताचा ऋतू अजुनी कितीतरी दूरसा
अन पाकळ्या माझ्या नटायाचे मला भय वाटते!!
-मनमेघ
टीप- ही गझल नाही. गझल सारखी वाटत असली तरीही. तेव्हा तंत्राचा मुद्दा बाजूला ठेवून वाचावीत ही नम्र विनंती.
प्रेम तुझे हे बरसणारे
पाण्यावर हलकेच तरंगणारे फुलच जसे काही
तोच मंद मंद सुवास दरवळतो मनात खास
तोच तो कोमलपणा वेड लावे जीवा
तुझाच ध्यास अन् प्रेमाचाच श्र्वास
तुझ्याच आठवणींची मनात रास
असता जवळ तु हरपतसे भान
दुर जाताच हे जीवन माळरान
तुझ्यात रमले आणि विरघळले
जशी विरघळावी दुधात साखर
आणि उरले फक्त प्रेमच प्रेम... प्रेमच प्रेम
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
स्वप्नात झाले होते
पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!)
पंतप्रधान मोदींचे सचीव !! :)
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले गेले
वर्ष भर काय केले ?
ओबामां फोनु आला
डू यु नो अँड व्हॉट दे सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !! बरं का !
हॅप्पी न्यू यीअर !!
श्री न. गोळे ह्यांच्या कविते ला मिळालेल्या प्रतिसादातून हा विषय घेऊन येण्याची परवानगी असावी.
कविता कुणाची असते , हा प्रश्नच मनास विचलित करून गेला , ह्या सर्व प्रतिसादांमधून.
हे प्रश्न मी कविते च्याच माध्यमातून विचारतो आहे. सर्वांनी कृपया जोड द्यावी.
विडंबन, जोड , सर्व काही - आपल्या सर्वांची कविता :)
कविता कुणाची
कवीच्या भावनेच्या अथांग समुद्रातून
अमृत स्वरूपात आलेली
ती कविता
कुणाची?
माझिया मनासी कधी तरी
वाटते फिरावे नदितिरी ||
हळूच घेउन हाती
हिरव्या गवताची
कुरवाळावी पाती ||
नाजुक.... गुजगोष्टी
सांगाव्यात तयाशी
भेटून त्याना लोटले
दिस आज किती तरी - ||
सांगावे नाते जलदाचे
नदीच्या संथ जळाशी
संबध ऐलतीराचा
आणि पैलतीराशी
तसाच सरितेचा
सांगावा सागराशी
जन्म गिरिकुंदरमाहेरी
सार्थक अर्णवी पद सासरी ||
वाटते मना परोपरी
नित्य फिरावे नदितिरी ||
आठवण ही का अशी जागवी मनाला
प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।
रात्र वेडी जागताना अंतरंग मोहरे
पाहताना मी तुला चांदणे ही बावरे
का असे भास होती वेड्या मनाला
प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।
रातराणीच्या फुलांचा घेऊनी सुगंध
प्रीत वेडे पाखरू हे मनी झाले दंग
नशा तुझ्या प्रेमाची ही आवडे मनाला
प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।
आठवण ही का अशी जागवी मनाला
प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।
वेळूच्या बनात
एक पाखरू एकटे
शीळ देई वारियाला
सांगे जा तू घरट्याला
वारा उनाड बावरा
घुमे वेळूच्या भवती
म्हणे वेळूचे गे गाणे
गळा भर, पाखराला
पारा उन्हाचा महान
लखलख मृगजळ करी
कंठी पाखराच्या परि
पाऊस घरचा ओला
जीव बनी अडकला
जीव एक घरट्यात
देई हळवा संधिकाल
बळ नाजूक पंखाला
- संदीप चांदणे
घरात माणसे कमी
अन लोक वाढतात
तेव्हा गॅलरीची 'एक्स्ट्रा रूम' होते!
घरात नव्याला सूज येते
अन जुन्याचे कुपोषण होते
तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो!
घरात वाचणारे कमी
अन वाचाळ जास्त होतात
तेव्हा गॅलरीचा रद्दीखाना होतो!
घरात आवाज कमी
अन गोंगाट जास्त होतो
तेव्हा गॅलरीत 'सायलेंट झोन' येतो!
घरात हवे ते कमी
अन नको ते जास्त येते
तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते!
घरात दिवस कमी
अन रात्री जास्त होतात
तेव्हा गॅलरीत बोन्साय वाढतात (?)
खरं सांगू हल्ली काही सुचतच नाही
ह्या बोथट मनाला हल्ली काही बोचतच नाही
ह्या शहरात राहून संवेदना झाल्यात बधीर
इथे जो तो नुसतेच फोटो काढायला अधीर
पडणारा कोणीतरी आकांताने हात मागतोय
बघणारा मोबाईलमध्ये त्याचाच फोटो काढतोय
तो पलीकडे लटकतोय… मला काय त्याचे ??
आपण तिथे नाही ना मग आपल्याला काय करायचे ?
तोही कोणाचा कोणीतरी असेल … मग असू देत ….
उद्या त्याच्यासाठी कोणीतरी रडेल … रडू देत ….
मी माझ्याच कोशात सुरक्षित आहे ना….
मग बाकीच्यांना काहीही करू देत ….