प्रेम तुझे हे बरसणारे

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जे न देखे रवी...
24 Dec 2015 - 7:53 am

प्रेम तुझे हे बरसणारे

पाण्यावर हलकेच तरंगणारे फुलच जसे काही

तोच मंद मंद सुवास दरवळतो मनात खास

तोच तो कोमलपणा वेड लावे जीवा

तुझाच ध्यास अन् प्रेमाचाच श्र्वास

तुझ्याच आठवणींची मनात रास

असता जवळ तु हरपतसे भान

दुर जाताच हे जीवन माळरान

तुझ्यात रमले आणि विरघळले

जशी विरघळावी दुधात साखर

आणि उरले फक्त प्रेमच प्रेम... प्रेमच प्रेम

कविता माझीकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

24 Dec 2015 - 9:08 am | प्रचेतस

???

DEADPOOL's picture

24 Dec 2015 - 10:46 am | DEADPOOL

पण जरा छंदबद्ध असायला हवी होती!
छंदबद्धच म्हणतात ना?

यमक, छंद, मात्रा, वृत्त, मीटर बीटर असे कै नसते.
.
.
आली लहर केला कहर, हेच कवितेचे सत्व असते

DEADPOOL's picture

24 Dec 2015 - 11:54 am | DEADPOOL

अभ्याशेठ सॉरी हं!
माहितीच नव्हतं मला!