कविता माझी

अंधार वेशी वरचे

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
3 Dec 2015 - 8:04 pm

लिहित गेलो मी
वेचत गेलो
प्रश्न अनेक
अनुत्तरीत
अनेक पाने विखुरलेली
गुरफटलेली… शब्दांत !

लागते कोठे झोप हल्ली
रात्रच रात्र आहे वेशी वर
अंधार ही
आवाज मुके
मोर पंख सुके
रात्रीस जणु कापून डोळ्यात
स्वप्न सारे
भिजले आसवात

वेदना असंख्य
रक्त वाहते
लिहित अविरत
बोरू न थांबे

कविता माझीसमाज

मावळत्या या संध्याकाळी ....

सत्य धर्म's picture
सत्य धर्म in जे न देखे रवी...
29 Nov 2015 - 2:21 pm

मावळत्या या संध्याकाळी ....

मावळत्या या संध्याकाळी, पुन्हा फिरून पहाताना....
क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा.

मावळत्या या संध्याकाळी, सूर्य बिम्ब ते लाल गुलाबी,
क्षणभर ते रंग उधली आण हळूच होई क्षितीजाखाली.

मावळत्या या संध्याकाळी, पुन्हा फिरून पहाताना...
क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा.

मावळत्या या संध्याकाळी, काय वाटे त्या सुर्याला,
उगावत्यास नमस्कार मावळत्यास पाठ करी हीच जगाची रित खरी.

मावळत्या या संध्याकाळी, पुन्हा फिरून पहाताना...
क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा.

कविता माझीकविता

लंगोट तुझा ना राहिला, ना अस्थीही तुझ्या राहिल्या

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
28 Nov 2015 - 5:24 pm

प्रेरणा १ प्रेरणा २ प्रेरणा ३ आणि कदाचित अत्यल्प प्रभाव अशा चार चार कवि आणि कवितांची माफी मागून हि भूछत्री विडंबन जिलबी वाचक सेवेत सादर.

लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या
ना याद तुझी राहिली, ना कर्म तुझे राहिले

चरत होतास तू या जगी पोट आणि पोपटी वासना
स्वप्नांचा खेळ ठेऊनी पोपट मैना उडाले ततक्षणा

कविता माझीजिलबीभूछत्रीविठ्ठलसांत्वनाकविताविडंबन

करवाचौथ

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
28 Nov 2015 - 2:16 pm

आकाशगंगेत पसरलेल्या चांदण्यांच्या गराड्यात चाळणीतून चंद्र शोधणारी,
तू कशी दिसत होतीस गं ,
अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ???

डी.डी.एल.जे मधल्या काजोल सारखी तर नक्कीच नाही...

आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा.
कोकणकड्यावर बसुन नवलाइने डोळ्यात चंद्र सामावून घेणारा.

आतशा दोघांचेही चंद्र वेगवेगळे आहे म्हणा
फक्त तुझा उपवास 'करवाचौथ'चा असतो,
आणि
माझा 'संकष्टी चतुर्थी' चा.

जिप्सी

कविता माझीमुक्त कविताकलाकविता

स्वप्न सुंदर

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
23 Nov 2015 - 8:23 pm

स्वप्नातल्या फुलांची स्वप्नात भेट झाली,
 हलकेच पापणीला हळूवार जाग आली.

रातराणीचा गंध वेडावून गेला
मना जीवनाला नवा रंग आला
खुलावल्या कळ्यांना आशा नवी मिळाली
अन्
हलकेच पापणीला हळूवार जाग आली.

धुके हे अनामिक मनी साठलेले
स्वच्छंद स्वप्न हे उरी दाटलेले
ओलावल्या क्षणांना छेडून आस गेली
अन्
हलकेच पापणीला हळूवार जाग आली.

पहाट ही ओली सुखावून जाते
बावरे मन हे मग शहारून जाते
गोड त्या स्वप्नांनी मने भारावून गेली
अन्
हलकेच पापणीला हळूवार जाग आली.

कविता माझीकविता

एक कविता मनाची.......

मयुरMK's picture
मयुरMK in जे न देखे रवी...
22 Nov 2015 - 10:40 am

एक कविता मनाची
एक कविता जनाची
मना वाटते, राजा मी व्हावे
जन म्हणती, तू रंकचि रहावे-

एक कविता स्वप्नाची
एक कविता सत्याची
स्वप्न म्हणे, गगनात विहरावे
सत्य म्हणे, कदर्मी तू कुजावे -

एक कविता नात्याची
एक कविता जातीची
नाते म्हणे, आमचाच हां स्वकीय
जात म्हणे, कोण हां परकीय-

एक कविता प्रश्नाची
एक कविता क्षणाची
प्रश्न म्हणे,मी कधी संपणार नाही
क्षण म्हणे, मी कधी थांबणार नाही-

ही कविता जीवनाची
ही कविता मरणाची
जीवन म्हणे, ना मी कुणाची मालमत्ता
मरण म्हणे, इथे तर आहे माझीच सत्ता -

कविता माझीमुक्तक

गॅलरी .....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
21 Nov 2015 - 11:07 pm

एक हात कठड्यावर ठेऊन,
अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन,
मी उभा आहे गॅलरीत!

तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर
मन रमून गेले फार!
इथेच बसून नाही का लावत
तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला!

नाही.....वेडा नव्हतोच कधी
समंजस होतो खूप म्हणून
गॅलरी नाही ओलांडत
आजही!

मला नाही जमत लिहायला,
तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला!
इतकं जग पाहूनही
प्रेमबीम पण नाही कळत मला!

कविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताविराणीसांत्वनाकरुणकवितामुक्तकदेशांतरस्थिरचित्र

मी तुझा

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
18 Nov 2015 - 9:14 pm

या नभातील तारका तू मी तुझा गं चांदवा
सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।

रंग हे तारांगणीचे रंगले नयनी तुझ्या
छंद माझे गंध होऊन दंगले स्वप्नी तुझ्या
तू असे आकार माझा मी गुलाबी ही हवा
सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।

अंतरीचे ते चिरंतर स्वप्न तु जे पाहीले
तेच माझ्या या मनाच्या अंतरीही रंगले
तुच सारी राञ माझी मी नशीला काजवा
सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।   

कविता माझीकविताप्रेमकाव्य

शौ(चौ) र्यनिखारे

मोगा's picture
मोगा in जे न देखे रवी...
11 Nov 2015 - 10:02 am

पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली
तेव्हां
काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर
गजला करत उभा होता
बाजी बोलला
जमवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली
आता मायबोली सर्चमधून
तेच तेच जुने मतले काढून
राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो.

कविता माझीकाहीच्या काही कविताभावकवितामुक्त कवितावाङ्मयशेतीभयानकहास्यवीररसअद्भुतरससंगीतधर्मइतिहासवाङ्मयकवितामुक्तकविडंबनभाषाविनोदसमाजजीवनमानभूगोलराजकारणमौजमजा

तिथली दिवाळी.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
9 Nov 2015 - 7:18 pm

तिथली दिवाळी.....

तीरकामठा रंगीत कागद
चिखलमाती अर्धा किल्ला....
शिवाजीच्या मावळ्यांहाती,
परत फराळ ठेवशील का?

पहाट झोपेत हळूच उठवून
घमघमणारी आंघोळ घालून,
फुलबाजांची हजार फुले
परत हातात ठेवशील का?

रांगोळीतील हुकले ठिपके
रेषांमधील नाजूक वळणे,
तुळशीमाईचे लगीन लटके
परत दणक्यात लावशील का?

किणकिण बांगड्या काचेच्या
घिरघीर झालरी पोरींच्या!
सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या
परत उडवण्या येशील का?

कविता माझीभावकविताविराणीसांत्वनाकरुणसंस्कृतीकवितासाहित्यिकसमाजजीवनमानदेशांतर